बॅडमिंटन खेळाविषयी माहिती मराठीमध्ये | Badminton Information In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला बॅडमिंटन खेळाविषयी माहिती मराठीमध्ये सांगणार आहे म्हणजेच Badminton Information In Marathi खोलवर सांगणार आहे.

बॅडमिंटन म्हणजे रॅकेट्स आणि शटल यांचा खेळ… जनसामान्यांमध्ये तसा खूप कमी लोकप्रिय खेळ जरी असला तरी देखील बरेचसे लोक या खेळाला ओळखतात. लोकांना या खेळाचे नियम आणि इतर महत्वाच्या गोष्टी माहीत नसल्या तरी देखील लोकांना या खेळाविषयी मूलभूत गोष्टी मात्र माहिती आहेत. याच बॅडमिंटन खेळाचे नियम, महत्वाच्या गोष्टी आणि इतर काही माहिती (Badminton Rules, Badminton important things, Badminton Game information in Marathi) आज आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय कन्या पी व्ही सिंधु हिने ऑलम्पिक मध्ये ऑलम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन खेळात कांस्य पदक जिंकून पुन्हा एकदा भारतीयांना या बॅडमिंटन खेळाकडे बघायला लावले आहे. सायना नेहवाल, कदंबी श्रीकांत, गोपीचंद सारख्या खेळाडूंनी या खेळाला भारतात देखील थोडीफार लोकप्रियता मिळवून देण्याचे काम केले आहे.

बॅडमिंटन खेळाचा इतिहास – History Of Badminton In Marathi

बॅडमिंटन खेळाचा इतिहास तसा जास्त सापडत नाही परंतु असे देखील म्हणले जाते की खेळाची सुरुवात ही भारतातून झाली असावी. ब्रिटिशांनी 19 व्या शतकाच्या मध्यवर्ती भारतात हा खेळ खेळायला सुरुवात केली होती. हा खेळ ब्रिटिश छावणी पुना येथे जास्त प्रसिद्ध होता म्हणून त्याला पुनई या नावाने ओळख देखील मिळाली होती. परंतु त्याआधी देखील इ स 1500 मध्ये बॅडमिंटन हा खेळला गेला असावा असे काही संदर्भ सापडतात.

ड्युक ऑफ ब्युफर्ट यांनी पहिल्यांदा हा खेळ त्यांच्या मित्रांच्या सोबत खेळला होता त्यामुळे कदाचित ड्युक ऑफ ब्युफर्ट यांना बॅडमिंटन खेळाचे जनक म्हणले जाते.

बॅडमिंटन खेळासाठी एक जगमान्य नियमावली ही 1934 नंतर आली. 1934 मध्ये वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन ची स्थापना झाली. त्यांनी बॅडमिंटन खेळाला एक साचेबद्ध आणि नियम बद्ध केले. यामध्ये त्यांनी कोर्ट, रॅकेट्स, शटलकॉक यांच्यावर नियम घातले. या संघटनेत आणि बॅडमिंटन च्या होणाऱ्या स्पर्धांमध्ये देखील आशियाई देशांचे वर्चस्व भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. 1992 साली ऑलम्पिक मध्ये बॅडमिंटन खेळाला स्थान मिळाले. आता बॅडमिंटन मध्ये पुरुष व महिला दोघांसाठी एकेरी आणि दुहेरी म्हणजेच सिंगल आणि डबल सामने होतात.

बॅडमिंटन कसे खेळतात – How Badminton Gets Played In Marathi

Badminton Information In Marathi
Badminton Information In Marathi

बॅडमिंटन हा खेळ दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन संघांमध्ये खेळाला जातो. यामध्ये वैयक्तिक म्हणजे एक विरुद्ध एक तर संघांमध्ये म्हणजे एका संघात दोन व्यक्ती विरुद्ध संघात दोन व्यक्ती अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. यामध्ये महिला व पुरुष दोघेही हा खेळ खेळत असल्याने संघ सामन्यांमध्ये एका संघात एक पुरुष आणि एक महिला असा देखील सामना खेळवता येतो. बॅडमिंटन मध्ये एका सामन्यात एकूण 3 सेट खेळले जातात आणि जो कोणी व्यक्ती किंवा संघ तीन पैकी कमीत कमी 2 सेट जिंकेल त्याला त्या सामन्याचा विजेता घोषित केले जाते.

बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला बॅडमिंटन कोर्ट, नेट, बॅडमिंटन रॅकेट्स आणि शटलकॉक या महत्वाच्या गोष्टी लागतात. रॅकेट्स च्या सहाय्याने आपल्याला त्या शटलकॉक ला मारायचे असते. जेव्हा आपण त्या शटलकॉक ला मारून दुरस्याच्या पार्टी मध्ये फेकतो तेव्हाच त्याला ते शटल पुन्हा आपल्याकडे त्या रॅकेटच्या साहाय्याने पाठवायचे असते. रॅकेट्स हे सर्वसाधारणपणे कार्बन फायबर सारख्या हलक्या पण टिकाऊ मटेरिअल पासून बनवलेले असते. रॅकेट्स ला पकडायला एक लांब दांडी आणि समोर नेट विणलेले अंडाकृती जागा असते. याच नेटवर आपण शटल घेऊन त्याला मारत असतो. शटलकॉक विषयी सांगायचे झालेच तर शटलकॉक हे देखील कमी वजनाचे असते आणि याला हवेत दिशा देण्यासाठी 16 पंख बसवलेले असतात. शटलकॉक हे खालील बाजूला पोलियुरेथिन पासून बनवलेले असते जेणेकरून त्याला मारताना सोप्पे जाते.

प्रत्येक सेट चा एक बेसिक नियम असतो आणि तो म्हणजे जो खेळाडू 21 या संख्येवर सर्वात आधी पोहोचेल तो त्या सेट चा विजेता असतो. परंतु याला देखील एक नियम आहे तो म्हणजे खेळाडू 21 गुणांवर असताना प्रतिस्पर्धी खेळाडू आणि त्यांच्यामध्ये कमीत कमी 2 गुणांचे अंतर हे असायला हवे. म्हणजे 21 पुढे जेव्हा देखील खेळाडू मध्ये 2 गुणांचे अंतर असेल तेव्हा आघाडीवर असणारा खेळाडू हा विजेता घोषित केला जातो. आता याला एक अंत असावा म्हणून जर समजा दोन्ही खेळाडू 29-29 अंकांवर आले तर मग जो खेळाडू पहिले 30 वा पॉईंट मिळवेल त्याला त्या सेटचा विजेता घोषित केले जाते.

बॅडमिंटन कोर्ट – Ground or Court for Badminton In Marathi

बॅडमिंटन हा इंडोर खेळला जाणार खेळ जरी असला तरी देखील याला मैदानाची गरज लागते. बॅडमिंटन ज्या मैदानावर खेळले जाते त्याला बॅडमिंटन कोर्ट म्हणले जाते. बॅडमिंटन कोर्ट ची लांबी ही 44 फूट इतकी असते. यामध्ये बदल होत नाही. परंतु मॅच ही वैयक्तिक आहे की सांघिक यानुसार बॅडमिंटन कोर्ट ची रुंदी ही बदलली जाते. जर वैयक्तिक म्हणजेच सिंगल मॅच असेल तर कोर्टची रुंदी ही 17 फूट आणि जर डबल म्हणजे सांघिक मॅच असेल तर कोर्टची रुंदी ही 20 फूट असते.

कोर्ट च्या मध्यभागी म्हणजे दोन पार्टी ना वेगळी करणारी रेषा असते तिथे एक नेट लावलेली असते. कोर्टचा आकार हा चौकोनी आखलेला असतो. कोर्टचा शेवटच्या टोकाकडून दोन्ही बाजूनी 2 फूट 6 इंच अंतरावर लॉंग सर्व्हिस लाईन आखलेली असते तर नेट पासून 6 फूट 6 इंच अंतरावर शॉर्ट सर्व्हिस लाईन असते. लॉंग सर्व्हिस लाईन आणि शॉर्ट सर्व्हिस लाईन यांच्या दरम्यान मध्ये आपल्याला सेंटर लाईन बघायला मिळते. या सेंटर लाईनच्या डाव्या बाजूला लेफ्ट सर्व्हीस कोर्ट तर उजव्या बाजूला राईट सर्व्हिस कोर्ट असतो.

बॅडमिंटन खेळाची सुरुवात देखील पंचांकडून नाणेफेक करून केली जाते. यामध्ये जो खेळाडू किंवा संघ नाणेफेक जिंकतो त्याला आपली दिशा म्हणजे पार्टी निवडण्याचा किंवा सर्व्हिस करण्याचा पर्याय असतो.

सर्व्हिस करत असताना आपल्याला ती सर्व्हिस ही प्रतिस्पर्धी खेळाडूच्या कोर्ट मधील योग्य जागेत करावी लागते. जर ती योग्य जागेत झाली नाही तर प्रतिस्पर्धी खेळाडूला एक पॉईंट मोफत प्राप्त होत असतो. आपण कोर्ट वर ज्या लाईन बघितल्या त्यानुसार शॉर्ट सर्व्हिस आणि लॉंग सर्व्हिस असे सर्व्हिस चे दोन प्रकार पडतात.

शॉर्ट सर्व्हिस मध्ये खेळाडू हा स्वतःला सुरुवातीला जास्त अग्रेसिव्ह (आक्रमक) दाखवतो आणि नंतर मग जेव्हा रॅकेट आणि शटल यांचा संपर्क येणार असतो तेव्हा तो वेग आणि आक्रमकता कमी करतो. यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंचा संभ्रम होतो. लॉंग सर्व्हिस मध्ये याच्या अगदी उलट घडते. यामध्ये सुरुवातीला सगळे नॉर्मल असते परंतु जेव्हा शटल आणि रॅकेट्स चा संपर्क येतो तेव्हा वेग पकडला जातो आणि शटल जास्त ताकदीने समोरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या क्षेत्रात पाठवले जाते.

बॅडमिंटन मध्ये स्कोअर/ पॉईंट कसे होतात- Scoring system in Badminton In Marathi

बॅडमिंटन या गेममध्ये 20 गुणानंतर जो कोणता खेळाडू 2 गुण जास्त लवकर करेल त्याचा तो सेट विजयी असतो. म्हणजे जर समजा दोन्ही खेळाडू 20-20 अंकांवर आहेत आणि जर समजा हा स्कोअर 22-20 झाला तर 22 वाला खेळाडू त्या सेटचा विजेता… परंतु जर हे असेच सुरू राहील आणि 21-22 किंवा 23-24 अस काहीही होत राहील ज्यात दोघांमध्ये 2 गुणांची तफावत नसेल तर तो खेळ पुढे सुरू राहतो. जेव्हा दोन्ही खेळाडू 29-29 वर असतील त्यानंतर जो खेळाडू सर्वात आधी 30 गुण करेल त्याचा तो सेट असतो. या 30 व्या पॉइंटला आपण गोल्डन पॉईंट किंवा सोनेरी बिंदू म्हणून ओळखतो.

या खेळात खेळाडूला 3 पैकी कमीत कमी 2 सर हे विजयासाठी जिंकणे गरजेचे असते. मराठी मध्ये बोलायचे झाले तर त्या बॅडमिंटनच्या कोर्टाला मराठीत न्यायालय तुम्ही म्हणू शकता.

जेव्हा खेळाडू सर्व्हिस करतो आणि त्यानंतर रॅली होते त्या रॅली मध्ये विजय हा त्या खेळाडूंचा होतो जो दुसऱ्याच्या कोर्टात शटल मारेल आणि ते शटल दुसऱ्याच्या कोर्टमध्ये पडेल. म्हणजे यात प्रतिस्पर्धी ते शटल मारण्यास अपयशी ठरत असेल तर गुण हा पहिल्या खेळाडूला मिळतो.

बॅडमिंटन खेळाचे महत्वाचे नियम – Rules for Badminton Game in Marathi

बॅडमिंटन हा खेळ सिंगल (वैयक्तिक) किंवा डबल (सांघिक) अशा दोन प्रकारे खेळता येतो.
महिला व पुरुष दोघेही हा खेळ खेळू शकता.
बॅडमिंटनचा एक सामना किंवा मॅच ही 3 सेट्स मध्ये विभागलेली असते.

सामन्यामधील एक सेट हा कमीत कमी 21 गुणांनातर आणि जास्तीत जास्त 30 गुणानंतर त्या सेटचा विजेता दर्शवत असतो.

तीन सेट मधील जो खेळाडू जास्तीत जास्त सेट जिंकेल म्हणजे 2 किंवा दोन पेक्षा जास्त सेट जिंकेल त्याला विजेता घोषित केले जाते.

शटलकॉक हा रॅकेटच्या साहाय्याने मारत असताना त्याला कधीही खाली मारायचे नसते. त्याला नेहमी हवेत मारावे लागते.

बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूला बॅडमिंटनपटू संबोधले जाते. त्यांना खेळ सुरू असताना नेटस ला हात लावायची परवानगी नसते.

सर्व्हिस करत असताना दोन्ही खेळाडूंचे पाय हे स्थिर असणे गरजेचे असते. म्हणचे कोणताही खेळाडू सर्व्हिस होत असताना हलु शकत नाही. सर्व्हिस देत असताना त्या खेळाडूने निर्धारित जागेतून ती द्यायला हवी. त्याने कोणत्याही रेषेला स्पर्श करता कामा नये.

सर्व्हिस देणार खेळाडू जर सर्व्हिस कोर्ट मध्ये नसेल तर याला फॉल मानले जाते.

यामध्ये आणखी एक गोष्ट जोडता येते ती म्हणजे सर्व्हिस देणारा सर्व्हिस देताना जर पुढे सरकला तरी तो फॉल पकडला जातो.

सर्व्हिस करताना ती जर कोर्टाच्या बाहेर गेली किंवा ते शटल जर जाळीखालून किंवा जाळीला स्पर्श करून जात असेल तरी ती सर्व्हिस ही फॉल ग्राह्य धरली जाते.

एक खेळाडू एकावेळी दोनदा शटलला मारू शकत नाही. तसे झाल्यास ती सर्व्हिस फॉल पकडली जाते.

भारतीय बॅडमिंटन खेळाडू – Indian Badminton Players

किदंबी श्रीकांत- श्रीकांत यांनी भारताला दक्षिण आशियाई खेळांमध्ये पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरी खेळात म्हणजे 2 दा सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

पुल्लेला गोपीचंद- पुल्लेला गोपीचंद यांनी भारताला काही मिळवून जरी दिले नसले तरी देखील त्यांनी त्यांची विद्यार्थी पी व्ही सिंधू यांना प्रशिक्षण दिले आहे. ते देखील एक बॅडमिंटनपटू होते.

सायना नेहवाल- भारतीय महिलांना गर्व वाटेल अशी कामगिरी करणाऱ्या या सायना नेहवाल! ऑलम्पिक खेळांमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय खेळाडू होत्या. जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा तसेच इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय खेळाडू होत्या. त्यांनी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये महिला एकेरी मध्ये सुवर्ण तर पुरुष महिला मिश्र मध्ये रौप्य पदक मिळविले आहे. 2012 साली झालेल्या लंडन ओलम्पिक मध्ये सायना नेहवाल यांनी महिला एकेरी मध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

पी व्ही सिंधू- भारताची मान 2020 टोकियो ऑलम्पिक मध्ये गर्वाने उंचावणाऱ्या या भारत कन्या! 2016 साली रिओ दि जानेरिओ मध्ये झालेल्या ऑलम्पिक मध्ये भारताला महिला एकेरी माधव रौप्यपदक तर 2020 मध्ये झालेल्या टोकियो ऑलम्पिक मध्ये कांस्य असे सलग दोन ऑलम्पिक मध्ये पदक देणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय ठरल्या आहेत.

निष्कर्ष

इतर खेळांप्रमाणे बॅडमिंटन हा खेळ देखील जगात ओळखला जातो आणि हा एक आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जाणारा खेळ आहे. जर आपण खेळाडू असाल तर ह्या खेळाविषयी माहिती असणे आपल्याला गरजेचे आहे आणि विद्यार्थी म्हणून शाळेत बॅडमिंटन वर निबंध मराठी नक्की विचारला जातो त्यात तुम्हाला ही माहिती कामात येईल.

बॅडमिंटन या खेळाविषयी जवळपास सर्व माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण बघितली आहे. बॅडमिंटन खेळाविषयी गरजेची अशी सर्व महत्वपूर्ण माहिती (Badminton Information in Marathi) इथे आपल्याला मिळाली असेलच. तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर ही माहिती नक्की इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap