यूट्यूबचा शिक्षणासाठी कसा वापर करावा? | How To Use YouTube For Education In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला यूट्यूबचा शिक्षणासाठी कसा वापर करावा ते सांगणार आहे. कारण आजच्या युगात बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती नाहीये की सोशल मीडिया ऍप च्या मदतीने शिक्षणात कसा यूज होऊ शकतो ज्याने आपले काम सोपे आणि वेळ कमी जाईल.

आजकाल लोकं सोशल मीडिया जात प्रमाणात यूज करतात आणि जास्त करून तरुण पिढी परंतु काय आपल्याल माहितीये की यूट्यूबचा शिक्षणासाठी कसा यूज करावा. नाही माहित असेल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात ज्याने आपले ज्ञान वाढेल.

आपण आतापर्यंत माझे मागील आर्टिकल वाचले असतील जे फेसबुक आणि टेलिग्राम चा वापर शिक्षणासाठी कसा करावा ते सांगितले आहे, आणि जर आपण ते वाचले नसेल तर खाली मी त्यांची लोकं दिली आहे त्यावर क्लिक करून तेही वाचा कारण त्याच्याने आपल्याला भरपूर मदत मिळेल.

इंटरनेटवर अश्या भरपूर गोष्टी आहेत ज्यांचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी करू शकतो जसे शिक्षणासाठी, ज्ञानासाठी आणि इतर अनेक कामांसाठी. आणि खास करून सोशल मीडिया ऍप मध्ये फेसबुक, टेलिग्राम, यूट्यूब, व्हॉटसअप ज्यामुळे आपल्या चालू घडामोडी आणि तुमच्या पद्धतीचे ज्ञान प्राप्त होते.

यूट्यूबचा शिक्षणासाठी कसा वापर करावा? How To Use YouTube For Education

यूट्यूब म्हणजे काय? हे तर आपल्याला माहितीच असेल कारण आजकाल सर्वांच्या स्मार्टफोनमध्ये YouTube App असते आणि चुकून का होईना त्यावर क्लिक होतेच. तर यूट्यूब हे एक व्हिडिओ शेअरिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमींग ऍप आहे ज्यात तुम्ही व्हिडिओज टाकू शकता आणि बघू देखील शकतात.

आजच्या युगात जास्त करून लोकं यूट्यूबचा उपयोग फक्त मनोरंजनासाठी करतात जसे कॉमेडी व्हिडिओज बघणे, गेमिंग व्हिडिओज बघणे, चित्रपट बघणे, वेब सीरिज बघणे, शॉर्ट व्हिडिओज बघणे, गाणे बघणे आणि इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. परंतु काय आपल्याल माहितीये यांचा वापर फक्त मनोरंजनासाठी नाही तर शिक्षणासाठी सुद्धा केला जाऊ शकतो आणि भरपूर जण करता देखील. आणि मुख्य करून विद्यार्थ्यांसाठी यूट्यूब हे एक उत्तम पर्याय म्हणून साबित होते.

तर आपल्याला माहिती नसेल की यूट्यूबचा शिक्षणासाठी कसा यूज करावा किंवा आपण यूट्यूब चा शिक्षणासाठी यूट्यूबचा वापर करत असाल पण अजून योग्य पद्धतीने कसा करावा ज्याने आपल्याला योग्य ती माहिती प्राप्त होईल, तर पुढील टिप्स काळजीपूर्वक वाचा.

तुम्ही एक विद्यार्थी असाल किंवा कोणत्या ना कोणत्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आपण यूट्यूबचा वापर करू शकतात. आधी आपल्याला जी समस्या असेल ती यूट्यूब मध्ये वरील बाजूस दिलेल्या सर्च आयकॉन वर क्लिक करून त्यात तुमची समस्या किंवा प्रश्न टाका. त्यानंतर तुम्हाला अनेक व्हिडिओज सुचविले जातील त्यातून तुमच्या प्रश्नाला जुळणारी व्हिडिओ ओपन करून ती पूर्ण बघा. आणि त्यातून तुम्हाला नक्कीच तुमच्या समस्यांचे निवारण मिळेल आणि जर त्या व्हिडिओ पासून तुमचे मन समाधान नाही झाले तर तुम्ही दुसरी व्हिडिओज निवडून ती बघू शकता आणि आपल्याल नक्कीच फायदा होईल.

जर आपली समस्या इंग्रजीमध्ये आहे आणि आपल्याला मराठीत किंवा हिंदीमध्ये त्याची माहीत हवी असेल तर तेही तुम्हाला त्यात मिळते फक्त त्यावेळेस तुम्हाला तुमच्या प्रश्नाच्या शेवटी in marathi किंवा marathi असे टाईप करावे लागेल, उदाहरणार्थ, how to use YouTube for education in marathi. अश्या पद्धतीने आपण आपल्या मातृ भाषेत देखील याचा उपयोग करू शकता किंवा फायदा घेऊ शकता.

YouTube मध्ये आपल्याला अनेक प्रकारचे वेगवेगळ्या कॅटेगरीचे आणि फील्डचे चॅनल्स बघायला मिळतील ज्यात त्यांनी त्या फील्ड संबंधित व्हिडिओज टाकले असतील, तर तुम्ही त्यांना सबस्क्राईब करून त्यांचे नवनवीन व्हिडिओज चे अपडेट्स घेऊ शकता. जर आपण कोणत्या चॅनेलला subscribe करून bell icon चालू केले असेल तर त्याचे नवीन आलेली व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहचून जातात.

तर आपण आपल्या फील्ड मधले चॅनल्स कसे शोधाल हाही आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल परंतु काळजी करू नका आता मी तुम्हाला तेच सोप्या भाषेत सांगणार आहे. आधी आपण आपल्या फिल्डचे नाव सर्च करा जसे engineering, pharmacy, arts, commerce, science, MPSC, UPSC, ई त्यानंतर आपल्यासमोर काही चॅनल्स येतील आपल्या आवडीनुसार एक चॅनल निवडून त्यात तुमच्या फील्ड नुसार व्हिडिओज आहेत का ते तपासा मग त्याला सबसक्राईब करून घ्या. दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला जो प्रश्न सापडत नसले ती सर्च करा जो व्हिडिओज आपल्याला सोयीस्कर वाटेल त्या व्हिडिओच्या चॅनल मध्ये जाऊन तपासा की फील्ड नुसार व्हिडिओज आहेत का मग त्या सबसक्राईब करा.

MPSC, UPSC च्या विद्यार्थ्यांना यूट्यूब हे खूप योग्य ऍप आहे कारण यात असे खूप चॅनल्स आहेत जे स्पर्धापरीक्षांबद्दल माहिती प्रदान करतात. जनरल नॉलेज चे अनेक प्रश्न, चालू घडामोडी वर प्रश्न आणि जगात सध्या काय चालू आहे याच्याबद्दल माहिती मिळते. त्याचबरोबर एमपीएससी, यूपीएससी मध्ये कसे इंटरव्ह्यू होतात त्यात काय काय प्रश्न विचारले जातात त्यांची पूर्वतयारी सांगितली जाते, काही चॅनल्स वर समोरासमोरील इंटरव्ह्यू शेअर केले जातात ते तुम्ही बघू शकतात.

अश्या पद्धतीने आपण युट्यूबवर शैक्षणिक चॅनल्स शोधू शकतात आणि त्याच्या साह्याने अभ्यासात मदत घेऊ शकता. तर मला आशा आहे की यूट्यूबचा शिक्षणासाठी कसा वापर करावा म्हणजेच वर दिलेले आर्टिकल आपल्याला नक्कीच आवडले असेल.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

1 thought on “यूट्यूबचा शिक्षणासाठी कसा वापर करावा? | How To Use YouTube For Education In Marathi”

  1. Youtube हे हल्लीच्या काळात खूप उपयुक्त ठरत आहे. यूट्यूब चा आपण चांगल्या प्रकारे कसा वापर करू शकतो. ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. धन्यवाद, अशीच माहिती देत रहा.

    Reply

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap