माझे बाबा मराठी निबंध | Majhe Baba Marathi Nibandh | My Father Essay In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला माझे बाबा मराठी निबंध सविस्तर सांगणार आहे. हा निबंध लिहून नक्कीच आपल्याला पैकी चे पैकी गुण मिळतील.

👉नक्की वाचा: माझी आई निबंध

👉नक्की वाचा: माझे आजोबा निबंध

खाली दिलेला माझे बाबांवर निबंध माझ्या मनातून लिहिलेला आहे त्यात तुम्ही तुमचे स्वतःचे मत देखील टाकू शकता.

माझे बाबा मराठी निबंध | Majhe Baba Marathi Nibandh

जसा शिल्पकार दगडाला आकार देऊन सुंदर मूर्ती बनवतो तसेच बाबा मुलांच्या जीवनाचे शिल्पकार असतात म्हणजेच ते मुलांच्या जीवनाला आकार देतात, त्याला घडवतात.

बाबा, वडील, पप्पा, डॅडी अश्या काही नावांनी ओळखले जाणारे व्यक्ती म्हणजे बाबा होय.

आपल्या आयुष्यात आई आणि बाबा दोघांचे मौल्यवान आणि महत्वाचे स्थान असते. बघितलं तर आईवर खुपसाऱ्या कविता, कथा, पाठ, लेख बघण्यासाठी मिळतात पण बाबांवर कदाचितच बघायला मिळतात.

तशीच एक दमलेल्या बापाची ही कहाणी तुला हे गाणं किंवा कविता खूप प्रसिद्ध झाली होती, तिचे खूप चाहते आहेत.

माझ्या यशाच्या मागे माझ्या बाबांचा मौल्याचा वाटा आहे कारण त्यांनी मला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर माझी मदत केली आहे. अभ्यासाच्या गोष्टीत माझे सर्व श्रेय फक्त माझ्या बाबा आणि आईंना जाते. त्यांचे संस्कार एवढे चांगले आहेत की सर्वजण नाव काढतात आणि तेच संस्कार आमच्या संपूर्ण कुटुंबावर झालेला आहे.

लहापणापासून ते आतापर्यंत बाबा आम्हाला त्यांच्या कष्टाची गोष्ट सांगतात त्यांनी कसे हाल काढले आहेत तेही सांगतात. थोडक्यात सांगायचे म्हटले तर बाबा सांगतात जेव्हा मी लहान होतो तेव्हा एका खेड्या गावात राहायचो आमची खूप गरीबाची परिस्थिती असल्यामुळे बाबांनी मला बोर्डिंग मध्ये टाकले होते. तेथे सर्व विद्यार्थी आपापली कामे करतात जसे कपडे धुणे आणि बरेच काही कारण तेथे आपली काळजी घ्यायला आपले आई वडील नसतात. त्यावेळेस बाबांचा पोशाख म्हणजे ठिगळ लावलेली छोटी चड्डी आणि वरती एक शर्ट. त्यावेळेस बाबा तेथे शिकायचेही आणि रिकामे वेळेत काही काम करायचे जसे अगरबत्ती विकणे, अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी विकणे. त्यांवर वडिलांना काही पैसे मिळायचे त्याच्यातून ही काही घरी आई वडिलांना द्यायचे.

काहीवेळेस तर इतरांच्या घरी भांडी, कपडे धुण्यास देखील जायचे आणि लोकांची गुरे देखील चरायचे तेव्हा त्यांना कुठे तरी अर्धी – एक भाकर भेटायची.

माझ्या बाबांचे बाबा म्हणजेच माझे आजोबा माझ्या बाबांना बोर्डिंग मध्ये भेटण्यास जाण्यासाठी पायी निघायचे कारण गाडीवर येण्यासाठी तेवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते.

त्यांनतर वडील खेड्या गावातून शहरात आले कारण पुढे काहीतरी बनायचे होते ज्याने आपले कुटुंब चांगले राहतील. जे हाल आपण भोगले ते आपल्या मुलांनी भोगायला नको असा त्यांचा विचार होता. जेव्हा वडील शहरात होते तेव्हा ते बसस्थानकावर झोपायचे आणि दिवसभर अगरबत्ती विकायचे. त्या शहरात आमचे एक नातेवाईक राहायचे जेव्हा बाबा त्यांना भेटण्यास म्हणून गेले पण त्यांनी बाबांना एक दिवा ही ठेवले नाही कारण तो वडिलांचा पोशाख चड्डीवर ठिगळ आणि मळलेले शर्ट पाहून त्यांनी हुबही नाही केलं.

तिथून बाबा निघाल्यावर त्यांनी खूप कष्ट केले आणि एका शाळेत शिक्षक म्हणून लागले परंतु तेथे बाबांनी काही वर्ष फुकट काम केले तेथे बाबांना फक्त जेवण दिले जायचे.

त्यावेळेस बाबा काही बाहेरील छोटे मोठे कामे देखील करत. त्यासोबत शिक्षण ही पूर्ण करत होते असे परीक्षा देत ते एका चांगल्या नोकरीस लागले. आज आमचे दोन मजली घर आहे, दोन दुचाकी वाहन आहेत. ज्या नातेवाईकांनी वडिलांना उभ ही केले नव्हते त्यांना आज त्यांचा स्वतःचा मुलगा देखील होत नाही आणि आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण येते परंतु वडील ते मागचं सर्व विसरून त्यांची मदत करतात. अशी माझ्या बाबांची कहाणी मी काही कमी शब्दात सांगायचा प्रयत्न केला आहे.

ते खूप काटकसरी देखील आहेत जर ते एखादी वस्तू घ्यायला जातात तर ते चार ते पाच दुकाने फिरतात मग ती वस्तू घेतात आणि त्यांच्यामुळे आम्हालाही काटकसर करण्याची सवय लागली आहे.

लहानपापासून माझ्या बाबांचा मला खूप पाठिंबा आहे ते माझ्या जीवनात माझे सुपरहिरो आहेत. ते मला अभ्यासात खूप मदत करतात आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्यात ते मला भाग घेण्यास सांगत आणि मार्गदर्शन ही करतात. त्यांचे म्हणणे आहे की स्पर्धा परीक्षा दिल्याने साहस वाढतो आणि अनुभव येतो ज्यामुळे आपल्याला पुढे कोणत्याही परीक्षेत अडथळा येत नाही.

बाबा जेवढे कठोर आहेत तेवढेच ते मनाने प्रेमळ आणि दयाळू आहेत. जेव्हा मी चुकतो तेव्हा ते मला रागवतात पण तो राग फक्त काहीच काळ असतो त्यानंतर ते मला पुन्हा एकदा प्रेमाने बसून सांगतात की तू इथे चुकलास आणि पुढे ती चूक होऊ नये याबद्दल सल्ला ही देतात.

दया नावाचा शब्द त्यांच्या शब्दकोश मध्ये जणू पहिल्याच पानावर आहे कारण त्यांना लगेच गोरगरिबांवर दया येते ते नेहमी मदतीसाठी पुढे असतात. मला आठवतंय एकदा एक व्यक्ती माझ्या बाबांकडून पैसे मागत होता त्याला बाबांनी विचारले की तुला पैसे का लागतंय तर तो म्हटला मला भूक लागली आहे. मग बाबा म्हटले चल मी तुला पैसे न देता प्रत्यक्ष जेवणच देतो पण तो व्यक्ती नाही म्हटला आणि पैश्यांची मागणी करत तिथून निघून गेला. मी बाबांना विचारले की बाबा त्या व्यक्तीला पैसे देऊन टाकायचे ना, तेव्हा बाबा म्हटले त्याला खरतर आयते पैशांची सवय झालिये तो एवढा भरभक्कम आहे त्याला सहजतेने 100 – 200 रोजाने काम भेटेल. आणि मी त्याला 5 – 10 रुपयांहून अधिक जेवण देत होतो जस त्याने म्हटले मी पैसे जेवणासाठी गोळा करतोय तर तो नाही म्हटला म्हणजेच त्यांनी त्या पैशांचा दुरुपयोग केला असता. जर आपल्याला खरंच वाटत असेल की समोरच्याला पैशांची गरज असेल तर त्याला नक्की मदत करायला हवी.

घरात प्रत्येक जन ज्याची त्याची वाट्याची कामे करतात तसच बाबांनी मला त्यांच्या कपड्यांना इस्त्री करण्याचे, रोज सकाळी त्यांची गाडी पुसण्याचे आणि इतर छोटे मोठे कामे वाटून दिली आहेत.

आजकालच्या जगात कुणीही कुणाला आपल्यापेक्षा पुढे जाऊ देण्याचा विचार करत नाही परंतु वडील एकमेव असे व्यक्ती आहेत ते त्यांचे पोट कापून मुलाला शिकवतात आणि त्याला आपल्यापेक्षा उच्च स्थानावर पाठवतात.

शिक्षणाच्या गोष्टीत ते कधीही काटकसर करत नाहीत ते नेहमी माझ्या अभ्यासबद्दल काळजीपूर्वक असतात. मी शाळेतून आलो का लगेच ते मला शाळेत काय शिकवलं ते विचारता, गृहपाठ काय दिलाय ते विचारतात. जर मला शिक्षणाबद्दल काही गोष्ट लागणार आहे जसे की काही पुस्तकं, वही, पेन, इतर काही ते लगेच ते मला आणून देतात, त्याबद्दल ते खूप सतर्क असतात.

सणाच्या दिवशी बाबा भले जुने कपडे घालतील पण आम्हाला नवे कपडे घेऊन देतात त्यामुळे परिस्थितीची जाणीव ठेऊन आम्हीही कधी जास्त महागडे कपडे मागत नाहीत.

असे माझे बाबा आहेत जे मला खूप प्रेम करतात आणि मीही त्यांच्यावर खूप प्रेम करतो.

मला खंत वाटते की का काही लोकं आपल्या आई वडिलांना वागत नाहीत आणि वृध्दाश्रमात टाकतात. बाप म्हणजे तोच व्यक्ती आहे ज्यामुळे तुम्ही इथवर आहात, त्यांनी त्यांचे स्वतःचे हौसी पूर्ण न करता तुमच्या हौसि पूर्ण केल्या, भले ते स्वतः पायी चालतील पण तुम्हाला सायकल घेऊन दिली, भले ते फाटलेले जूनेपुराने कपडे घालतील पण तुम्हाला नवीन कपडे घेऊन दिले आणि आज त्याच व्यक्तीला तुम्ही एका चिरलेल्या ढोरासारखे सोडून देतात.

जर आपल्या पाठीशी आपले वडील उभे असतील तर आपल्याला कसलीच भीती वाटत नाही.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap