नमस्कार मंडळी आज मी आपल्याला माझी आजी मराठी निबंध सांगणार आहे. हा निंबंध माझ्या मनातून आलेला आहे म्हणजे थोडक्यात माझ्या आजी बद्दलच आहे.
असा हा सत्य घटनेवर आधारित निंबध तुम्हाला देखील वाचण्यास आवडेल. हा निबंध लिहून नक्कीच आपल्याला पैकी चे पैकी गुण मिळतील.
माझी आजी मराठी निबंध | Short Essay On Majhi Aaji In Marathi
माझी आजी वर निबंध लिहिण्याचे म्हटले तर तो संपता संपणार नाही कारण आपली आजी असतेच एवढी प्रेमाची.
ते नऊवारी पातळ, केसांचा जुडा त्यावर एक फुल, हातात हिरव्या बांगड्या, माथेवर मोठा कुंकू अशी तिची भारतीय संस्कृतीची वेशभूषा जी तिला एक वेगळीच ओळख आणि सुंदरता प्रदान करते.
तिचे ते प्रेमळ मन, तिचा तो प्रेमळ स्वभाव आणि भरपूर काही मला खूप आठवते. जेव्हा मी लहानपणीचे आठवतो तेव्हा माझ्या मनात आजी आणि बाबा हे दोन शब्द नक्कीच समोर येतात आणि तुमच्याही मनात येत असतील.
काय ते आजीने केलेले लाड आणि प्रेमाने घेतलेली पप्पी ते आठवूनच माझे मन भरून येते.
असेच मी एक माझ्या आजी सोबत गेलेले माझे लहानपापासून ते आत्तापर्यंतचे जीवन आपल्याला काही छोट्या वेळेत सांगत आहे.
सर्वांना दोन आज्या असतात एक म्हणजे आई ची आई आणि दुसरी म्हणजे वडिलांची आई, मला ही दोघी आजी आहेत.
माझे अर्धे बालपण हे माझ्या आई ची आई म्हणजेच माझ्या आजी कडे गेले आहे. मुळातच माझा जन्म देखील माझ्या आईच्या गावालाच झाला आहे म्हणून माझी आजी मला लहापणापासून खूप आवडते.
जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा आमच्या सर्व घरात आनंद साजरा करत होते, माझ्या आजीने आजूबाजूच्या घरांना जेवण सांगितले होते.
दिवसभर माझी आजी माझी काळजी राखायची, मला सकाळी लवकर उठवायची आपल्या स्वतःच्या हाताने माझी अंघोळ घालायची. माझ्या केसांचा मस्त भांग पाडून द्यायची आणि खरं तर आज तिच्या मुळेच माझे केस उभे राहतात, माझ्या केसांचा मोठा फुगा (volume) होतो.
रात्री झोपताना मला एक गोष्ट सांगायची ती एकूण मला खूप भारी वाटायचे आणि मी गोष्ट ऐकत ऐकत झोपून जायचो.
ती रोज शेतात जायची केव्हा केव्हा मलाही शेतात घेऊन जायची. मी रोज आजीच्या मागे लागायचो की मला सुद्धा शेतात यायचं तेव्हा ती मला कोणत्यातरी दिवशी घेऊन जायची. आजी मला सांगायची की शेतात खूप ऊन राहते तुझी तब्येत बिघडेल म्हणून तू येऊ नको परंतु तरीही मी एकायचो नाही आणि मागे लागायचो.
मग ती मला 1 – 2 रुपये देऊन चूप करायची आणि तेव्हा दोन रुपये ही खूप मोठे वाटायचे. त्या पैशांनी मी चॉकलेट, पेप्सी, किंवा कुरकुरे वगैरे घ्यायचो.
जेव्हा मी पाच वर्षाचा झालो तेव्हा मला आई वडील शहरात घेऊन आले आणि माझे शाळेत नाव टाकले. मी खूप रडायचो की मला आजीकडे जायचे परंतु आजी म्हणायची की शिकून मोठा हो चांगली नोकरीला लाग. तू शाळेत जाशील खूप शिकशिल तेव्हा मोठा साहेब होशील.
मग मी मन लाऊन शाळा शिकू लागलो आणि कालांतराने मला शाळेत मज्जा येऊ लागले माझे खुपसारे मित्र झाले.
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मी मामाच्या गावाला जायचो म्हणजेच आजीला भेटायला. मग आजीला शाळेतील सर्व गोष्टी सांगायचो आजीही खूप खुश व्हायची.
मला अजूनही आठवतंय जेव्हा मी आखाजीला ला आजीच्या गावाला जायचो तेव्हा तेथे लिंबाच्या मोठ्या झाडाला एक मोठा झोका बांधलेला असायचा आणि आत्ताही बांधलेला असतो.
मी आणि माझे मित्र मंडळी आम्ही सर्व झोका खेळायचो आणि खूप मज्जा करायचो. गाणी म्हणत आम्ही झोका खेळायचो आणि खूप मज्जा धमाल करायचो.
सुट्ट्यांमध्ये आजी माझ्यासाठी मस्त खाद्यपदार्थ बनवायची लाडू, चिवडा, सांजरी, बर्फी अस बनवायची. तिथे माझी खेळण्याचीही मज्जा राहते आणि खण्याचीही मज्जा राहते.
आत्ता माझी आजीने 70 वय पार केले आहे तरीही ती अजून वाकली नाही आहे उलट ती अजुनही तसेच काम करते जसे ती पाहिले करायची. अजुनही ती शेतात जाते आणि तेवढेच जोराने काम करते.
सर्वजण चकित होतात की ही म्हातारी अजुनही एवढे कामे कसकाय करते. माझ्या आजीच मला खूप गर्व वाटतो की ती अजुनही खूप जवान सारखी वाटते.
गावाला गेल्यावर माझी आजी कधी आईची कमी भासुच देत नाही म्हणून तिच्या प्रती माझे प्रेम अजून वाढते.
असेच मला दोन आज्या आहेत ज्या दोघीही माझ्यावर खूप प्रेम करतात आणि माझे ही त्यांच्यावर खूप प्रेम आहे.
आजी आमच्या घरातील एक वैद्य म्हणून ही ओळखली जाते कारण तिचे ते घरगुती रोगांवर रामबाण उपाय म्हणजेच आजीच बटवा. आमच्या घरात कोणीही आजरी पडो ती लगेच आपला गावठी, आयुर्वेदिक उपचार सांगते आणि त्याच्याने लगेच फरक ही पडतो. तिचे म्हणणे आहे की गोळ्या खाण्या पेक्षा रोज पोष्टिक जेवण आणि शरीराची हालचाल करा तुम्हाला कुठलेही आजार होणार नाही.
अशीच आमच्या घरातील सर्वात थोर व्यक्ती म्हणजे आमची आजी आणि आमचे आजोबा.
जर आजी घरात असली ते कधीच बोर होत नाही कारण ती दिवसभर काही ना काही कामात आपल्याला व्यस्त करून घेते आणि आपल्याला देखील काहीतरी काम लाऊन देते.
जेव्हा आई माझ्यावर चिडते किंवा माझ्या काही वागण्याने किंवा अभ्यास न करण्याने मला मारते तेव्हा आजीच एक अशी व्यक्ती असते जी मला मार खाण्यापासून वाचवते. मी तेव्हा आजीच्या खुशीत जाऊन बसतो.
परंतु नंतर शांत झाल्यावर आई देखील मला जवळ घेते आणि आजी व आई दोघी मला समजावून सांगतात की तुझ अस करणं चुकीचं आहे.
माझ्या हट्टी सभावाला तिने झेलले हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे माझ्या माझ्या सर्व इच्छा ती पूर्ण करते.
ती माझ्या आईला देखील खूप मदत करते जसे की स्वयंपाक मध्ये, घराच्या साफसफाई मध्ये आणि विशेषतः तर दिवाळीच्या दिवसांत पूर्ण घराची साफसफाई केली जाते. तेव्हा देखील आजी आणि मी माझ्या आईला खूप मदत आणि घराचे जाळे काढणे, सर्व भांडे जसे डबे, पितळ जे भांडे, मोठे बोघने आणि इतर काही धुणे, झावरी, शाल धुणे. अशी कामे होतात तेव्हाही आम्ही मज्जा करत ते काम पूर्ण पार पाडतो.
ती फक्त आमच्या घरातील नाही तर आजूबाजूच्या लोकांना देखील मदत करते जसे कोणाच्या घरी पापड, कुरडया आणि इतर काही खाण्याचे पदार्थ होतात तेव्हा ती त्यांना खूप मदत करते. जेव्हा कुणाचे दुःखद निधन होते तेव्हा ती मदतीसाठी नेहमी तयार असते. थोडक्यात ती त्यांच्या सुख दुःखात शामिल होते.
आमची आजी आमचीच आजी नाही तर सर्वांची आजी आहे सर्वजण तिला आजी म्हणूनच हाक मारतात.
अजुनही आजीच्या त्या गोष्टींची मला आठवण येते आजीच्या बटव्यातील गोष्टी संपेसंपेना रोज एक नवीन गोष्ट सांगायची आणि प्रत्येक गोष्टीतून एक सुंदरसा बोध द्यायची. केव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट तर कधी महाभारत, रामायण, श्री कृष्णाच्या शूरवीर गोष्टी, आणि पराक्रमी राजा महाराजांची गोष्ट सांगायची.
त्याचबरोबर भक्ती आणि देवांच्या गोष्टी सुद्धा सांगायची, भक्त पुंडलिकाच्या गोष्ट, कृष्णा आणि सुधामा ची गोष्ट, न्यानेश्र्वरांची गोष्ट आणि अजून भरपूर गोष्टी सांगायची.
आजी जेवढी दयाळू आहे तेवढीच ती कठोर देखील आहे जर काही चुकीचा प्रसंग आला तर ती त्यावेळेस कठोर बनण्यास देखील मागे सरत नाही.
ती जेवढी देवाची भक्ती करते त्याच्यापेक्षा जास्त ती लोकांची सेवा करते, गरीबाची मदत करते. तिचे म्हणने आहे जर आपण गोरगरिबांना मदत केली, लोकांची सेवा केली तरच देवाची कृपा आपल्याला लाभते.
ती देवाला प्रार्थना करते की देवा मला अशीच निरोगी वरती ने, माझ्यामुळे कोणाचेही हाल होऊ नये. अशी आमची आजी आम्हा सर्वांना खूप प्रिय आहे.