FAU-G गेम आता उपलब्ध | कसा आहे फौजी गेम त्याचे First Impression

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला FAU-G गेम बद्दल सांगणार आहे, त्यात FAUG गेमचे First Impression कसे आहे आणि Gameplay देखील सांगणार आहे. त्याचबरोबर आपण FauG Game कुठून आणि कसा डाऊनलोड कराल ते देखील दिले आहे तर काळजीपूर्वक वाचा.

PUBG Game ban झाल्यामुळे खूप लोकांची मने दुखावली आहेत ज्याने भरपूर लोकं इतर गेमकडे वळत आहेत. हे तर आपल्याला माहितीच असेल की भारतात एकूण 118+ पेक्षा जास्त apps बैन केली आहेत का केले हे तर आपल्याला माहितीच असेल. आणि खरं तर आपण देखील ह्या गोष्टींना पाठिंबा द्यायला हवा कारण आपण आपल्या भारत देशाच्या पाठीशी उभे राहायला हवे.

अक्षय कुमारने FAU-G गेम सुचवलेले आहे कारण फौजी एक भारतीय गेम असून तो PUBG गेम सारखा हानिकारक नाहीये. ह्या गेमामुळे आपल्याला हानी का नाहीये कारण pubg game मध्ये आपल्याला सवय लागली होती आणि सतत आपण त्या गेमकडे आकर्षित व्हायचो ज्याने माणसाचे मानसिक संतुलन भिघडायचे आणि मग तो वेडा व्हायचा. परंतु faug game app मध्ये आपल्याला याची सवय लागणार नाही.

Bollywood Star Akshay Kumar ने ट्विटर वर tweet करून सांगितले आहे की स्वदेशी गेम म्हणजेच भारतीय FAU-G गेम खेळायला हवा. आपण आपल्या देशाच्या गेमाला अधिक प्राधान्य द्यायला हवे आणि त्याचा वापर करायला हवा.

काय आहे FAU-G चा पूर्ण अर्थ? What Is Meaning Of FAU-G Game?

PUBG Game ला टक्कर देण्यासाठी FAUG भारतीय गेम काढण्यात आला परंतु जेव्हा आपण तो गेम खेळणार तेव्हाच माहिती पडेल की खरंच तक्कराचा गेम आहे की नाही. परंतु हा एक नक्कीच की हा गेम खेळण्यात मज्जा तर येणार आहे.

FAU-G Game App Meaning किंवा FAU-G गेम चा अर्थ FAU-G: Fearless And United Guards आहे. याचा मराठीत अर्थ निडर आणि युनायटेड(एकजूट) रक्षक असा होतो. आणि जर आपण त्याच्या शॉर्ट नावाच्या तुलनेने बघितले तर फौजी म्हणजे सैनिक जे आपल्या देशाच्या सीमेवर आपले रक्षण करतात.

FAU-G Game काय आहे? What Is FAU-G Game App?

FAU-G Game App काय आहे तर हा एक भारतीय गेम असून तो भारतात बनलेला गेम आहे म्हणजेच made in india. हा गेम एक action game आहे, त्यात आपल्याला अँक्शन, फाईटींग बघायला मिळते आणि त्याच्या नावातच दिसून येते की हा एक अक्शन गेम आहे.

FAU-G: Fearless And United Guards असा ह्या गेमचे पूर्ण नाव असून हा गेम एक सुंदर गेम आहे.

जसे Pubg आणि Freefire गेम्स आहेत त्याचप्रमाणे लक्षात घेऊन हा गेम बनवण्यात आला आहे. कारण भारतात सर्वात अधिक PUBG गेम खेळला जायचा आणि Chinese app ban झाल्यामुळे त्यात pubg देखील शामील होता. आणि pubg गेम बैन झाल्यामुळे भारतात ह्या गेमाचे प्रकाशन करण्यात आले.

FAU-G गेमचे वैशिष्ट्ये, FAU-G Game Highlights

Name:FAU-G
Full Form:Fearless And United Guards
Game Size:460 MB
Graphics:Low to Ultra
Sound Quality:Best / Hindi
Modes:Campaign, Team Deathmatch, Free For All
Store:Weapons, Dress. 20% Money donated Indian soldiers (20% पैसे वीर जवानांना दिले जाणार आहे).

FAU-G Game App प्रकाशन तारीख, Fau-G Game App Release Date

जेव्हापासून PUBG सोबत इतर Chinese apps बैन झाली तेव्हापासून सर्वजण FAU-G गेमची आतुरतेने वाट पाहत होते कारण अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हॅण्डल वर ट्विट केले होते की भारतीय FAU-G गेम लवकर येत आहे आणि आपल्या स्वदेशी गेमला समर्थन करा.

FAU-G Game Release Date: 26 Jan 2021 launched Fau-G Game.

हो मित्रांनो FAUG गेम हा 26/01/2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रकाशित झाला आहे. 26 जानेवारीला भारतात प्रजासत्ताक दिवस म्हणून मनवला जातो आणि त्या दिवसाचा मुहूर्त काढून FAUG गेमला launch केले आहे.

FAU-G Game App कसा आणि कुठे डाऊनलोड करायचा? How To Download FAU-G Game

FAU-G Game App अजून पर्यंत फक्त Android फोन साठी उपलब्ध आहे त्यामुळे हा गेम आपण फक्त अँड्रॉइड फोन वरच खेळू शकतात.

FAU-G Game Download On Play Store: https://play.google.com/store/apps/details?id=com.ncoregames.faug

FAU-G गेम तुम्ही Play Store मधून डाऊनलोड करू शकता. हा गेम 26 जानेवारी 2021 रोजी Google Play Store वर उबलब्ध आहे. तिथे जाऊन हा गेम download करू शकता.

FAU-G Game App कसा Install करायचा? How To Install FAU-G Game App?

FAU-G गेम install करण्यासाठी आपल्या जवळ Android phone असणे आवश्यक आहे.

Google Play Store वर जाऊन Faug असे सर्च करून आपल्याला FauG गेम दिसेल तो डाऊनलोड केल्यानंतर आपोआप इंस्टॉल होऊन जाईल.

नंतर तुम्ही तो आपल्या मोबाईल मध्ये खेळू शकता.

FAU-G Game कसा खेळायचा? How To Play Fau-G Game? FAU-G Gameplay

FAU-G गेम एक ऍक्शन गेम आहे आणि तो पूर्णपणे भारतीय सैनिकांवर अवलंबून आहे.

गेम ओपन केल्यावर आधी तो लोड होईल नंतर त्यात तुम्हाला खाली उजव्या बाजूला Play बटन दिसेल त्यावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर तीन modes येतील त्यातील आपल्याला फक्त पहिलाच campaign mode खेळता येईल. कारण अजून बाकीचे दोन पर्याय त्यांनी comming soon असे सांगितले आहे, त्यामुळे सध्या तुम्ही फक्त पहिलाच पर्याय खेळू शकता.

पहिल्या मोडवर क्लिक केल्यावर आधी आपल्याला गलवान घाटी वर झालेल्या युद्धाबद्दल सांगितले जाते त्या गोष्टीत सर्वजण जखमी असतात आणि तरीही लढायला जातात आणि त्यांनतर मुख्य गेम चालू होतो.

मग आपल्यासमोर खूप सारे दुश्मन येतात आणि त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचे असते. युद्धात आपल्याकडे बंदूक नसते आणि हे हवे तर आपण स्टोअर मधून काही हत्यार घेऊ शकतो परंतु त्यात बंदूक नाही आहे.

असे करत तुम्हाला दुश्मनाना मारत पुढे जावे लागते. त्यानंतर आपल्याला पुढे एक शेकोटी दिसते तिथे बसून तुम्ही आपले अंग शेकु शकतात. आग ने आपली हेल्थ वाढते जसे Pubg मध्ये मेडिकिट ने वाढायची.

असे तुम्ही हा गेम खेळू शकतात, बघायला गेले तर हा खेळ खूप सोपा आहे.

FAU-G Game App चे First Impression, कसा आहे FAU-G गेमचा पहिला ठसा?

FAU-G गेम च्या first impression ची चर्चा केली तर खूप मस्त आहे कारण ह्या गेम चे graphics खूप सुंदर आहे. PUBG च्या बरोबरीला तर नाही आहे परंतु त्या मानाने ठीक आहे.

आवाजाच्या बाबतीत FAUG गेम खूप उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे यात हिंदी भाषेत आपल्याला instruction दिले जातात जे की भारतीय संस्कृती प्रमाणे उत्तम आहे. आणि तो गलवान घाटी युद्धाबद्दलचे माहिती हिंदी मध्ये सांगितली आहे जी एकूण अंगावर काटे येतात.

त्यात pubg सारखे कंट्रोल दिलेले आहेत, आणि कंट्रोल खूप सोपे आहेत ज्याने आपण सहजतेने खेळू शकतात.

माझ्या मते FAU-G Game त्याच्या जागेवर बरोबर आहे कारण तो एक ऍक्शन गेम आहे आणि जर भविष्यात त्यांनी काही updates केले जसे Pubg सारखे royal battle आणले तर मग खूपच उत्तम होऊन जाईल.

FAU-G Game FAQs In Marathi

FAU-G Game चा अर्थ काय आहे?

FAU-G Game चा अर्थ Fearless And United Guards असा आहे.

FAU-G Game कधी release होणार आहे?

FAU-G Game App 26 Jan 2021 रोजी release झाला आहे.

FAU-G Game कुठून download करायचा आहे?

FAU-G गेम हा फक्त Android users साठी उपलब्ध आहे त्यामुळे हा गेम फक्त गूगल प्ले स्टोअरवर (google play store) वरून डाउनलोड करू शकता.

FAU-G गेम ची size किती आहे?

FAU-G गेम हा 460MB चा आहे.

PUBG चा best alternative काय आहे?

PUBG चा best alternative FAU-G Game आहे.

FAU-G Game For Android?

FAU-G गेम हा Android साठी उपलब्ध आहे आणि तुम्ही तो प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता.

FAU-G Game For IOS?

FAU-G गेम हा IOS युजर साठी अजून उपलब्ध नाहीये परंतु भविष्यात उपलब्ध होऊ शकतो.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap