एकूण दिशा किती आणि कोणत्या आहेत | दिशा ओळख | दिशा म्हणजे काय | Directions In Marathi

नमस्कार मंडळी आज मी एकूण दिशा किती आहेत म्हणजेच Direction In Marathi आणि दिशा कोणत्या आहेत ते सांगणार आहे. त्याचबरोबर दिशा म्हणजे काय हे देखील समजवून सांगणार आहे जे विद्यार्थी मित्रांना फायदेशीर ठरेल.

आजच्या गर्दीच्या जीवनात विद्यार्थ्यांना काही गोष्टी अपूर्ण माहीत असतात आणि त्यातीलच त्यांना फक्त चार दिशा माहीत असतात. परंतु 4 दिशा सोडून देखील अजून काही दिशा आहेत ज्या सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे.

ज्ञान हे भेटत असेल तर ते अपूर्ण का घ्यावे तर संपूर्ण ज्ञान हे एका व्यक्तीला हुशार बनवते. दिशा हे पूर्थीवरील महत्वाचे घटक आहेत आणि कारण आजकाल कोणाला कुठे जायचयं, कुठे प्रवास करायचा हे सर्व दिशा वार ठरते. जसे जर आपण राहतात दक्षिणेकडे आणि आपल्याला जायचे आहे पश्चिमेकडे तर आपल्याला आपल्या गाडी पश्चिमेकडे वळवावी लागेल.

प्रत्येक दिशेचे दिग्पाल देखील दिलेले आहेत. दिग्पाल म्हणजे त्या दिशेचे रक्षक.

तर सुरू करूया दिशांची माहिती मराठीमध्ये तेही एकदम सोप्या आणि सरळ भाषेत.

दिशा म्हणजे काय? What Is Directions In Marathi

जर एखादी गोष्ट किंवा दिशा तुम्हाला तुमच्या ठिकाणाचा मार्ग दाखवते म्हणजेच तुम्हाला जावयाची दिशा दाखवते त्याला दिशा असे म्हणतात. कारण तुम्हाला दिशा माहीत असतील तर तुम्ही तुमच्या योग्य ठिकाणी जरूर पोहचाल.

एकूण दिशा किती आहेत

Directions In Marathi

एकूण दिशा ह्या आठ आहेत परंतु मुख्य चार दिशा आहेत आणि चार उप दिशा आहेत. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार एकूण दहा दिशा आहेत. जर ह्या चार दिशा तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच इतर चार दिशा ही तुमच्या लक्षात येतील.

चार दिशांची नावे | Four Directions Names In Marathi

मुख्य चार दिशा आहेत त्यांचे नावे व त्यांची माहिती खाली दिली आहे.

पूर्व दिशा (East Direction)

सूर्य ज्या दिशेला उगवतो ती पूर्व दिशा असते. इंद्र देवाला पूर्व दिशेचे दिग्पाल म्हटले जाते. पूर्व दिशेला इंग्रजीमध्ये ईस्ट डायरेक्शन असे म्हणतात.

2. पश्चिम दिशा (West Direction)

सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा पश्चिम दिशा असते. वरून देवाला पश्चिम दिशेचे दिग्पाल मानले जाते. पश्चिम दिशेला इंग्रजीत वेस्ट डायरेक्शन असे म्हणतात.

3. दक्षिण दिशा (South Direction)

दक्षिण ध्रुवावर बर्फाळ खंड अंटार्क्टिका आहे ज्याने देखील दक्षिण दिशा ओळखली जाते. दक्षिण दिशेला पृथ्वीचा साऊथ पोल स्तिथ आहे. हिंदू धर्मात दक्षिण दिशेचे दिग्पाल यम देवाला मानले जाते. दक्षिण दिशेला इंग्रजीत साऊथ डायरेक्शन म्हणतात.

4. उत्तर दिशा (North Direction)

उत्तर दिशेला पृथ्वीचे नॉर्थ पोल स्थिथ आहे त्यामुळे देखील ही उत्तर दिशा म्हणून ओळखली जाते. कुबेर देवाला उत्तर दिशेचे दिग्पाल मानले जाते. उत्तर दिशेला इंग्रजीमध्ये नॉर्थ डायरेक्शन असे म्हटले जाते.

आठ दिशांची नावे | Eight Directions Names In Marathi

चार उप दिशा त्यांची नावे आणि त्यांची माहिती खाली दिली आहे. चार दिशा म्हणजे वरील चार दिशा आणि चार दिशा असे आहे.

5. आग्नेय

पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्ये आग्नेय दिशा येते. आग्नेय दिशा अग्नी ह्या घटकाला दर्शवते. आग्नेय दिशेला इंग्रजीमध्ये साऊथ ईस्ट डायरेक्शन असे म्हणतात म्हणजेच दक्षिण पूर्व.

6. नैऋत्य

दक्षिण आणि पश्चिम दिशामध्ये नैऋत्य दिशा येते. नैऋत्य दिशेला इंग्रजीमध्ये साऊथ वेस्ट डायरेक्शन असे म्हटले जाते म्हणजेच दक्षिण पश्चिम.

7. वायव्य

पश्चिम आणि उत्तर दिशेच्या मध्ये वायव्य दिशा स्थित असते. वायव्य दिशेचे दिग्पाल वायू देवाला मानले जाते. ह्या दिशेला इंग्रजीमध्ये नॉर्थ वेस्ट डायरेक्शन म्हटले जाते म्हणजेच उत्तर पश्चिम.

8. ईशान्य

उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये जी दिशा येते तिला ईशान्य दिशा असे म्हटले जाते. महादेव देवतांना ईशान्य दिशेचे दिग्पाल म्हटले जाते. ईशान्य दिशेला इंग्रजीमध्ये नॉर्थ ईस्ट डायरेक्शन देखील म्हटले जाते म्हणजेच उत्तर पूर्व.

दहा दिशांची नावे | Ten Directions Names In Marathi

इंग्रजीमध्ये फक्त आठ दिशा दिलेल्या आहेत परंतु हिंदू धर्मात दहा दिशा दिलेल्या आहेत. ज्योतिषी शास्त्रात एकूण दहा दिशांचे वर्णन केले आहे.

दहा दिशा म्हणजे वरील आठ दिशा आणि खाली दोन दिशा असे एकूण दहा दिशा आहेत.

9. आकाश

आकाश ही दिशा हिंदू धर्मात वर्णित आहे, ह्या दिशा उध्वार असे देखील म्हणतात. आकाश दिशेचे दिग्पाल ब्रम्हा आहेत.

10. नरक

नरक दिशेचे देखील वर्णन ज्योतिष शास्त्रात केलेले आहे आणि ह्या दिशेला दिशा अंतर्गत म्हणतात. नरक दिशेचे दिग्पाल शेषनाग देवाला मानले जाते.

दिशा कशी ओळखावी | How To Identify The Direction In Marathi

How To Identify The Direction In Marathi

वर दिलेल्या चित्रामध्ये व्यक्ती जसा उभा आहे तसे तुम्हाला उभे राहायचे आहे कारण ह्यामुळे आपल्याला दिशा ओळखणे खूप सोपे जाईल.

असे उभे रहा ज्याने आपले तोंड सूर्योदय कडे येईल म्हणजेच पूर्व दिशेकडे. आता जिकडे तुमचे तोंड आहे ती पूर्व दिशा, जिकडे तुमची पाठ आहे ती पश्चिम दिशा, तुमच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा, आणि तुमच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा. अशी ही सरल दिशा ओळख आहे.

दिशांचे महत्व | Importance Of Directions In Marathi

पूर्व दिशेला प्रवेशद्वार असणे शुभ मानले जाते. दक्षिण दिशेला धन ठेवणे शुभ मानले जाते. उत्तर दिशेला खिडक्या आणि दरवाजे ठेवणे शुभ मानले जाते. ईशान्य दिशेला देवघर आणि मंदिर असणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात अश्या सर्व दिशांना खूप महत्त्व दिलेले आहे.

निष्कर्ष

दिशा ह्या फक्त मार्ग दाखवण्यासाठी नाही तर काही शुभ कामांसाठी देखील महत्वाच्या आहेत. वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व प्राप्त आहे.

विद्यार्थ्याना दिशा लक्षात ठेवणे अवघड जाते परंतु ह्या लेखाच्या माध्यमातून त्यांची शंका दूर झाली असेल. त्याचबरोबर त्यांना दिशांचे महत्व आणि त्यांची माहीत, दिशा किती आहेत आणि कोणत्या आहेत हे माहीत पडले असेल. Directions In Marathi हा लेख लिहिण्याचा उद्देश एवढाच आहे की मराठी विद्यार्थी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचावी.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap