हृदयस्पर्शी बहिणीचे भावाला पत्र | Bahiniche Patra | Sister Letter To Brother

बहिण म्हणजे काय असे विचारले तर लगेच तोंडातून उच्चार होतो आईनंतर आपल्या पाठीशी उभी राहणारी व्यक्ती म्हणजे बहिण. आणि भाऊ म्हणजे काय असे विचारले तर बहिणीच्या मागे तिचे रक्षण करणारा म्हणजे भाऊ. अश्या दोघींची एक सुंदर नाते ह्या जगात ओळखले जाते तेच बहिण भावाचे नाते.

ह्या जगात मानवाने भरपूर नाती निर्माण केली आहेत परंतु आई, वडील, बहिण आणि भाऊ यांच्यातील जे नातेसंबंध असतात नाते हे जगातील सर्वात मूल्यवान नाते असतात. कारण इतर भरपूर नाते आपण बघितली असतील परंतु जीवाला जीव देणारे फक्त आपलेच असतात म्हणजेच आई, वडील, बहिण आणि भाऊ त्यामुळे हे नाते जेवढे जपता येतील तेवढे जपण्याची काळजी घ्या. बहिणीवर कितीही कमी प्रेम करा तरी ती आपल्यावर खूप प्रेम करते जसे आई आणि बाळाचे नाते असते तसेच बहिण आणि भावाचे नाते असते.

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला एका बहिणीने आपल्या भावाला लिहिलेले पत्र सांगणार आहे. हे पत्र हृदयस्पर्शी पत्र असून यात अनेक बहिण भावांच्या भावना जोडलेल्या आहेत त्यामुळे काळजीपूर्वक वाचा.

असे जगातील एक सुंदर नाते आज आपल्यासमोर सादर होत आहे तर खालील बहिणीच्या भावना व्यक्त झाल्या आहेत ते आपल्या डोळ्यात अश्रू आणतील.

हृदयस्पर्शी बहिणीचे भावाला लिहिलेले पत्र | Bahiniche Patra

प्रीय भावा, मित्र आणि बरेच काही,

तुला भाऊ म्हणावे की मित्र म्हणावे का वडिलांच्या जागेवर संबोधावे हेच कळत नाही. कारण ह्या जगात सर्व नात्यांवर भारी पडणार व्यक्ती म्हणजे तूच आहे. माझी काळजी घेणारा, माझी मदत करणारा, मी चुकले तर मला रागवणारा आणि समजावून सांगणारा असा तू आहेस.

तुला माहितीये बहिण भावाचे प्रेम हे सर्व नात्यांना लाजवेल असे नाते असते कारण त्या नात्यात कुठलाही भेदभाव नसतो, कुठल्याही पैशांची चटक नसते.

खूप आठवण येते रे भावा तुझी, ये ना परत. जेव्हा माझ्या मैत्रिणींना त्यांच्या भावासोबत बघते ना खरंच तुझी आठवण काढल्याशिवाय नाही राहिले जात. माझ्या मैत्रिणी कंटाळून जातात आणि म्हणतात तुझा भाऊ खरंच एवढा चांगला आहे का ग, कारण मी सतत तुझ्याबद्दल बोलत असते काही गोष्ट झाली की लगेच माझा भाऊ पण असा आहे, त्याने असे केले होते, त्याने हे केले होते असेच चालू असते. मला बोर नाही होत तुझी गुणगान गायायला कारण तुझ माझा मित्र, सखा आणि सर्वस्व आहे.

घरी तर तू वर्षांतून 5-10 दिवस येतो परंतु बाकीचे दिवस तुझ्याविना कसे जातात ते तर विचारू नको कारण ते लहानपणापासून तुझ्यासोबत राहणे खूप आठवते.

लहानपणी आपण खूप मज्जा करायचो, खेळायचो, भांडण करायचो काय तुला आठवतंय. आता कोणी नाहीये रे माझे नाव घ्यायला, तेव्हा मी चिडायची आणि आईला नाव सांगायची परंतु आता असे वाटते की जर तू दिवसभर देखील माझे नाव घेतले ना तरी मी आईला नाव सांगणार नाही. तुला ते देखील आठवत असेल कसा तू माझ्या सुरक्षेसाठी त्या मुलांना भिडला होता, हो मला अजूनही आठवतंय जेव्हा आपण शाळेतून येत होतो आणि काही मुलं माझे नाव घेत होते आणि तेव्हा तुझी जीवावर आली आणि त्यांच्याशी भांडण केली, मी इकडे तुला आवरत होती, रडत होती नको भाऊ जाऊदे, तो क्षण ही खूप स्मरणीय होता.

रक्षाबंधनाच्या दिवशी मी रोज तुला राखी बांधायची आणि तू मला काही ना काही छोटेशे भेटवस्तू द्यायचा तेही खूप आठवतं. आता तर तू रक्षाबंधनाला सुद्धा येत नाही, मला पोस्टाने तुला राखी पाठवावी लागते आणि तू तिकडून एक भेटवस्तू पाठवतो. ह्यावेळेस तुझी भेटवस्तू मोठी आणि महागडी असते परंतु माझ्यासाठी तर तूच मोठा आहे. आशा करते की ह्या येत्या रक्षाबंधनाला तरी तू नक्की येशील तर रक्षाबंधन ऑनलाईन साजरा करून नाही तर सांस्कृतिक पद्धतीने साजरा करून माझा दिवस उजळ करशील.

दोन तीन दिवसातून एकदातरी तुझी आठवण घरात निघतच असते, कधी जेवतांना, तर कधी सर्वजण एकत्र गप्पा मारत बसल्यावर. आईतर विचारू नको तिचे तर चालूच असते त्यालाही हेच आवडते, तो आता जेवण करत असेल, आता त्याची सुट्टी झाली असेल सतत तिचे हेच चालू असते.

बोलायला बसले तर संपूर्ण वही देखील कमी पडेल परंतु हे पत्र असून मी इथेच याचा शेवट करते आणि तुझ्यापासून माझी निरोप घेण्याची विनंती करते.

तुझीच लाडकी बहिण,
ताऊ

निष्कर्ष

बहिण भावाचे नाते म्हणजे जगातील असे प्रेम जे सर्व नात्यावर भारी पडेल कारण हेच ते नाते ज्यात कोणताही लोभ नसतो, कोणताही भेदभाव नसतो त्यात फक्त एक पवित्र प्रेम असते.

एका बहिणीचे प्रेम काय असते हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर वरील बहिणीने भावाला लिहिलेले पत्र जरूर वाचा त्यातील ज्या भावना आहेत त्या आत्मसात करा. आई ही जगातली सर्वात मोठी गुरु आहे आणि तिच्या नंतर बहिण ही जगातली एक सुंदर मूर्ती आहे. घरात भावासाठी रडणारी, भावासाठी धडपडणारी व्यक्ती म्हणजे आपली बहीण असते ते म्हणता ना बहिण ही फक्त नशिबवाल्यानांच मिळते.

बहिनिविषयी जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे, ही तीच व्यक्ती आहे ज्यावर कितीही कमी प्रेम करा परंतु ती नेहमी आपल्या भावावर आणि आपल्या कुटुंबावर सारखेच प्रेम करते.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap