भ्रष्टाचार निबंध मराठी | Corruption Essay in Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला भ्रष्टाचार निबंध मराठी मध्ये सांगणार आहे, म्हणजेच Corruption Essay In Marathi खोलमध्ये सांगणार आहे.

भ्रष्टाचार या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर तो होतो भ्रष्ट आचरण! भ्रष्ट आचरण म्हणजे भ्रष्ट वागणूक होय. आपल्या स्वतःचा फायदा व्हावा म्हणून समाजातील सर्व मूल्य बाजूला सारून केलेले कार्य म्हणजे भ्रष्टाचार होय. भारतात बघायला गेलं तर आपण राजकारणी भ्रष्ट आहेत असे सांगतो परंतु बघायला गेले तर सामान्य व्यक्ती देखील अशा काही चुका करत असतो त्यामुळे तो देखील भ्रष्टाचाराला जबाबदार आहे.

सध्याच्या काळात सेवा क्षेत्र थोडेफार चांगले वाटत होते परंतु आता त्याला देखील भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. असे कोणतेही क्षेत्र नाहीये जिथे भ्रष्टाचार हा होत नाही.

भारताच्या प्रगतीत जर काही गोष्ट आडकाठी बनून उभी असेल तर ती म्हणजे सुरू असलेला भ्रष्टाचार होय. भ्रष्टाचार जर कोणी करत असेल तर त्यात त्या व्यक्तीचा स्वार्थ हा असतोच परंतु त्यात जास्त कोणाचे नुकसान होत नाही असे आपल्याला वाटते. परंतु यात सर्वात आधी नुकसान हे आपल्या देशाचे होत असते आणि परिणामतः सामान्य नागरिक हा यामुळे खूप भरडला जातो.

भ्रष्टाचार मराठी निबंध – Essay on Corruption in Marathi

भ्रष्टाचार म्हणजे काय?

भ्रष्टाचार हे व्यक्तीचे असे आचरण आहे ज्यामध्ये तो स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी देशाचा क्षणभर देखील विचार न करता कुठल्याही मोठ्या संकटात देशाला ढकलू शकतो. मग यात फक्त राजकीय नेतेच नव्हे तर कंत्राटदार, वाहतूक सेवक, सरकारी कर्मचारी, देशाचे रक्षणकर्ते पोलीस यांचाही समावेश होतो. सामान्य स्तरावर बघितले तर आपला शेतकरी देखील दुधात पाणी किंवा इतर भेसळ करून एक प्रकारे भ्रष्टाचारच करत असतो. त्या शेतकऱ्याला वजनात मारणारे तर दूध संकलन केंद्रावाले, बियाणे घ्यायला गेल्यावर फसवे बियाणे देणारे दुकानदार आणि खतांच्या बाबतीत देखील जास्त पैसे घेणारे दुकानदार हे सर्व भ्रष्टाचारच आहेत.

भ्रष्टाचार हा कोणत्या स्तरावर होतो आहे यापेक्षा तो किती जास्त होतो आहे याची जाणीव सगळ्यांना होणे गरजेचे आहे.

भ्रष्टाचाराची कारणे

विकसनशील देश– हो हे देखील सर्वात मोठे कारण आहे कारण यामध्ये देश हा विकसित होत असताना अशा गोष्टींकडे थोड्याफार प्रमाणात दुर्लक्ष केले जाते. जर आपण बघितले की भ्रष्टाचार हा किती वाढला आहे त्यामागे सर्वात महत्वाचे कारण हे प्रशासनाने दाखवलेला हलगर्जीपणा असतो. विकसनशील देशात छोट्या गोष्टींकडे नाही म्हणाले तरी दुर्लक्ष हे होतच असते आणि त्यामुळे हळूहळू भारतासारख्या देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण हे वाढत चालले आहे.

लवचिक न्यायव्यवस्था- भारतासारख्या देशाचीच जर आपण गोष्ट घेतली तर आपल्याकडे न्यायव्यवस्था ही संस्था वेगळी आहे तरी देखील ती खूप जास्त लवचिक आहे. न्यायव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण नसले तरी देखील सरकार आणि न्यायव्यवस्था यांचे नाते मात्र आहे असे म्हणायला काही हरकत नाही. इथे एखाद्या नेत्याने जर भ्रष्टाचार केला तर त्याला न्यायालय लवकरात लवकर शिक्षा ही देण्याऐवजी जास्त काळ ती केस कशी चालेलं याकडे लक्ष देते. जर अशा एखाद्या भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीला कठोर शासन केले तर त्याचा परिणाम असा होईल की कोणीही पुन्हा तसे करण्याविषयी विचार देखील करणार नाही.

सवय- भारतासारख्या देशात आपला शेजारी व्यक्ती किंवा सहकर्मी ती गोष्ट करत आहे तर मग आपण का करू नये म्हणून मग तो व्यक्ती देखील अशा गोष्टी करायला लागतो. आपल्याला एखादी चांगली सवय लागली तर ती टिकवून ठेवणे मुश्किल असते परंतु जर वाईट सवय लागली ना ती सुटता सुटत नाही. आपण विचार करतो की आपण थोडे पैसे घेतलेत किंवा आपण केलेला भ्रष्टाचार हा इतका मोठा नाहीये परंतु आपल्याला माहीत आहे जग गोल आहे! फिरून ते तुम्हालाच भोगावे लागणार आहे.

मानसिकता- जस वर बोललो तसच जर आपली मानसिकता ही एकदा भ्रष्टाचारी झाली ना तर लगेच आपले संपूर्ण जीवन हेच भ्रष्टाचारात निघून जाते. पकडणारा कोणी नसतो आणि एखाद्याने पकडले तरी देखील आपण कमावलेले पैसे आपल्याला सोडवण्यासाठी पुरेसे आहेत ही गोष्ट जोपर्यंत डोक्यात आहे ना तोपर्यंत भ्रष्टाचार हा थांबणे कठीण आहे. आपली मानसिकता एकदा बदलून बघा तुम्हाला देश देखील हळूहळू बदलताना दिसेल. जर भ्रष्टाचार नष्ट झाला ना तर भारत विकसित देश लवकरच बनू शकेल.

लालच- मनुष्य हा लालची प्राणी आहे आणि एखाद्याने आपल्याला लालच दाखवली तर आपण त्याला लगेच बळी पडतो ही गोष्ट सांगायला नको. आपल्याला थोडे जास्त पैसे मिळतील म्हणून आपण थोडा थोडा भ्रष्टाचार करायला सुरुवात करतो आणि पुढे जाऊन मग तर या राईचा डोंगर कधी होतो हे तुम्हाला देखील कळत नाही. लालच ही गोष्ट कमी व्हायचे नाव घेत नाही आणि भ्रष्टाचार हा वाढतच जातो.

लाच देणे आणि घेणे- साधे उदाहरण घेतले तर जेव्हा आपल्याला वाहतूक पोलीस अडवतात तेव्हा आपण म्हणतो की साहेब थोडेफार घ्या आणि मिटवून टाका! हे आपले वाक्य नेहमी असतेच. इथूनच भ्रष्टाचाराला सुरुवात झाली असे म्हणायला काही हरकत नाही. जेवहा आपली ही वृत्ती बदलेल ना तेव्हा हा भ्रष्टाचार कुठे संपायला सुरुवात होईल.

भ्रष्टाचार विरोधी उचलेली पाऊले

भ्रष्टाचार विरोधी भारत सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत. यामध्ये भ्रष्टाचार विरोधी पथक स्थापन करणे हे सर्वात महत्वाचे पाऊल आहे. हे पथक आता पोलिसांच्यावर असणारा भार कमी करत आहे. त्याशिवाय सरकारी यंत्रणेतच जो भ्रष्टाचार होत होता त्याला थांबविण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कॅमेरे तर बसवले आहेत परंतू तिथे होणारे सर्व व्यवहार हे डिजिटल केले आहेत. डिजिटल व्यवहारांचा फायदा हा झाला आहे की यामुळे भारतात जे काही व्यवहार होतात त्यांचे रेकॉर्ड राहतात आणि भ्रष्टाचार सारखी स्थिती आढळली तर लगेच लक्षात येते.

सरकारी नोकरी मध्ये एखादा व्यक्ती असेल आणि जर तो भ्रष्टाचार आरोपाखाली सापडला तरी देखील त्याला गुन्हा सिद्ध होऊ पर्यंत तरी सरकारी नोकरीतून काही काळ दूर ठेवण्यात येते. जर तो खरच गुन्हेगार असेल तर त्याला लगेच निलंबित केले जाते. यामुळे आता सरकारी कर्मचारी नोकरी जाण्याच्या भीतीने घाबरून असतात. हे निर्णय ग्रामीण पातळीवर देखील घेतले गेले असल्याने सर्व भ्रष्टाचाऱ्यांना एक चांगलीच जरब बसली आहे.

आपल्या निवडणूक पद्धतीत सुधारणा आणल्या आहेत. अगोदर या निवडणूक होण्याच्या पद्धतीतच भ्रष्टाचार होत असल्याने जर नेते निवडून येत होते ते भ्रष्टाचार करतच होते. परंतु आता निवडणूक आयोगाने चांगले परिश्रम घेत ही निवडणूक प्रक्रिया भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक बनवली आहे. जे राजकीय नेतृत्व वर जाऊन भ्रष्टाचार करत होत ते आता निवडूनच येत नाही आणि त्यामुळेच भ्रष्टाचाराला काही प्रमाणात राजकीय पातळीवर आळा बसला आहे.

भ्रष्टाचार विषयी तथ्य

भ्रष्टाचार मुक्त देश या यादीत भारताचा क्रमांक हा 80 व्या स्थानी आहे. भारतात वाढत असलेल्या भ्रष्टाचाराचा परिणाम म्हणून भारताची या यादीत घसरण होतच आहे.

चीन मध्ये देखील भ्रष्टाचार हा खुप मोठ्या प्रमाणात असून त्यांचे स्थान भ्रष्टाचार मुक्त देशांच्या यादीत भारताच्याही खाली आहे.

सोमालिया हा देश सर्वाधिक भ्रष्ट देश म्हणून ओळखला जातो.

डेन्मार्क हा देश सर्वाधिक गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. डेन्मार्क देशात भ्रष्टाचार जवळपास पूर्णपणे नष्ट झालेला आहे.

युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे केंद्र आहे. यामध्ये जे लोक आपल्या देशातील टॅक्स चोरतात तो पैसे इथे ठेवला जातो.

निष्कर्ष

भ्रष्टाचाराला समूळ नष्ट जर करायचे असेल तर तुम्हाला स्वतःपासून सुरुवात ही करावी लागेल. आपण टॅक्स भरून, कोणालाही लाच न देण्याची शपथ घेऊन, आपल्या मालात भेसळ न करून किंवा एखादा भ्रष्टाचार करत असेल तर त्याची माहिती सरकारला देऊन भ्रष्टाचार मिटविण्यासाठी मदत करू शकतो.

भ्रष्टाचार निबंध मराठी (Corruption Essay in Marathi) हा लेख आपल्याला कसा वाटला नक्की कळवा आणि जर आमच्याकडून Bhrashtachar Ek Samasya बद्दल काही सुटले असेल किंवा आपल्याला याबद्दल अजून माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap