माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | Diwali Nibandh Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी सांगणार आहे म्हणजेच Diwali Nibandh Marathi. हा निबंध नक्कीच आपल्याला पैकी चे पैकी गुण मिळवून देईल याची आम्ही खात्री घेतो.

भारतात अनेक प्रकारचे सण साजरा केले जातात आणि त्यांच्यातील एक सण म्हणजे दिवाळी हा आहे. दिवाळी आली म्हणजे सर्वजण खूप आनंदाने साजरा करतात कारण हा सण भारतात वर्षानुवर्ष साजरा करण्यात आला आहे.

👉नक्की वाचा: गणेश उत्सव निबंध मराठी
👉नक्की वाचा: होळी निबंध मराठी
👉नक्की वाचा: गुढीपाडवा निबंध मराठी

जर आपण एक विद्यार्थी असाल आणि आपल्याला दिवाळी वर निबंध मराठी सांगितला असेल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आले आहात. कारण इथे मी माझ्या मनातून आणि अनुभवातून हा निबंध आपल्यासमोर मांडत आहे आणि मीही एक भारतीय असल्यामुळे मला ह्या सणाची माहिती खूपच चांगली आहे.

तर चला मित्रांनो जाणून घेऊया diwali nibandh marathi madhe.

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | Diwali Nibandh Marathi

दिवाळी जवळ येण्याच्या आधीच मनात खूप आनंद होतो आणि एक वेगळीच कल्पना मनात सुरू होते. कारण दिवाळी आली की आम्हा मुलांना दिवाळीच्या आधीच सुट्टी लागलेली असते आणि मग काय फक्त मज्जा.

आपल्याला माहितीये का दिवाळी का साजरी केली जाते आणि केव्हापासून साजरी केली जाते? तर जेव्हा राम 14 वर्षांचा वनवासमधून अयोध्येला परत आले होते त्यावेळेस सर्व कडे खूप आनंद आणि उत्साह होता. ह्याच आनंदात सर्वजण दिवे लावत उत्सव साजरा करत होतो आणि तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो. राम हे हिंदू धर्माचे उत्कृष्ट देवता आहेत आणि आपल्याला रामायण तर माहितीच असेल, असा हा दिवाळीचा थोडक्यात इतिहास आहे.

दिवाळी हा सण भारतातील मुख्य सणांपैकी एक सण आहे आणि हा सण भारतात तर साजरा केलाच जातो त्याचबरोबर इतर देशांतही आनंदाने साजरा केला जातो. हा सण अश्विन महिन्यातील शेवटच्या आठड्यात येतो म्हणजेच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात. दिवाळीला दीपावली असे देखील म्हटले जाते.

साधारणतः दिवाळी हा सण मुख्य एकूण 5 दिवसांचा असतो त्यात पहिला दिवस म्हणजे वसू बारस, दुसरा दिवस धनत्रयोदशी, तिसरा दिवस लक्ष्मी पूजन, चौथा दिवस दिवाळी स्नान आणि पाचवा दिवस भाऊ बीज असतो. परंतु दिवाळी हा एवढा मोठा सण आहे जो पंधरा दिवस साजरा केला जातो पार तुळशीच्या लग्नापर्यंत.

दिवाळीला सर्व शाळांना सुट्ट्या असल्यामुळे सर्व विद्यार्थी घरीच राहतात. कोणी गावाला जातात तर कोणी घरीच आपली दिवाळी साजरा करतात. मी सुद्धा केव्हा केव्हा मामाच्या गावाला दिवाळी साजरा करण्यास जातो परंतु ह्यावेळेस मी घरीच दिवाळी साजरा करणार आहे, ह्यावेळेस माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत साजरा करणार आहे.

15 दिवसा आधीच आमच्या घरात दिवाळीची तयारीला सुरुवात होऊन जाते आणि त्याच्याही आधी घरातील साफसफाई सुरू होते. घरातील साफसफाई मध्ये मी आईला मदत करतो जसे घरातील काही वस्तू पुसून साफ करणे, जाळे काढणे असे. आणि फराळाची गोष्ट आली म्हणजे संपूर्ण घरात वेगवेगळा सुगंध दरवळत असतो. फराळात चिवडा, लाडू, बर्फी, शंकरपाळी, चकली, करंजी, अनारसे, गुलाबजाम आणि इतर अजून काही बनवलेले असते परंतु हे काही दिवाळीच्या फराळातील मुख्य पदार्थ आहेत.

दिवसभर माझे तोंड चालूच असते म्हणजे मी काही ना काही खातच असतो आणि त्यातील माझी आवडती वस्तू म्हणजे अनारसे, हे तर मी रोज दोन तीन तरी खातच असतो.

दिवाळीला सर्व कडे दिवे लावलेले असतात आणि आमच्याही घरी वट्यावर, छतावर, तुळशी जवळ, देवाऱ्यात दिवे लावलेले असतात. आमचं संपूर्ण घर लख्ख प्रकाशाने उजळलेले असते.

आकाशकंदील आणि लाईटींग ने घराला साजवण्याचे काम माझ्याकडे सोपलेले असते आणि दर दिवाळीला मीच घरावर लाईटींग्ज टाकतो. दरवेळेस आमचा आकाशकंदील मोठा असतो आणि त्यात मी एक रंगीत लाईट टाकून घराच्या बाहेर दरवाज्यावर बांधतो. लायटिंग सुद्धा रंगबेरंगी असते ज्यामुळे घराला अजून एक नवीनच शोभा येते. त्याचबरोबर अंगणात रांगोळी काढण्याचे काम हे ताईकडे असते म्हणजेच माझ्या बहिणीकडे असते. दिवाळीत ती खूप सुंदर सुंदर रांगोळी काढून घराची शोभा वाढवते. मागच्या दिवाळीला तिने भारतीय सैनिकांवर म्हणजेच आपल्या वीर जवानांवर रांगोळी काढली होती आणि सर्व गल्लीतील लोकं तिची स्तुती करत होते.

हा सण आला की बाबा मला नवीन कपडे घेऊन देतात त्यामुळे मी दिवाळीची वाट बघत असतो कारण सुट्ट्या आणि वरून मज्जा काय असते हे ह्या दिवशी कळते.

फाटके हे दिवाळीच्या दिवशी सर्वजण फोडतात, मीही लहानपणी फटाके फोडायचो परंतु जेव्हा मला माहिती पडले की फटाके फोडल्याने प्रदूषण होते आणि ते नंतर आपल्या मानवी जिवणासाठीच खूप घातक होते, म्हणून मी फटाके फोडणे बंद केले आहे. आणि माझ्या मित्रांनो तुम्हीही आपल्या पृथ्वीसाठी आणि मानवी जीवनासाठी फटाके फोडणे बंद करायला हवे व इतरांना देखील सांगायला हवे.

त्याव्यतिरिक्त मी इतर गोष्टी करतो जसे घराबाहेर किल्ला बनवणे, घराला सजवणे, मित्रांसोबत घेळणे, दिवाळीचा अभ्यास करणे, फराळ खाणे. मी आणि माझे मित्र दिवाळीत एक मोठा किल्ला तयार करतो त्यात आजूबाजूला खोटे शिपाई आणि किल्याच्या वर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेऊन किल्याची शोभा वाढवतो. आपल्याला शाळेतून दिवाळीच्या आधी एक पुस्तक दिलेले असते ज्यात दिवाळीचा अभ्यास दिलेला असतो आणि त्यात भरपूर मनोरंजक गोष्टी, खेळ, अभ्यास आणि भरपूर काही दिले असते ज्याने विद्यार्थ्याचे मन आनंदी आणि मनोरंजक राहते.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात एक मोठी पूजा केली जाते ज्यात नैवेद्य, फराळ दाखवला जातो आणि पैशांची पूजा केली जाते ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरात अशीच टिकून राहो.

बहीण भावाचा आवडता दिवस म्हणजे भाऊबीज कारण ह्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. आमच्या घरात सुद्धा माझी दीदी मला ओवाळते आणि मी तिला एक छोटीसी भेटवस्तू देतो.

खरी दिवाळी तुळशीच्या लग्नाच्या दिवशी संपते, दिवाळीत तुळशीचे देखील लग्न लावले जाते त्यात तुळशीचे लग्न बाळकृष्णशी लावले जाते ज्यात बाळकृष्ण विष्णु देवतांचे रुप आहे आणि तुळशीला लक्ष्मी देवी मानले जाते. असे म्हणतात की जर ज्याने हे व्रत केले असेल त्याला तुळशीच्या कन्यादानाचा लाभ मिळतो व तो भाग्यशाली असतो.

दिवाळीच्या दिवशी संपूर्ण भारत खूप प्रकाशित असतो कारण सर्व कडे दिवे लावलेली असतात आणि फटाक्यांचा आवाज गुंजत असतो.

असा दिवाळी हा सण मला खूप आवडतो आणि मी दिवाळीला खूप मज्जा करतो.

निष्कर्ष

दिवाळी म्हणजे सर्व कडे आनंदी वातावरण, तो दिव्यांचा लख्ख प्रकाश, फराळाचा छान सुंगंध आणि अजून बरेच काही. विद्यार्थ्यांना दिवाळी येण्याच्या आधीच खूप आनंद येतो कारण ती दिवाळीतील मज्जा ते आठवत असतात. खरंच लहान मुलांची तर ह्या सण दिवशी मजाच असते, फक्त खेळायचे, फराळ खायचे आणि खूप धमाल करायची. परंतु आपल्याला देखील diwali nibandh in marathi मनात आले असेल आणि आपण नक्कीच वेगवेगळ्या कल्पना करत असाल तर ते कारण योग्य आहे.

जर आपण शाळेत शिकत आहात आणि आपल्याला essay on diwali in marathi language असे विचारले असेल तेव्हा आपण गूगल वर नक्कीच Diwali in marathi essay असे सर्च करत असाल. तर आपण जराही काळजी करू नका कारण इथे आम्ही हा निबंध खूप छान पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Diwali Nibandh Marathi हा लेख लिहिण्याचा आमचा उद्देश फक्त एवढंच आहे की आपण काही वेळेस आपल्या मनासारखा माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी शोधत असाल तर तो आम्ही दिला आहे.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap