माझे आजोबा मराठी निबंध | Majhe Ajoba Marathi Nibandh

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला माझे आजोबा मराठी निबंध सांगणार आहे. हा निबंध माझ्या आजोबांवर आहे म्हणजेच माझ्या स्वतःच्या शब्दात आहे.

हा निबंध नक्कीच आपल्याला पैकी चे पैकी गुण मिळवून देईल त्यामुळे ह्याला काळजीपूर्वक वाचा आणि होऊ शकेल तर काही तुमचे शब्द यात वापरले तरी चालतील.

खालील निबंध कोणकोणत्या विषयांवर वापरू शकता

माझे आजोबा – Majhe Ajoba

माझे प्रिय आजोबा – Majhe Priy Ajoba

आजोबाचे मनोगत – Ajoba Che Manogat

माझे बाबा निबंध – Majhe Baba Nibandh

आमच्या घरातील वृद्ध व्यक्ती

वृद्ध व्यक्ती – Vrudh Vyakti

वृद्ध आजोबा – Vrudh Ajoba

माझे वृद्ध आजोबा – Majhe Vrudh Ajoba

माझे आजोबा मराठी निबंध | Majhe Ajoba Marathi Nibandh

आमच्या घरातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणजे आमचे आजोबा ते घरात असले की आम्हाला असे वाटते की जसे आमच्या घरात एक खंबीर नेतृत्व असलेले व्यक्ती आहेत ते जणू आमचे सुपरहिरो च आहेत.

आमचे आजोबा म्हणजे नाना बरं का! आम्ही सर्वजण आमच्या आजोबांना प्रेमाने नाना असे म्हणतो. आणि आम्हीच काय तर सर्व गावातील, गल्लीतील लोकच त्यांना नाना म्हणून हाक मारतात त्यामुळे आम्हाला देखील लहानपणापासून तीच सवय आहे.

आजोबा बद्दल जेवढे सांगावे तेवढे अपुरेच आहे कारण त्यांच्या एक एक प्रेमळ गोष्टी सांगत तर वाहीचे पान देखील अपुरे पडेल.

आजोबांचा पोशाख म्हणजे अंगावर बंडी(शर्ट) आणि खाली धोतर असा त्यांचा रुबाबदार आणि शेतकरी असल्याचा

मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून नाना माझ्या सोबत आहेत जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा ते खूप खुश होते की त्यांना नातू झाला आणि त्यांनी जवळच्या सर्व नातेवाईकांना पेडा वाटून त्यांचे तोंड गोड केले.

लहानपणीची गोष्ट केली तर मी त्यांच्या शिवाय रहायचोच नाही सतत त्यांच्या मागे मागे फिरायचो.

मला अजुनही आठवतंय ते मला आपल्या खांद्यावर बसवून फिरायचे आणि मला छान छान गोष्टी सांगायचे. माझे आजोबा खेड्या गावात राहत असल्यामुळे ते खूप कष्टाळू आहेत आणि त्यांचे एक शेत देखील आहे. लहानपणी तेल मला शेतात घेऊन जायचे आणि मला तेव्हा शेतात जायला खूप मज्जा यायची कारण आमच्याकडे बैलगाडी असल्यामुळे मला त्यात बसणे मस्त वाटायचे. ते सकाळी बैलांना गाड्याशी जुपायचे आणि मग आम्ही शेतात जायचो.

ती शेतातील मज्जा म्हणजे वेगळीच होती सकाळी गेल्यावर शेतात काम करणे दुपारी 1 – 2 वाजता जेवण करणे मग पुन्हा कामाला लागणे आणि संध्याकाळी घरी येणे. पण शेतातील तो वेळ केव्हा निघून जायचा ते समजायचच नाही कारण कामासोबत मज्जा मस्ती करत तो वेळ लगेच निघून जायचा. तसे तर माझे आजोबा मला शेतीचे कामे नाही लावायचे पण मी स्वतःहूनच आजोबांना शेतात मदत करायचो.

रात्री झोपताना आजी किंवा आजोबा एक छानशी गोष्ट सांगायचे. नाहीतर आजोबा गावातील छानशे आणि मनोरंजक किस्से सांगायचे त्या किस्स्यांमधून काहीतरी शिकायला मिळायचे.

आमच्या शेताजवळ गोड गोड फळांची झाडे आहेत तेथे मला बाबा नेहमी घेऊन जात आणि बोरं, पेरू, आवळे, चिंचा असे फळ तोडायचे आणि मला खायला द्यायचे. तेथे एक आंब्याचे देखील मोठे झाड आहे आणि उन्हाळ्यात तेथे आंब्याच्या ओढ मध्ये मी आजोबांकडे हट्ट करायचो. माझे आजोबा एवढे भक्कम होते की ते त्या झाडावर चढून आंबे तोडायचे आणि मी खाली पकडायचो.

एकदा शेतात आम्ही चटणी भाकर बांधून घेऊन गेलो होतो तेव्हा मी ते खाण्यास मनाई केली आणि खिचडी खाण्याचा हट्ट केला. तेव्हा सर्वांनी मला समजावलं की आता जे आहे ते खाऊन घे घरी गेल्यावर तुला खिचडी देऊ पण मी लहान असल्यामुळे मी हट्टच पकडला मग काय आजोबांना राग आला आणि त्यांनी त्यांची चामडी चप्पल काढली आणि मला मारून फेकली तेव्हा सर्वजण शांत त्याचसोबत मीही शांत आणि गपगुमान चटणी भाकर खाल्ली. तेव्हा आमची गरीबाची परिस्थिती असल्यामुळे आम्ही सामान्य जीवन जगले आहे परंतु लहानपणी आपल्याला त्याची समज नसते. जसा मी थोडा मोठा झालो तेव्हा मला समजले की जे आजोबांनी केले ते माझ्या योग्यासाठीच केले होते कारण आज त्यांच्यामुळेच मी ताटामध्ये जे असले ते बिना नखरे करता खातो. तेव्हा जेवण झाल्यानंतर आजोबांनी मला जवळ घेऊन समजावले देखील होते आणि एक बोध दिला होता की अन्नाला कधी पाठ दाखवू नये कधीही अन्नाचा अपमान करू नये.

नाना मला अभ्यासात देखील खूप मदत करायचे जर मला निबंध, गोष्टी लिहिण्याचा अभ्यास सांगितला असेल तर मी सर्वात आधी माझ्या आजोबांकडे जायचो. त्यांच्याकडे जणू गोष्टीचा बटवा असायचा जसं आजीकडे असतो.

आजोबा घरातील देखील कामे करतात जर घरात काही कमी पडले तर ते लगेच बाजारात जाऊन ती वस्तू आणतात.

त्यांना जेवढे शेतीतील ज्ञान आहे तेवढेच त्यांना पुस्तकी ज्ञान देखील आहे. पंचांग तर त्यांनी सर्व चाळून काढले आहे गावातील खूप लोक भविष्य बघण्यास त्यांच्याकडे येतात. त्याचबरोबर आजोबांकडे धार्मिक व शूरवीर, पराक्रमी पुस्तके देखील आहेत जसे महाभारत, रामायण, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज, भगवत गीता आणि इतर बरेच काही. मला ते यांच्यातील देखील खुपसार्या गोष्टी सांगतात आणि शेवट एक सुंदरसा बोध देखील देतात.

त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची गोष्ट करावी तर ते खूप प्रामाणिक आहेत, दयाळू आहेत, प्रेमळ आहेत, तंदुरुस्त आहेत आणि महत्वाचे म्हणजे खूप कष्टाळू आहेत.

प्रामाणिकपणा म्हणजे काय असतो हे खरंच त्यांच्याकडूनच शिकावे जर कोणाची दहाची नोट देखील पडली तरी ते त्याला परत करत.

आमच्या घरात आजोबा आहेत म्हणून सतत माणसांची एवजाव चालू असते कारण ते सर्वांच्या मदतीला धाऊन येतात. गावातील काहीही कार्यक्रम असेल, मरणधरण असेल किंवा कोणाचे लग्न असेल तर ते तिथे नेहमी पुढे असतात. ते वयाने आणि बुध्दीने मोठे असल्यामुळे सर्वजण त्यांचे सल्ले घेतात. आणि ते सर्वांना त्यांच्याकडून जेवढी होईल तेवढी मदत करतात.

गावातील सर्वजण मला नातू नातू म्हणून हाक मारतात कारण आजोबांचा नातू म्हणून सर्व मोठे व्यक्ती नातू म्हणतात.

माझे आजोबा जेव्हा बाजारात जातात तेव्हा मी त्यांची घरी येण्याची आतुरतेने वाट बघत असतो कारण मी त्यांना पहिलेच सांगितले असते की नाना घरी येताना मला खाऊ घेऊन या. आणि जेव्हा आजोबा घरी येतात तेव्हा मी आजोबांच्या आजुबाजूस फिरायचो आणि आजोबा शेवटी हळूच मला खाऊ दायचे.

अशी माझे आजोबा आणि माझी जोडी आहे.

माझे आजोबा निबंधातले महत्वाचे मुद्दे

  • थोर आणि वृद्ध
  • घरातील मोठे व्यक्ती
  • प्रामाणिक
  • कष्टाळू
  • शेतकरी
  • मदत करणारे
  • बुध्दिमान

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap