कलोंजी म्हणजे काय, कलोंजीचे फायदे, तोटे, उपयोग | Kalonji in Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला कलोंजी म्हणजे काय म्हणजेच Kalonji In Marathi सांगणार आहे. हा पदार्थ दिसायला छोटा असतो परंतु मी खात्रीने सांगतो की यापासून आपल्याला नक्की फायदा मिळेल.

आपल्या किचन मध्ये असे अनेक मसाले आणि पदार्थ असतात ज्यांचा वापर आपण स्वयंपाकात क्वचित करत असतो परंतु जर बघितले तर या पदार्थांच्या स्वयंपाकात केलेल्या वापरांच्या व्यतिरिक्त अनेक इतर वापर देखील असतात. असाच एक पदार्थ आपल्या मसाल्यांच्या डब्यात देखील असतो परंतु आपल्याला त्याचा मसाल्यातील वापर सोडता जास्त माहिती नसल्याने आपण तो क्वचित वापरात आणत असतो. त्याचे नाव म्हणजे कलोंजी किंवा मंगरेला किंवा काळे बियाणे होय.

आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण याच कलोंजी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. कलोंजी म्हणजे काय, कलोंजीचे स्वयंपाक घरातील उपयोग, कलोंजीचे आयुर्वेदीक उपाय (What is Meant By Kalonji in Marathi, Uses of Kalonji In Kitchen, Ayurvedic Importance of Kalonji) या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

कलोंजी म्हणजे काय मराठीमध्ये || Kalonji Meaning in Marathi

कलोंजी म्हणजे मराठीत काळे तीळ. हो आपल्याकडे आपण दशक्रिया विधीला अर्पण करतो तेच काळे तीळ. या कलोंजीचा वापर आपण स्वयंपाक घरात क्वचितच करत असतो. परंतु याचे महत्व जेव्हा तुम्हाला समजेल त्यानंतर तुम्ही याचा वापर जास्तीत जास्त करायला नक्की सुरुवात कराल.

कलोंजीला इतरही अनेक नावे आहेत. जसे हे बियाणे एका नायजेला झाडाचे बियाणे आहे. हे झाड साधारण 12 इंचापर्यंत वाढते. कलोंजी ज्या झाडाला येते त्याला नायजेला सॅटीवा हे वैज्ञानिक नाव आहे. या नावाचा इतिहास हा लॅटिन शब्द असलेला निजार सोबत निगडित आहे. निजार म्हणजे काळा होय. नायजेलाचे उत्पादन हे दक्षिण पश्चिम आशियाई देशांमध्ये तसेच काही उत्तर आफ्रिकेच्या देशांत घेतले जाते.

झाडाचा आकार छोटा असतो आणि त्यावर सफेद आणि हलक्या निळसर रंगाचे फुल येते. नायजेला वनस्पतीला एक मोठ्या गोल आकाराचे काळे फळ देखील येते. हे फळ फोडले असतात यात आपल्याला आतमध्ये काळ्या रंगाचा त्रिकोणी आकाराच्या कलोंजी बघायला मिळातात. कलोंजीचा आकार बघितला तर तो त्रिकोणी असतो आणि साधारण 3 मिमी पेक्षा कमीच असतो. कलोंजीला काही ठिकाणी काळे बियाणे, नायजेला बियाणे, उत्तर भारतात मंगेला या नावाने देखील ओळखले जाते.

अनेक लोक कलोंजी आणि कांद्याचे बी यामध्ये गफलत करून बसतात. कलोंजी हे बियाणे उग्र वास देत नाही तर कांदा बियाणे फोडले असता त्यातून उग्र दर्प येतो. कलोंजीला अनेक नावांनी ओळखले जाते. जसे महाराष्ट्रात मराठीमध्ये कलोंजी किंवा काळे तीळ, संस्कृत मध्ये कृष्णाजीरा म्हणून ओळखले जाते.

कलोंजीचा स्वयंपाकात वापर – Use of Kalonji in Kitchen

कलोंजीचा वापर आपण स्वयंपाक घरात हा कमी करत असतो. परंतु याचे आयुर्वेदिक फायदे जास्त असल्याने आपण त्यांचा वापर हा दररोजच्या स्वयंपाकात त्याचे पीठ बनवुन करू शकतो. सर्वात जास्त कलोंजीचा वापर हा कुठे होत असेल तर तो म्हणजे लोणचे बनवताना. लोणच्यामध्ये आपण जे मसाले वापरतो त्यात आपण कलोंजी चा वापर हा नक्कीच करत असतो.

आपण एखाद्या भाजीला फोडणी देण्यासाठी कलोंजी वापरू शकतो. कलोंजी जर आपल्याला स्वयंपाक घरात ठेवायची असेल तर ती हवाबंद डब्यात ठेवावी. जेणेकरून तिचा सुगंध आणि चव बिघडणार नाही.

नान, ब्रेड आणि केक यांना सजवण्यासाठी या कलोंजीचा वापर केला जातो. याची चव थोडीशी कडू असल्याने याचा वापर मसाल्यांमध्ये केला जातो. आपण बिर्याणी आणि पुलाव खातो त्यात देखील कलोंजीचा वापर हा केलेला असतो. बंगाली नान आणि पेशवारी ब्रेड नान यांच्यामध्ये कलोंजी बारीक करून आणि सजवण्यासाठी वापरलेली असते.

कलोंजीचा इतिहास – History of Kalonji

What Is Kalonji In Marathi
Kalonji In Marathi

बडीशेप प्रकारात येणाऱ्या या वनस्पतीचा इतिहास तसा खूप जुना आहे. या पदार्थाचा वापर हा अनेक शतकांपासून आशिया, उत्तर आफ्रिका आणि अरबी देशांमध्ये उत्पादन घेण्यासाठी, बडीशेप, मसाला किंवा औषधी पदार्थ म्हणून केला जातो.

आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये या कलोंजीचा उल्लेख आणि औषधी वापर आपल्याला आढळतो. धार्मिक ग्रंथामध्ये देखील कलोंजी सारख्या काही पदार्थांचा वेगळ्या नावाने उल्लेख आलेला आहे. इतकेच नव्हे तर रोम देशात जर आपण बघितले तर त्यांच्या आयुर्वेदात प्रत्येक आजारासाठी त्यांनी कलोंजीचा वापर केलेला आढळतो. इस्लाम धर्म असो किंवा ख्रिश्चन धर्म असो, प्रत्येकाने हेच सांगितलेले आहे की मृत्यू सोडता सर्व आजारांवर हे गुणकारी औषध आहे.

कलोंजीचे औषधी उपयोग – Medicinal Uses Of Kalonji

1) लक्ष केंद्रित करायचे असेल किंवा मेमरी वाढवायची असेल तर कलोंजी गुणकारी औषध आहे.

2) तीव्र वेदना असलेल्या आजारांवर तुम्हाला कलोंजी आराम देऊ शकते.

3) तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर तो रक्तदाब कमी करण्यासाठी कलोंजी गुणकारी आहे.

4) दैनंदिन जीवनात येणारा तणाव आणि डिप्रेशन सारख्या समस्या कलोंजी मुळे कमी होतात.

5)तरुणांसाठी आणि वयोवृद्धांसाठी आरोग्याच्या दृष्टीने कलोंजी गुणकारी औषध आहे.

6) कलोंजीला तुम्ही गरम पाण्यात मिसळून किंवा मधासोबत सेवन करू शकतो. याने दमा किंवा खोकला यासारखे जर आजार असतील तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो.

7) कलोंजी आयुर्वेदानुसार हृद्यरोगावर गुणकारी आहे.
कलोंजी मध्ये असे अनेक घटक आहेत ज्यांच्या मदतीने आपण दररोज थोडे सेवन केल्यास आपले कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

8) कलोंजीचे तेल देखील निघते आणि हे तेल मालिश करण्याच्या तेलात वापरले जाते.

9) अँटी ऑक्सिडेंटिव्ह असल्यामुळे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने कलोंजी कर्करोगावर आराम मिळवण्यासाठी वापरू शकतो.

10) यात लठ्ठपणा घालवण्यासाठी गुणधर्म असल्याने जाड झालेले व्यक्ती याचे सेवन करतात.

11) ज्यांना मुतखडा सारख्या आजारांचा त्रास आहे त्यांनी याचे सेवन नक्की करावे.

12) मधुमेह सारख्या आजारावर देखील कलोंजी गुणकारी मानले जाते.

13) स्त्रियांमधील आजारावर हे कलोंजी खूप गुणकारी औषध आहे.

14) स्त्रीने बाळाला जन्म दिल्यानंतर डॉक्टर एखाद्या फळाच्या रसासोबत कलोंजी देण्यास सांगतात.

15) डोळ्याच्या समस्या, जसे की मोतीबिंदू, डोळ्यातून पाणी येणे यावर कलोंजी गुणकारी आहे. आपली दृष्टी सुधारण्यास देखील याने मदत होते.

16) कलोंजी हे दातांसाठी आणि हिरड्यांसाठी देखील गुणकारी आहे.

केसांसाठी आणि सुंदरतेसाठी कलोंजीचे फायदे – Uses of Kalonji for Hairs and Beauty

कलोंजी मध्ये अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म आहे. याशिवाय तुम्हाला कलोंजी चे तेल देखील काढता येते. या तेलाला उग्र दर्प असल्याने याचा वापर अँटी मायक्रोबियल म्हणून देखील केला जातो.

तुम्हाला तुमच्या केसांची गळती थांबवायची असेल आणि केस मजबूत बनवायचे असतील तर दररोज तुम्ही केसांच्या मुळांशी कलोंजी चे तेल लावू शकता. कलोंजीची पेस्ट बनवून देखील तुम्ही त्याचा वापर हा करू शकता. हेअर कंडिशनिंग मध्ये सध्या जे तेल वापरले जाते त्यात कलोंजी तेलाचा समावेश असतो. या तेलाने आपले केस मजबूत तर होताच परंतु त्यांची वाढ देखील चांगली होते.

डोक्यामध्ये कोंडा किंवा ऊवा यांची समस्या असेल तर कलोंजी तेलाचा वापर हा नक्की करावा. याने तुमच्या टाळूवरील सर्व मायक्रोबियल आजार दूर होऊ शकतात.

तुमच्या चेहऱ्यावर मुरूम किंवा डाग असतील तर लिंबाच्या रसासोबत या कलोंजी पेस्ट चा वापर करून चेहऱ्यावर लावले तर चेहरा नक्की उजळतो. तेलकट त्वचा किंवा कोरडी त्वचा ही समस्या अनेक लोकांना असते. अशा वेळी तुम्ही कलोंजी मिश्रित काही पेस्ट बनवून त्वचेवर लावू शकता. त्याने तुमच्या त्वचेला एक वेगळाच ग्लो येईल.

कलोंजीचे सेवन कोणी करू नये?

ज्या व्यक्तीला उष्णता सहन होत नाही किंवा पित्ताचा त्रास होत आहे त्यांनी कलोंजीचे सेवन करणे टाळावे. यामध्ये पोटाचा त्रास ज्यांना आहे त्यांनी तर यापासून थोडे दूरच राहावे. मग यात मूळव्याध, मासिक पाळीशी निगडित समस्या यांचा देखील समावेश होतो. अशा लोकांनी कलोंजी सेवन करू नये.

सांगायचे झालेच तर पोटाशी निगडित आजार असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. यात गर्भधारणा असलेल्या महिलांच्या विषयी अजून काही माहिती नसल्याने त्यांनी कलोंजी सेवन न करणे कधीही चांगले. ज्यांना ब्लड क्लोटिंग चा त्रास आहे किंवा तशी लक्षणे आहेत त्यांनी.

निष्कर्ष

कलोंजी म्हणजेच थोडक्यात काळी तीळ जी आपण केव्हा ना केव्हा जरूर वापरली असेल आणि लेख वाचल्यानंतर आपण याचा नक्कीच वापर वाढवणार असे वाटते.

वरील दिलेल्या उपयोग आणि फायेद्यानुसर तुम्ही कलोंजीला आपल्या आहारात शामिल करू शकता ज्याने काळी तीळ आपल्यासाठी गुणकारी साबित ठरेल.

तर आपल्याला Kalonji In Marathi हा लेख कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि कलोंजी म्हणजे काय किंवा याबद्दल आमच्याकडून काही माहिती सुटली असेल तर ते ही नक्कीच कमेंट च्या माध्यमातून कळवा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap