नमस्कार मंडळी आज मी आपल्याला फेसबुकचा शिक्षणासाठी कसा वापर करावा ते सांगणार आहे. शिक्षणासाठी सोशल मीडियाचा वापर करणे फार गरजेचे ठरते कारण तेथे जगातील सर्विकडून मदत मिळते.
आजकाल लोकं सोशल मीडियाचा सर्व गोष्टींसाठी यूज करतात परंतु जास्तकरून लोकं चांगल्या कामासाठी करत नाही. त्यामुळे आज मी आपल्याला तेच सांगणार आहे की फेसबुक सोशल मीडिया ऍपचा वापर तुमचे भविष्य घडवण्यासाठी कसा करता येईल.
फेसबुक मध्ये खूप सारे फीचर्स आहेत जे तुम्हाला अभ्यासात खूप मदत करू शकता जसे फेसबुक ग्रुप ज्यात जगातून सर्विकडचे लोकं जॉईन असतात त्यात तुम्ही तुमची समस्या दूर करू शकता आणि जर त्या ग्रुप मध्ये कोणाला अडचण आहे तर त्याची ही मदत करू शकता. फेसबुक पेज सुध्दा एक चांगली गोष्ट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही अभ्यासातील गोष्टी मिळवू शकता आणि चालू घडामोडी मिळवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चॅटिंग करून सुद्धा शिक्षणासाठी मदत घेतली जाऊ शकते.
विद्यार्थी म्हटल की ते आपल्या देशाचे पुढील भविष्य असतात आणि त्यांच्याशी योग्य मधले योग्य मार्गदर्शन कसे मिळावे याची आम्ही दक्षा घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण फेसबुक वापरत असाल आणि तेथे फक्त फोटोज् टाकने, व्हिडिओज टाकने, स्टेटस ठेवणे आणि इतर मनोरंजक काम करत असतील तर ते खूप चुकीचे आहे कारण फेसबुक हे इतर अनेक गोष्टीत देखील खूप फायदेमंद आहे. तर ते कसे फायदेमंद ठरेल हे खाली वाचा.
फेसबुकचा शिक्षणासाठी कसा वापर करावा? | How To Use Facebook For Education
फेसबुक ऐकलं की लगेच आपल्या मनात चॅटिंग, फोटोज् व्हिडिओज सोडणे, स्टेटस ठेवणे आणि इतर काही रिकाम्या गोष्टी करणे हेच आठवत असेल आणि अजून तर एक गोष्ट चाललीये की कोणाचे लाईक्स जास्त येतात कोणाच्या पोस्टला जास्त कमेंट येतात तर याच्या पलीकडे देखील Facebook चा अजून छान आणि योग्य उपयोग आहे.
फेसबुक ग्रुप्स असतात जे शिक्षणात खूप मदतगार साबित होतात, त्यांच्या मदतीने विद्यार्थ्याला मार्गदर्शन प्राप्त होऊ शकते.
तर आपण आधी जाणून घेऊया की तुम्ही तुमच्या फील्ड नुसार ग्रुप कसा निवडू शकता ज्याने तुम्हाला तुम्हाला हवी असलेली माहिती मिळेल. फेसबुक मध्ये वर दिलेल्या सर्च आयकॉन वर क्लिक करून त्यात तुमचे फील्ड चे नाव टाकावे किंवा तुमच्या शिक्षणातील विषयाचे नाव टाकावे. त्यानंतर तुम्हाला अनेक ग्रुप्स सूचित केले जातील त्यातून तुम्ही एक ग्रुप निवडू शकता. आणि ज्या ग्रुपमध्ये जास्त सदस्य असतील तो ग्रुप निवडला अजून उत्तम होईल कारण तेथे आपल्याला आपल्या प्रश्नाचे लवकर उत्तर मिळेल. ग्रुप निवडल्यानंतर त्यात जॉईन व्हा, काही ग्रुप्स हे प्रायव्हेट असतील त्यात आधी जॉईन रिक्वेस्ट पाठवावी लागेल नंतर ग्रुपचा एडमिन रिक्वेस्ट स्वीकार करून तुम्हाला जॉईन करेल.
ग्रुपमध्ये जुळले गेल्यावर त्यात तुम्हाला तुमच्या फील्ड मधल्या पोस्ट दिसतील ते तुम्ही वाचू शकतात आणि त्यात तुम्हाला अपडेट्स देखील मिळतील जसे जॉब संबंधित, नवीन नियम संबंधित, ई. त्यात तुम्ही तुम्हाला येत असलेल्या अडचणी वचारू शकता, प्रश्न विचारू शकतात आणि तिथे तुम्हाला नक्कीच मदत मिळेल.
जर आपल्याला pdf, notes आणि books हवे असतील तर facebook group आपल्यासाठी एक चांगला मार्ग असेल. कारण नोट्स संबंधित अनेक ग्रुप्स असतात ज्यात नोट्स आणि पुस्तक टाकली जातात आणि ते तुम्ही डाऊनलोड करू शकता. त्याचबरोबर जे पुस्तक ऑनलाईन किंवा ऑफलाईन विकत भेटतात तेच पुस्तक तुम्हाला तिथे pdf माध्यमातून प्राप्त होऊन जातात ज्यामुळे आपला खर्च देखील वाचतो. त्यात काही लोक हाताने लिहिलेले म्हणजेच handwritten notes देखील टाकतात ज्यात त्यांनी त्यांच्या सोप्या भाषेत समजावले असते ते तुम्ही डाऊनलोड करून वाचू शकता.
स्पर्धापरीक्षा किंवा MPSC, UPSC ची तयारी आपण करत असाल तर फेसबुक आपल्यासाठी एक ज्ञान गंगा म्हणून चांगले साबित होऊ शकते. कारण यात भरपूर प्रकारचे जनरल नॉलेज ग्रुप्स बघायला मिळतात ज्यात रोज काही ना काही ज्ञानी प्रश्न पडत असतात आणि अनेक चालू घडामोडी देखील पडत असतात. हवे तर आपण चालू घडामोडी साठी दुसरा ग्रुप जॉईन करू शकता जो तुम्हाला खूप मदत करेल. काही ग्रुप्स हे एमपीएससी आणि यूपीएससी सुद्धा असतात त्यात तुमची चांगली मदत होऊ शकते. आणि तेव्हा खरे वाटेल की तुमचा मोबाईलचा खरा वापर होतोय.
आता आपण फेसबुक पेज ची चर्चा करणार आहोत कारण शिक्षणासाठी facebook page देखील खूप मदतगार असते. फेसबुक पेज मध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याला त्याला लाईक किंवा फॉलो करावे लागते आणि त्यात तुम्हाला नवनवीन पोस्ट प्राप्त होतात. परंतु फेसबुक पेजमध्ये एक बाब अशी असते ती म्हणजे तुम्ही त्यात मेसेज नाही करू शकत कारण फेसबुक ग्रुप मध्ये तुम्ही मेसेज करू शकता तेही पब्लिक ग्रुप असला तर परंतु फेसबुक पेजमधे नाही.
त्याचबरोबर फेसबुक मध्ये मित्रांशी चॅटिंग करून सुद्धा तुम्ही अभ्यासात मदत घेऊ शकतात. आपल्याजवळ कोणी मित्र नसेल आणि आपल्याला अभ्यासात काही मदत हवी असेल तर फेसबुक वर मित्राशी चॅटिंग करून मदत घेऊ शकता. फेसबुक जगातील कुठून कुठून लोकं जोडलेले आहेत त्यात तुमच्या फील्ड चा कोणता व्यक्ती फेसबुकवर तुमचा मित्र बनला तर त्याची तुम्ही मदत घेऊ शकता.
अश्या पद्धतीने तुम्ही फेसबुकचा शिक्षणासाठी यूज करी शकतात तर मी अशा करतो की आपल्याला How To Use Facebook For Education म्हणजेच वरील आर्टिकल नक्की आवडले असेल.