केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय: तुमचे केस जलद जाड होण्यासाठी 6 नैसर्गिक मार्ग

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे जे 100% फायदेमंद आणि आयुर्वेदिक आहेत.

आपल्या भारत देशात दाट आणि सुंदर केस हे आपल्या सौंदर्याचे प्रतिक मानले जाते. प्रत्येकाला मनातून वाटत असते की आपले केस हे दाट आणि काळे असावेत जेणेकरून आपण आणखी सुंदर दिसू शकू परंतु ही गोष्ट प्रत्येकाच्या नशिबात नसते. अनेकांचे केस हे विरळ होत जातात आणि पुरुषांना तर केस गळून टक्कल देखील पडते. महिलांमध्ये देखील आपल्याला केसगळती आणि विरळ केस या समस्या बघायला मिळतात. महिलांसाठी लांब, काळे आणि दाट निरोगी केस त्यांचे सौंदर्य आणखी खुलवून देत असतात.

तुम्ही एखाद्या समारंभात गेला तर तुम्ही ज्या व्यक्तीचे केस हे काळे, निरोगी आणि दाट असतात अशा व्यक्तीकडे लवकर आकर्षित होतात. तुम्हाला तुमचे सुंदर केस एक वेगळी ओळख देत असतात. आपल्याला असे निरोगी दाट केस हवे असतील तर मग त्या केसांची काळजी देखील घ्यायला हवी. ही काळजी आपण कशी घेतली पाहिजे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत.

आपल्या केसांची काळजी ही आपल्या बालपणापासूनच सुरू होत असते. आपली आई आपल्या टाळूची मालीश करून ही सुरुवात करते. यात आई आपल्या केसांची आणि त्यांच्या खाली असलेल्या त्वचेची म्हणजेच टाळूची आणि स्कल्पची काळजी घेत असते. लहानपणी आई आपल्या मुलांच्या केसांची योग्य ती काळजी घेत असते परंतु पुढे जाऊन मुले स्वतः केसांची काळजी घ्यायला लागतात आणि केसांची इथून वाट लागायला सुरुवात होते असे म्हणायला काही हरकत नाही. मुले केसांकडे दुर्लक्ष करायला लागतात आणि मग केसात कोंडा होणे आणि केस गळणे या समस्या सुरू होतात.

आपण जर बघितले तर काही लोक हे केसांना तेल लावत नाहीत आणि याचा परिणाम हा होतो की ते केस रुक्ष होतात. रुक्ष केसांचा परिणाम हा होतो की केसांची वाढ तर खुंटतेच परंतु केस कोरडे दिसतात. त्यांची चमक कमी व्हायला लागते. केसांच्या मुळांना आवश्यक असलेले तेल न मिळाल्याने आपले केस देखील खूप गळायला सुरुवात होते.

योग्य पोषण/आहार | Proper Nutrition

Proper Nutrition For Kes Dat Honyasathi Gharguti Upay

केसांसाठी नव्हे तर आपल्या संपूर्ण शरीर आणि त्याच्या प्रत्येक अंगासाठी योग्य पोषण गरजेचे आहे. शरीराला बाहेरून गोष्टी लावण्यापेक्षा आतून निरोगी ठेवावे ज्याने त्याचा फायदा आपल्या बाहेरील अंगांवर दिसतो.

तर आपण आपले केस निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी काय आहार घ्यावा आणि कसा घ्यावा ते पाहणार आहोत.

केस निरोगी ठेवण्यासाठी आहारात उच्च प्रोटीन, फॅट आणि व्हिटॅमिन असणे गरजेचे आहे. थोडक्यात पातळ आणि अस्वस्थ केस असणे अयोग्य पोषण असल्याचे लक्षणे आहे.

सॅल्मन नावाचा मासा असतो ज्यात ओमेगा थ्री आणि फॅट्टी एसिड चे प्रमाण जास्त असते ज्याने केस निरोगी राहतात आणि केस जाड होण्यास मदत होते.

बदाम, शेंगदाणे, अक्रोड आणि इतर स्त्रोत केसांसाठी खूप फायदेमंद ठरतात कारण ह्यांत अधिक प्रोटीन असते.

हिरवा भाजीपाला आणि बिया केसांसाठी खूप उपयोगी असतात कारण त्यात प्रथिने असतात जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

बाजारातील शाम्पू/ तेल किती योग्य?

Shampoo or Oil For Kes Dat Honyasathi Gharguti Upay

केस जेव्हा आपल्याला चांगले हवे असतात तेव्हा आलन आपल्या मित्रांचा सल्ला हा घेत असतो. किंवा आपल्यासमोर टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर अनेक तेलाच्या शाम्पूच्या जाहिराती या येत असतात. आता हे सर्व शाम्पू अनेक केमिकल ववापरून बनवलेले असतात. आपण हे शाम्पू किंवा तेल काहीही विचार न करता आपल्या केसांना लावतो आणि चूक करून बसतो. यामधील केमिकल हे आपल्या केसांना कुठल्या तरी मार्गाने हानिकारक असतात. जेव्हा आपण हे तेल किंवा शाम्पू वापरतो त्यानंतर तुम्हाला जाणवेल की केसांची मुळांची पकड ही कमी होत जाते. परिणाम असा होतो की केस गळायला सुरुवात होते आणि ते थांबत नाही.

यामुळे बाजारातील शाम्पू आणि इतर तेल न वापरणे कधीही चांगले. आपल्या घरात आणि आयुर्वेदिक मार्गाने असे काही पदार्थ आहेत ज्याचा वापर आपण केला तर आपले केस हे गळणे तर कमी होईलच परंतु दाट आणि निरोगी केस बनतील.

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedies For Thickening H In Marathi

कोरफडीचा ज्यूस / तेल (Aloe Vera Gel)

Aloe Vera Juice For Kes Dat Honyasathi Gharguti Upay

कोरफडीचे सौंदर्य प्रसाधनांमध्ये खूप जास्त महत्व आहे. आपण कोणतेही सौंदर्य प्रसाधन बघितले तर त्याच्या कंटेंट मध्ये आपल्याला aloe vera नक्कीच आढळून येतो. केसांना बाहेरून जितके सुंदर बनवायचे असते तितकेच ते आतून देखील सुंदर असायला हवेत. आपण दररोज सकाळी जर उपाशीपोटी कोरफडीचा गर खाल्ला तर आपल्या पोटासाठी ते खूप गुणकारी औषध आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. परंतु याचा फायदा आपल्या केसांना आतून बळकटी द्यायला देखील होतो. यामुळे नवीन केस उगण्याची शक्यता तर असतेच परंतु जे आधीचे केस आहेत त्यांना अधिक बळकटी मिळाल्याने त्यांचे गळणे देखील कमी होते.

कोरफडीचा गर आपण बाह्य रूपाने देखील केसांना लावू शकतो. आता त्याआधी वर सांगितलेल्या मुद्द्यात तो गर खायचा कसा तर तुम्ही कोरफडीचा गर व्यवस्थित काढून तो एखाद्या ज्यूस मध्ये मिक्स करून घेऊ शकता. केसांना बाहेरून कोरफड लावणे देखील खूप गुणकारी औषध आहे. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही कोरफडीचा गर काढून त्याला मिक्सर मधून अगदी बारीक करून त्याचा लेप केसांच्या मुळांपर्यंत जाईल असा लावू शकता. अर्धा ते एक तास तुम्ही हा जेल आपल्या केसांवर लावल्यानंतर पुढे एखाद्या हर्बल शाम्पूच्या माध्यमातून त्याला धुवून काढा. या उपायांचा फायदा असा होईल की तुमचे केस गळणे तर थांबेलच कारण केसांना मुळांपासून मजबुती मिळालेली असेल आणि नवीन केस उगवायला देखील सुरुवात होईल.

कोरफड ही केसांसाठी इतकी गुणकारी आहे की तुम्हाला असलेले केसांचे सर्व प्रॉब्लेम यामुळे संपतील. केस अगदी निरोगी, चमकदार आणि काळेभोर होतील.

कांद्याचा रस (Onion Juice)

Onion juice for Kes Dat Honyasathi Gharguti Upay

घरी तुम्ही कांद्याचा रस काढू शकता आणि हेच तेल किंवा रस जर तुम्ही केसांवर लावला तर केसगळती ही थांबू शकते. केसगळती थांबली की केस घनदाट बनण्यासाठी आपोआप मदत होते. कांद्याचे तेल काढण्यासाठी एक किंवा दोन कांदे घेऊन त्यांना बारीक कापावे. हे बारीक केलेले कांदे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावेत. जो काही गर असेल त्याला एखाद्या गाळणीद्वारे गळून घेऊन त्या रसाचा केसांसाठी वापर करावा.

केसांना हा रस लावण्याच्या आधी धुवून घ्यावेत. एकदा केस धुतले की कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने तुम्ही हे तेल केसांच्या मुळांशी लावू शकता. त्यानंतर काही वेळ हाताच्या साहायाने तुम्ही केसांची मालिश देखील करू शकता. साधारण अर्धा ते एक तास हे तेल केसांवर ठेवल्यानंतर सध्या पाण्याने तुम्ही डोकं धुवून घेतलं पाहिजे.

कांद्याच्या तेलाने केसांना मजबूत पणा येतो कारण यात सल्फर असते. हेच सल्फर केसांना मुळांपासून मजबूत बनवते. आपल्या डोक्यावर बऱ्याच ठिकाणी बाल्ड पॅचेस पडलेले असतात. अशा ठिकाणी देखील केस या तेलाच्या वापराने येऊ शकतात.

मेथीचे दाणे

Fenugreek For Kes Dat Honyasathi Gharguti Upay

मेथीच्या दाण्यांनी देखील आपले केस कमी गळतात. रात्रभर दोन चमचे मेथीचे दाणे म्हणजे मेथीचे बी आपण पाण्यात भिजत ठेवायचे. सकाळी हे रात्रभर भिजलेले मेथीचे बी मिक्सर मध्ये दोन चमचे दही, 2 चमचे मध असेल तर कोरफडीचा गर आणि खोबरे तेल सोबत मिक्स करून घ्यावे. आता हा तुमचा स्वतःचा हेअर पॅक तयार झाला आहे.

याला तुमच्या केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत नीट लावा. आणि थोड्यावेळाने हा धुवून टाका. मेथीमध्ये असे गुणधर्म असतात की जेणेकरून तुमचे केस हे दुभागात नाहीत आणि मुळांना मजबुती मिळून केस भक्कम होतात. तुमच्या केसांना चमक नसेल तर तुम्ही हे हेअर पॅक नक्की लावले पाहिजे कारण याने केसांना एक वेगळीच शाईन येते.

मेहंदी

Mehandi For Kes Dat Honyasathi Gharguti Upay

आता ही मेहंदी म्हणजे आपण डोक्याला लावतो तो रंग नव्हे. मेहंदी हे एक झाड असते. त्या झाडापासूनच आधी आपण हाताला लावतो ती मेहंदी बनवली जात असे परंतु आता आपण हाताला लावायला वापरतो ती मेहंदी केमिकल मिश्रित असते. त्यामुळे ही मेहंदी डोक्याला लावणे कधीही चुकीचे आहे. जर तुम्हाला प्राकृतिक आणि नैसर्गिक अशी मेहंदी मिळाली तर ती डोक्याला लावणे कधीही चांगलेच असते.

मेहंदीची पाने तोडून आणल्यानंतर किंवा तुम्हाला मेहंदी मिळाली असे तर ती आणल्यानंतर ती भिजवत ठेवावी. त्यात तुम्ही कोफी पावडर, आवळा पावडर, अर्धा लिंबू हे सर्व एकत्र ठेवू शकता. या सर्व गोष्टी जवळपास 7 ते 8 तास भिजत ठेवाव्या. सकाळी केस धुवून ते थोडे सुकवावेत. एकदा ते थोडेसे ओले असताना केसांवर आपण बनवलेला हा मेहंदीचा पॅक लावावा. थोडे तास हा पॅक केसांवर ठेवून नंतर केस पुन्हा धुवून काढावेत.

महिन्यातून एकदा तरी आपण हा पॅक आपल्या केसांना लावला पाहिजे. जेव्हा आपण हा पॅक केसांवर वापरायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला फरक नक्कीच जाणवेल. याने आपल्या केसांची गळती कमी होते आणि केसांच्या मुळांशी असलेली त्वचा देखील निरोगी रायला मदत मिळते.

जास्वंद पॅक

Hibiscus For Kes Dat Honyasathi Gharguti Upay

जास्वंदाची फुले आणि पाने आपल्या केसांसाठी उपयुक्त असतात. जास्वंदाची फुले आणि पाने एकत्र करून त्यांच्यासोबत एक चमचा एरंडेल तेल, खोबरे तेल आणि कोरफडीचा गर जर एकत्र करून मिक्सर मधून वाटून घेऊन केसांना लावला तर केस आणखी चमकदार आणि मजबूत बनतात. हा लेप केसांवर अर्धा तास ठेवून त्याला सध्या पाण्याने धुवून घ्यावे.

याशिवाय कढीपत्ता, आवळा यासारख्या पदार्थांमध्ये देखील आपल्या केसांचे आरोग्य चांगले ठेवण्याची क्षमता आहे. आपण त्यांचे देखील लेप बनवून केसांना लावू शकतो. डोक्याला लावायचे खोबरे तेल आपण गरम म्हणजेच कोमट करून दररोज रात्री झोपताना त्याने केसांची मसाज करू शकता. याने आपल्या केसांना आणि डोक्याला आराम मिळतो व केस गळण्याचे प्रमाण हे कमी होते.

आवळा

Amla For Kes Dat Honyasathi Gharguti Upay

आपण सतत ऐकलं असेल की आवळा आपल्या केसांसाठी फायदेमंद असतो परंतु का असतो हे आपण जाणून घेवूया. तर आवळा हा अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी ने भरपूर असतो ज्याने केस वाढतात आणि मजबूत होतात.

आवळाचा केसांसाठी कसा वापर करावा ज्याने केस दाट आणि लांब होतील. 1 चमचा आवळा पावडर आणि 1 चमचा लिंबूचा रस घेऊन चांगले मिश्रण करा.

हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर केसांना आणि केसांच्या मुळांना लावा. संपूर्ण लावल्या नंतर त्या पॅकचा वाळण्यापर्यंत वाट पहा. कोरडे झाल्यावर केस थंड पाण्याने धुवून घ्या.

निष्कर्ष

केस हे मानवाचे सुंदर आणि आकर्षक अवयव आहे. केसांना निरोगी ठेवण्यासाठी व्यक्ती काहीही करतो परंतु फक्त केसांना सावरून काही होती नाही तर त्यासाठी आहार आणि निगा राखणे आवश्यक आहे.

आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय बघितले आहेत. आपल्याला घनदाट, निरोगी आणि काळे केस हवे असतील तर आपण नैसर्गिक रित्या त्यांचे पोषण कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही केमिकल असलेले शाम्पू किंवा तेल वापरत असाल तर मग तुमच्या केसांची एक समस्याच कमी होईल परंतु इतर समस्या वाढतील. तुम्हाला केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय हा लेख कसा वाटला आणि तुम्हाला याचा किती फायदा झाला हे नक्की कमेंट मध्ये कळवा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

1 thought on “केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय: तुमचे केस जलद जाड होण्यासाठी 6 नैसर्गिक मार्ग”

  1. Khup chan upay tumhi sangitle natural padhtine kes kshe changle hotil yabddl tumhi brech kahi sangitl khup khup dhnyvad🙏🙏

    Reply

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap