माझा आवडता सण गणेश उत्सव निबंध मराठी | Ganesh Utsav Nibandh Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला गणेश उत्सव निबंध मराठी सांगणार आहे. Ganesh Utsav Nibandh Marathi नक्कीच आपल्याला पैकी चे पैकी गुण मिळवून देईल.

भारतात एकतेचे प्रतीक असणारा सण म्हणजे गणेश उत्सव आहे आणि हा भारतात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. भारत हा एक बहुधर्मांनी नटलेला देश आहे आणि त्यात अनेक प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात. सण हे सर्व जाती धर्माचे लोकं मिळून मिसळून साजरा करतात म्हणून भारत देश खूप महान आहे.

👉नक्की वाचा: मेरा प्रिय मित्र पर निबंध हिंदी

👉नक्की वाचा: माझा आवडता खेळ क्रिकेट

👉नक्की वाचा: भ्रष्टाचार निबंध मराठी

👉नक्की वाचा: दिवाळी निबंध मराठी
👉नक्की वाचा: होळी निबंध मराठी
👉नक्की वाचा: गुढीपाडवा निबंध मराठी

गणपती एक हिंदू देव आहेत ज्यांना भारतात अधिकाधिक पसंत केले जाते आणि हेच कारण आहे की गणेश उत्सव खूप आनंदाने आणि गर्दीने साजरा केला जातो.

माझा आवडता सण गणेश उत्सव निबंध मराठी | Ganesh Utsav Nibandh Marathi

भारतात अनेक सण साजरा केले जातात आणि त्याचपैकी गणेश उत्सव हा एक हिंदू सण आनंदाने आणि धूम धामाने साजरा केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गणेश उत्सव साजरा केला जातो, त्यात ते गणपतीची पूजा करायचे. असे म्हणतात की पुण्यात असलेला कस्बा गणपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ माता यांनी स्थापन केला होता.

पेशव्यांनी देखील ह्या उत्सवाला खूप मान दिला व आनंदाने साजरा केला परंतु त्यावेळेस गणेश उत्सव फक्त कुटुंबा पर्यंत सीमित होता. पेशवे गणपतीची पूजा करत आणि आनंद साजरा करत.

बाळ गंगाधर टिळकांच्या पूर्वी पर्यंत हा उत्सव फक्त कुटुंबा पर्यंत सीमित होता परंतु टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. म्हणजेच तो फक्त धार्मिक आणि कौटुंबिक पर्यंत सीमित नसून तर संपूर्ण लोकांचा उत्सव झाला होता. 1893 मध्ये टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. ह्या मागचा हेतू एवढाच होता की सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावे, धर्मवाद, जातीवाद दूर व्हावे, सर्वांनी मिळून मिसळून राहावे. कारण त्यावेळेस सर्वजण आपापल्या जाती धर्माने बांधलेले होते आणि भेदभाव करत होते त्यामुळे टिळकांनी गणेश उत्सव हा सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा केला.

गणेश उत्सव हा गणेश चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो ज्याला गणेश जयंती आणि विनायक चतुर्थी ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये येते.

ह्या उत्सवाच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता त्यामुळे गणेश जयंती म्हणून हा सण साजरा केला जातो.

गणेश उत्सव हा माझा आवडता सण आहे, ह्या दिवशी आम्ही सर्व मित्र पंधरा दिवसा आधीच तयारीला लागून जातो कारण आम्ही दर वेळेस ही जयंती धूम धामने साजरा करतो.

हा सण मुख्य 11 दिवसांचा असतो परंतु काही लोक 5 दिवस, 7 दिवस ही साजरा करतात. जास्त करून शाळेत, महाविद्यालयात पाच किंवा सात दिवस गणपती बसवला जातो कारण तिथे जास्त दिवस बसवणे शक्य होत नाही.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पा बसवला जातो, त्या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती लाल कापडाने झाकून घरी आणली जाते. घरात पाय ठेवण्याच्या आधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि ज्या व्यक्तीने मूर्ती पकडलेली असते त्याच्या पायावर पाणी टाकून आणि कपाळावर कुंकू लावून, ओवाळून पूजा केली जाते. नंतर घरात प्रवेश करून गणपतीला पाटावर बसवले जाते, आणि मोदकचा नैवेद्य दाखवला जातो, त्याचबरोबर गोडधोड ही केले जाते.

उत्सवाचे 11 ही दिवस खूप आनंदाने साजरा केले जातात, असे वाटते की खरंच घरात आपल्यासोबत देव राहता आहे. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते, तो दिवस मात्र खूप दुःखीचा दिवस असतो. तेव्हा खूप आठवण येते गणपती बाप्पाची असे वाटते की घरातील एक सदस्यच कमी झाला आहे.

आमच्या घरात आणि गल्लीत दोघींकडे गणपती बाप्पा बसवला जातो. उत्सवाच्या पंधरा दिवसा आधीच आम्ही गल्लीत तयारीला लागतो जसे मंडप बांधणे, गणपतीची मूर्ती बुकिंग करणे, वाजंत्री बुकिंग करणे असे काही तयारी करतो. पहिल्या दिवशी आम्ही गणपती बाप्पाला गाडीवर आणतो आणि सोबत वाजंत्री ही लावतो. त्याचबरोबर आम्ही सर्व गल्लीतील मुल वाजत गाजत आणि नाचत गणपती गल्लीतील मंडपात आणतो. आणल्यानंतर गणपतीची आरती पूजा करतो, प्रसाद मध्ये मोदक आणि मिठाई असते.

रोज संध्याकाळी आम्ही गणपती बाप्पाला वेगवेगळा प्रसाद आणतो त्याचबरोबर प्रत्येक घरातून काही ना काही प्रसाद देखील येतो जसा मोदक, मिठाई, बर्फी अजून काही चविष्ट पदार्थ प्रसाद म्हणून आणतात.

अकराही दिवस खूप आनंदाने साजरा होतात आणि सकाळ संध्याकाळ गल्लीत गणपतीचे गाणे वाजत असतात.

गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते तो दिवस मात्र आमच्यासाठी कठीण असतो कारण गणपती विसर्जन नंतर गल्लीत खूप शांतता असते.

असे वाटते जणू गल्लीतून देवच चालले गेले आहेत, जणू आमच्यातील एक सदस्य कमी झाले आहेत, खूप एकटे एकटे वाटते.

असा हा गणेश उत्सव आम्हा सर्वांना खूप आवडतो आणि त्या दिवसांत आमची मज्जाच काही वेगळी असते.

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||

निष्कर्ष

Essay on ganesh chaturthi in marathi language हा लेख मुलांना खूप पसंद असतो कारण गणपती बाप्पा आठवले की लगेच अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते.

गणेश उत्सव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू आहे परंतु सार्वजनिक गणेश उत्सव ची खरी सुरुवात ही लोकमान्य टिळकांनी केली आहे. गणपती देवाला हिंदू धर्मात खूप मानले जाते, जेव्हा आपण एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करतो त्याच्या आधी गणपती बाप्पाचे नाव घेतले जाते.

Ganesh utsav nibandh marathi हा लेख लिहिण्याचा आमचा उद्देश एवढाच आहे की आपल्यापर्यंत योग्य आणि उत्तम माहिती मिळो.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap