माझी शाळा मराठी निबंध | Majhi Shala Marathi Nibandh | My School Essay In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला माझी शाळा मराठी निबंध सांगणार आहे जो माझ्या शाळेवर आधारित आहे. शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात एक मुख्य भूमिका निभावते आणि तिची आठवण ही एक आठवण म्हणूनच राहून जाते.

खालील निबंध कोणकोणत्या विषयांवर वापरू शकता

माझी शाळा

माझी शाळा निबंध मराठी – Majhi Shala Essay In Marathi

शाळेचे महत्त्व – Shaleche Mahatva In Marathi Nibandh

माझी शाळा सुंदर निबंध – My School Beautiful Essay

माझी स्वच्छ शाळा मराठी निबंध – Mazi Swachh shala Marathi Nibandh

Mazi Shala My School Essay In Marathi

माझी शाळा मराठी निबंध 100 शब्दात | Majhi Shala Marathi Nibandh 100 Words

Majhi Shala Marathi Nibandh 100 Words

ज्ञान मंदिराचे दुसरे नाव म्हणजेच शाळा कारण माणसाला प्रगतीच्या शिखरावर नेऊन सोडणारी गोष्ट म्हणजे शाळा होय.

माझ्या शाळेचे नाव संत गाडगे बाबा विद्यालय असे होते, तुम्हाला नावावरूनच लक्षात आले असेल की शाळेत स्वच्छतेला घेऊन खूप शिस्त असेल. आणि शिस्त तर असायलाच हवी कारण ज्या ठिकाणी आपण ज्ञान आत्मसात करतो त्या ठिकाणी स्वच्छता आणि निसर्गरम्य वातावरण असायला हवे.

तीन मजली इमारत असलेली, लाल आणि पांढरा रंग दिलेली, एक सुंदर शाळा ज्यात 1 ते 10 पर्यंतचे वर्ग आहेत. अशी आमची शाळा बाहेरून तर सुंदर आहेच परंतु शिक्षकांनी ज्ञान गंगा वाहून मधूनही सुंदर केली आहे.

अशी ज्ञानाने भरपूर आणि निसर्गरम्य वातावरणात असलेली आमची शाळा आम्हा सर्वांना खूप खूप प्रिय आहे.

माझी शाळा मराठी निबंध 200 शब्दात | My School Essay In Marathi 200 Words

Majhi Shala Essay In Marathi 200 Words

ते म्हणतात ना की मज्जा करायची असेल तर पुन्हा शाळेत प्रवेश घ्या कारण जी शाळेत मित्रांबरोबर मज्जा व मस्ती येते ती जगातील कोणत्याच कोपऱ्यात सापडत नाही.

मी तर शाळेत खूप मज्जा करतो, आमचे शिक्षक आम्हाला हसत खेळत शिकवतात कारण त्यांचे म्हणणे आहे की जो शिक्षक हसत खेळत विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही तर तो मुळात एक उत्तम शिक्षकच नाही. कारण विद्यार्थ्यांना मध्ये मध्ये ताजे करणे गरजेचे असते नाहीतर सर्व शिकवलेल वाया गेले असे समजा.

माझी शाळा माझ्या घरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि माझ्याकडे एक छोटी सायकल आहे जिच्यावर मी आणि माझा मित्र त्याच्या सायकलवर असे आम्ही शाळेत जातो. आम्ही घरून 11:35 ला निघतो आणि 11:50 पर्यंत आरामाने शाळेत पोहोचतो.

त्यानंतर आमची शाळा 12 वाजता भरते, शाळेत प्रथम राष्ट्रगीत, प्रार्थना आणि प्रतिज्ञा होते, हे सर्व अर्धा तासात आवरले जाते आणि मग लेक्चर ला सुरुवात होते. जास्तकरून पहिला तास आमचा मराठीचाच असतो कारण आमचे वर्ग शिक्षक हे मराठीचे शिक्षक आहेत म्हणून. पहिल्या तासाला ते आमची हजेरी घेतात आणि मग नंतर शिकवण्यास सुरुवात करतात. मराठीचे शिक्षक माझे आवडते शिक्षक आहेत कारण ते आम्हाला हसत खेळत आणि समजावून शिकवतात.

खरी मज्जा तर आमची खेळण्याच्या तासाला असते, तेव्हा सर आम्हाला पटांगणावर खेळायला नेतात. जास्तकरून आम्ही क्रिकेट, खो खो आणि फुटबॉल असे काही खेळ खेळतो. अशी आमची शाळा खूप खूप सुंदर आहे आणि तिला सुंदर बनवणारे शिक्षक देखील खूप छान आहेत.

माझी शाळा निबंध मराठी 500 शब्दात | Majhi Shala Nibandh In Marathi 500 Words

My School Essay In Marathi 500 Words

तीन मजली इमारत असलेली लाल आणि पांढरा रंग असलेली सुंदर शाळा म्हणजे आमची संत गाडगे बाबा विद्यालय जी ज्ञानाने भरपूर आणि निसर्गाने वेढलेली आहे असे म्हणणे चुकीचे नाही.

खालील तळ घरात मुख्य ऑफिस आहे जेथे मुख्यधापक सर बसतात, त्याच्या बाजूला एक वाचनालय आहे ज्यात अनेक पुस्तकं आहेत जसे छत्रपती शिवाजी महाराज, थोर नेत्यांवर, शब्दकोश आणि इतर भरपूर जे संपता संपत नाहीत. त्याच बाजूला मॅडमांचा स्टाफ रूम आहे ज्यात सर्व मॅडम बसतात आणि बाकीचे वर्ग आहेत. दोन नंबरच्या मजल्यावर काही वर्ग आहेत आणि त्याबजुला एक संगणक रूम आहे ज्यात एकूण 20 संगणक आहेत आणि त्याच बाजूला सरांचा स्टाफ रूम आहे ज्यात सर्व सर बसतात.

संगणक तासाला आमची खूप मज्जा येते, त्यात आम्हा सर्व विद्यार्थ्यांना संगणक मध्ये अभ्यास कसा करावा, मायक्रोसॉफ्ट कसे चालवावे, चित्र कसे काढावे, लिहायचे कसे आणि इतर अनेक गोष्टी शिकवतात.

तिसऱ्या मजल्यावर फक्त वर्ग आहेत परंतु त्यात फक्त 8वी, 9वी आणि 10वी चे वर्ग आहेत. कारण तिसऱ्या मजल्यावर सांभाळून चालावे लागते आणि आठवीच्या पुढचे विद्यार्थी आले म्हणजे ते मोठेच असतील. जस जस विद्यार्थी मोठं मोठा होत जातो तसा त्याचा वर्ग बदलत असतो आणि जेव्हा तो माध्यमिक मध्ये जातो तेव्हा तिसऱ्या मजल्यावर वर्ग असतो.

सर्व वर्गांना खिडक्या आहेत ज्यामुळे शुद्ध हवा आत येते आणि वर्गातील वातावरण रम्य असते. ज्यामुळे शिकण्यास सुद्धा खूप मज्जा येते आणि वर्गात बोर होत नाही.

शाळेतील कार्यक्रम आणि उत्सवांची गोष्ट केली तर जवजवळ सर्वच कार्यक्रम होतात मग तो सरस्वती पूजन असो की गणेश उत्सव असो. गेल्या वर्षी आम्ही सरस्वती पुजनला आमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडून वर्गणी जमा केली होती आणि त्यातून तो कार्यक्रम साजरा केला होता. त्यात सरस्वती मातेला फुलांचा हार आणि प्रसाद म्हणून कचोरी, समोसा ठेवला होता परंतु ते फक्त आमच्या वर्गापर्यंत सीमित होत. आणि गणेश उत्सव ची तर गोष्टच करू नका कारण ह्या दिवशी आमची खूप मज्जा असते. साधारण आमच्या शाळेत 3 ते 4 फुटचा गणपती बाप्पा एकूण 7 दिवस बसवला जातो. प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी विद्यार्थी छानसा प्रसाद आणतो जसे कधी मिठाई, मोतीचुरचा लाडू, मोदक आणि अजून बरेच काही. उत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी वाजा लावलेला असतो त्यात आमची खूप मज्जा येते परंतु गणपती बाप्पा गेल्यावर शाळेत खूप शांतता आणि एकटे एकटे वाटते.

माझे आवडते शिक्षक हे मराठीचे शिक्षक आहेत कारण ते खूप प्रेमळ आणि मनोरंजक आहेत. त्याचबरोबर इतर शिक्षकही खूप चांगले आहेत ते हसत खेळत शिकवतात त्यामुळे आमची शाळा शिक्षकांसाठी ही प्रसिद्ध आहे. आमचे शिक्षक आमच्याशी मिळून मिसळून राहतात आणि आम्हाला असे वाटत की ते आमचे मित्रच आहेत.

आमच्या शाळेत दोन सुट्ट्या होतात एक म्हणजे डब्याची मधली सुट्टी आणि एक साडेतीन वाजता होणारी 15 मिनिटांची सुट्टी. मधली सुट्टीत आम्ही मित्र लवकर डबा खाऊन खेळतो. खेळण्यात आम्ही क्रिकेट, खो खो, आबाधोबा आणि इतर अनेक खेळ खेळतो.

शाळेला मोठे मैदान आहे ज्यात क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉल चे मैदान आहे. मैदान मोठं असल्यामुळे सर्व मुले सहजतेने कोणताही खेळ खेळू शकतात. आमच्या खेळण्याच्या तासाला क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, खो खो आणि इतर काही खेळ नेहमी खेळले जातात. शाळेच्या एका वर्गात खेळण्याची वस्तू ठेवल्या आहेत जसे बॅट, बॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, बास्केटबॉल आणि अजून भरपूर साहित्य आहेत.

अश्या सर्व सुविधांनी परिपूर्ण, निसर्गरम्य, भव्य आणि सुंदर अशी माझी शाळा आहे जी आम्हा सर्वांना खूप खूप आवडते. शाळा आली म्हणजे शिक्षक ही येताच आणि तेही आम्हाला खूप प्रिय आहेत.

माझी शाळा मराठी निबंध 1000 शब्दात | Majhi Shala Marathi Nibandh 1000 Words

Majhi Shala Marathi Nibandh 1000 Words

मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी माझ्या आजीकडे म्हणजेच खेड्या गावात राहायचो. मी तीन वर्षाचा झालो तेव्हा सर्व मुलांना बघून मीही आजीकडे शाळेत जाण्याचा हट्ट केला मग आजीने गावातील बालमंदिर शाळेत माझे नाव टाकले. बालमंदिर ला अंगणवाडी देखील म्हणतात त्यामुळे कोणी म्हणायचं शाळेत चाललास का, कोणी म्हणायचं बालवाडीत चालला का, अंगणवाडीत चालला का मी तेव्हा हसून फक्त हो म्हणायचो.

पहिले काही दिवस आजी मला अंगणवाडीत सोडायला यायची मग कालांतराने माझे काही मित्र झालेत तेव्हा मी त्यांच्यबरोबर शाळेत जायला लागलो. खरतर लहानपणी अंगणवाडीत कोणीच अभ्यास करायचा म्हणून जात नाही आणि आम्ही तर फक्त मज्जा मस्ती करायला आणि अंगणवाडीतील खिचडी, डाळ भात, भाजी भात आणि इतर स्वादिष्ट जेवण करायला जायचो.

डब्ब्याची सुट्टी झाली की डब्ब्यातले लवकर संपवून लगेच अन्न वाटणाऱ्या बाईंकडे जायचो मग कधी खिचडी तर कधी भाजी भात घाऊन मज्जाच यायची.

असे आमचे बालपण तर फक्त मज्जाच करण्यात गेले आणि पाच वर्षाचा झाल्यावर मला आई वडील शहरात त्यांच्याकडे घेऊन गेले. मग तेथे माझा प्रवेश बाफना विद्यालय मध्ये 1 लीच्या वर्गात केला. पाहिलीत गेल्यावर माझे काही अजून नवीन मित्र झाले आणि मुख्य तर आपण ज्या बाकळ्यावर ज्याच्या बाजूला बसतो तोच आपला पहिला मित्र होतो. असे करत गावातील सवय ही दूर झाली आणि शहरातील शाळेची सवय झाली पण शहरातील शाळेतही तसेच गावातील शाळेसारखे अन्न भेटायचे केव्हा खिचडी तर केव्हा डाळ भात, भाजी भात ते बघून मी हळु रमायला लागलो होतो.

परंतु खेड्या गावात शाळेत मुलं कमी असल्यामुळे शिक्षक मुलाला जवळ घेऊन देखील शिकवत पण शहरातील शाळेत मुलं जास्त असल्याने जसे की एका वर्गात पन्नास – शंभर मुल त्यामुळे शिक्षक फक्त पुढे फळा जवळून शिकवायचे आणि काहीवेळेस नाव धरून हाक देखील मारायचे.

त्या शाळेत माझा एक मित्र झाला होता ज्याने नाव लोकेश होते आमची खूप चांगली जोडी बसली होती. आम्ही एकाच बाकड्यावर बसायचो, सोबत डब्बा खायचो, एकाच गाडीत घरी जायचो. आणि हां जसे गावात शाळा जवळ असल्यामुळे मी पायी पायी मित्रांबरोबर जायचो परंतु शहरात शाळा दूर असल्यामुळे मी रिक्षावर जायचो. शाळेत जाण्यासाठी एक रिक्षा ठरलेली होती ते रिक्षावाले घरी येऊन घेऊन जायचे. आम्ही त्या रिक्षावाल्यांना काका म्हणून हाक मारायचो. तस आमच्या शाळेची देखील एक बस होती पण ती खूप जाम भरलेली असायची त्यात मुलं तर असायची पण शिक्षक देखील असायचे आणि ती बस उशिरा सोडायची जस जर शाळा 5 वाजता सुटली तर ते 6 वाजेपर्यंत सोडायचे कारण सर्व विद्यार्थ्यांना सोडत सोडत वेळ व्हायचा. त्यामुळे मी रिक्षातून यायचो जायचो कारण रिक्षा 15 ते 20 मिनटात मला घरी सोडायची.

त्या शाळेत जेवढी मस्ती करायचो तेवढंच आम्ही अभ्यास देखील करायचो कारण जर अभ्यास नाही केला तर मार बसायचा. ती शाळा फक्त पहिली ते चौथी पर्यंत होती. माझी चौथी झाल्यानंतर मी दुसऱ्या शाळेत गेलो.

तीन मजली इमारत, लाल आणि पांढरा रंग, हिरवेगार सौदर्य, आजूबाजूला स्वच्छ परिसर, समोर मोठे मैदान, पटांगण, आणि त्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर माझा पाचविचा वर्ग.

पाचवीत गेल्यावर माझी शाळा बदल झाली त्या शाळेचे नाव होते संत गाडगे बाबा विद्यालय. तेथे माझे अजून नवीन मित्र झाले परंतु तेथेही लोकेश माझ्यासोबत होता. ती शाळा खूप मोठी होती शाळेसमोर शाळेचे मोठे पटांगण होते त्यावर आम्ही खूपसारे खेळ खेळायचो. क्रिकेट, खो खो, कबड्डी, आबाधोबा, पकडा पकडी, आणि अजून भरपूर खेळ खेळायचो.

मला अजुन देखील आठवतंय ते शाळेचे दिवस आणि त्या मैदानावरील आबधोबा खेळ तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही किंवा तुमच्या येथे ह्या खेळाला काय म्हणतात येही माहीत नाही, तर ह्या खेळात कपड्यांच्या तुकड्यांनी किंवा प्लास्टिक वगैरे टाकून त्याचा एक चेंडू तयार केलेला असतो. सुरुवातीला आबा धोबा तीबा असे बोलतात तेवढ्यात सर्वजण दूर दूर पडून जातात आणि एक दुसऱ्याला मारतात. ज्याच्याकडे तो चेंडू आला तो जवळील मुलाला मारतो अस तो खेळ चालूच असतो. पण जर ज्याला तो चेंडू सापडला आणि कोणी जर त्याच्या जवळ आहे तर वेगळीच मज्जा यायची.

शिक्षक ही खूप चांगले होते जेव्हा ते मारायचे तेव्हा खूप वाईट वाटायचे आणि राग देखील यायचा पण त्यांच्यामुळेच मी आज एवढा हुशार आहे. तसेच आमच्या शाळेत भोसले बाई होत्या, बोरसे सर, महाले सर, ई होते आणि ते आम्हाला हसत खेळत शिकवायचे.

अभ्यासाची गोष्ट केली ते अभ्यास ही केलाय, मज्जा ही केलीय, मार पण खाल्ल्यास. गृहपाठ च्या वेळेस शिक्षक एक विद्यार्थाला उभ करून विचारायचे आणि जर कोणी घरचा अभ्यास पूर्ण केलेला नसेल तर मग त्याला दोघी हातांवर पाच पाच छडया मिळायच्या, मीही भरपूर वेळेस छडीचा मार खाल्लाय.

शाळेचा परिसर देखील खूप सुंदर होता, आजूबाजूला सुंदर सुंदर झाडे होती आणि आम्ही देखील खूप सारे झाडे लावली होती जसे पेरू, अंबा, डाळिंब, आवळा, गुलाब, जास्वंद, झेंडू.

होळीच्या दिवशी आमच्या शाळेत देखील होळी व्हायची त्यात आम्ही लाकडे नाही आणायचो कारण आमचे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना पटांगणावरील आणि शाळेच्या परिसरातील कचरा गोळा करून तो एका ठिकाणी गोळा करायला सांगायचे. नंतर त्याच कचऱ्याची होळी आमच्या इथे करायचे अशी टाकाऊ पासून टिकाऊ होळी आमच्या शाळेत व्हायची.

आमच्या शाळेच्या जवळील परिसरात खूप सारे सुंदर झाडे होती जसे आवळा, पेरू, बोर, चिंच परंतु ते झाडे कोणा ना कोणाच्या घराजवळ, कोणाच्या जागेवर होती त्यामुळे ते आम्हाला तोडू देत नसे. पण शाळेतील विद्यार्थी तर आपल्याला माहीतच असतील कसे ना कसे करून काम करूनच घेतात. तसेच मग गुपचूप आवाज न करता फळे तोडून आणायचो पण जर कोणी त्या झाडाच्या मालकाला सापडला तर मग त्याला मार पडायचा किंवा तो मालक येताच सर्वजण पळून जायचे. जास्त मार तर आम्ही आवळासाठी खाल्ला आहे कारण तो मालक आमच्यावर लक्ष ठेवायचा आणि जसे कोणी झाडावर चढले की खालून काठीने मारायचा किंवा जो कोणी दगड मारतच त्यांच्या मागे पाळायचा. परंतु आम्ही खाली हात कदाचितच आलो असणार नेहमी काही ना काही घेऊनच यायचो.

शाळेत जर काही कार्यक्रम असेल तर तेव्हा आमची खूप मज्जा असायची. जर कोणाची जयंती किंवा पुण्यतिथी असायची तेव्हा आमच्यापैकी कोणी ना कोणी नक्कीच भाषण मध्ये बाघ घ्यायचे. मीही भाषण मध्ये भाग घ्यायचो मला अजुनही आठवतंय लोकमान्य टिळकांची जयंती ला मी एक भाषण दिले होते त्यात माझा एक नंबर आला होता सर्वजण माझे अभिनंदन करत होते. जेव्हा आपल्याला बक्षीस मिळते तेव्हाचा आनंदच वेगळा असतो.

शाळेत असताना स्वप्न खूप बघायचो जर कोणी विचारले की बाळा मोठा होऊन काय होशील तर पोलिस होईल असे म्हणायचो पण जसजसा मोठा होत गेलो तसतसे स्वप्न आणि अपेक्षा वाढत गेल्या आणि ध्येय ही बदलत गेले पण 10वी पर्यंत मी माझे ध्येय निश्चित केले होते की मला लोकांची सेवा कण्यासाठी डॉक्टर किंवा फार्मसिस्ट व्हायचे आहे. त्यानुसार मी अभ्यास करू लागलो आणि ध्येय पूर्ण करण्याचे स्वप्न बघू लागलो.

5 वी ते 10 वी पर्यंत मज्जा ही केली, अभ्यास देखील केला आणि असे शाळेतील जीवन पार केले.

वरील निबंध कोणकोणत्या वर्गासाठी वापरू शकता

1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap