बँकेची संपूर्ण माहिती मराठी | Bank Information in Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्या Bank Information In Marathi म्हणजेच बँक माहिती मराठी मध्ये खोलवर जाऊन सांगणार आहे.

आपल्याला सध्याच्या काळात सर्वात जास्त महत्वाची गोष्ट बनली आहे ती म्हणजे बँक! आता तुम्ही म्हणाल हे कसे? आज आपले जवळपास सगळे व्यवहार हे डिजिटल होत आहेत आणि जेव्हा आपण डिजिटल व्यवहार करत असतो तेव्हा आपण आपले पैसे हे बँकेच्या माध्यमातूनच देवाणघेवाण करत असतो. सध्याच्या काळात व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल मग ती विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप असो किंवा शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई सरकारने आता सर्व काही ऑनलाइन केले असल्याने पैसे हे सरळ बँकेत जमा होत असतात.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून याच बँकेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. बँका या फक्त पैसे काढण्यासाठी नसतात तर बँकांचे इतरही काही कार्य आहेत ते देखील आपण या लेखाच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

बँक विषयी थोडक्यात सांगायचे झाले तर ही एक संस्था आहे. या संस्थेत वित्तीय व्यवहार चालतात म्हणून हिला वित्तीय संस्था गटात गणले जाते. बँक ही लोकांकडून पैसे घेते आणि लोकांना पैसे देते देखील. आपण आपले पैसे बँकेला वापरायला दिले तर बँक आपल्याला त्यावर व्याज देते आणि जर आपण बँकेकडून पैसे घेतले तर बँक आपल्याला त्यावर व्याज आकारते. बँक याशिवाय अनेक इतरही कार्य करते ज्यामुळे पत निर्मिती ही होत असते. याच कारणांमुळे बँकेला पत निमिर्ती करणारी संस्था म्हणून देखील ओळखले जाते.

बँक म्हणजे काय? | What Is A Bank

लोकांना पैसे जमा करण्यासाठी आणि लोकांना कर्ज वाटण्यासाठी जी वित्त संस्था कार्य करते तिला बँक असे म्हणतात. सर्व प्रकारच्या आर्थिक सेवा या मुख्यतः बँकेच्या माध्यमातून चालतात. भारतातील नव्हे तर संपूर्ण जगभरातील बँका या वित्तीय सेवा देत असतात. बँक सुरू करण्यासाठी किंवा बँक चालविण्यासाठी आपल्याला शासनाकडून परवानगी घ्यावी लागते.

आपल्या भारतात सर्वर उच्च स्थानी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही वित्त संस्था म्हणजेच बँक आहे. ही रिझर्व्ह बँकच भारतातील इतर बँका आणि चलनाविषयी सगळी धोरणे हाताळत असते. म्हणजे आपण असेही म्हणू शकतो की भारतीय रुपया आणि भारताचे वित्त या गोष्टी भारतीय रिझर्व्ह बँकच सांभाळते. इतर सर्व बँका आणि रिझर्व्ह बँक यांच्या निर्णयांचा आणि दिलेल्या सेवेचा अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होत असतो.

बँकेचा इतिहास | History Of Bank

बँक हा शब्द आपल्या सर्वांच्या ओळखीचा परंतु या बँकेचा इतिहास काय आहे? ही गोष्ट क्वचितच लोकांना माहीत असेल. बँकेचा इतिहास हा आपल्या इसवी सन पूर्व काळाकडे घेऊन जातो. इ स पूर्व 2000 मध्ये असिरियन आणि बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये आपल्याला कर्जे दिल्याची काही उदाहरणे बघायला मिळतात. आता यात मंदिरातील साधक म्हणजेच पुजाऱ्यानी काही व्यापाऱ्यांना कर्ज दिले होते असे उल्लेख आढळतात. यामध्ये बँकेचे काही नियम देखील शिलालेखावर आहेत असे लोक सांगतात परंतु त्यावर अजूनही शोध सुरूच आहे.

पुढे जाऊन आपल्या भारतात जर बघितले तर आपल्याकडे जी सावकारी पद्धतीचे पुरावे आहेत त्यात मौर्य साम्राज्याच्या काळात काही असे पुरावे सापडतात. बार्टर सिस्टम ही प्रक्रिया तुम्हाला माहिती असेलच. या प्रक्रियेत आपण वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू देत असे. आता त्या काळात आपल्याला म्हणजे आपल्या पूर्वजांना पैसा ही संकल्पना माहीत नव्हती त्यामुळे वस्तूची खरेदी विक्री ही वस्तुंच्याच देवाणघेवाणिवर आधारित होती.

1472 साली स्थापना झालेली Banca Monte Dei Paschi di Siena ही सिएना येथे असणाऱ्या टस्कन शहरात असलेली बँक जगातील सर्वात प्राचीन बँक आहे. तर भारताचा इतिहास बघितला तर ब्रिटिश राजवटी पासून भारतात ही बँकिंग प्रणाली सुरू झाली असावी असे म्हणतात. 19 व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्या व्यापाराच्या फायद्यासाठी भारतात देखील बँका सुरू करायला सुरुवात केली. काही ठिकाणी 1770 साली भारतात पहिली “बँक ऑफ हिंदुस्थान” ही बँक सुरू झाली असा उल्लेख आढळतो. ही बँक 1826 साली बंद देखील पडली असेही उल्लेख आढळतात. 1806 साली सुरू झालेली बँक ऑफ कलकत्ता पुढे जाऊन 1809 मध्ये बँक ऑफ बंगाल बनली. पुढे बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या तिन्ही बँकांचे एकत्रीकरण करून इंपिरियल बँकेची स्थापना करण्यात आली.

1935 साली भारताची उच्च बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. पुढे स्वातंत्र्यानंतर RBI ही बँक केंद्रीय बँक बनली. 1955 मध्ये बँकांचे विलीनीकरण करून स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) स्थापन करण्यात आली. आता रिझर्व्ह बँकेनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जास्त महत्व प्राप्त झाले होते. अलाहाबाद बँक ही भारतातील पहिली खाजगी बँक म्हणून ओळखली जाते.

बँकांचे प्रकार | Types Of Banks

भारतात मालकी हक्कावरून बँकांचे 3 मुख्य प्रकार पडतात. यातील केंद्रीय बँक हा केंद्र सरकारी अखत्यारीत येणारा बँकेचा प्रकार आहार.

अ) केंद्रीय बँका (Central Bank)

यालाच आपण सेंट्रल बँक असे देखील म्हणू शकतो. भारतात केंद्र सरकारच्या अंतर्गत ज्या बँका काम करतात त्यांना केंद्रीय बँका असे म्हणतात. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबिआय ही एकमेव केंद्रीय बँक आहे. या बँकेची सूत्रे ही स्वतंत्र जरी असली तरी राज्यपाल आणि केंद्र सरकार यात थोडाफार हस्तक्षेप करत असते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निवडणुका या भारत केंद्र सरकारकडून होत असतात.

ब) सार्वजनिक बँका (Public Sector Banks)

भारतात सार्वजनिक क्षेत्रात एकूण 3 बँकांच्या समूहांचा समावेश होत असतो. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या आणखी 5 सहयोगी बँकांचा समावेश होतो. यासोबत इतर 19 राष्ट्रीयकृत बँका आणि विलीनीकरण धोरणातून वाचलेल्या काही प्रादेशिक ग्रामीण बँकांचा (RRB’s) देखील सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात येतात.

बँकांचे होत असणारे विलीनीकरण आणि इतर काही गोष्टींमुळे सर्वजनिक बँकांची संख्या ही सतत बदलत असते. सध्या प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता भारतात एकूण 26 सार्वजनिक बँका आहेत.

क) खाजगी बँका (Private Sector Banks)

भारतात खाजगी बँक क्षेत्रात भारतीय आणि परकीय अशा दोन प्रकारच्या बँकांचा समावेश होतो. खाजगी बँक ही संकल्पना म्हणजे त्यांचा आणि सरकारचा संबंध हा फक्त बँक म्हणून काम करण्यास परवानगी मिळविणे इतकाच असतो. बँकेचा मालकी हक्क हा खाजगी असतो. तरी देखील या बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत जोडून राहावे लागते आणि रिझर्व्ह बँकेचे सर्व नियम या बँकांना देखील लागू पडतात.

1969 मध्ये रिझर्व्ह बँकेने खाजगी बँका स्थापन करण्यास बंदी आणली आणि त्यामुळे या आधी स्थापना केलेल्या बँकांना जुन्या खाजगी बँका म्हणून ओळखले जाते. पुढे 1991 साली या धोरणात आरबीआय ने थोडा बदल केला आणि त्यानंतर पुन्हा खाजगी बँका स्थापन करता यायला लागल्या. त्यावेळी 10 बँका स्थापन झाल्या पण विलीनीकरण होत आता सध्या फक्त 7 नव्या खाजगी बँक कार्यरत आहेत. 2001 मध्ये पुन्हा या कायद्यात थोडे बदल करण्यात आले परंतु त्यानंतर खाजगी क्षेत्रात बँका आल्याचं नाही. पुढे खाजगी क्षेत्रात एका बजेटवर अनुसरून स्थानिक खाजगी बँकांची स्थापना करायला सुरुवात झाली.

भारतात कार्यरत असलेल्या खाजगी बँकामध्ये परकीय बँकांचा देखील समावेश होतो. सध्या स्टॅंडर्ड चार्टड, HSBC बँक, सिटी बँक, इंडस्ट्रीयल कमर्शियल बँक ऑफ चायना या काही भारतात कार्यरत असलेल्या परकीय बँका आहेत.

बँकेची कामे | Function Of Banks

बँकेमध्ये आपण आपले पैसे जमा करू शकतो. म्हणजे बँक आपले पैसे जमा करण्याचे कार्य करत असते.

बँकांमध्ये व्यक्तीचे खाते असते आणि सर्व व्यवहार त्या खात्यावरून होत असतात. आपल्या खातेधारकांचे खाते सांभाळणे आणि हाताळणे हे कार्य बँका करत असतात.

बँक तिच्या ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असते. बँक त्या ग्राहकाला पैसे देते परंतु त्या पैशांवर बँक व्याजदर आकारत असते.

बँकांमध्ये मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लॉकर ही सुविधा देखील असते. आपले सोने, चांदी, दागिने, हिरे किंवा कागदपत्रे यासारख्या महत्वाच्या गोष्टी आपण बँकेच्या लोकर्स मध्ये सुरक्षित ठेऊ शकतो.

बँक मध्ये आपण आपले पैसे हे fd किंवा rd च्या माध्यमातून गुंतवू शकतो. बँक ग्राहकांच्या पैशांवर व्याज देत असते.

बँका या त्याच्या ग्राहकाला एखाद्याला पैसे पाठवण्याची सुविधा देखील देतात.

बँकामधून आपण आपल्या खाते नंबर आणि खातेदार यांच्या मदतीने सहज पैसे काढू शकतो.

ऑनलाइन बँकिंग | Online Banking

एटीएम

सर्व आर्थिक व्यवहार – कर्ज, हफ्ते, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाइन बँकिंग, इत्यादी

राष्ट्रीयकृत बँक संकल्पना | Nationalized Banks Concept

Bank Information In Marathi
राष्ट्रीयकृत बँक यादी

यासाठी राष्ट्रीयीकरण ही संकल्पना आपल्याला आधी समजून घ्यावी लागेल. एखादी खाजगी गोष्ट असेल ती सरकारी मालकीची करून तिचे हस्तांतरण करणे म्हणजे राष्ट्रीयीकरण होय. ज्या काही खाजगी बँका या आधी अस्तित्वात होत्या त्यांचे विलीनीकरण करत पुढे जाऊन त्यांचे मालकी हक्क हे सार्वजनिक केले गेले आणि मग त्याच बँकांना राष्ट्रीयकृत बँका म्हणून ओळखले जाऊ लागले.

राष्ट्रीयकृत बँकांचा कार्यभार हा संपूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अखत्यारीत चालतो.

भारतात सध्या एकूण 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत. त्या खालीलप्रमाणे-

बँकांचे नियम – Rules of the Banks

बँकेत प्रत्येक ग्राहकाचे खाते असते. त्या खात्यावरूनच सर्व काही व्यवहार हे होत असतात. जेव्हा आपण पैसे टाकतो म्हणजे deposite करतो तेव्हा ते आपल्या खात्यात जोडले जातात म्हणजे जमा होतात. जेव्हा आपण पैसे काढतो म्हणजे Withdrawal करतो तेव्हा ते आपल्या खात्यातून वजा केले जातात.

ग्राहकाला त्याच्या खात्यात असलेल्या पैशाच्या बदल्यात बँका त्याला काही व्याज देखील देत असते.

बँक त्या ग्राहकाकडून त्याला deposit, Withdrawal किंवा इतर मेसेज सारख्या सेवा देताना स्वतःसाठी पैसे कमवत असते.

बँकेला त्या ग्राहकाच्या खात्याला सुरक्षा द्यावी लागते. ग्राहकाच्या परवानगी शिवाय बँक त्याच्या खात्यातून कोणाला पैसे देऊ शकत नाही.

बँकांना सरकारी कामे किंवा न्यायालयाने मगितल्याशिवाय त्या खातेदाराविषयी माहिती समोर उघडी करता येत नाही. ग्राहकांची गोपनीयता बाळगून ठेवणे हे बँकेचे कार्य आहे.

ग्राहकाने दिलेला चेक हा बँकेकडे असतो. त्या चेक वरून ग्राहक हा जेव्हा सही सोबत सर्व काही माहिती देईल तेव्हाच तो चेक बँक पुढे पैशात हस्तांतरण करू शकते.

काही बँकांचे खात्यासाठी कमीत कमी खाते रक्कम साठी अटी असतात. त्या अटींची पूर्तता ग्राहकाला करावी लागते.

बँकांमध्ये चालू आणि बचत खाते या दोन संकल्पना आहेत. यात चालू खात्यावर जास्त पैशांचे व्यवहार हे होतात तर बचत खात्यावर आपले साधारण व्यवहार हे होत असतात.

बँकांना ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड सारखी सुविधा देणे बंधनकारक आहे.

बँक कोणत्याही ग्राहकाचे खाते विनाकारण बंद करू शकत नाही. त्यासाठी ग्राहकाकडून परवानगी ही हवी असते. जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर बँकांना तो अधिकार देण्यात आलेला आहे.

निष्कर्ष

बँक माहिती मराठी मध्ये तर बँक का बनवल्या गेल्या कारण लोकांनी आपले पैसे घरात न ठेवता एका योग्य आणि सुरक्षित ठिकाणी ठेवणे. कारण रोज आपण पैसे कमवत असाल परंतु त्या पैश्यांना स्वतःकडे ठेवणे म्हणजे धोकादायक आणि तेही आजच्या युगात अजून जास्त त्यामुळे बँक ची सुविधा करण्यात आली आहे.

आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण बँकेविषयी मराठीत सविस्तर माहिती (Bank Information in Marathi) बघितली आहे. बँकांचे प्रकार आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण या काही संकल्पना देखील आपण बघितल्यात. बँकेविषयी आणखी भरपूर संकल्पना देखील आहेत परंतु गरजेची सर्व माहिती इथे देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांसोबत हा लेख नक्की शेअर करा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap