नमस्कार मंडळी आज मी आपल्याला टेलिग्राम अकाउंट डिलिट कसे करावे हे सांगणार आहे आणि आपल्या मनात असे कधी ना कधी आलेच असेल. तर हे आर्टिकल आपल्यासाठी खूप फायदेमंद राहणार आहे कारण यात तुम्ही Delete Telegram Account Permanently करू शकता.
टेलिग्राम ऍप जर आपण डिलिट करत असाल तर म्हणजे आपल्याला टेलिग्राम ऍप काय आहे माहिती आहे परंतु त्याबद्दल तुम्हाला पूर्ण ज्ञान नसेल. कारण टेलिग्राम हे सेक्युर मेसेंजर ऍप आहे आणि व्हॉटसअपच्या तुलनेत हे ऍप देखील recommended केले जाते. जर आपण आपले टेलिग्राम अकाउंट कायमस्वरूपी साठी डिलिट करत असाल तर खालील detail guide लक्षपूर्वक वाचा. आणि telegram account delete करण्याच्या आधी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायचे तेही सांगितले आहे.
Table of Contents
Telegram Account Delete करण्याच्या आधी लक्षात ठेवण्यायोग्य गोष्टी
जे टेलिग्राम अकाउंट आपल्याला डिलिट करायचे ते आधी टेलिग्राम ऍप मध्ये उघडून ठेवा. कारण त्याच्यावर तुम्हाला SMS येईल.
आपण ज्या device मध्ये टेलिग्राम अकाउंट डिलिट करणार आहे त्यात इंटरनेट कनेक्शन आणे आवश्यक आहे आणि ते मजबूत आणि जलद असायला हवे.
टेलिग्राम अकाउंट डिलिट करण्यासाठी आपल्याकडे एक browser असायला हवे, कारण Telegram account permanently delete फक्त आपण ब्राऊझर मध्ये करू शकता टेलिग्राम ऍप मधून नाही.
आपल्या टेलिग्राम अकाउंट मध्ये आपल्याला एक SMS येईल म्हणजेच One Time Password येईल तो आपल्याला access म्हणून लागेल. परंतु लक्षात ठेवा की Sms तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर येणार नाही तर टेलिग्राम ऍप मध्ये येईल.
Telegram Account Delete केल्यावर काय होईल?
टेलिग्राम अकाउंट पर्मनंट डिलिट केल्यावर आपली सर्व history मिटून जाईल जसे आपले सर्व contact आणि messages delete होऊन जातील.
आपण ज्या channels आणि groups मध्ये join असाल तर तसे चे तसेच राहतील त्यांचा आणि तुमचा संपर्क तुटला असेल.
आपण ज्या channels आणि groups मध्ये messages केले असतील ते तसेच राहतील आणि सर्व सदस्यांना तसेच दिसतील आणि ते चॅनल्स तसेच असल्यामुळे त्यातील members एकमेकांशी chatting करू शकतील.
जर आपण पुन्हा त्याच mobile number वरून टेलिग्राम अकाउंट उघडले तर ते new user सारखे उघडेल आणि तुमची मागील history delete झाली असेल.
Telegram Account Delete का करतात?
जर कोणी दोन दोन telegram accounts open केले असेल तर अश्यावेळी ते एक अकाउंट डिलिट करतात कारण त्यांना सध्या एकाच टेलिग्राम अकाऊंटची गरज असते. किंवा काही वेळेस कोणाकडून काही चुकी होऊन जाते जी समोरच्याला वाईट वाटते अश्या वेळेस देखील खूप जण आपले अकाउंट डिलिट करून देतात.
जर आपणास टेलिग्राम ऍप मध्ये काहीच उपयोग नसेल आणि टेलिग्राम ऍप आपल्या फोन मध्ये फक्त एका कोपऱ्यात पडले असेल ज्याचा तुम्ही काहीच वापर करत नसाल तर अश्या वेळेस सुद्धा telegram app delete करण्याचा निर्णय येतो.
Telegram Account Delete कसे करावे Step by Step Guide In Marathi
Step 1
https://my.telegram.org/auth?to=deactivate दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि ब्राऊझर मध्ये उघडा. ह्या लिंक वर गेल्यावर तुम्हाला खाली दिलेल्या फोटो नुसार पेज दिसेल.
Step 2
नंतर तेथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकण्याचे ऑप्शन दिसेल त्यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायला लागेल. परंतु लक्षात ठेवा की जे टेलिग्राम अकाउंट आपल्याला डिलिट करायचे आहे तोच मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे.
Mobile number टाकतांना आधी तुमचा country code टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंतर. उदाहणार्थ भारताचा country code आहे + 91 आणि आपण एक मोबाईल नंबर घेऊत 1234567890 तर हा नंबर आपण तिथे कसा टाकाल. तर बघा 911234567890 असा नंबर आपल्याल तिथे टाकायचा आहे. खाली दिलेल्या फोटो मध्ये आपण बघू शकता मी मोबाईल नंबर कसा टाकला आहे.
Step 3
नंतर आपल्याला एक login code येईल जो आपल्याला आपल्या telegram account मध्ये दिसेल. जे अकाउंट आपण डिलिट करणार आहेत त्याच अकाउंट मध्ये आपल्याला Telegram कडून एक मेसेज येईल त्यात एक one time password येईल ज्यात login code नावाने लिहिले असेल जे मी खाली दिलेल्या फोटो मध्ये दिलेले आहे.
Step 4
टेलिग्राम अकाउंट मध्ये आलेला कोड आपल्याला confirmation code च्या जागेवर टाकायचा आहे. त्या कोडला कॉपी करून तिथे पेस्ट करायचा आहे आणि जर कॉपी होत नसेल तर एक एक अक्षर व्यवस्थित बघून तिथे टाईप करा. खाली दिलेल्या फोटो नुसार आपल्याला आपल्या अकाऊंटवर आलेला code टाकायचा आहे.
Step 5
नंतर आपल्यासमोर खाली दिलेल्या फोटो नुसार स्क्रीन येईल त्यात तुम्हाला Delet Your Account असे दिले असेल. त्याच खाली तुमचा मोबाईल नंबर दिलेला असेल आणि त्याचा खाली दिले असेल की आपण टेलिग्राम का सोडत आहात, त्याचे कारण आपल्याला विचारले असेल. तर आपल्याला हवे असल्यास ते कारण टाका नाहीतर ती रिकामे सोडून Delete My Account वर क्लिक करा. हे देखील मी खाली फोटो मध्ये दिले आहे आपण तसे फॉलो करू शकता.
Step 6
डिलिट माय अकाउंट वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक popup उघडेल त्यात तुम्हाला दोन पर्याय दिसतील जसे खाली दिलेल्या फोटो मध्ये दिले आहे. त्या ठिकाणी आपल्याला Yes delete my account आणि बाजूला Nope, I’ll give it another try. असे विचारले असेल. पहिल्या ऑप्शन चा अर्थ होतो की हो मला अकाउंट डिलिट करायचे आहे आणि दुसऱ्या ऑप्शन चा अर्थ नाही मी पुन्हा प्रयत्न करीन असा आहे.
तेव्हा आपण पहिल्या ऑप्शन निवडून म्हणजेच Yes delete my account वर क्लिक.
त्यानंतर आपले अकाउंट पूर्णपणे डिलिट झालेले असेल.
निष्कर्ष
Telegram app एक उत्कृष्ट Messenger app आहे जे व्हॉट्सअँप सारखेच प्रसिद्ध आहे. कारण ह्यात व्हॉटसअप पेक्षा जास्त फीचर्स आहेत आणि सर्व फील्ड च्या लोकांना सोयीस्कर आहे. टेलिग्राम अकाउंट डिलिट करणे खूप सोपे आहे परंतु हे टेलिग्राम ऍप मधून शक्य नसते म्हणून ब्राऊझर मधून करावे लागते. तसे टेलिग्राम ऍप मधून सुद्धा होते परंतु तिथून कायमस्वरूपी साठी डिलिट करता येत नाही त्यात फक्त 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 12 महिने एवढ्या कालावधीसाठी डिलिट करता येते परंतु पर्मनंट नाही करता येत.
वर दिलेल्या आर्टिकल मध्ये मी आपल्याला How To Delete Telegram Account Permanently step by step guide दिलेले आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात शक्य होईल असे समजावले आहे.
परंतु जर आपल्याला खरंच permanent delet करायचे असेल तरच वर दिलेली प्रोसेस फॉलो करा. कारण एकवेळेस चे तुमचे Telegram Account Delete झाल्यानंतर त्यातील सर्व चॅटिंग, कॉन्टॅक्ट डिलिट होतील. आणि आपण जेव्हा त्याच नंबरने अकाउंट उघडाल तेव्हा new user सारखे open होईल आणि त्यातील history डिलिट झालेली असेल.