पर्यावरण वर निबंध मराठी | Essay On Environment In Marathi Language

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला Essay On Environment In Marathi Language सांगणार आहे. हा निबंध नक्कीच आपल्याला पैकी चे पैकी गुण मिळवून देईल अशी मी आशा करतो.

पर्यावरण वर निबंध मराठी लिहिण्याचा म्हटला तर आपल्या मनात खूप साऱ्या वेगवेगळ्या कल्पना सुरू होतात परंतु नेमक काय लिहायचं तेच कळत नाही त्यामुळे आम्ही हा निबंध लिहिला आहे.

👉 नक्की वाचा: बिजली बचाओ निबंध

ह्या निबंधात आम्ही सर्व मुद्दे मनाने आणि आजूबाजूच्या परिसरात अनभवून लिहिलेले आहेत.

हा निबंध कोणकोणत्या विषयांवर वापरू शकता

पर्यावरण निबंध मराठी – Essay On Environment In Marathi Language
पर्यावरण मराठी निबंध – Environment Essay In Marathi Language
पर्यावरण वर निबंध मराठी – Environment Essay In Marathi
पर्यावरण प्रदूषण निबंध मराठी – Environment Pollution Essay In Marathi
पर्यावरण संरक्षण निबंध – Environment Protection Essay In Marathi

पर्यावरण वर निबंध मराठी | Essay On Environment In Marathi Language

Essay On Environment In Marathi Language

पर्यावरण म्हणजे एक असा विषय ज्यात आपल्याला जगवण्याची आणि मारण्याची दोन्ही क्षमता आहेत. ह्याने मानवाचा मूड कसा ठेवावा चांगला की वाईट, ताजा ठेवावा हीही क्षमता आहे.

5 जुन पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जाणारा दिवस म्हणजे एक सण च आहे.

ह्या सृष्टीत असे मानले जाते की पृथ्वी हा एक असा ग्रह आहे जो सर्व गुण संपन्न आहे कारण हा पर्यावरणाने आणि मानवी जीवनाने संपन्न आहे.

पर्यावरणात खूप गोष्टींचा समावेश आहे जसे झाडे झुडपे, पर्वत, डोंगर, नदी, समुद्र, प्राणी, पक्षू, मानव, जल, वायू, अग्नी आणि इतर अनेक काही.

पृथ्वीवर सर्वात जास्त बुद्धिमान असलेला प्राणी म्हणजे मानव आहे त्यामुळं आपण आपले पर्यावरण सुंदर बनवले पाहिजे. पर्यावरण जीव जीवांना प्रगती करण्यास मदत करतो आणि मानवांना देखील खूप मदत करतो त्यामुळे मानवाचा कार्य बनते की पर्यावरणाला सुरक्षित ठेवायला हवे.

मानवाच्या सुखी जीवनासाठी सभोवतालचे वातावरण, पर्यावरण सुंदर आणि स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. आणि मानवी जीवनात पर्यावरणाची गोष्ट केली तर त्याचा मानवी जीवनात खूप महत्वाचा वाटा आहे. पर्यावरण आहे महणून आपण आहोत असे म्हटले तेही खोटे ठरणार नाही.

आजकाल सर्वजण ऐकत असाल की जर आपण पर्यावरणाचा समतोल नाही ठेवला तर आपल्याला पुढे भारी नुकसान सोसावे लागू शकते.

का झाले पर्यावरण दूषित तर वाढत्या प्रदूषणाने आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर जास्त केल्यामुळे.

तंत्रज्ञानाच्या युगात मानव खूप पुढे गेला आहे परंतु पुढे जातांना तो मात्र हे विसरला की आपल्या काही चुकींमुळे निसर्गाला हानी होऊ शकते ज्याने नंतर जीव सृष्टीला त्रास होईल.

जगात सर्वात जास्त प्रदूषण हे वाहनांच्या मधून निघणारा धुरमुळे होतो. ह्या प्रदूषणाला वायू प्रदूषण असे म्हटले जाते. कारखाना मधून निघणारा धूर आणि सांडपाणी मधून सुद्धा प्रदूषण होते ज्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्याचबरोबर पाणी दूषित करणे जसे नदीत कपडे भांडी धूने, नदी समुद्रात कचरा करणे. तर ह्या गोष्टी आपण रोखायला हव्या ज्याने पर्यावरण सुरक्षित राहील. त्यामुळे आपण पाणी वाचवा ही मोहीम आत्मसात करायला हवी.

गाड्यांचा धूर, कारखान्याचा धूर आणि सांडपाणी, मोठा प्रमाणात आवाज अश्या अजून काही गोष्टींमुळे वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदुषण अधिक प्रमाणात वाढून पर्यावरणाला हानी पोचवतात.

पर्यावरण टिकवण्यासाठी झाडे खूप महत्वाची आहेत आणि आजकाल मनुष्य झाडांना नष्ट करत आहेत ज्यामुळे निसर्गाला मोठा धक्का बसला आहे. जर आपल्याला पर्यावरण टिकवायचे असेल तर झाडे नष्ट करणे आणि झाडे लावणे आत्मसात करायला हवे. निसर्गातील विविध सुंदर गोष्टींमधून झाडे हे एक निसर्गाची सुंदर देणं आहे जिला आपण मनापासून जपले पाहिजे. माणसांना जगण्यासाठी झाडांची गरज असते कारण झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन प्राप्त होते ज्यामुळे आपण जिवंत राहू शकतो.

झाडांना लावून काही होत नाही तर त्यांना जगवावे देखील महत्वाचे आहे. झाडे झुडपे निसर्गाची शान आहे ज्याने निसर्गाला सौदर्य प्राप्त होते.

मानवाने नवीन वस्तूचा शोध लावण्याआधी हे लक्षात घ्यायला हवे की याच्यामुळे पर्यावरणाला काही हानी तर नाही होत आहे ना. आणि जर होत असेल तर ते तिथेच थांबवायला हवे कारण जर ही सृष्टी राहील तेव्हाच ती वस्तू आपल्या कामात येईल नाहीतर आपल्याला बघायला देखील मिळणार नाही.

अजून एक मुख्य मुद्दा म्हणजे मनुष्य सध्या पर्यावरणाच्या विरूद्ध जात आहे. जसे पर्यावरणाने मानवाला खाण्यासाठी खूप काही नैसर्गिक गोष्टी दिल्या आहेत जे फळांच्या रुपात आपल्याला मिळतात. परंतु मनुष्य मांसाहारी होऊन निसर्गातील जीवांना मारून त्यांचे मास खात आहेत. त्याच्या व्यतिरिक्त लोकं कृत्रिम पदार्थ खात आहेत जे एका निर्जीव स्वरूपात येतात. ह्या गोष्टींनी पर्यावरणाला, प्राण्यांना आणि मानवांना धोका निर्माण झाला आहे.

प्राण्यांची शिकार करून त्यांना मृत्यू देणे हे मनुष्याच्या हातात नाही आहे परंतु तरीही हे मनुष्याला समजत नाही. आजकाल तुम्ही ऐकलं असेल की काही प्राणी लुप्त होत आहेत आणि त्यांची पिढी देखील नष्ट झाली आहे तर त्या मानव मुळेच झाले आहे.

वाढती लोकसंख्या देखील पर्यावरणाला दूषित करते कारण जेवढी संख्या तेवढे जास्त प्रमाणात प्रदूषण होते. लोकं कुठे फिरायला गेले की लगेच कचरा करतात आणि प्लास्टिकचे वस्तू तर जागोजागी फेकलेली दिसतात ज्याने भूमी प्रदूषण निर्माण होते. नदी किनारी आणि समुद्र किनारी फिरायला गेल्यावर पर्यटक पाण्यात कचरा टाकतात आणि प्लास्टिकचे वस्तू, पिशव्या, बाटल्या अती फेकलेल्या असतात ज्याने जल प्रदूषण होते. तर हे रोखण्यासाठी आपण आपला कचरा आपल्या बॅगेत भरुन एका ठिकाणी कचरा कुंडीत टाकायला हवा ज्याने प्रदूषण नियंत्रित होईल.

निष्कर्ष

Essay On Environment In Marathi Language

पर्यावरण आपल्याला मिळालेली एक अमूल्य भेट आहे जी आपली काळजी घेते परंतु निराशाजनक बाब आहे की मनुष्य त्याची काळजी घेत नाही. त्यामुळे आजकाल प्रदूषण वाढून पर्यावरणाला हानी करत आहे ज्याने सर्व जीव सृष्टीला त्रास भोगावा लागत आहे.

पर्यावरण हा आपला एक मित्र आहे ज्याची काळजी आपण प्रदूषण मुक्त करून घ्यायला हवी. गाड्यांचा धूर आणि कारखान्यातील धूर व सांडपाणी नियंत्रित करून निसर्गाला सुरक्षित ठेऊ शकतो.

निसर्गाने पृथ्वीवर मनुष्याला सर्वात हुशार आणि बुद्धिमान जीव बनवला आहे परंतु तो त्या बुद्धीचा दुरुपयोग करू लागला आहे असते दिसत येत आहे तर जे प्रयोग पर्यावरणाच्या विरूद्ध आहेत ते रोखून जे प्रयोग पर्यावरणासाठी योग्य आहेत तेच करायला हवे.

तर आम्ही आपल्यासाठी हा लेख Essay On Environment In Marathi Language म्हणजेच पर्यावरण निबंध मराठी लिहिला कारण आपल्या मराठी मायबोलीत माहिती खूप कमी प्रमाणात बघायला मिळते. तर मी आशा करतो की हा निबंध आपल्याला नक्कीच आवडला असेल.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

2 thoughts on “पर्यावरण वर निबंध मराठी | Essay On Environment In Marathi Language”

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap