जगातील पहिला भारतीय Customizable स्मार्टफोन Lava MyZ | World’s First Customisable Smartphone In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्यासाठी घेऊन आलोय जगातील पहिला Customizable स्मार्टफोन तो ही भारतीय म्हणजेच lava MyZ.

आजकाल मार्केटमध्ये खूप साऱ्या स्मार्टफोन्स कंपनी आहेत ज्या नवीन नवीन वैशिष्टे घेऊन येतात जसे Mi, samsung, vivo, oppo, realme, lava, micromax, sony, motorola, आणि अजून भरपूर काही. परंतु आपल्याला ह्या स्मार्टफोन्स मध्ये खूप साऱ्या गोष्टी तर मिळतात परंतु एकाधी गोष्टी अश्या असतात ज्यात तुम्हाला वाटते की याची कमी आहे.

तर काळजी करण्याचे जराही काम नाही कारण आपल्या भारतातील स्मार्टफोन कंपनी म्हणजेच Lava आपल्यासाठी Customizable Smartphone घेऊन आली आहे ज्याने आपल्याला हवे तसे customize करु थोडक्यात Ram, Storage, Camera, color आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता.

आपण हा स्मार्टफोन आपल्या इच्छेनुसार customize करू शकतात.

तर जाणून घेऊ ह्या भारतीय Customizable स्मार्टफोन बद्दल

Lava MyZ In Marathi

आपल्याला माहितीच असेल Lava ही एक भारतीय कंपनी आहे, जी एक स्मार्टफोन बनवणारी कंपनी आहे आणि ती खूप सारे स्मार्टफोन बनवते.

आता Lava कंपनी ने सानुकुल स्मार्टफोन काढला आहे म्हणजेच Customizable स्मार्टफोन जो आपण आपल्या इच्छेनुसार बनवू शकतात.

ह्या स्मार्टफोनची खास गोष्ट ही आहे की जर आपण कमी ram, stoarage किंवा camera cuatomize करून घेतला असेल आणि जर आपल्याला नंतर ते specifications बदलवू शकता, उदाहरणार्थ, जर आपण 4 gb ram, 64 gb storage आणि 13 mp camera घेतला आणि आपल्याला नंतर भविष्यात त्याच्या मध्ये बदल करायचा असेल तर Lava च्या स्टोअर मध्ये जाऊन आपण त्याला upgrade करु शकता. परंतु आपण हा स्मार्टफोन Lava च्या official website वरच बुकिंग करा, ती लिंक आम्ही खाली दिली आहे.

Lava MyZ स्मार्टफोन बुकिंग केल्यानंतर 10 दिवसांत घरपोच येतो.

खरेदी कसा कराल तर मी ह्या साठी खाली लिंक दिली आहे तिच्यावर क्लिक करून खाली दिलेल्या पद्धतीने customize करा.

लिंक : https://myz.lavamobiles.com/

Customizable पार्टस

Rear Camera (मागचा कॅमेरा) :13+2 MP, 13+5+2 MP
Front Camera (समोरचा कॅमेरा) :8 MP, 16 MP
RAM (रॅम) :2 GB, 3 GB, 4 GB, 6GB
ROM (रॉम्) :32 GB, 64 GB, 128 GB
Color (रंग) :Red (लाल), Blue (निळा)

Customize मध्ये एवढे काही खास नाही आहे, पण हा ठीक आहे.

Specifications (वैशिष्ट्य)

Display (डिस्प्ले) :6.5 Inch, HD+ IPS Display, Corning Gorilla Glass 3
Processor (प्रोसेसर) :Mediatek Helio G35, 2.3 GHz Octa core processor
OS (ओएस) :Android 10
Battery (बॅटरी) :5000 mAh, Type C
Connectivity (कनेक्टिविटी) :3G, 4G
SIM (सिम) :Dual SIM ( 4G + 4G)
Expandable Memory (एक्सपांडेबल मेमोरी) :512 GB
Sensors (सेन्सर) :Face Unlock, Fingerprint Sensor, Accelerometer and Proximity
Weight (वजन) :190g
Warranty (वॉरांटी) :1 Year Handset, 6 months accesories

असा हा स्मार्टफोन आहे आणि आपण हा आपल्या आवडीनुसार customize करू शकता. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात खूप काही शक्य आहे आणि आपण आजपर्यंत फक्त फिक्स वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन बागितलेले असतील परंतु हा जगातील एकमेव Customizable स्मार्टफोन आहे.

थोडक्यात म्हणावे तर तंत्रज्ञान किती पुढे चाललंय कारण आपल्या इच्छेनुसार आपल्याला स्मार्टफोन्स तयार करून मिळेल म्हणजे नवीनच आहे ना. आणि मला असे वाटते की पुढे पुढे इतर स्मार्टफोन्स कंपन्या देखील Customizable स्मार्टफोन्स काढतील आणि जर असे झाले तर खूपच उत्तम ठरेल. मार्केट मधील मुख्य कंपन्या जसे samsung, MI, Vivo, Oppo, Sony, Realme आणि इतर कंपन्यांनी सुद्धा असे केले तर छान होईल परंतु आता बघुत ते केव्हा होते.

तर मंडळी कशी वाटली आपली ही नवीन लेटेस्ट बातमी किंवा माहिती मला कॉमेंट्स करून नक्की कळवा. आणि आपल्याला ह्या स्मार्टफोन मध्ये अजून काय हवे होते तेही मला सांगा. त्याचबरोबर आपली आवडती स्मार्टफोन कंपनी सांगा किंवा कोणत्या कंपनीने असे करायला हवे तेही सांगा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap