दिवाळी सणाची संपूर्ण माहिती मराठीमध्ये | Diwali Information in Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला दिवाळी सणाची माहिती मराठीमध्ये सांगणार आहे म्हणजेच Diwali Information In Marathi खोलवर सांगणार आहे.

दिवाळी हा सण म्हणजे आपल्या संपूर्ण भारतासाठी एक आनंदोत्सव असतो. देशातील प्रत्येक नागरिक या सणाच्या काळात भलताच आनंदी असतो. साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर या थंडीच्या महिन्यात येणारा हा सण वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो. दिवाळीला नवीन कपडे, घरांवर सजावट आणि फराळ या गोष्टी आपल्याला आनंद देत असतात. लक्ष्मीपूजन, भाऊबीज यासारख्या सणांची मांदियाळी म्हणजे दिवाळी होय.

आज याच दिवाळी सणाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण दिवाळी सणांची माहिती, दिवाळी का साजरी केली जाते, दिवाळीचे महत्व आणि इतिहास (Diwali Festival Information, why we celebrate Diwali, Importance of Diwali Festival and History of Diwali in Marathi) बघणार आहोत.

दिवाळी सणाचा इतिहास – History of Diwali Festival

दिवाळी हा सण प्रत्येक समाजाच्या दृष्टीने वेगवेगळ्या इतिहासाशी निगडीत आहे. याच संदर्भ जवळपास सतयुगात आपल्याला आढळतो. जेव्हा नरसिंह देवाने हिरण्यकश्यपुचा वध केला होता त्यानंतर दिवाळी हा आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला असा संदर्भ काही लोक देतात.

काही मतांनुसार द्वापारात भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि तेव्हापासून अश्विन अमावस्या साजरी केली जाऊ लागली. काही लोकांच्या मते या दिवशी माता लक्ष्मी दुग्धसागरामधून प्रकट झाल्या आणि शक्ती देवीने तेव्हा महाकालीचे रूप घेतले म्हणून आपण आश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन साजरे करतो.

पांडव आश्विन अमावस्येच्या दिवशी वनवास संपवून परतले होते त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी घरोघरी दीप लावून आनंदोत्सव साजरा केला होता अशी देखील एक आख्यायिका आहे. राम, लक्ष्मण आणि सीता माता हे 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्या नगरीत परतले आणि त्यामुळे अयोध्या नगरीतील लोकांनी आनंदोत्सव साजरा केला आणि तो पुढेही साजरा करत राहिले अशी एक कथा आहे.

दिवाळी मधील दिवसांचे महत्व – Importance Of Days During Diwali

दिवाळीला आपण दिपावली असे देखील म्हणतो. दिपावली म्हणजे दिव्याची अवली म्हणजेच दिव्याची रांग होय. दिवाळीला आपण दीपोत्सव असे देखील म्हणत असतो. दीपोत्सव हा शब्द आपल्याला असा अर्थ सांगून जातो की हा दिव्याचा म्हणजेच प्रकाशाचा उत्सव आहे. अंधारावर मात करत म्हणजे चुकीच्या आणि असत्य गोष्टींवर आपण मात करून सत्याच्या आणि योग्य मार्गाने विजय मिळवून हा सण साजरा करत असतो. दिवाळी हा सण परिवारांना एकत्र आणून आनंद वाटण्याचा सण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत असलेले सर्व सण उत्सव हे आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी मदत करत असतात. त्यातील दिवाळी हा सण म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीत असलेल्या सणांचा राजा म्हणायला काही हरकत नाही.

दिवाळी हा एकूण 5 दिवसांचा उत्सव आहे. यामध्ये प्रत्येक दिवसाची माहिती खालीलप्रमाणे-

धनत्रयोदशी-

Diwali Information In Marathi Dhantrayodashi

दिवाळी या उत्सवाची सुरुवात छोट्यामोठ्या सणांनी आधीच झालेली असते परंतु खरी दिवाळी ही धनत्रयोदशीला सुरू होते. या दिवशी सोने चांदीचे दागिने आणि नवीन वस्तू लोक घेतात. हा दिवस धनाची पूजा करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी शुभ म्हणतात. देवी धन्वंतरी चा या दिवशी जन्म झाला असे समजले जाते. त्यामुळे देवी धन्वंतरी ला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची पूजा केली जाते. असे मानणे आहे की या दिवशी लक्ष्मी घरात प्रवेश करून आपले दारिद्र्य निर्मूलन करत असते.

नरकचतुर्दशी-

Diwali Information In Marathi Narak Chaturdashi

लहान दिवाळी म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो. दिवाळीचा दुसरा दिवस हा नरक चतुर्दशी असतो. नरकासुर वध हा या दिवशी झाला होता अशी आख्यायिका या दिवासविषयी प्रचलित आहे. या दिवशी आपण आपल्या पूर्वजांसाठी दिवे लावावेत आणि प्रार्थना करावी अशी शिकवण हिंदू धर्मात आहे.

लक्ष्मीपूजन-

Diwali Information In Marathi Laxmipujan

मोठी दिवाळी आणि दिवाळी मधील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन होय. आश्विन अमावस्या ही नरकचतुर्दशी पासून सुरू होते आणि ती लक्ष्मीपूजनाच्या रात्री संपते. आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी माता लक्ष्मी आणि सरस्वती सोबत श्री गणेशाची आराधना करत असतो.

या दिवशी या तिन्ही देवांना घरात येण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी त्यांच्या स्वागताला रांगोळी काढली जाते, घरावर आकर्षक रोषणाई केली जाते आणि सर्वत्र दिवे लावले जातात. घराचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवल्या जातात. दिवाळी साठी बनवलेले सर्व फराळाच्या पदार्थांचा नैवद्य हा या देवांना दाखविला जातो. पूजा संपन्न झाल्यानंतर बाहेर फटाके फोडून आनंद साजरा केला जातो. एकदा पूजा झाली की जवळपासचे आपले कुटुंबीय एकत्र येऊन गोड फराळाचा आनंद घेतात. हा दिवस व्यावसायिकांसाठी देखील महत्वाचा असतो. ते धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मी ची पूजा दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी करत असतात.

बलिप्रतिपदा / दिवाळी पाडवा-

Diwali Information In Marathi Diwali Padwa

गुढीपाडवा ज्याप्रमाणे मराठी नववर्ष म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा हा दिवस सर्व व्यापारी आणि व्यावसायिक लोकांसाठी आर्थिक नववर्षाची सुरुवात असते. ‘ईडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणून आपण बळीराजाला साकडे घालत असतो. छत्रपती शिवरायांच्या आधी कोणाचे सुफल समृद्ध असे राज्य होते तर ते म्हणजे बळीराजाचे होते. शेतकरी राजा या दिवशी आपल्या शेतात एका मडक्यात कणकेचा दिवा लावून पुरतात. असे करून ते त्या बळीराजाची पूजा करत असतात.

हा सण नवविवाहित आणि विवाहित जोडप्यासाठी महत्वाचा असतो. या दिवशी पत्नी ही पतीचे औक्षण करते आणि पती त्याबदल्यात तिला ओवाळणी देत असतो. साडे तीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्याने याला हिंदू संस्कृतीत खूप महत्व आहे.

भाऊबीज-

Diwali Information In Marathi Bhau beej

बहीण भावाच्या गोड नात्याला आणखी उजाळा देणारा हा सण म्हणजे भाऊबीज! या दिवशी बहीण भावाला ओवाळते. ओवाळत असताना आजूबाजूला दिव्यांची आरास केलेली असते आणि यात भाऊ बहिणीला काहीतरी गिफ्ट देत असतो. रक्षाबंधन सणामध्ये रक्षण करण्याचे वचन मागितले जाते परंतु या सणाला बहीण काही न मागता भावाकडून फक्त प्रेम मागत असते.

या 5 महत्वाच्या दिवसांच्या व्यतिरिक्त आपण दिवाळी सणामध्ये वसुबारस साजरी करतो. ज्यात गाईच्या पाडसची पूजा केली जाते. आपल्या हिंदू संस्कृतीत गाईला खूप महत्वाचे स्थान आहे आणि या दिवशी आपण गाईला आणि तिचा पाडसाला पुरणपोळीचा नैवद्य बनवून खाऊ घालत असतो.

दिवाळी सणाविषयी माहिती

दिवाळी निमित्त सासरी आलेल्या सुवासिनी या माहेरी जात असतात. भाऊबीज त्या माहेरी साजरी करतात. दिवाळी सणाला आपण विविध प्रकारचे गोड धोड पदार्थ बनवत असतो. त्याला फराळ म्हणतात. यात शेव, चिवडा, चकली, लाडू, करंजी, पुऱ्या, अनारसे यांचा समावेश असतो. आपण हा फराळ लक्ष्मीपूजन होऊ पर्यंत खात नाही. एकदा पूजा झाली की आपण हे फराळ कुटुंबियांसोबत ग्रहण करत असतो.

दिवाळी मधील प्रत्येक दिवशी आपण पहाटेच उठून अभ्यंगस्नान करत असतो. घराच्या बाहेर एक आकाशकंदील आणि विद्युत रोषणाई ही केली जाते. प्रत्येक दिवशी सायंकाळी सर्वत्र पणत्या लावून विद्युत रोषणाई केली जाते.
दिवाळी सणाला आपण फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत असतो परंतु वाढते प्रदूषण लक्षात घेता आपण प्रदूषण मुक्त दिवाळीकडे सध्या वळतो आहे. शाळा आणि शैक्षणिक संकुलांमध्ये आता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याकरिता शपथ दिली जाते आहे.

आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्र परिवाराला, नातेवाईकांना फराळाचे पदार्थ आणि काही उपहार देऊन आपले नाते अधिक बळकट करत असतो. यातून आपल्या गाठीभेटी देखील होतात आणि आपण एकमेकांच्या अधिक जवळ येतो. आपल्यातील जो काही वाद असेल तो या दिवाळी सणाच्या माध्यमातून नष्ट होतो आणि आपण नवीन नात्याचे दीप लावत असतो.

दिवाळी या सणाला हिंदू संस्कृती मध्ये खूप जास्त महत्व आहे. दिवाळी सणाविषयी जवळपास सर्व काही माहिती आज या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवली आहे. यावर्षी येणाऱ्या दिवाळी सणाला आपण एक शपथ घेऊयात की आपल्या संस्कृतीला पकडून पर्यावरणाची हानी होणार नाही अशी काही दिवाळी साजरी करूयात.

निष्कर्ष

दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण, भारतीय लोकांचा आवडता सण. हा पाच दिवसाचा सण आणि ह्या पाच दिवसांतील मज्जा फक्त भारतातच अनुभवायला मिळते.

Diwali Information In Marathi हा लेख लिहिण्याचा उद्देश फक्त आपल्याला मराठी मंडळींना दिवाळी सणाची माहिती मराठीमध्ये कळावी. जर आमच्याकडून काही माहिती सुटली असेल तर ती कमेंट करून जरूर सांगा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap