माझा आवडता सण गुढीपाडवा निबंध मराठी | Gudi Padwa Essay In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला माझा आवडता सण गुढीपाडवा निबंध मराठी म्हणजेच Gudi Padwa Essay In Marathi सांगणार आहे. हा निबंध नक्कीच आपल्याला शाळेत पैकी चे पैकी गुण मिळवून देईल.

भारतात अनेक प्रकारचे सण साजरा केले जातात आणि त्यातील मुख्य सणांपैकी गुढीपाडवा हा एक सण आहे जो भारतात आनंदाने साजरा केला जातो. जास्त करून महाराष्ट्रात हा सण खूप प्रसिद्ध आहे आणि येथे घरोघरी हा सण साजरा केला जातो.

👉नक्की वाचा: दिवाळी निबंध मराठी
👉नक्की वाचा: होळी निबंध मराठी
👉नक्की वाचा: गणेश उत्सव निबंध मराठी

गुढीपाडवा म्हटल की मराठी माणसांचा सण कारण भारत हा अनेक जाती धर्मांनी नटलेला देश आहे.

जर आपण विद्यार्थी असाल तर आपल्याला शाळेत Gudi Padwa Nibandh In Marathi नक्की विचारला असेल परंतु आपल्याला तो कसा लिहावा, कुठून सुरुवात करावी हे कळत नसेल तर हा निबंध फक्त आपल्यासाठी आहे.

माझा आवडता सण गुढीपाडवा निबंध मराठी | Gudi Padwa Essay In Marathi

गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी माणसांचा सण जो आपण भारतीय लोकं मराठी नववर्षाच्या निमित्ताने साजरा करतो.

1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरा करतात परंतु ते इंग्रजांनी आणले आहे आणि आपले नवे वर्ष खरे चैत्र महिन्यात येणाऱ्या गुढी पाडव्याला सुरू होते. त्यामुळे आपले नविन वर्ष फक्त गुढीपाडव्यालाच.

गुढीपाडवा का साजरा करतात त्यामागे काही कथा आहेत त्यापैकी एक कथा अशी आहे की ब्रह्म देवाने ह्या दिवशी सृष्टी निर्माण केली होती. आणि अजून कथा म्हणजे ह्या दिवशी देव रामाने रावणाचा वध करून, सिते मातेला सोडवून आणि 14 वर्षाचा वनवास समाप्त करून परत अयोध्येला आले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी त्या आनंदात गुढी उभारली होती. अश्या ह्या दोन कथा आहेत ज्यामुळे गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.

गुढपाडव्याच्या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठून अंघोळ करतात आणि आपल्या घराच्या बाहेर वट्यावर किंवा छतावर गुढी उभी करतात. गुढी उभारण्यासाठी एक लांब बांबूची काठी घेतात त्या काठीच्या वरच्या टोकाला साडी, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आणि साखरीची गाठी, फुलांची माळ असे बांधून त्यावर तांब्याचा गडू ठेऊन गुढी उभी करतात. ह्या गुढीला गोड साखरेचा म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी ही गुढी खाली उतरवली जाते. आमच्या घरात मी आणि माझे बाबा आम्ही दोघी गुढी उभी करतो त्यात मी बाबांना मदत करतो.

गुढीपाडव्याला पुरण पोळीचा नैवेद्य केला जातो कारण नव वर्षाच्या आनंदात सर्वजण गोडधोड पदार्थ करतात. आमच्याही घरात आई सकाळमध्ये स्वयंपाकाला लागून जाते त्यात पुरणपोळी, आमटी, भात, तळण असे करते. मीही आईला त्यात मदत करतो.

ह्या सणाला हिंदू धर्मात शुभ दिवस मानला जातो कारण वेदांग ज्योतिष शास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा एक मुहूर्त असतो. गुडी ही सुख समृद्धीची प्रतीक असते आणि घरातील शांतता, सुख, समृद्धी, धन असेच टिकून राहावे याचे ते प्रतिक असते. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे ह्या दिवशी लोक खरेदी करतात जसे नवे कपडे, दागिने, इतर गोष्टी. असे मानतात की ह्या दिवशी खरेदी करणे हे शुभ असते.

वैज्ञानिकदृष्ट्या बघितले तर हा सण खूप उपयोगी आहे कारण ह्या दिवशी कडुलिंबाचा उपयोग केला जातो. आणि जर ह्या ऋतुंमध्ये जर कडुलिंबाची पाने खाल्ली तर शरीरातील उष्णता कमी होते आणि त्याचरोबर इतर रोग ही कमी होतात. कारण आपण सर्वांना माहितीच असेल की कडुलिंब हे एक औषधी वनस्पती आहे.

आपण जर महाराष्ट्रात बघितले तर हा सण घरोघरी साजरा केला जातो आणि घरोघरी आपल्याला गुढी उभारलेली दिसेल. महाराष्ट्रात अधिक मराठी माणसे राहतात आणि सण मराठी माणसांचा सण म्हणून जास्त ओळखला जातो.

मला ह्या दिवशी शाळेला सुट्टी असते आणि त्यादिवशी आमच्या घरात, घरात काय पूर्ण गल्लितच प्रसन्न वातावरण असते. कारण सर्वजण सकाळी लवकर उठून तयार झालेले असतात सर्वांच्या घरात पूजा पाठेचा सुगंध, पुरणपोळीचा सुगंध आणि घराच्या बाहेर छान गुडी उभी केलेली असते.

असा हा सण मला खूप आवडतो आणि खूप प्रसन्न वातावरण वाटते. आमच्या घरात हा सण आनंदाने साजरा केला जातो.

निष्कर्ष

विद्यार्थी असले म्हणजे खूप गोष्टी मनात येतात जसे Gudi Padwa information in marathi essay परंतु नक्की ते काय असते हे समजत नाही त्यामुळे आम्ही हा निबंध शेअर केला आहे.

गुडी पाडवा सण आला म्हणजे भारतीय लोकांचं नवीन सण आला असे म्हणण्यात हरकत नसावी कारण भारतीय संस्कृती नुसार आपले नववर्ष फक्त गुढीपाडव्याला असते.

Essay on gudi padwa in marathi हा लेख लिहिण्याचा आमचा उद्देश फक्त एवढाच आहे की भरपूर विद्यार्थ्यांना त्यांच्या मना नुसार निबंध मिळत नाहीत त्यामुळे हा निबंध आम्ही लिहिला आहे.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap