ई-बँकिंग माहिती मराठी| E-Banking Information In Marathi | Advantages & Disadvantages

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला E Banking Information In Marathi म्हणजेच ई बँकिंग माहिती मराठी मध्ये सांगणार आहे.

सध्या इंटरनेटचा काळ आहे ज्यात लोकांना सर्व गोष्टी जलद आणि कमी मेहनत मध्ये हवी असतात आणि अश्याच काही गोष्टी लक्षात घेऊन नेट बँकिंग ची सुविधा काढली आहे.

👉 नक्की वाचा: बँकेची माहिती मराठीमध्ये

घरी बसल्या व्यवहार करण्यासाठी म्हणजेच बिना बँकेत जाऊन फक्त घरी बसून काम करण्यासाठी इंटरनेट बँकिंगचा वापर उत्तम आहे.

ई-बँकिंग माहिती मराठी | E Banking Information In Marathi

ई बँकिंगला इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग, ऑनलाईन बँकिंग आणि इलेक्ट्रॉनिक बँकिंग असे देखील म्हटले जाते.

बँकिंग म्हणजे आपण जो बँकेत जाऊन पैशांच्या व्यवहार करतो तो आणि बँकिंगच्या आधी ई लावला तर तो प्रत्यक्ष बँकेत न जाता इंटरनेटच्या साह्याने केला जाणारा व्यवहार म्हणजे ई बँकिंग होय.

ई बँकिंग म्हणजे आपली बँक आपल्याला अशी अधिकार देते की आपण कधीही, कुठेही आपल्या बँक अकाऊंट ची तपशील करू शकता, पैशांचे देवाण घेवाण करू शकता तेही बँकेत न जाता फक्त इंटरनेटच्या माध्यमातून.

इंटरनेट बँकिंग च्या मदतीने आपण आपली कामे अजून सोपी आणि कमी वेळेत करू शकता. जसे बँक खात्याची शिल्लक रक्कम(Bank Balance) चेक करणे, वीज बिल भरणे, इतर काही बिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, ऑनलाईन शॉपिंग करणे आणि इतर भरपूर कामे Internet Banking मुळे कमी होतात.

ई बँकिंगचा वापर कसा करायचा | How To Use E Banking In Marathi

E Banking चा यूज करण्यासाठी आपल्याकडे एक बँक खाते असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या बँक मध्ये जाऊन नेट बँकिंग सेवा सुरू करायची आहे त्यात तुम्हाला username आणि password दिला जाईल ज्याच्या मदतीने आपण त्यात लॉगिन व्हाल. एवढे झाल्यावर आपण इंटरनेट बँकिंग वापरू शकता.

नेट बँकिंग वापरण्यासाठी आधी आपण गूगल वर जा आणि त्यात आधी बँकेचे नाव आणि पुढे नेत बँकिंग (Bank Name Net Banking) असे सर्च करा. उदरहणार्थ माझे स्टेट बँक मध्ये खाते आहे तर मी कसे सर्च करणार ते लक्षात घ्या. State Bank Of India Net Banking असे मी गूगल मधे search करेल.

त्यानंतर तेथे लॉगिन चे ऑप्शन निवडून username आणि password टाका, आणि त्याच खाली दिलेला एक नंबर (captcha code) व्यवस्थीत टाका. मग खाली दिलेल्या लॉगिन बटन वर क्लिक करा.

लॉगिन झाल्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यात बँक धारकाचे नाव, बँक बॅलन्स, शेवटची बँक व्यवहार, बँक स्टेटमेंट आणि इतर अनेक काही सुविधा उपलब्ध होतील. त्याचबरोबर त्यात पैसे ट्रान्स्फर करण्याचीही सुविधा असते आणि त्यातही काही ऑप्शन आहेत.

ई बँकिंगचे फायदे | Advantages Of E Banking In Marathi

 1. ई बँकिंग चा सर्वात मोठा फायदा म्हणजे बँकेत न जाता घरी बसून फक्त मोबाईल किंवा कॉम्प्युटर च्या मदतीने कामे करू शकतात जसे बँक खात्याची शिल्लक रक्कम बघणे, पैसे ट्रान्स्फर करणे आणि इतर काही गोष्टी करू शकतात.
 2. सुट्टीच्या दिवशीही आपण बँकेचा कारभार पाहू शकता, करू शकता आणि जर आपल्याला पैसे पाठवायचे असतील किंवा प्राप्त करायचे असतील तर तेही करू शकतात.
 3. इंटरनेट बँकिंग च्या मदतीने तुम्ही कुठूनही आणि कुठेही शॉपिंग चे बिल पे करू शकता, मोबाईल रिचार्ज करू शकता, वीज बिल भरू शकता, ऑनलाईन फॉर्म फी भरू शकतात.
 4. आपण आपला बँक बॅलन्स ऑनलाईन चेक करू शकतात ज्याने आपले बँकेत जाण्याचे काम कमी होईल आणि तेही कमी वेळात तपासू शकतात.
 5. नेट बँकिंग च्या साह्याने आपण बँकेत न जाता ऑनलाईन passbook, checkbook, debit card, credit card साठी सहजतेने apply करू शकता.
 6. मागील जुने bank transition म्हणजेच पैशांचा व्यवहार (bank statement) आपण नेट बँकिंग च्या मदतीने तपासू शकता आणि pdf फॉर्म मध्ये डाऊनलोड करू शकतात.
 7. याच्या साह्याने आपण FD, RD सारखे खाते उघडू शकतात ज्यात आपण पैसे जमवू शकतात. आणि ह्या खात्यात आपोआप आपली रक्कम आपल्या मुख्य खात्यातून कापून टाकली जाते हा ही एक मोठा फायदा आहे.
 8. दिवस हो रात्र हो तरीही आपण बॅंकेचे व्यवहार करू शकता, बँक बॅलन्स चेक करू शकता, मित्राला पैसे पाठवू शकता, पैसे स्वीकारू शकता.
 9. जर आपल्याला काही अडचण आली तर ती आपण ऑनलाईन तक्रार करून सोडवू शकतात आणि आपल्या समस्यांचे निवारण करू शकतात.

ई बँकिंगचे तोटे | Disadvantages Of E Banking In Marathi

 1. ई बँकिंगची सुरक्षा मजबूत असतेच परंतु आपल्या स्वतःच्या नेट बँकिंग अकाउंटला सुरक्षित ठेवणे आपलीही जबाबदारी आहे. जर आपली लॉगिन इन्फॉर्मेशन कोणत्या चुकीच्या व्यक्तीला माहीत पडली तर भारी नुकसान होऊ शकते. आपली रक्कम ही चोरली जाऊ शकते त्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे.
 2. नेट बँकिंग कधीही सायबर, इतर कोणाच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर वर चालवू नये कारण येथे आपले अकाउंट हॅक होण्याची संभावना असते.
 3. काही वेळेस नेट बँकिंग सफल होत नाही म्हणजेच आपले ट्रांसिशन फेल होते त्यामुळे आपल्या कामात. अडचण निर्माण होते. काही वेळेस आपले इंटरनेट कनेक्शन कमजोर असल्यामुळे आपला व्यवहार पूर्ण होत नाही.
 4. ग्राहक आणि बँकेतील संपर्क चांगला होत नाही, जर ग्राहकाला काही मोठी अडचण आली तर ती ऑनलाईन सोडवणे कठीण होते ज्यामुळे त्याला बँकेत जावे लागते.

ई बँकिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या

 1. ई बँकिंग ही cyber cafe, public place, public wifi मध्ये कधीही करू नये कारण येथे आपली माहिती लीक होण्याचा संबंध असतो.
 2. कधीही आपल्या नेट बँकिंग अकाऊंटचा पासवर्ड आपल्या जन तारीख, नाव, शहर, कुटुंबातील कोणाच्या जन्म तारीख वर कधीही ठेऊ नये कारण ह्याने आपले अकाउंट हॅक होऊ शकते.
 3. जर आपला व्यवहार मोठा असेल, आपल्या बँकेत जास्त रक्कम असेल तर अश्या वेळेस आपण आपला पासवर्ड नियमित बदलत राहायला हवा ज्याने कोणी आपले खाते हॅक करत असेल तर त्याला ते शक्य होणार नाही.
 4. दरवेळेस अश्याच कॉम्प्युटर मध्ये आपले खाते उघडा ज्यात सिक्युरिटी असेल म्हणजेच Antivirus, Malware असेल. आणि आपल्या कॉम्प्युटर मध्येही अँटीव्हायरस टाकून घ्या.
 5. ऑनलाईन पेमेंट अश्याच वेबसाईटवर किंवा ठिकाणी करा जेथे security असेल कारण जर कोणती website वर सिक्युरिटी नसले तर त्यात आपले खाते लीक होऊ शकते.
 6. जर आपल्याला कोणताही फसवणूक फोन आला तर त्याला कधीही आपल्या नेट बँकिंगशी जोडलेली ईमेल आयडी, फोन नंबर, युजर नेम, पासवर्ड आणि अकाउंट नंबर देऊ नका.
 7. जर आपल्याला नेट बँकिंग करतांना कोणत्याही प्रकारची शंका आली तर लगेच आपल्या बँकच्या ब्रांचला संपर्क करून सूचना द्या.

निष्कर्ष

ई बँकिंग एक असा मार्ग आहे ज्याने आपली कठीण कामे सोपी होतात आणि वेळेची बचत होते त्यामुळे भरपूर लोकं जास्त करून नेट बँकिंगचाच उपयोग करतात. आणि जर आपल्याला इंटरनेट बँकिंग कशी करावी ती काय असते हेच माहिती नसेल तर ही माहिती फक्त आपल्यासाठीच आहे.

E Banking Information In Marathi हा लेख लिहिण्याचा आमचा उद्देश फक्त एवढाच आहे की जर आपल्याला Internet Banking काय आहे, Net Banking कशी करावी हे माहीत नसेल तर ते मी आपल्या मराठी भाषेत सहजतेने आणि सविस्तर सांगितले आहे.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap