हृदयस्पर्शी भावाने बहिणीला लिहिलेले पत्र | भावाचे पत्र | Brothers Letter To Sister

भाऊ आणि बहीण जगातील एक पवित्र आणि मौल्यवान नातं ज्यात कुठलाच भेदभाव नसतो आणि ना घमंड असतो. असेच काही भावाने बहिणीला लिहिले एक प्रेमळ आणि हृदयस्पर्शी पत्र खाली दिलेले आहे.

भाऊ म्हणजे तोच जो पूर्ण जगात आपल्या बहिणीसाठी काहीही करायला तयार होतो जर जग ही एका बाजूस झाले तरीही तो आपल्या पाठीशी उभा राहतो. जेवढी माणसाला आई वडिलांची काळजी असते तेवढीच काळजी भावाला आपल्या बहिणीची असते कारण ते नात जीवनभर साथ राहणार असतं.

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला हृदयस्पर्शी भावावे बहिणीला लिहिलेले पत्र सांगणार आहे. हे पत्र वाचून नक्कीच आपल्या मनात भावूक भावना निर्माण होतील तर काळजीपूर्वक वाचा कारण भावाचे प्रेम सर्वांनाच भेटत नाही.

👉 नक्की वाचा: हृदयस्पर्शी बहिणीने भावाला लिहिलेले पत्र

हृदयस्पर्शी भावाने बहिणीला लिहिलेले पत्र | Bhavache Patra

प्रिय दीदी, मैत्रीण,

तुला दीदी म्हणावे मैत्रीण हेच समजत नाही कारण माझ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीत माझ्या सोबत राहते.

मैत्रीला ही लाजवेल असे बहीण भावाचे बंधन असते आणि नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी बहीण भेटली. तुला माहितीये ह्या जगात कुठलाच भेदभाव नाही, कोणताही लोभ नाही आणि कुठलीही भीती नाही असे नाते कोणते आहे तर ते बहीण भावाचे पवित्र नाते आहे. हो हे तेच नाते आहे जे आपल्यात आहे.

वाटलं नव्हतं की ताई तू एवढ्या दूर जाशील, खूप आठवण येते ग तुझी. सध्या तू खूप कमी वेळा घरी येतेस का ते समजत नाही पण सर्वजण घरात फक्त तुझ्याच बद्दल बोलत असतात. आईचं तर विचारूच नको सतत तुझीच आठवण काढत असते जसे आता दिदीने जेवण केले असेल, आता तिचे हे चालू असेल असेच तिचे चालू असते. दोनतीन दिवसातून तुझी आठवण निघतच असते, रात्री सर्वजण एकत्र जेवायला बसले की बाबा तुझाच विषय करत असतात.

सण देखील सण सारखे वाटत नाही कारण जेव्हा तू राहतेस तेव्हा खूप मस्त वाटायचे, पूर्ण घरात आनंदी आणि हसत खेळत चित्र असायचे. ही दिवाळी देखील अशीच गेली, मला वाटलं होत की तू येशील परंतु तू आलीच नाही. तू राहिलीस की घरात नवनवीन पदार्थ बनायचे पण ह्या दिवाळीला आई कडून जेवढे शक्य झाले तेवढे आईने केले, तेव्हाही आई तुझीच आठवण काढत होती की तुझी दीदी राहिली असती तर अजून फराराचे प्रकार केले असते.

रक्षाबंधन कसे होते हे तर तुला माहिती आहे, तू मला पोस्टाने राखी पाठवते मी एकडून भेटवस्तू पाठवतो असे हे ऑनलाईन रक्षाबंधन पासून मी तर बोर झालोय. तुला आठवतं लहानपणी रक्षाबंधनाला तू मला राखी बांधायची आणि मी तुला एक छोटीसी भेटवस्तू द्यायचो,. एक गोष्ट आहे की तेव्हाची भेटवस्तू छोटी असायची पण आताही भेटवस्तू थोडी मोठी आणि महागडी असते. परंतु असे काय कामाचे ज्यात समोरासमोर रक्षाबंधन होत नसेल. अशा करतो की ह्या येत्या रक्षाबंधनाला तू घरी येशील, येशील ना घरी!

लहानपण ही कसे छान होते, मी तुझ्याशिवाय आणि तू माझ्याशिवाय राहू शकत नव्हते. त्या आपल्या मस्ती, एकमेकांचे नाव घेणे आणि मी तर तुझ भरपूर नाव घ्यायचो कुठे तुझी वेणी वाढायचो तर कुठे तुला मारायचो आणि तू आईला माझे नाव सांगायचो आणि नंतर आई मला मारायला लागली की तुझ मला जवळ घ्यायची.

तुझ्याबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे तरीही एक गोष्ट म्हणतो की मी नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी बहीण मिळाली. असे हे बहीण भावाचे प्रेम असते आणि ज्यांना बहिण नसते ते बहिणीसाठी तरसता परंतु मला बहीण असून देखील तू एवढी दूर आहेस की मी पण तसाच तरसतो.

ताई तू मला खूप खूप प्रिय आहेस आणि मीही तुला खूप आवडतो हेही मला माहितीये परंतु आता नाही सहन होत तुझी वाट बघणे त्यामुळे ह्या रक्षाबंधनाला नक्की घरी ये मी तुझी वाट बघेल.

तुझाच लाडका भाऊ,

निष्कर्ष

बहीण भावाचे प्रेम जे असते ना ते सर्व प्रेमाचे भाऊ असते कारण असे खूप नाते तुम्हाला ह्या जगात बघायला मिळतील परंतु ज्या नात्यात विश्वास आणि प्रेम असते ना तेच नाते ह्या पृथ्वीवर टिकते ते म्हणजे बहीण भावाचे नाते असते. हे असे नाते हे ज्यात कुठलाच भेदभाव, लोभ आणि गर्व नसतो त्यामुळे बहीण भावाच्या नात्याला जगातील सर्वात पवित्र आणि महान नाते मानले गेले आहे.

असेच वरील हृदयस्पर्शी पत्र म्हणजेच भावाने बहिणीला लिहिलेले एक सुंदर पत्र दिले आहे आणि मला खात्री आहे की ते तुम्ही नक्कीच काळजीपूर्वक वाचले असेल. ह्या पत्रात आपल्या भावाने आपल्या बहिणीसाठी काही भावना व्यक्त केल्या आहेत ज्यात त्याने बहीण भावाचे दूरचे नाते मनाने किती जवळ असते हे सांगितले आहे.

माझ्या मते हे पत्र त्या भावांसाठी फायदेशीर ठरू शकते कारण जर त्यांना आपल्या सुंदर बहिणीसाठी काही दोन शब्द मनाला लागणारे लिहायचे आहेत तर. त्यामुळे भावाने बहिणीला लिहिलेले पत्र लक्षात घेऊन आपल्यासाठी आम्ही हे पत्र घेऊन आलो आहोत. मी आशा करतो हे पत्र नक्की आपल्याला आवडले असेल आणि आपण त्यांच्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या असतील.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap