टेलिग्रामचा शिक्षणासाठी कसा वापर करावा? | How To Use Telegram For Education In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला टेलिग्रामचा शिक्षणासाठी कसा वापर करावा? सांगणार आहे. जर आपण विद्यार्थी असाल किंवा आपल्याला अभ्यासात मार्गदर्शन किंवा मदत हवी असेल तर टेलिग्राम ऍप आपल्यासाठी उत्तम ठरेल.

आजच्या युगात इंटरनेट हे खूप महत्त्वाचे आणि चर्चित स्त्रोत आहे ज्याच्या मदतीने आज सर्वकाही शक्य आहे. जास्त करून लोकं आता सोशल नेटवर्क साईट्स चा वापर करतात कारण तेथे जगातील सर्व लोक त्यांचे उपक्रम बघतात जसे फोटोज्, स्टेटस, व्हिडिओज, स्टोरी. परंतु काय आपल्याला माहितीये यांचा उपयोग शिक्षणात देखील केला जातो आणि इतर अनेक उपयोगी कामात केला जातो.

टेलिग्राम हे एक सोशल मीडिया ऍप आहे जे व्हॉटसअप सारखेच आहे परंतु त्यात व्हॉटसअप पेक्षा जास्त फीचर्स आहेत. Telegram app Android, IOS आणि Windows साठी उपलब्ध आहे आणि जर आपण अँड्रॉइड युजर असाल तर आपण प्ले स्टोअरवर हे ऍप डाऊनलोड करू शकतात.

टेलिग्राममध्ये चॅनल्स आणि ग्रुप्स असतात त्यात तुम्हाला हवे उपलब्ध होते परंतु आपल्याला जे हवे आहे त्या कॅटेगरी मधल्या ग्रुप्स आणि चॅनल्स ला जॉईन व्हावे लागेल.

तर आता आपल्याला समजले असेल की टेलिग्राम काय असते तर आता जाणून घेऊ की शिक्षणासाठी टेलिग्रामचा कसा यूज करू शकता.

टेलिग्रामचा शिक्षणासाठी कसा वापर करावा? | How To Use Telegram For Education

टेलिग्राम हे एक सोशल मीडिया ऍप आहे जे व्हॉटसअप सारखेच आहे परंतु यात काही advanced features आहेत जे प्रत्येक फील्ड मधल्या लोकांना सोयीस्कर वाटते.

टेलिग्रामचा शिक्षणासाठी कसा यूज करावा हा आपला मुख्य मुद्दा आहे आणि तर टेलिग्राम मध्ये चॅटिंग ने, चॅनल्स मधून, ग्रुप्स मधून, कॉलिंग ने आपण उपयोग करू शकता.

टेलिग्राम चॅनल्स चा शिक्षणासाठी खूप मोठा वाटा आहे कारण टेलिग्राम मध्ये चॅनल हे सर्वात जास्त पसंत केले जाणारी गोष्ट आहे. तर आता आपण जाणून घेऊया की टेलिग्राम चॅनलच्या मदतीने कसे अभ्यासात मदत होऊ शकते.

तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्ही तुमच्या फील्ड प्रमाणे टेलिग्राम चॅनल्स सर्च करुन त्यांना जॉईन होऊ शकता, चॅनल शोधण्यासाठी टेलिग्राम ऍप मधील वरील उजव्या बाजूला सर्च चे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तेथे आपल्या टॉपिक चे नाव टाका आणि चॅनल मध्ये जाऊन खाली दिलेल्या जॉईन बटन वर क्लिक करून जॉईन करा.

टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर त्यात तुम्ही तुम्हाला असलेली अडचण सर्च करू शकता ती तुम्हाला त्यात नक्की सापडेल. जर आपल्याला अभ्यासात नोट्सची गरज असेल तर तेही चॅनल टेलिग्राम वर भेटतील त्यात आपल्याला नोट्स प्राप्त होतील. त्याचबरोबर आपण पुस्तक किंवा बुक्स चे शौकीन असाल किंवा आपल्याला शिक्षणातील पुस्तक लागत असतील तर येथे आपल्याला pdf माध्यमात मिळून जातील. ऑनलाईन पुस्तक हे बिकट भेटतात आणि जर आपल्याला ते विकत घ्यावी नसतील टेलिग्राम वर असे अनेक चॅनल्स आहेत जे तुम्हाला फ्री मध्ये बुक्स उपलब्ध करतील.

टेलिग्राम ग्रुप्स देखील शिक्षणासाठी एक उत्तम पर्याय आहे, जसे व्हॉटसअपवर ग्रुप्स असतात तसेच टेलिग्रामवर देखील ग्रुप्स असतात. परंतु व्हॉट्सअपवर ग्रुप्स स्वतःहून जॉईन करता येत नाही आणि त्यात सदस्यांची सुद्धा क्षमता कमी असते आणि टेलिग्राम मध्ये जर पब्लिक ग्रुप असले म्हणजे जास्तकरून पब्लिक ग्रुपच असतात आणि त्यात तुम्ही स्वतःहून जॉईन होऊ शकता आणि त्यात सदस्यांची क्षमता 200000 पर्यंत असते. त्यामुळं टेलिग्राम ग्रुप्स मध्ये जगातून सर्वकडचे लोकं जॉईन असतात. आणि जर आपली काही समस्या असली तर त्यात तुम्ही टाईप करून आपली समस्या विचारू शकता त्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळेल. आणि क्षणा क्षणाला खूप सारे लोक त्यात ऑनलाईन असतात.

ग्रुप्स मध्ये तुम्ही बहु पर्यायी सारखे प्रश्न देखील विचारू शकता ज्यात प्रत्येकजण एक उत्तर निवडेल ज्याने आपल्याला अजून मदत मिळेल.

टेलिग्राम चॅनल्स आणि ग्रुप्स मध्ये अजून एक फायदा असा असतो की त्यात आपला नंबर कोणालाच दिसत नाही फक्त तुमचे नाव तिथे दिसते, तर हा ही एक चांगला मुद्दा आहे.

टेलिग्राम मध्ये आपण मित्राशी चॅटिंग करून सुद्धा शिक्षणातील मदत म्हणून टेलिग्राम ऍप चा वापर करू शकता. जसे व्हॉटसअप मध्ये आपण चॅट करून मित्राशी किंवा दुसरे कोणाशी अभ्यासात मदत घेत असतो तसेच आपण टेलिग्राम ऍपमध्ये देखील करू शकता.

टेलिग्राम मध्ये सिक्रेट चॅट नावाचे सुद्धा एक फायदेमंद फीचर आहे ज्यात सेक्युरिटी च्या अंतर्गत काम होते जे तुमच्या दोघींच्या व्यतिरिक्त कोणालाच माहिती पडत नाही आणि समोरचाही ती चॅट कोणाशीच शेअर करू शकत नाही. कारण सिक्रेट चॅट च्या दरम्यान समोरचा व्यक्ती स्क्रीनशॉट काढू शकत नाही आणि तुम्ही देखील काढू शकत नाही आणि त्याचबरोबर जर आपण किंवा समोरील व्यक्तीने ती चॅट कॅन्सल केली तर त्यानंतर चॅट करू शकत नाहीत.

टेलिग्राम मध्ये कॉलिंग चे देखील फीचर आहे ज्यातून तुम्ही समोरच्याला फोन करू शकता. फोन केल्यामुळे आपल्याला अभ्यासात मोठी मदत होईल कारण जर समोरचा व्यक्ती आपल्याला फोनवर मार्गदर्शन करेल तर ते खूपच उत्तम ठरेल, त्यात तुम्हाला अजून समजावून सांगितले जाईल.

असा हा टेलिग्राम छा शिक्षणात उपयोग होऊ शकतो कारण भरपूर वेळेस आपण गूगल वर सर्च करुन थकून जातो परंतु त्यातील एकही साइटवर आपल्या मनासारखे उत्तर भेटत नाही आणि आपल्यालाही अशी समस्या निर्माण झाली असेल तर टेलिग्राम आपल्यासाठी उत्तम पर्याय. त्यामुळे आम्ही how to use Telegram for education खास आपल्यासाठी लिहिले आहे.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap