जिओ फोन हँग झाल्यास काय करावे आणि कसे फास्ट करावे | What To Do If Jio Phone Hangs Solution In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला जिओ फोन हँग झाल्यास काय करावे आणि त्यावर सोल्युशन काय ते सांगणार आहे. खालील पायऱ्या पूर्ण केल्यास नक्की आपला प्रॉब्लेम सुटेल.

Jio Phone एक किपेड वाला स्मार्ट फोन चा बरोबर आहे कारण त्यात गरज असलेल्या सर्व सुविधा आहेत. Jio Phone Hang Zalyas Kay Karave असे आपल्याला सुद्धा वाटत असेल तर माझ्याजवळ देखील एक जिओ फोन आहे आणि मी ही समस्या कशी सॉल्व केली ते मी आपल्याला स्पष्टपणे प्रॅक्टिकली फोटोंच्या माध्यमातून दाखवणार आहे.

यात मी तुम्हाला काय काय सांगणार आहे ह्याची आधी तुम्ही नोंद घ्या, जिओ फोन हँग का होतो?, जिओ फोन हँग झाल्यास काय करावे? सॉल्युशन, जिओ फोन फास्ट करण्यासाठी काय करावे?

जिओ फोन हँग का होतो | Why Does Jio Phone Hang In Marathi

जिओ फोन हा एक कमी पैश्यात भेटणारा उत्तम फोन आहे ज्यात एका गरजू माणसाला लागणारे सुविधा आहेत. परंतु तो कीपॅड वाला मोबाईल असल्यामुळे त्यातील सुविधांची गुणवत्ता कमी आहे. त्यामुळे त्या मोबाईलवर लोड पडल्यावर तो हँग होतो.

जिओ फोनमध्ये रॅम 512mb म्हणजे कमी असल्यामुळे फोनची सहनशक्ती कमी असते जसे 1gb रॅम वाला मोबाईल सुद्धा कालांतराने हँग होण्यास सुरू होतो.

त्यामुळे जिओ फोनची रॅम कमी असल्यामुळे त्यात जास्त ऍप्लिकेशन ठेवणे हँग होण्याचे मोठे कारण आहे.

आजकाल इंटरनेटच्या युगात लोकं प्रमाणापेक्षा इंटरनेटचा वापर करतात त्याप्रमाणेच जिओ फोनमध्ये सुद्धा सतत आणि प्रमाणापेक्षा अधिक इंटरनेट चालवतात त्याचाही जिओ फोनवर परिणाम होतो.

जिओ फोन हा बटनांचा फोन म्हणजे कीपॅडवाला फोन असल्यामुळे आपण लगातार वेगवान बटन दाबल्यावर ज्याने तो फोन गोंधळात पडतो आणि काम करणे बंद करतो ज्याने तो हँग होतो.

जिओ फोन हँग झाल्यास काय करावे | What To Do If Jio Phone Hangs Solution In Marathi

रिस्टार्ट (Switch Off – On, Restart)

Jio Phone Hangs Solution In Marathi

जर आपला जिओ फोन केव्हा केव्हा कदाचितच हँग होत असेल तर अशावेळेस त्याला स्विच ऑफ म्हणजे बंद करून नवीन चालू करावा किंवा restart करावा. कारण प्रत्येक मोबाईलला विश्रांतीची गरज असते त्यामुळे jio phone ला थोड्या वेळ विश्रांती द्यावी.

आणि जर जिओ फोन मध्येच अटकला असेल तर तेव्हा आपण त्याची बॅटरी काढून नवीन टाकून स्विच ऑन करू शकता ज्याने तो बंद होऊन नवीन चालू होईल आणि त्यातील सर्व क्रिया नवीन चालू होतील.

रिसेट फोन ( Reset Phone)

जिओ फोन थोड्या जास्त प्रमाणात हँग होत असेल तर अशावेळेस तुम्ही त्याला रिसेट करू शकता ज्याने आपला मोबाईल पुन्हा पहिल्यासारखा होईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी की jio phone reset करतांना आपला संपूर्ण डेटा मिटून जाईल जसे फोन नंबर्स, फोटोज्, व्हिडिओज, म्युझिक, गाणे आणि फाईल्स डिलिट होतील आणि मोबाईल पुन्हा नवीन मोबाईल घेतल्यासारख होऊन जाईल. नंतर तुम्ही फोनमध्ये जेही टाकणार ते तुम्हाला गरज असेल तरच टाकावे कारण बिनकामाचे काहीही भरू नये जसे, ऍप्लिकेशन, फोटोज्, व्हिडिओज, म्युझिक वैगेरे.

जिओ फोन रिसेट करण्यासाठी settings मध्ये जाऊन, device मध्ये जा, नंतर त्यात reset phone मध्ये जाऊन reset करा. (Setting > device > reset phone > reset)

हार्ड रिसेट (Hard Reset)

जेव्हा आपला जिओ फोन खूपच हँग होत असेल तर आपण त्याला हार्ड रिसेट करू शकतात ज्याने आपला jio phone hard reset होईल जणू संपूर्ण डेटा मुळासकट मिटून जाईल.

मी हार्ड रिसेट करण्यासाठी Jio Phone F30c model वापरणार आहे आणि जर आपल्याकडे दुसरा मॉडेल असेल तर त्याचे देखील बटन (keys) खाली दिले आहेत.

आधी जिओ फोनची बॅटरी काढून पुन्हा टाका मग आवाज वाढवण्याचे बटन + पॉवर बटन(लाल) म्हणजेच Volume up + Power key एक सोबत दाबा. त्यानंतर wipe data/factory reset वर क्लिक करा. नंतर yes वर क्लिक करा आणि थोड्यावेळ वाट बघा, आपला जिओ फोन रिसेट झाला असेल.

जिओ फोनला हार्ड रिसेट करण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायला लागतील परंतु प्रत्येक जिओ फोन च्या मॉडेल्स साठी वेगवेगळे बटन आहेत जे मी खाली दिले आहेत.

हार्ड रिसेट करण्यासाठी आपल्याला फक्त दोन बटन दाबून वाइप डाटा करायला लागेल. परंतु प्रत्येक मॉडेल्स साठी वेगवेगळे बटन आहेत ते मी पुढे दिले आहेत.

ModelsReset Keys
F30c, F50y, F90m :आवाज वाढवण्याचे बटन + पॉवर बटन(लाल), (Volume up + Power key)
F41t :व्हॉईस + पॉवर बटन (voice + power key)
F10q :आवाज वाढवण्याचे बटन + आवाज कमी करण्याचे बटन + पॉवर बटन (volume up + volume down + power key)
F81e :आठ अंकाचे बटन + पॉवर बटन ( 8 key + power key)
F61f :कॉलिंग बटन + पॉवर बटन (Calling (green) key + power key)
F101k :शून्य अंकाचे बटन + पॉवर बटन (zero (0) + power key)
F220b, F2403n :स्टार + पॉवर बटन (स्टार (*) + power key)

जिओ फोन बदलवणे (Jio Phone Replacement)

आपण कंटाळले आहेत की आपला जिओ फोन प्रमाणापेक्षा अधिक हँग होत आहे तर आपण त्याला जिओ सर्व्हिस सेंटर (jio service center) मध्ये Jio Phone replacement करून घ्या, त्यांना आपण आपली समस्या सांगितली तर ते आपल्याला जिओ फोन बदलवून देतील ज्यात आपल्याला त्याचे upgraded model भेटेल.

जिओ फोन फास्ट करण्यासाठी काय करावे | How To Make Jio Phone Fast In Marathi

जिओ फोन फास्ट करण्यासाठी आपल्याला त्यातील ऍप्लिकेशन कमी ठेवावे कारण जेवढी आपल्याला गरज असेल तेवढीच ऐप ठेवावीत आणि डेटा देखील कमी ठेवावा कारण त्यामुळेच मोबाईल जास्त हँग आणि स्लो होतो. जिओ फोनमध्ये 512mb ram असल्यामुळे त्याची क्षमता कमी असते.

जिओ फोनला गतीने वापरू नये म्हणजेच थोडक्यात बटन जलद गतीने दाबू नये त्यांना हळू हळू दाबावे.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap