माझा आवडता सण होळी निबंध मराठी | Essay On Holi In Marathi

भारतातील सण म्हणजे एक वेगळीच मज्जा, वेगळीच प्रथा, परंपरा, संस्कृती जे भारतीय लोकांना काहीतरी शिकवून जातात. आणि त्यांपैकीच होळी हा एक सण आहे ज्यावर आपण Holi Festival Essay In Marathi Language बघणार आहोत.

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला माझा आवडता सण होळी निबंध मराठी किंवा Essay On Holi In Marathi सांगणार आहे. ह्या निबंधने नक्कीच आपल्याला पैकी चे पैकी गुण प्राप्त होतील.

👉नक्की वाचा: दिवाळी निबंध मराठी
👉नक्की वाचा: गणेश उत्सव निबंध मराठी
👉नक्की वाचा: गुढीपाडवा निबंध मराठी

जगात अनेक सण साजरा केले जातात आणि मुख्य म्हणजे भारतातील काही सण देखील संपूर्ण जगात साजरा केले जातात आणि त्यांपैकीच होळी हा एक सण आहे जो भारताच्या बाहेर देखील साजरा केला जातो.

भारतातील प्रत्येक सणांच्या मागे काही ना काही तथ्य आहे ज्यामुळे ते प्राचीन काळापासून तर आतापर्यंत साजरा केले जातात. होळी, दिवाळी, गुढीपाडवा, नवरात्री आणि इतर अनेक भारतीय सण आहेत जे जगात खूप प्रसिद्ध आहेत.

खालील निबंध कोणकोणत्या विषयांवर वापरू शकता

माझा आवडता सण होळी निबंध मराठी – My Favourite Festival Holi Esaay In Marathi

होळी वर निबंध मराठी – Esaay On Holi In Marathi

होळी मराठी निबंध – Holi Essay In Marathi

होळी निबंध – Holi Nibandh In Marathi

होळी सण निबंध मराठी भाषेत – Holi Festival Essay In Marathi Language

रंगपंचमी सण निबंध – Essay On Holi Festival In Marathi Language

माझा आवडता सण – Marathi Essay On Holi

तर चला मित्रांनो सुरुवात करुया holi nibandh in marathi ला.

माझा आवडता सण होळी निबंध मराठी | Essay On Holi In Marathi

Holi Nibandh Marathi

होळी हा माझा आवडता सण आहे कारण ह्या दिवशी खूप मज्जा असते आणि संपूर्ण वेळ फक्त मित्रांसोबत खेळायचे, मस्ती करायची यातच संपूर्ण दिवस जातो.

ह्या सणाला होळी किंवा रंगाचा सण असे देखील म्हटले जाते. होळी हा भारतातील एक प्रसिद्ध आणि आवडता सण आहे जो खूप आनंदात आणि धूम धाममध्ये साजरा केला जातो. हा सण भारतात तर साजरा केलाच जातो परंतु इतर देशांतही साजरा केला जातो थोडक्यात संपूर्ण जगात साजरा केला जातो. आणि भारत हा सर्व संस्कृतींनी, धर्म, जातींनी नटलेला देश आहे त्यामुळे ह्यात अनेक सण मिळूनमिसळून साजरे केले जातात.

तुम्हाला माहितीये की होळी हा सण का साजरा केला जातो कारण ह्या मागे एक मोठी प्राचीन कथा दडलेली आहे, तयबद्दल आधी आपण जाणून घेऊया. एकेकाळी राक्षस कुळातील हिरण्यकश्यप नावाचा राजा राहत होता. त्याला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता ज्याला आता भक्त प्रल्हाद नावाने ओळखले जाते. तो विष्णूचा मोठा भक्त होता परंतु हे त्याच्या पित्याला म्हणजेच हिरण्यकश्यपाला मान्य नव्हते. कारण हिरण्यकश्यप अहंकारी आणि क्रूर होता, जो स्वतःला सर्वश्रेष्ठ आणि देवताहूनही श्रेष्ठ मानायचा. त्याला देवांबद्दल सन्मान नव्हता, तो देवांना मानत नसे. आपला मुलगा दिवसरात्र विष्णुच्या भक्तीमध्ये लीन असतो, फक्त विष्णूचा जप, नामस्मरण करत असतो हे त्याला कदापि मान्य नव्हते. त्यामुळे हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाला त्यापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्याला मारण्याचे उपाय करत असे, परंतु भक्त प्रल्हाद विष्णु देवतांचे मोठे भक्त असल्यामुळे हिरण्यकश्यप अपयशी ठरत असे. एकेवेळेस हिरण्यकश्यपने प्रल्हादाला मारण्यासाठी आपल्या बहिणीची मदत घेतली जीचे नाव होलिका होते. होलिका देखील राक्षस कुळातील होती आणि तिला एक वरदान होते की तिला आगीपासून काहीच हानी होणार नाही आणि तिला आगीत भस्म होणार नाही. हिरण्यकश्यपने एक चीता तयार केली ज्यात आपल्या होलिका बहिणीला बसवले व तिच्या मांडीवर आपल्या मुलाला भक्त प्रल्हादाला बसवले आणि चीतेले आग लावली. प्रल्हाद विष्णु देवतांचा भक्त असल्यामुळे त्याला त्या आगीत काहीच हानी पोहोचली नाही परंतु त्या आगीत स्वतः होलिका भस्म होऊन राख झाली. त्यानंतर विष्णूंनी नृसिंह च्या रुपात खांब्यातून बाहेर निघून हिरण्यकश्यपाचा वध केला.

ह्या कथेतून आपल्याला एवढेच शिकायला मिळते की वाईट गोष्टीचा हमेशा नाश होतो. त्यामुळे वाईट गोष्टीचा, नकारात्मक गोष्टींचा नाश व्हावा म्हणून होळी हा सण साजरा केला जातो.

होळी सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच मार्च महिन्यात साजरी केली जाते.

साधारणतः होळी हा सण दोन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी होळी आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते.

होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते ज्यात होळीला नैवेद्य दिला जातो आणि घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा व वाईट गोष्टीचा नाश होऊ दे अशी प्रार्थना केली जाते. होळीची पुजा ही सहसा स्त्रिया करतात.

होळीला नैवेद्यात पुरणपोळी दिली जाते, नैवेद्य दिल्यानंतर होळीच्या अवतीभवती फेरी मारता तांब्यामधून खाली पाण्याची धार लाऊन पाणी सोडले जाते.

रंगपंचमीच्या दिवशी रंगांनी खेळले जाते जसे एकमेकांना रंग लाऊन खेळले जाते. ह्या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वजण आनंदाने खेळतात.

होळीच्या पाच दहा दिवसांआधीच आम्ही गल्लीतील मित्र तयारीला लागून जातो. आम्ही सर्वजण होळीसाठी लाकडे गोळा करतो ज्यात आमची खूप मज्जा येते. काही लाकडे आम्ही इथून तिथून गोळा करतो आणि बाकीचे वर्गणीच्या पैशांतून विकत आणतो. होळीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही ते सर्व लाकडांची होळी उभी करतो आणि गल्लीतील सर्वांची तयारी झाल्यावर होळी जळतो.

रंगपंचमीच्या दिवशी सर्वजण सकाळमध्ये उठून रंगपंचमी खेळतात. त्यात एकमेकांना रंग लाऊन आणि पाणीने ओले करून खेळतात परंतु पाणीची कमतरता असल्यामुळे पाणी वाया घालू नये. तरीही आपल्याला पाण्याने रंगपंचमी खेळायची असेल तर थोडेसेच पाणी खर्च करा किंवा जे पाणी पिण्यायोग्य नसेल ते वापरावे.

रंगपंचमीला गाणी लाऊन नाचतात ज्यात सर्वजण खूप मज्जा करतात. आम्हीही आमच्या गल्लीत दोन छोटेसे स्पीकर लावतो आणि होळीचे गाणे लाऊन खूप धमाल करतो.

असा हा सण भारतात खूप प्रसिद्ध आहे आणि इतर देशांतही प्रसिद्ध आहे. जास्तकरून हा सण लहान मुलांना खूप आवडतो कारण ह्या दिवशी सर्वजण आनंदाने एकमेकांशी हसत खेळत असतात जे खूपच उत्तम आहे. मला आणि माझ्या मित्रांना देखील हा सण खूपच आवडतो, ह्या दिवशी आम्ही संपूर्ण दिवस खूप मज्जा मस्ती आणि काम करतो.

निष्कर्ष

होळी सण म्हणजे सर्व लोकांना जवळ आणून आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. विद्यार्थी असले म्हणजे essay on holi festival in marathi language हा प्रश्न नेहमी उद्भवतो. आणि होळी मनात आले की ती मज्जा मस्ती आठवते.

नकारात्मक गोष्टींचा नाश कण्यासाठी हा सण साजरा केला जातो आणि पुढच्या दिवशी रंगपंचमी जी सर्व लोकांना एकत्र आणण्याचे काम करते असा हा दोन दिवसांचा सण होळी ह्या नावाने ओळखला जातो.

जर आपण विद्यार्थी असाल आणि शाळेत शिकत असाल तेव्हा आपल्याला शाळेत एक निबंध नेहमी विचारला जातो तो म्हणजे Holi essay in marathi परंतु आपण जराही काळजी करू नका कारण वर दिलेला निबंध फक्त आपल्यासाठी आहे.

Essay On Holi In Marathi हा लेख लिहिण्याचा आमचा उद्देश एवढाच आहे की खूप जणांना आपल्या मनानुसार होळी वर निबंध मिळत नाही आणि आम्ही तोच योग्य शब्दात आणि माहितीत मांडला आहे.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap