क्रिकेट खेळाविषयी माहिती मराठीमध्ये | Cricket Information In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला क्रिकेट खेळाविषयी माहिती मराठीमध्ये सांगणार आहे म्हणजेच Cricket Information In Marathi खोलवर स्पष्ट करणार आहे.

क्रिकेट या खेळाविषयी आपल्याला माहिती असेलच परंतु या लेखाच्या माध्यमातून आपण क्रिकेट या खेळाचे सर्व नियम, क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारे प्रकार आणि स्पर्धांविषयी माहिती मराठी भाषेत जाणून घेणार आहोत.

आपल्या भारत देशात गल्लीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट या खेळाला खूप जास्त प्रसिद्धी मिळालेली आहे. प्रत्येक लहान मुलगा ते संसाराला लागलेला युवक देखील या खेळावर सारखेच प्रेम करत असतो. त्यात जर भारत पाकिस्तान सामना असेल मग तर संपूर्ण भारत देश जणू फक्त तो सामनाच बघत असतो! हे क्रिकेट प्रति भारतीयांचे प्रेम… भारतीयांनी क्रिकेटला तर जणू जीवकी प्राण मानले आहे असे म्हणायला काही हरकत नसावी कारण प्रत्येक भारतीय सचिन तेंडुलकर ला किंवा महेंद्रसिंग धोनी सारख्या खेळाडूंना देवच मानतात.

क्रिकेटचा इतिहास | History of Cricket in Marathi

इ स 1598 मध्ये क्रिकेटचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो परंतु तेव्हा त्याला क्रिक्रेट /क्रिक्केट असे म्हणले जायचे. सुरुवातीला हा खेळ लहान मुले खेळत असत परंतु पुढे जाऊन हळूहळू मोठ्यांनी देखील या खेळात रस घेतला आणि हा खेळ लोकप्रिय झाला. शब्दशः अर्थ जर घेतला तर क्रिकेट या शब्दाचा अर्थ हा क्रीक शी निगडित आहे. क्रीक म्हणजे काठी किंवा छडी होय. त्यामुळे क्रिकेट चा अर्थ असा होतो की छडी ने खेळला जाणारा खेळ! पुढे जाऊन या छडीचे रूपांतर हे फळीत म्हणजे बॅट मध्ये झाले. भारतात क्रिकेटची सुरुवात ही 1761 मध्ये बडोद्याच्या आसपास कुठे तरी ईस्ट इंडिया कंपनीकडून झाली असावी. पुढे याची लोकप्रियता वाढतच गेली आणि कधी काळी तर क्रिकेटचा समावेश हा ऑलम्पिक मध्ये देखील होता.

क्रिकेट काय आहे? | What Is Cricket In Marathi

Cricket Information In Marathi
Cricket Information In Marathi Language

क्रिकेट हा एक मैदानी खेळ आहे. यामध्ये दोन संघांचा समावेश असतो. या खेळामध्ये बॅट, बॉल आणि स्टंप हे सर्वात महत्वाचे साहित्य आहे. दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी किमान 11 खेळाडूंचा समावेश या खेळात होतो. एक अतिरिक्त खेळाडू हा संघांमध्ये असतो.

क्रिकेट मध्ये मैदानावर 2 तर बाहेर एक असे एकूण 3 अंपायर असतात. हे अंपायर म्हणजेच पंच मैदानावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद तर ठेवताच परंतु त्यांचे काम हे महत्वाचे निर्णय देणे असते. पंचांचा निर्णय हा अंतिम असतो आणि तो खेळाडूंना मान्य करावा लागतो.

क्रिकेट मध्ये 2 इनिंग असतात. पहिल्या इनिंग मध्ये एक संघ फलंदाजी म्हणजेच बॅटिंग करतो तर दुसरा संघ गोलंदाजी म्हणजे बॉलिंग करतो आणि दुसऱ्या इनिंग मध्ये दुसरा संघ हा फलंदाजी करत असतो. कोणता संघ फलंदाजी करेल किंवा गोलंदाजी करेल हे नाणेफेक ठरवत असते. नाणेफेक जिंकल्यानंतर संघाच्या कर्णधाराला त्याचा निर्णय विचारला जातो. पहिल्या इनिंग मध्ये पहिला संघ हा एक धावसंख्या धावफलकाला लावतो आणि मग दुसऱ्या इनिंग मध्ये प्रतिस्पर्धी संघाला ती धावसंख्या गाठायची असते. पहिला संघ त्यावेळी त्या प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाजी मध्ये चुरस दाखवत त्या धावसंख्येचा पाठलाग करू देत नाही. यामध्ये खेळाच्या प्रकारानुसार षटके (overs) असतात. एका षटकात एकूण 6 चेंडू टाकले जातात. प्रत्येक संघाला 10 विकेट्स दिलेल्या असतात म्हणजे एकतर षटके संपली किंवा आधी विकेट्स संपल्या तरी त्या संघाची इनिंग तिथे संपते. जो संघ दोन्ही इनिंगच्या शेवटी सर्वात जास्त धावसंख्या करेल तो संघ विजेता घोषित केला जातो.

क्रिकेट खेळाडूंची संख्या | Number Of Players In Cricket In Marathi

क्रिकेट हा खेळ मैदानावर दोन संघाने खेळला जाणारा खेळ आहे, ज्यात प्रत्येकी संघात 11 खेळाडू असतात. म्हणजेच दोघी संघ मिळून 22 खेळाडू असतात.

क्रिकेटचे तीन मुख्य प्रकार | Types Of Cricket On International Level In Marathi

क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मुख्यतः तीन प्रकार पडतात. हे प्रकार खेळाची पद्धत आणि षटके यावर आधारित आहेत.

एकदिवसीय क्रिकेट (One Day Cricket)

एकदिवसीय क्रिकेट ला आपण साधारणतः वन डे क्रिकेट असे म्हणतो. वन डे क्रिकेट सामन्यांमध्ये प्रत्येक संघाला 50 षटके खेळण्याची संधी असते. या 50 षटकांमध्ये संघाला 10 विकेट्स मिळतात.

टी-20 क्रिकेट (T-20 Cricket)

टी 20 क्रिकेट किंवा ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट या नावाने हा प्रकार ओळखला जातो. यामध्ये प्रत्येक संघाला नावाप्रमाणेच 20 षटके मिळतात. या खेळांमध्ये जास्तीत जास्त वेगाने धावसंख्या उभारणे आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने लवकरात लवकर विकेट्स मिळवणे आणि धावा न होऊ देणे या गोष्टी येतात.

कसोटी क्रिकेट (Test Cricket)

कसोटी सामने हे वरील दोन प्रकारांपेक्षा वेगळे असतात. वन डे आणि टी 20 मध्ये एकूण 2 च इनिंग असतात परंतु कसोटी सामन्यांमध्ये आपल्याला प्रत्येक संघाला 2 म्हणजे एकूण 4 इनिंग बघायला मिळतात. कसोटी क्रिकेट मध्ये पहिला संघ हा एकदा इनिंग खेळतो नंतर दुसऱ्या संघाला संधी असते मग परत पहिला संघ खेळतो आणि शेवटी तो दुसरा संघ खेळत असतो. या सामन्यांमध्ये आपल्याला 5 दिवसाचा खेळ खेळायचा असतो आणि यात प्रत्येक दिवशी सरासरी 90 षटके खेळली जातात. कसोटी क्रिकेट मध्ये इनिंगला षटकांचे बंधन नसते. जेव्हा आपला संघ सर्वबाद होईल किंवा आपण आपली इनिंग डीक्लेअर करू तेव्हा इनिंग समाप्त होत असते.

चला तर मग आता याच क्रिकेट खेळाविषयी काही नियम जाणून घेऊयात,

क्रिकेटचे मुख्य नियम | Important Rules Of Cricket In Marathi

1) क्रिकेटमध्ये एक षटक हे 6 चेंडूंचे असते. यामध्ये प्रत्येक खेळाच्या प्रकारानुसार षटकांची संख्या ही बदलत असते.

2) फलंदाजाने चेंडू टोलावून धावपट्टी वर जर धाव पूर्ण केली तर ती 1 धाव पकडली जाते.

3) गोलंदाजी करणाऱ्या संघाने म्हणजे त्यांच्या गोलंदाजाने जर फलंदाजाचा स्टंप उडवला तर फलंदाजाला माघारी परतावे लागते म्हणजे तो बाद होतो.

4) गोलंदाजी करणाऱ्या संघाने जर फलंदाजाने हवेत खेळलेला चेंडू जमिनीला न लागता हातात पकडला तर तो फलंदाज आऊट घोषित केला जातो.

5) धाव घेताना जर तो फलंदाज त्या निर्धारित सीमेवर पोहोचला नाही आणि त्याआधीच गोलंदाजी करणाऱ्या संघाने यष्टी म्हणजेच स्टंप उडवला तर तो फलंदाज बाद म्हणजेच धावचित झालेला असतो.

6) यामध्ये यष्टीचीत हा प्रकार देखील आहे आणि यात फलंदाजांच्या मागे असणारा यष्टीरक्षक त्याला धावचित करत असतो.

7) पायचीत हा देखील बाद होण्याचा एक प्रकार आहे आणि यात खेळाडू हा स्टंप च्या अगदी समोर पकडला जातो, त्याच्या बॅटला चेंडू न लागता तो त्याच्या शरीराला लागत असेल आणि अंदाजे जर तो स्टंप वर जात असेल तर खेळाडूला बाद दिले जाते.

8) चेंडू हा टप्पे घेत जर सीमारेषा ओलांडत असेल तर त्या फलंदाजाला चौकार (4 धावा) दिल्या जातात.

9) चेंडू जर टप्पा न घेता सीमारेषा ओलांडत असेल तर फलंदाजाला षटकार म्हणजेच 6 धावा दिल्या जातात.

10) पंचांचा निर्णय हा कायम अंतिम मानला जातो.

धावा काढण्याचे प्रकार | Score Rules In Cricket

क्रिकेट खेळात फलंदाज हा आपल्या संघाला 3 मुख्य प्रकारे धावा काढून देऊ शकतो. यात एक आणखी प्रकार आहे परंतु त्या धावा संघाच्या खात्यात जमा होतात आणि खेळाडूच्या खात्यात त्या धावा येत नाहीत.

स्टंपच्या मध्ये पळून धाव पूर्ण करणे (Running Between The Wickets)

क्रिकेटच्या मैदानाच्या मधोमध एक पिच (खेळपट्टी) बनवलेली असते. तिथेच मुख्य खेळ हा सुरू असतो. या पिचची लांबी 2012 सेमी आणि रुंदी ही 305 सेमी असते. पिचच्या दोन्ही बाजुंना दोन फलंदाज उभे असतात. एक फलंदाज हा गोलंदाजाचा सामना करणार असतो. दुसऱ्या बाजूला फलंदाज हा उभा असतो आणि तिथे पंच असतात आणि त्याच बाजूने गोलंदाजी ही केली जाते. फलंदाज तो चेंडू टोलावून धाव घेण्यासाठी पळत असतो. फलंदाजांनी धाव घेण्याच्या आधी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने तो चेंडू स्टंप पर्यंत पोहोचवून फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करायचा असतो.

चौकार

फलंदाज जेव्हा चेंडू टोलावतो तेव्हाच त्या चेंडूने टप्पे घेत जर सीमारेषा गाठली तर त्याला चौकार म्हणले जाते. यात खेळाडूला 4 धावा मिळतात.

षटकार

फलंदाज जेव्हा त्याची ताकद लावून चेंडू सीमारेषा पार टोलावतो तेव्हा त्याला षटकार म्हणले जाते. यात चेंडू मैदानावर एकही टप्पा न घेता सीमारेषा ओलांडत असतो. यामध्ये फलंदाजाला 6 धावा दिल्या जातात.

अतिरिक्त धावा

या धावा फलंदाजाला न मिळता त्या डायरेक्ट खेळाडूच्या संघाला मिळत असतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून जर चुकीच्या पद्धतीचे चेंडू फेकले गेले तर फलंदाजी करणाऱ्या संघाला त्याच्या बदल्यात धावा मिळत असतात.

चुकीच्या पद्धतीने चेंडू | Wrong Ball Types

वाईड बॉल (Wide Ball)

जेव्हा एखादा चेंडू हा गोलंदाजाकडून असा टाकला जातो की जेणेकरून फलंदाज त्या चेंडूला खेळुच शकत नाही तेव्हा तो चेंडू वाईड बॉल (Wide Ball) समजला जातो. या स्थितीमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला एक धाव दिली जाते.

नो बॉल (No Ball)

नो बॉल होण्याची अनेक कारणे असतात परंतु त्यातील महत्वाची कारणे म्हणजे जेव्हा गोलंदाज बॉल टाकत असताना तो फुल टॉस टाकतो आणि त्या चेंडूची उंची ही फलंदाजांच्या कमरेच्या वर असेल तर तो नो बॉल मानला जातो. बॉल टाकत असताना जर गोलंदाजाचा पाय हा रेषेच्या पुढे असेल तरी तो नो बॉल समजला जातो. क्रिकेट मध्ये क्षेत्ररक्षणाचे काही नियम आहेत आणि जर त्यानुसार जर एखादा क्षेत्ररक्षक चुकीच्या ठिकाणी असेल तरी देखील नो बॉल समजला जातो. गोलंदाजाने गोलंदाजी करताना चुकीच्या ऍक्शनचा वापर केला तरी देखील नो बॉल समजला जातो.

नो बॉलला धावचित फक्त बाद दिले जाते अन्यथा इतर सर्व काही हे नाबाद दिले जाते. या बॉलचा फलंदाजाच्या संघाला 1 रन दिला जातो आणि पुढील एक अतिरिक्त बॉल मिळतो त्याला फ्री हिट देखील मिळते. या फ्री हिट बॉल वर देखील धावचित शिवाय इतर काहीही लागु नसते.

बाय (Bye)

जेव्हा एखाद्या चेंडूला फलंदाज टोलावू शकत नाही आणि पुढे जाऊन तो यष्टी रक्षक देखिल चेंडू पकडू शकत नाही तेव्हा खेळाडूला पळून धावा काढण्याची संधी मिळते. त्या सर्व धावा या बाय मध्ये पकडल्या जातात.

क्रिकेट मधील महत्वाच्या स्पर्धा | Important Events In Cricket

ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल द्वारे काही स्पर्धांचे आयोजन हे केलेलं असते. यामध्ये 3 मुख्य स्पर्धा आहेत.

वर्ल्ड कप (विश्व चषक)

विश्व चषक स्पर्धा ही वन डे विश्वचषक स्पर्धा असते आणि ती प्रत्येक 4 वर्षांनी खेळली जाते. या स्पर्धेमध्ये सर्व देश सहभागी होत असतात. जो देश फायनल जिंकेल त्याच्या नावावर हा विश्वचषक असतो. भारताला आत्तापर्यंत 2 वेळा म्हणजे एकदा कपिल देव आणि एकदा महेंद्रसिंग धोनी यांच्या कर्णधार असताना विश्वचषक मिळालेला आहे.

टी-20 वर्ल्ड कप (20 षटकांचा विश्व चषक)

याचा फॉरमॅट देखील वर्ल्ड कप सारखाच असतो परंतु यात षटकांची संख्या ही 20 असते. भारताने 2007 साली एम एस धोनी यांच्या कर्णधार असताना एकदा ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी

ही देखील वन डे चषक स्पर्धा आहे. यामध्ये वर्ल्ड कप प्रमाणेच सर्व देश खेळत असतात. या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारताकडे 2002 आणि 2013 या दोन वर्षी आलेले आहे. 2002 साली विजेतेपद हे श्रीलंकेसोबत भारताला विभागून मिळाले होते. आता ही स्पर्धा बंद करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सुरू करण्यात आलेली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जागेवर ही स्पर्धा सुरू करण्यात आलेली असून भारत पहिल्याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील पोहोचला होता. न्यूझीलंड समोर भारताला अपयशाचा सामना करावा लागला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप चे पहिले विजेतेपद हे न्यूझीलंड संघाला मिळाले.

भारतीय क्रिकेट खेळाडूंची नावे | Indian Cricketers Names In Marathi

1) सचिन तेंडुलकर

2) महेंद्र सिंग धोनी

3) विराट कोहली

4) रोहित शर्मा

5) के ल राहुल

6) जसप्रीत बुंब्राह

7) ऋषण पंत

8) रवींद्र जडेजा

9) संजू सॅमसन

10) हार्दिक पंड्या

11) भुवनेश्वर कुमार

12) मोहम्मद शमी

13) पृथ्वी शाह

14) इशान किषण

15) कुलदीप यादव

16) युझवेंद्र चाहल

17) चेतन सक्रिय

18) नितीश राना

19) दिनेश कार्तिक

20) देवदत्त पदिक्कल

21) वरून चक्रवर्ती

22) मयंक अगरवाल

23) ऋतुराज गायकवाड

24) हनुमान विहारी

25) केदार जाधव

26) हरभजन सिंग

क्रिकेटविषयी रोचक तथ्य | Interesting Facts About Cricket In Marathi

क्रिकेटचे जनक कोण आहेत? Who Is The Father Of The Cricket In Marathi?

विल्यम गिल्बर्ट ग्रेस हे क्रिकेटचे जनक आहेत, आणि भारतीय क्रिकेट जनक म्हणून रणजीतसिंहजी विभाजी जडेजा यांना ओळखले जाते.

क्रिकेट चा देव कोणाला म्हटले जाते? Who Is Known As The God Of Cricket In Marathi?

जेव्हा क्रिकेट अती चर्चेत आला आणि तेव्हा एक खेळाडू सर्व रेकॉर्ड तोडू लागला तो म्हणजे सचिन तेंडुलकर ज्याला क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते. सोबतच सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देखील भेटला आहे. असेच मास्टर ब्लास्टर आणि लिट्ल मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेंडुलकर ने भारताचे नाव रोशन केले आहे.

क्रिकेट मध्ये सिक्सर किंग कोणाला म्हणतात? Who Is The Sixer King In Cricket In Marathi?

ग्रीस गेल ने 140 सामन्यात 357 सिक्सर आणि 404 चौकार मारले आहेत म्हणून याला सिक्सर किंग म्हटले जाते. त्याचबरोबर रोहित शर्माने देखील सिक्सर किंग आपल्या नावावर केले आहे त्याने 207 सामन्यात 224 सिक्सर आणि 476 चौकार मारले आहेत.

कोणत्या देशात सर्वाधिक क्रिकेट मैदाने आहेत? Which Country Has Most Cricket Stadium In Marathi?

सर्वाधिक क्रिकेट मैदाने असलेला देश म्हणून भारताचे नाव आधी येते कारण भारतात एकूण 28 क्रिकेट मैदाने आहेत.

जगातील सर्वात लहान क्रिकेट मैदान कोणते? Which Is The Smallest Cricket Stadium In World In Marathi?

न्यूझीलंड मधील इडन पार्क हे जगातील आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वात लहान क्रिकेट मैदान आहे.

निष्कर्ष

क्रिकेट हा खेळ विश्वात खूप प्रसिद्ध असलेला खेळ आहे, जो की आजकाल खूप जण पाहणे व खेळणे पसंद करतात. तर ह्या खेळाविषयी माहिती असणे आपल्याला गरजेचे आहे आणि मुख्य तर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ज्यांना क्रिकेट खेळाची माहिती विचारली असेल किंवा क्रिकेट वर निबंध मराठी मध्ये लिहून आणा असे सांगितले असेल.

क्रिकेट खेळाविषयी जवळपास सगळी माहिती आम्ही इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला क्रिकेट माहिती मराठी मध्ये किंवा Cricket information in Marathi हा लेख कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये कळवा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap