माझी आई मराठी निबंध | Majhi Aai Essay In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला माझी आई मराठी निबंध सांगणार आहे. ह्या निबांधने आपल्याला नक्कीच पैके चे पैकी गुण मिळतील याची मी खात्री देतो.

जेव्हा आपण 1 ते 10वी च्या वर्गात शिकत असतो तेव्हा माझी आई वर मराठी निबंध नक्की विचारला जातो. तेव्हा आपल्याला नक्कीच ताण येत असेल की कसकाय सर्वांपेक्षा उत्तम निबंध लिहायचा. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी असाच उत्तम आई वर निबंध आणला आहे तर पूर्ण वाचायला विसरू नका.

👉नक्की वाचा: हृदयस्पर्शी माातृदीन भाषण

खालील निबंध वेगवेगळ्या शब्दांत दिलेले आहेत. जेवढी तुम्हाला शब्दांची लांबी हवी असेल त्या प्रकारे निबंध निवडू शकता.

माझी आई मराठी निबंध १०० शब्दात – Majhi Aai Marathi Nibandh 100 Words

“आई” आई म्हणजे काय तुम्हाला माहितीये? नाही! तर मग मी सांगतो, आई शब्दाचा अर्थ म्हणजे आ म्हणजे आई आणि ई म्हणजे ईश्र्वर.

माझी आई मला खूप आवडते आणि ती मला खूप जीव लावते. खरं सांगायचं म्हटल तर माझी आई माझ्या जीवनात एक मुख्य भूमिका निभावते.

आजकालच्या युवांना प्रेम काय असतं हे माहिती आहे की नाही हे तर मला माहित नाही परंतु माझ्यासाठी माझी आईच माझ पाहिलं प्रेम आहे. तिच्या सारखी काळजी अजून कोणीच माझी घेतली नसेल.

दिवसभर फक्त आमचाच विचार करते, दररोज स्वादिष्ट स्वयंपाक करून आम्हाला खायला देते. बाबांना दररोज सकाळी गरम गरम चहा, नाश्ता देते.

माझ्या आईवर माझे खूप प्रेम आहे.

माझी आई मराठी निबंध २०० शब्दात – Majhi Aai Marathi Nibandh 200 Words

जेव्हा शिक्षकांनी वर्गात माझी आई या विषयावर निबंध लिहायला सांगितले तेव्हा मला खूप आनंद झाला की असे वाटले की जसे मला कोणी देवावरच निबंध लिहायला सांगितला असे वाटले.

आई म्हणजे एक असे फुल जे नेहमी फुललेले असते ज्यामुळे आमच्या घरात नेहमी रौनक असते. ती घरी असली आम्हाला कधीच बोर होत नाही. मी रोज फक्त आई, आई करतो आणि माझा सर्व दिवस त्यातच जातो.

आई मला स्वतःहून सकाळी उठवते आणि म्हणते बाळा शाळेची वेळ झाली चल लवकर उठ. तेव्हा मी म्हणतो हो आई फक्त 5 मिनिट आणि अस करत अर्धा तास केव्हा निघून जातो कळतच नाही. त्या अर्ध्या तासात आई 4 ते 5 आवाज देते परंतु तरीही मला उशीर झालेला नसतो कारण आई मला शाळेच्या वेळेच्या एक तासा आधीच उठवायची.

मग मी हळु हळु डोळ्यांतील झोप आवरून तयारी करतो आणि शाळेत जातो.

दुपारी माझ्या येण्याची वाट बघत असते, मी आलो का तर मला जेवणास विचारते. मला गरम गरम खायला देते. विशेषतः माझ्यासाठी दररोज नवनवीन पकावन बनवते जसे की मी हॉटेल मध्येच बसलेलो आहे. ती माझ्या आईची हाताची चव म्हणजे आता पण माझ्या तोंडाला पाणी सुटतयं.

अशी ती आमच्या संपूर्ण परिवाराची खूप काळजी घेते त्यामुळे ती आमच्या घरातील एक महत्वाची व्यक्ती म्हणून भूमिका निभावते.

माझ्या आईचे माझ्यावर आणि माझ्या परिवारावर अतिशय प्रेम आहे.

माझी आई मराठी निबंध ३०० शब्दात – Majhi Aai Marathi Nibandh 300 Words

मी खूप भाग्यवान आहे की माझी आई माझ्या जवळ आहे परंतु विचार करा ज्यांना आई नसते त्यांना काय वाटतं असेल. आपल्या नजरेपासून आई दूर गेली तरी आपण हडबडून जातो तर ज्यांना आई म्हणजे काय, आईचे प्रेम काय असते हेच माहिती नाही तर त्यांना कसे वाटत असेल.

त्यामुळे नेहमी आपल्या आईचा आदर बाळगायला हवा कारण ती आहे म्हणून आपण आहोत.

अशीच माझी आई आहे जी मला खूप प्रेम करते आणि मीही तिच्यावर खूप खूप प्रेम करतो.

ती आमच्या संपूर्ण परिवाराची खूप काळजी घेते. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिच्या मनात फक्त आमच्या बद्दलच विचार चालू असतो. यांना खाण्यामध्ये काय बनवावे, सकाळी नाश्त्याला काय द्यावे, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात काय द्यावे. म्हणून तर आईला अन्नपूर्णा ची उपमा दिली आहे.

त्याचबरोर माझी आई माझ्याकडून माझा अभ्यास करून घेते. जेव्हा तिच्या बाजूला बसून अभ्यास करतो तेव्हा अभ्यास अभ्यास वाटतच नाही कारण ती एवढ्या प्रेमाने आणि सोप्या पद्धतीने शिकवते की अभ्यास काही शनाताच पूर्ण होतो. असा ती मला अभ्यासात मदत करते. म्हणून म्हणता ना आई ही आपली पहिली गुरु असते हेच त्याचे जिते जागते उदाहरणं.

आई तीच व्यक्ती आहे जी आपल्याला जीवनाचे पाहिले धडे शिकवते, पुण्य – पाप, खरे – खोटे, चांगले – वाईट अश्या सर्व गोष्टींची आपल्याला जाणीव करून देते. आणि मुख्य म्हणजे आई वडिलांचे संस्कार ते अश्याच जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या क्षणांमधून शिकवण देतात.

ह्या जगात देवाने आईला का पाठवले आहे माहितीये? कारण देव प्रत्यक्ष पृथ्वीवर येऊ शकत नाहीत म्हणून देवाचे रूप म्हणून आईला पाठवले आहे.

आपण लहानाचे मोठे होतो आणि आपल्याला आपली आई अजून मोठी वाटते पण तरीही तिच्यासमोर आपण लहानच वाटतो. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हाही आपली आई आपल्यासोबत तशीच बोलते जसे आपण अजून पण लहानच आहोत, तीच आई ची माया, प्रेम बघून मन भरून येते.

कधी कधी असा विचार येतो की आई आपल्यासाठी किती कष्ट करते आणि जेव्हा मी मोठा होईल तेव्हा आईला एकही काम लावणार नाही तिला आरामाचे जीवन जगू देईल.

आपण कितीही पैसा कमावला तरीही आपण आई वडिलांचे उपकार कधीही फेडू शकत नाहीत.

माझी आई मराठी निबंध ५०० शब्दात – Majhi Aai Marathi Nibandh 500 Words

“आई” किती गोड शब्द आहे नां हा शब्द कानावर पडताच मी बिनधास्त होतो, मला कसलेही भय येत नाही जणू की माझ्यासोबत साक्षात परमेश्वरच उभे आहेत.

असाच एक किस्सा मला आठवतोय तो मी आपणास सांगतो. एक दिवस रोजच्या वेळेवर मी शाळेत जात होतो तिथे गेल्यावर शाळा सुरू झाली. मग नंतर मधली सुट्टी झाली तिला आम्ही डब्याची सुट्टी झाली असे म्हणत. सुट्टी मध्ये आम्ही सर्व मित्र लवकर डबा खाऊन खेळायला मैदानात जायचो. शाळेच्या समोरच शाळेचे मोठे मैदान होते. तेथे आम्ही सर्वजण खेळत असताना काही बाहेरचे टुक्कार मुले म्हणजेच टवाळके मुले आमच्या शाळेच्या मैदानावर आले होते. खेळत असताना माझा त्यांना धक्का लागला आणि ते मला शिव्या द्यायला लागले आणि धक्काबुक्की सुद्धा करायला लागले.

याबद्दल मी शिक्षकांकडे ही तक्रार केली परंतु शिक्षकांनी ही मला समजावून त्या प्रकरणाबद्दल काहीच केले नाही.

तो पूर्ण दिवस मी नाराज होतो तसाच मी घरी गेलो आणि आईने मला जवळ घेतले आणि विचारले काय झाले बाळा तेव्हा मी सर्व हकीकत आईला सांगितली. आईला ही त्या मुलांचा खूप राग आला आणि आई म्हणाली थांब मी उद्या तुझ्या शाळेतच येते.

पुढच्या दिवशी त्याच वेळेवर आई माझ्या शाळेत आली आणि मला तर खूप आनंद झाला. महत्वाचे म्हणजे त्या तीवशी ही ते मुले आमच्या मैदनावर आली होती. मग काय आईने एकेकाला चांगलेच झापले ते सर्वजण खाली मान घालून ऐकत होते. आई त्यांना म्हणत होती की लहान मुलगा आहे त्याचा धक्का लागला असेल तर तुम्ही ते समजून घेऊन त्याला माफ करायला हवे परंतु उलट तुम्हीच त्याच्यापेक्षा लहान होऊन त्याच्याशी भांडण करताय.

त्यानंतर आई शाळेतही आली आणि शिक्षकांना जाब विचारला की मुलाने तुमच्याकडे तक्रार केल्यावरही तुम्ही त्याची दखल घेतली नाही. शाळा तुमची, मैदान तुमचं तर अश्या टुक्कार मुलांना बोलणे तुमची जबाबदारी आहे. आणि नंतर तिचा राग शांत झाल्यावर तिने पुन्हा एकदा प्रेमाने समजावून सांगितले आणि घरी गेली.

तेव्हापासून शाळेतील सुद्धा कोणता मुलगा माझं नाव नघेत नसे.

त्याचबरोबर ती माझ्या अभ्यासाबद्दल सुद्धा खूप काळजी घेते. परीक्षेच्या वेळेस ती स्वतःहून माझ्याकडून अभ्यास करून घेते. का ठाऊक जेव्हा मी तिच्या बाजूला बसून अभ्यास करतो तेव्हा मला तो अभ्यास कठीण वाटतच नाही.

असच ती माझ्याकडून परिक्षेंची तयारी करून घेत असे आणि मला नेहमी कोणत्या ना कोणत्या स्पर्धापरीक्षा द्यायला लावते. जेव्हा मी पाचवीत होतो तेव्हापासून आईने मला सवय लावलीये की कुठलीही परीक्षा असो मग ती स्पर्धारीक्षा असो अथवा दुसरी कोणती असो फक्त परीक्षा फॉर्म भरून द्यायचा आणि पेपर देऊन यायचा.

माझ्या आईचे असे म्हणणे आहे की याच्यामुळे आपल्याला अनुभव येतो आणि आपल्याला मोठे झाल्यावर परीक्षा बाबत अजिबात भीती वाटत नाही.

सकाळी उठल्यावर आई मला माझी तयारी करण्यात मदत करते आणि मला गरम गरम नाश्ता तयार करून देते. रोज वेगवेगळे पदार्थ करून डब्बामध्ये देते. शाळा सुटण्याच्या वेळेवर माझी वाट बघत असते मी घरी आलो का लगेच मला जेवण देते.

रात्री झोपताना मला अंगाई गीत एकवते किंवा एक छानशी गोष्ट सांगते. ती गोष्ट ऐकत ऐकतच मला केव्हा झोप लागून जाते ते समजतच नाही.

आई वर जेवढे बोलले, जेवढे लिहिले तेवढे कमीच आहे कारण आई क्या ममतेचा सागर एवढा मोठा आहे की त्यावर जेवढे लिहिले तेवढे अपुरेच पडेल. खरं तर आईच्या ममतेसमोर सागर ही कमी पडेल.

जेव्हा आपण आईपासून दूर जातो तेव्हाच आपल्याला आईच्या ममतेची जाणीव होते. तेव्हा आपल्याला अक्षरशः रडायला येते कारण जी व्यक्तिशिवाय घरात आपल काही पत्ता हालत नाही आणि त्याच आईपासून एवढे दूर राहणे कसे जमेल.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

1 thought on “माझी आई मराठी निबंध | Majhi Aai Essay In Marathi”

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap