10 निरोगी पोहण्याचे फायदे मराठी मध्ये | पोहणे कसे शिकायचे | 19 Healthy Benefits Of Swimming In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला पोहण्याचे फायदे, पोहणे काय आहे, पोहणे कसे शिकायचे मराठी मध्ये सांगणार आहे. जर आपण नियमित पोहत असाल किंवा पोहणे सुरू करत असाल तर आधी पोहण्याचे फायदे नक्की जाणून घ्या.

Benefits Of Swimming In Marathi हा लेख आपल्याला नक्की आवडेल परंतु जर आपण पोहणे सुरू करत असाल किंवा करत असाल तरच फायदेशीर ठरेल.

पोहणे काय आहे | What Is Swimming In Marathi

पाण्यात जाऊन पाण्यावर तरंगणे त्या पाण्यावर मात करणे म्हणजेच पोहणे होय आणि पोहण्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात.

पोहण्याला इंग्रजीत swimming म्हणतात आणि आता तर कुणीही पोहायला जातो असे म्हणत नाही सर्वजण swimming म्हणतात.

पोहणे म्हणजे फक्त पाण्यात जाणे आणि हातपाय हलवणे नाही तर त्यासाठी देखील कौशल्य लागतात. पोहणे हा एक असा व्यायाम किंवा खेळ आहे ज्यात आपल्या सर्व शरीराची हालचाल होते ज्यामुळे सर्व शरीराचा व्यायाम देखील होतो.

पोहण्यासाठी आपल्याला योग्य जागा लागते जसे जलतरण, तलाव, नदी, विहीर ह्या ठिकाणी पोहु शकता. परंतु जर आपण शिकाऊ आहात तर आपण जलतरण मध्ये कमी पाण्यात पोहले पाहिजे. जर आपल्याला तलाव, नदी, विहीर यांचा अनुभव असेल तरच त्यात उडी टाका अन्यथा नाही. खेड्यातील मुल जवळपास जलतरण नसल्यामुळे विहीर किंवा नदी मध्ये पोहता आणि ते लहानपणापासून पोहत असल्यामुळे त्यांना सवय झालेली असते.

पोहणे कसे शिकायचे | How To Learn Swimming In Marathi

मित्रांनो जर आपण पूर्णपणे नवीन आहात तर आपण खालील एक एक पायरी लक्षपूर्वक वाचा.

आपण पाणीला घाबरत असाल किंवा पाणीत उतरल्यावर आपल्याला भीती वाटत असेल तर आपण आधी पाण्यात उभे रहा मग आपले खांदे पाण्यात बुडवून ओले करून घ्या.

त्यांनतर आपल्या खांद्यापर्यंत पाणी असेल एवढ्या भागात जाऊन पाण्यात चालायचे आहे. पण लक्ष ठेवा की कोणत्यातरी गोष्टीचा आधार घ्यायचा आहे किंवा कडेच्या भिंतीला हात लाऊन चालायचे आहे. जेव्हा आपल्याला सवय होईल तेव्हा आपण बिना आधाराचे चालाल.

मोठा श्वास घ्या आणि आपले डोके पाण्यात बुडवा पाण्यात डोके बुडवल्यावर श्वास सोडा. जेव्हा आपण श्वास सोडाल तेव्हा बुळबुळे निघतील.

जलतरण च्या आजूबाजूच्या भिंतीला हात लावा व आपले कोपर त्या भिंतीला टेकुन ठेवा. त्यांनतर एक पाय वरती घेऊन लगेच दुसरा पाय वरती घ्या. खांद्याच्या रेषेत शरीर ठेऊन दोघी पाय खाली वर हलवा. ह्या गोष्टीचा आपल्याला जास्त सराव करायचा आहे कारण ह्याने आपले पायांना सवय होईल व पायांमुळे सर्व शरीर स्थिर राहते.

नंतर स्विमिंग किकबोर्ड (Swimming Cickboard) च्या मदतीने पोहायचे आहे. कीकबोर्ड वर हात ठेवतांना मध्यभागी किंवा वरती पकडा. मग आपले पाय वरती घेऊन पोहा. पाणीच्या पातळीतच पाय मारावे.

नंतर भिंतीला हात लावा परंतु हात सरळ रेषेत ठेवा आणि पाण्याच्या पातळीत आपले पाय मारा.

पुन्हा किकबोर्ड घ्या पण ह्यावेळेस किकबोर्डच्या खाली शेवटच्या बाजूस म्हणजेच जवळ पकडा तेव्हा आपले हात एका सरळ रेषेत येतील. मग आपले पाय हलवत पोहा.

ज्यापर्यंत आपल्याला वाटत नाही काही आपण यात तरबेज झाले आहेत तेव्हा आपण किकबोर्ड चा आधार न घेता आपले हात देखील हलवा.

पोहण्याचे 19 निरोगी फायदे | 19 Healthy Benefits Of Swimming In Marathi

1. संपूर्ण शरीराचा व्यायाम

Pohnyache Fayde

जर आपण नियमित अर्धा किंवा एक तास पोहत असाल तर काय आपल्याला माहतिये याच्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. रोज पोहण्याने आपल्याला व्यायाम करण्याची देखील आवश्यकता राहत नाही.

जेव्हा आपण पोहता तेव्हा आपल्या पूर्ण शरीराचे अवयव हालचाल करतात. पोहतांना हात, पाय, मान, खांदे, आणि इतर सर्व अंग हलाचाल करतात. पाण्यात हात पाय मारताना आपला श्र्वसोस्वास वाढतो ज्याने दमा सारखा आजार होत नाही.

पोहण्याने चयापचन वाढते ज्याने आपली पचन संस्था चांगली राहते आपल्याला कोणतेही पोटाचे विकार निर्माण होते नाही. पूर्ण शरीराची हालचाल झाल्यामुळे कॅलरीज कमी होतात ज्याने आपली चरबी घटते. अजून आपली हाडं मजबूत होतात जर आपल्याला सांधे दुखी असेल तर ती कमी होते. आपले रक्तभिसरण सुधारते.

त्यामुळे आपण नेहमी दिवसातून एकदातरी पोहायला हवे.

2. वजन कमी होते

Swimming Benefits In Marathi

नियमित पोहण्याने आपली अतिरिक्त चरबी कमी होते. जर आपले पोट सुटले आहे तर मग आपण नक्कीच पोहायला हवे. जर आपल्याला पोहता येत नसेल तर वरती दिलेल्या सोप्या स्टेप्स अनुसरण करा.

पोहतांना आपले संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि आपल्या हाता पायांवर जास्त अवलंबून असतो ज्याने आपल्याला माहीत असेल जास्त वेळ पोहतांना दम लागतो जसे आपल्याला पाळताना दम लागतो तसा. हळु हळु आपण पोहण्याचा वेळ वाढवायला हवा ज्याने आपले वजन जलद गतीने कमी होईल.

आपण नेहमी बागितल असेल जो व्यक्ती नियमित पोहतो तो स्वस्थ आणि फिट असतो. त्याच्या पोटावर चरबी नसते कारण रोज त्याच्या शरिराची हालचाल होते. जर आपले पोट बाहेर नाहीये किंवा चरबी नाहीये तरीही पोहणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल कारण पोहल्याने आपले सिक्स पॅकस आणि इतर शरीर आकर्षित दिसेल.

3. हृदय निरोगी राहते

Pohnyache Fayde Marathi Madhye

हृदय हे मानवी शरीरातील मुख्य अवयव आहे जर ते निरोगी असेल आपले शरीरे निरोगी राहते. दररोज पोहल्याणे आपल्या शरीराची हालचाल होते त्याचबरोबर जेव्हा आपले दोघी हात हालतात तेव्हा आपली छातीचा व्यायाम होतो.

पोहतांना आपल्याला दम लागतो आणि श्वासावर देखील नियंत्रण ठेवावे लागते. जेवढे आपण जास्त वेळ पोहू तेवढं आपले हृदय आणि संपूर्ण शरीर तंदुरुस्त राहते.

4. रक्तभिसरण वाढते

Healthy Benefits Of Swimming In Marathi

रक्तभिसरन आपल्या शरीरात महत्वाची भूमिका निभावत. पोहण्याणे बाहेरील शरीर चांगले राहतेच परंतु आतील शरीर ही उत्कृष्ट राहते. सर्व रक्तवाहिन्या चांगल्या पद्धतीने काम करतात आणि रक्तभिसरन देखील वाढते.

जर आपण अर्धा तास सुद्धा पोहण्याचा व्यायाम केला तर रक्तभिसरनची क्रिया सुरळीत होते. जसे तुम्ही सामान्य व्यायाम किंवा धावण्याचा व्यायाम करतात त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्याबरोबरीचा व्यायाम होतो.

5. नियंत्रित रक्तदाब

Pohnyache Fayde Marathi

नियमित पोहण्याच्या फायदेंपैकी रक्तदाब नियंत्रित होणे हा ही एक मुख्य मुद्दा आहे. जर आपला रक्तदाब कमी किंवा जास्त होत असेल तर नियमित पोहण्यामुळे ही समस्या नक्की दूर होईल.

पोहण्यामुळें आपले हृदय उत्तम राहते आणि रक्त ही योग्य पद्धतीने काम करते ज्याने आपल्याला रक्ताचे कोणतेही आजार होत नाही.

6. खराब कोलेस्टेरॉल कमी होते

Swimming Benefits Marathi

जस की मी सांगितले की पोहण्यमुळे आपले संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो त्यामुळे आपले अतिरिक्त वजन कमी होते.

आजकालच्या जीवनात लोकं खूप सारे अस्वस्थ खाद्यपदार्थ खातात जसे की जंग खाद्य, पॅकेट्स मधील खाद्य, पिझ्झा, बर्गर, चिप्स ज्याने आपले शरीर खूप खराब होते आणि जर शरीर आतून खराब झाले तर त्याचा प्रभाव बाहेरील शरीरावर दिसतो. म्हणजेच आपल्या त्वचेवर, चरबी येणे, हाडं दुखणे, ई. जेव्हा आपण नियमित पोहतात तेव्हा आपल्या शरीराचे खराब कोलेस्टेरॉल कमी होते आणि कालांतराने संपते ज्याने आपले शरीर निरोगी आणि फिट दिसते.

7. स्नायू मजबूत होतात

Pohnyache Fayde

आजकाल सर्वजण आपल्या स्नायू कडे लक्ष देतात, सर्वजण पेहेलवान होण्याचं स्वप्न बघतात. परंतु त्यासाठी फक्त व्यायमच करणे अस नाही तर पोहणे देखील एक उत्तम पर्याय आहे जो कमी खर्चात आणि योग्य पद्धतीने आपले स्नायू मजबूत करतात.

जे लोक नियमित पोहण्याचा व्यायाम करतात त्यांच्या स्नायू मजबूत आणि आकर्षित दिसतात कारण पोहण्याणें त्यांच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

8. शरीराची लवचिकता वाढते

Swimming Benefits In Marathi

आपण नेहमी बघितले असेल किंवा एकले असेल की पोहणाऱ्याचे शरीर हे खूप लवचिक आणि तंदरुस्त असते.

लवचिकता जर आपल्या शरीरात असेल तर आपण नेहमी निरोगी राहू शकतात आणि आपल्याला ह्या गोष्टीचा प्रत्येक गोष्टीत फायदे होतो जसे क्रीडा मध्ये. लवचिकता चा अजून एक फायदा आहे तो म्हणजे आपल्याला कधी दुखापत होत नाही आणि झालीच तर ती लगेच ठीक होते. आणि जखम ही लवकर बरी होते.

त्यामुळे नियमित पोहणे हा एक उत्तम पर्याय आहे ज्यामुळे शरीर लवचिक होते व आपल्या पोहण्याचा वेग अजून वाढतो.

9. हाडं मजबूत राहतात

Pohnyache Fayde

आपल्याला हाडांमध्ये दुखापत होत असेल किंवा आपण थोडे जरी पडले तर लगेच आपले हाडं मुडत असेल तर पोहणे आपल्यासाठी योग्य व्यायाम आहे.

आजकाल खूप लोकांना हाडे ठिसूळ होण्याची समस्या असते आणि ते खूप छान आहार घेतात पण त्यांचा व्यायाम होत नसल्यामुळे त्यांची हाडं मजबूत राहत नाहीत. त्यामुळे आपण पोहणे हा व्यायाम करायला हवा.

10. उंची वाढते

Swimming Benefits In Marathi

पोहणे हा व्यायाम लहान मुलांसाठी योग्य पर्याय आहे कारण जास्त तर मुलांमध्ये उंची न वाढण्याची समस्या निर्माण होते.

उंची हा आपल्या जीवनात एक मुख्य भूमिका निभावते कारण जर आपली उंची बरोबर असेल तर आपण आकर्षित दिसतात.

पायांचा आणि हातांचा जास्त व्यायाम होत असल्यामुळे शरीराची वाढ मध्ये खूप बदल होतो. जर आपण लहापणापासून पोहत असाल तर आपली उंची नक्कीच वाढेल.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap