माझी बहिण मराठी निबंध | Majhi Bahin Marathi Nibandh

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला माझी बहिण मराठी निबंध सांगणार आहे. ह्या निबंधात माझ्या आणि माझ्या बहिणीतील नात मी सांगत आहे.

ह्या निबंधाने आपल्याला नक्कीच पैकी चे पैकी गुण मिळतील.

माझी बहिण मराठी निबंध | Majhi Bahin Marathi Nibandh

बहिण आणि भावातील नात म्हणजे जगातील एक मौल्यवान, आनंददायी, मनोरंजक, विश्वासू, आदर आणि प्रेमळ नात आहे.

असच माझ्या आणि माझ्या बहिणीतील नात आहे जे खूप प्रेमळ आणि मनोरंजक नात आहे.

बहिण आणि भावाला कोणत्या सणाची आतुरता असेल तर ती रक्षाबंधन असते ज्यात बहिण भावाला एक सुंदरशी राखी बांधते आणि भाऊ तिला भेट देतो.

मला अजूनही आठवतंय लहानपणी जेव्हा ताई मला राखी बांधायची तेव्हा मी तिच्या ताटात फक्त एक किंवा दोन रुपये टाकायचो. लहानपणी तेवढे पैसे ही खूप वाटायचे. आईने किंवा बाबांनी दिलेले पैसे जमा करून मी ते तिच्या ताटात टाकायचो.

तेव्हा सर्वजण म्हणायचे फक्त एक रुपया परंतु ती कधीही ही अशी बोलली नाही. हा मात्र आता तिला मी पैसे देण्याऐवजी एक सुंदर भेटवस्तू देतो कधी चॉकलेट तर कधी शोभेची वस्तू.

मी घरात लहान असल्यामुळे माझे खूप लाड केले जातात आणि ताई माझ्यापेक्षा मोठी आहे आणि तिचे ही खूप लाड केले जातात. बाबा म्हणतात जेव्हा ती जन्माला आली तेव्हा घरात खूप आनंद होता आणि तेव्हापासून आपल्या घरातील धनाला वाढ आली.

मुख्य तर आमच्या घरात आम्हा दोघींना सारखाच मन दिला जातो आणि सारखेच लाड पुरवले जातात.

लहानपणापसून तर आता पर्यंत आमच्यात खूप भांडण होतात. मी नेहमी तिचे नाव घेत राहतो जसे तिला चिडवणे, तिच्या मागे लागणे, तिला टोमणे मारणे अस आमचं चालूच असत. याच्याताच आमचं खूप टाईमपास होतो.

ज्यावेळेस ती घरी नसते तेव्हा खूप बोर होत आणि मी पुन्हा पुन्हा आईला विचारात असतो आई ताई केव्हा येईल तेव्हा आई म्हणते जेव्हा ती असते तेव्हा तिच्याशी भांडण करतो आणि आता तिच्याशिवाय तुला करमतं नाहीये हे एकूण खूप वेगळच वाटायचं.

आसचं ती एकदा मामाच्या गावी गेली होती तेव्हा मी पण खूप बोर व्हायचो जस गाईला तिच्या वासरू शिवाय. करमतं नाही तसच मला तिच्याशिवाय करामायचे नाही.

जेव्हा आई वडील गावी जातात तेव्हा तिचं माझी काळजी घेते मला जेवण देते सर्व तीच करते. अजिबात मला आईची गरज भासूच देत नाही आणि माझी निगाह ठेवते.

जेव्हा ती कुठे बाहेर जाते तेव्हा ती मला काहीतरी खायला आणते.

एकदा आम्ही दोघी लहान होतो जवळजवळ तेव्हा आम्ही चौथी – पाचवीला असणार. रात्रीची वेळ होती आणि मी पलंगावर झोपलो होतो आणि पलंगाच्या बाजूला लोखंडी स्टूल होता. मी झोपेत पलंगाच्या खाली पडलो आणि माझ्या हनुवटीला तो स्टूल लागला. तेव्हा माझ्या हनुवतीतून रक्त येत होते आणि मी जोरजोरात रडत होतो मला बघून ताई ही रडायला लागली. आम्ही दोघी रडत होतो तेव्हा ताई समोरच्या मावशींना बोलवून सांगितले. त्या मावशींना मला तेथे मलमपट्टी केली. असे खूप काही लहानपणीचे किस्से मला आठवतात.

जेव्हा भाऊ बाहेर गावी शिकण्यास जातो किंवा नोकरीस जातो तो क्षण एक वेगळाच दुःखद आणि आनंदी असतो.

रक्षाबंधनाच्या वेळेस बहिण भावासाठी त्याच्या आवडीनुसार राखी घेते आणि भावाला पोस्टाने पाठवते तिकडे भाऊ ही बहिणीच्या राखीची आतुरतेने वाट बघत असतो. राखी पोहचली का याची खात्री करण्यासाठी बहिण भावाला फोन करते आणि भाऊ तिचे धन्यवाद करून फोन ठेवतो. मग भाऊ बहिणीला पोस्टाने भेटवस्तू पाठवतो.

असे भाऊ आणि बहिणीचे दूर असलेले नाते ही खूप सुंदर असते.

ती लहानपणापासून खूप हुशार आहे नेहमी तिचा शाळेत एक किंवा दोन नंबर येत असे. मात्र ती मला देखील अभ्यासात खूप मदत करते जर मला काही अडचण असेल तर मला सविस्तर समजावून सांगते.

अभ्यासात हुशार असण्यासोबत ती इतर कलेत ही अवगत आहे. तिला चित्र काढण्यात देखील खूप आवडते आणि बॅडमिंटन स्पर्धेत तिचा एक नंबर आला आहे.

ताई धाडसी आहे ती भूतांना घाबरत नाही जर कधी लाईट गेली आणि आईने काही काम सांगितले तर मी अंधारात जाण्यास घाबरायची पण ती अजिबात घाबरायची नाही. तिचे ते धाडस पाहून मीही ही धाडसी झालो अस मी तिच्यापासून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी शिकलो.

घरात आल्यावर आमच्यात खूप भांडण होतात छोट्या छोट्या गोष्टींवरून आमच्यात काहीनाकाही चालूच असते पण जेव्हा कधीतरी आम्ही दोघी बाहेर गावी जातो तेव्हा आम्ही खूप चांगले राहतो एकमेकांना आदर देतो आणि एकमेकांची काळजी घेतो. त्यामुळे सर्वजण म्हणतात आमचे नाते खूप आदराचे आहे.

तिला मोठं होऊन आयएएस व्हायचय त्यासाठी ती खूप अभ्यास करते आणि लहानपणापासून स्पर्धा परीक्षा देत आहे. त्याच्याने तिचा पाया मजबूत होतो असे ती म्हणते म्हणून बाबा ही तिला कधीही नकार देत नाही आणि तिचा परीक्षेचा फॉर्म भरून देतात. तिने आतापर्यंत खूप साऱ्या परीक्षा दिल्या आहेत.

आणि मला ही ती अभ्यासात खूप मदत करते मला चांगले जीवनाचे धडे शिकवते.

अशी माझी बहिण आहे जी माझ्यावर खूप खूप प्रेम करते आणि मी ही तिच्यावर ढगा एवढे प्रेम करतो.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

2 thoughts on “माझी बहिण मराठी निबंध | Majhi Bahin Marathi Nibandh”

  1. आपली वेबसाईट चा उपयोग नक्कीच
    उपयोगी आहे.

    Reply
    • धन्यवाद🙏, आम्हाला आनंद होतो जेव्हा आपले मराठी मंडळी प्रतिसाद देतात. असेच आम्हाला समर्थन करा आणि इतरांपर्यंत देखील पोहोचवा.

      Reply

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap