मांड्या कमी करण्याचे घरगुती उपाय: मांड्यांवरील चरबी कमी करण्याचे 12 अचूक उपाय

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला मांड्या कमी करण्याचे घरगुती उपाय सांगणार आहे. हे उपाय 100% प्रभावी आणि गुणकारी आहेत ज्याने आपल्या मांड्या आणि वजन कमी होईल.

सध्याच्या काळात माणसाला शारीरिक हालचाली होणारे काम नाहीये. सर्व काही बसून सुरू आहे आणि माणूस ही सर्व कामे करताना जंक फूड आणि फास्ट फूड यांचे सेवन देखील वाढले आहे. जेव्हा आपण अशा अन्नाचे सेवन करतो आणि आपल्याला शारीरिक हालचाली होतील असे काहीच काम नसते तेव्हा आपल्या शरीरात अनेक भागांवर चरबी वाढायला लागते. यातील सर्वात जास्त चरबी वाढते तो भाग म्हणजे पोट आणि नंतर तुमच्या मांड्या! या मांड्या कालांतराने चरबीचे खूप जास्त संचयन करतात आणि त्या कमी करणे देखील कठीण होऊन बसते.

आपण दररोज बसून काम नाही करत असे तुम्ही म्हणत असाल तरी देखील तासंतास सोफ्यावर पडून मोबाईल वापरणे, अनेक तास हालचाल न करता पुस्तके वाचणे ही देखील काही मांड्यांवर चरबी वाढण्याची कारणे आहेत. जर तुम्ही योग्य अन्नाचे सेवन करत असाल तर चरबीची समस्या जाणवत नाही परंतु सध्या आपण सर्व लोक जंक फूडच्या दिशेने वळलो आहे. त्यामुळे आपल्याला या समस्या जाणवत आहेत.

आधीच्या काळात फास्ट फूड नव्हते असे म्हणायला काही हरकत नाही. त्यावेळी या समस्या देखील कमी होत्या. परंतु आता जीवनशैली बदलली आहे. काम जास्तीत जास्त सुखकर झाले आहे. शारीरिक त्रास होईल अशी कामे मुळीच नाहीत. त्याशिवाय आता घरात बसून किंवा ऑफिस मध्ये बसून कामे करावी लागतात. सर्व काही कामे ही बैठी असल्याने शरीरावर चरबीचे प्रमाण वाढू लागले आहे. आपण बघितले तर आपल्या शरीराची खूप कमी प्रमाणात हालचाल होते. याचा परिणाम असा होतो की आपल्या शरीरावर चरबी साठत जाते. पुढे आपली हालचाल न झाल्याने किंवा आपण व्यायाम जर करत नसलो तर मग ही चरबी वाढून आपले वजन कंट्रोलच्या बाहेर वाढते.

आपल्याला असे वाटते की मी तर जास्त बसत नाही मग तरी माझी चरबी का वाढते? थांबा ते पण सांगतो. तुम्ही जंक फूड खाता हे तर मान्य असेलच. ऑफिस मध्ये बराच काळ खुर्चीवर बसता की नाही? घरी आल्यावर थकलेले असल्याने सोफ्यावर किंवा बेडवर आडवे पडून राहता की नाही? तुम्ही स्थिर शरीर ठेवून एका जागेवर अनेक तास एकाच स्थितीत राहिलात तरी देखील चरबी वाढण्याची समस्या होते. चरबी ही पोटावर आणि मांडीवर जास्त प्रमाणात साचते.

शहरातील लोक व ग्रामीण लोक आणि चरबी

आपण जर खेड्याकडे गेलो आणि बघितले तर तिथले लोक आपल्याला सडपातळ आणि काटक दिसतात. त्यांचा शरीर बांधा हा खूप चांगला असतो कारण त्यांचा आहार देखील पोषक आणि सकस असतो. तसे बघितले तर त्यांनी जंक फूड जरी खाल्ले तरी देखील त्यांचे कष्ट इतके असतात की त्या कॅलरी ते बर्न करू शकतात. आपण असे कधी नसेल बघितले की त्या लोकांचे पोट सुटले आहे किंवा त्यांना वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. त्यांना सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कष्टाची आणि घामाची कामे करावी लागतात. या घामातून त्यांच्या शरीरातील पोषक नसलेले घटक देखील बाहेर पडतात.

तुम्हाला पण घाम येतो ना? पण कधी, बसून बसून गरम व्हायला लागल्यावर! या घामातून काही कॅलरी बर्न होत नसतात. शहरातील लोक हे रात्री खूप वेळ जागून मोबाईल मध्ये काहितरी करत असतात किंवा लॅपटॉप वर तरी कामे करत असतात. त्यांची सकाळ देखील उशिरा सुरू होते आणि रात्र तर खुल उशिरा संपते. शरीराला ते योग्य वेळेत योग्य आराम देखील देत नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्या शरीरावर चरबी वाढते.

आपण चरबी कशी वाढते याची कारणे आणि समस्या जाणून घेतली. चला तर मग आता मांड्यांवर असलेली चरबी कमी करण्यासाठी काही उपाय देखील जाणून घेऊयात.

मांड्या कमी करण्याचे उपाय – How to Reduce Fats on Thighs

आपण एखाद्या कार्यक्रमात गेलो किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी गेलो तरी देखील आपल्या मांड्यावर चरबी वाढलेली असेल तर ती लोकांच्या लगेच लक्षात येते. आपला आत्मविश्वास चांगला ठेवायचा असेल तर आपले शरीर देखील त्या दृष्टीने चांगले असायला हवे. आज आम्ही तुमच्यासाठी काही मांड्या कमी करण्याचे उपाय घेऊन आलो आहोत. तुम्ही जर यांचा अवलंब केला तर लवकरच तुमच्या देखील मांड्यांवरील चरबी कमी होऊन तुम्हाला परिणाम बघायला मिळतील.

जंक फूड/ फास्ट फूड खाणे थांबवा

Mandya Kami Karnyache Upay Stop Junk Food

तुम्हाला सर्वात पहिले काय करायचे आहे तर ते म्हणजे जंक फूड तुम्ही खाऊ नका. हो कारण तुम्ही बाकी सगळं काही करणं थोडं कठीण जाईल परंतु हे तुम्ही सहज करू शकता. यामध्ये तेलात तळलेले पदार्थ देखिल तुम्हाला खायचे नाहीयेत. बाहेर मिळणारे वडे, समोसे, पिझ्झा, बर्गर आपण खाणे टाळले पाहिजे. घरात देखील जे तेलकट पदार्थ बनवतात ते खाणे तुम्ही टाळले पाहिजे.

सकस व पौष्टीक आहार घ्यावा

Mandya Kami Karnyache Upay Nutrition

जंक फूड थांबवून आपले जेवण हे नियमित आणि वेळेवर सुरू करावे. यामध्ये तुम्ही पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये, डाळी, दुग्धजन्य पदार्थ इत्यादीचे सेवन करू शकता. आपले अन्न देखील आपल्याला चरबी वाढण्यापासून थांबवू शकत. यात तुम्ही काय खाता यावर जास्त भर देण्यापेक्षा तुम्ही खाताय ते सकस आणि पौष्टिक आहे किंवा नाही हे नक्की बघता जा.

व्यायाम

आपल्या शरीराची हालचाल होत नसल्याने आपल्याला व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करताना सकाळी उठून 2 ते 3 किलोमीटर तरी चालले पाहिजे. जेवहा तुम्ही चालत असता तेव्हा तुमच्या अंगातून घाम बाहेर आला पाहिजे. त्यानंतर काही वेळ तुम्ही दोरीउडया देखील मारू शकता. दोरीउडया मारताना तुम्हाला तुमचे शरीर जास्तीत जास्त उंच उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि यासाठी पायावर जास्त दोर दिला गेला पाहिजे. तुम्ही रनिंग सोबत सायकलिंग आणि पोहणे या गोष्टी देखील करू शकता. यातून देखील तुम्हाला लवकर मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी मदत होईल.

याशिवाय हालचाल करत जावी. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल तर ती तुम्ही स्वतः उठून घेत जावी जेणेकरून तुमच्या शरीराची हालचाल होईल व तुमच्या मांड्या या लवकर कमी होतील. जर तुमचे काम हे सतत बसून असेल तर शक्य झाल्यास मध्ये काही वेळ उठून एखादा फेरफटका नक्की मारून या. तुम्ही जर जिम ला जात असाल तर तिथे प्रशिक्षकाकडून मांड्या कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करायचे असतात हे जाणून घेऊन त्यावर जास्त भर द्या.

तुम्हाला यासाठी काही व्यायाम सांगतो आहे ते तुम्ही करू शकता. परंतु हे व्यायाम करण्याआधी तुम्हाला काही त्रास असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बर्पीस

Mandya Kami Karnyache Upay Burpees

बर्पीस हा व्यायाम मांड्या कमी करण्यासाठी उत्तम व्यायाम आहे आणि सोबतच पोट कमी करण्यासाठी ही योग्य आहे.

आधी आपण उभे राहायचे आहे नंतर हाथ वर करून उडी मारून स्क्वॉट करत खाली येऊन आपले दोघी हात जमिनीवर ठेवायचे आहे. दोघी हाथ जमिनीवर ठेवल्यानंतर उडी मारून पाय झटक्यात मागे घायचे आहे. नंतर पुन्हा आधीच्या स्थितीत यायचे आहे म्हणजे पाय पुन्हा पुढे घ्यायचे आहे. मग उभे राहून दोघी हात वर करून एक उडी मारायची आहे, हे पुन्हा पुन्हा करा 15 मिनिट.

वन लेग सर्कल एक्सरसाईज

Mandya Kami Karnyache Upay One Leg Circle

चटई किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला आधी सरळ झोपायचे आहे. त्यानंतर दोन्ही पाय हे गुढग्यात वाकवून दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत. आता तुम्ही कोणताही एक पाय उचलून त्याला घड्याळाच्या दिशेने आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवावे. तुम्ही हे तुम्हाला शक्य आहे तितक्या वेळा करू शकता. याने पायाची चरबी कमी होते आणि पायाला ताकद देखील मिळते.

सायकलिंग

Mandya Kami Karnyache Upay Cycling

ही एक्सरसाईज तुम्ही इंडोर आणि आऊटडोर दोन्हीकडे करू शकता. तुमच्याकडे व्यायामाची सायकल असेल तर ती वापरा किंवा सायकल खरेदी करा. सायकल मुळे रनिंग आणि पोहोण्यापेक्षा जास्त पायांचा व्यायाम होतो. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्ट्रेस हा पायावर देत असल्याने तुमच्या पायाचे स्नायू मजबूत होतात व मांड्यावर असलेली चरबी खूप लवकर कमी व्हायला लागते.

स्क्वाट्स

Mandya Kami Karnyache Upay Squats

स्क्वाट्स हा सर्वात उपयोगी व्यायाम आहे.कारण याने चरबी तर कमी होतेच परंतु आपले शरीर शेप मध्ये देखील यायला मदत होते. यात तुम्हाला कोणत्याही उपकरणाची गरज नाहीये. फक्त पायांमध्ये अंतर ठेवून उभे राहा. त्यानंतर हात चेहऱ्यासमोर आणून मग गुडघ्यात वाकून खाली जा आणि पुन्हा सरळ उभे रहा. यामध्ये तुम्हाला हा व्यायाम जितका जास्त वेळा शक्य आहे तितका करावा. याने चरबी लवकर जाते आणि मांडयासोबत नितंब देखील आकार घ्यायला लागतात.

यामध्ये तुम्ही पायांमधील अंतर अधिक जास्त वाढवून देखील हा व्यायाम करू शकता. याला सुमो स्क्वाट्स असे म्हंटले जाते.

जम्पिंग जॅकस

Mandya Kami Karnyache Upay Jumping Jacks

हा व्यायाम म्हणजे सर्वात सोपा व्यायाम आहे. हा तुम्हाला कधीही करता येऊ शकतो. तुम्हाला सरळ उभे राहून उडी मारायची आहे. उडी मारण्याच्या आधी तुम्ही सावधान स्थितीत असता परंतु उडी मारताना तुम्ही पायातील अंतर वाढवता आणि हात वर नेऊन वृक्षासन करतो त्या स्थितीत जाता. आता पुन्हा दुसरी उडी मारताना हात खाली आणले जातात व पाय देखील एकमेकांच्या जवळ येतात.

एरोबिक्स

Mandya Kami Karnyache Upay Aerobics

हा प्रकार तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीराची चरबी कमी करण्यासाठी मदत करेल. याच जास्तीत जास्त फायदा हा मांड्यावर होतो. एरोबिक्स मध्ये आता अनेक प्रकार आहेत. आपण याचे कुठेही क्लास लावू शकतो. आपण ज्या सर्व एक्सरसाईज बघितल्या त्या सर्व या एरोबिक्स क्लास मध्ये करून घेतल्या जातात त्यामुळे हा एक तुमच्यासाठी चांगला उपाय आहे.

पायऱ्या चढणे

Mandya Kami Karnyache Upay Stairs Up

पायऱ्या चढणे आणि उतरने हा देखील एक व्यायाम आहे. तुम्ही जर दररोज थोडा वेळ काढून हा व्यायाम केला तर तुम्हाला लवकरच फरक दिसू लागेल. तुम्हाला यासाठी वेळ मिळत नसेल तर कमीत कमी घरी आल्यावर आणि ऑफिस मध्ये गेल्यावर लिफ्ट न वापरता पायऱ्यांचा वापर करा. जेणेकरून तुमचा व्यायाम देखील होईल व तुम्हाला यासाठी वेगळा असा वेळ देखील काढावा लागणार नाही.

पाणी पीत राहा

Mandya Kami Karnyache Upay Drinking Water

आपल्याला जर चरबी जास्तीत जास्त लवकर कमी करायची असेल तर शक्य तितके पाणी दिवसभर पित राहा. यामध्ये तुम्हाला हवे तितक्या वेळा तुम्ही थोडेथोडे का होईना पण पाणी पिले पाहिजे. तुम्हाला पोटाचे आजार असतील किंवा तुम्हाला वजन कमी करायचे असेल तरी देखील डॉक्टर सुद्धा हा सल्ला देतात कारण याने आपले वजन कमी व्हायला खूप मदत होते. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपल्या लिव्हरला जर चरबीचे ऊर्जेत रूपांतर करायचे असेल तर त्याला त्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते आणि आपण जर ते पाणी त्याला दिले तर आपली चरबी कमी करण्यास लिव्हर देखील आपल्याला मदत करेल.

निवांत आणि शांत अशी पूर्णवेळ झोप

Mandya Kami Karnyache Upay Better Sleep

आपल्याला वजन कमी करायचे असो किंवा वाढवायचे असो आपल्याला निवांत झोप ही खूप महत्वाची असते. यामध्ये शहरात सध्या झोप घेण्याची वेळ आणि प्रमाण हे खूप कमी होत आहे आणि याचाच परिणाम चरबी आणि वजन वाढण्यावर होतो आहे. झोपताना तुम्ही कमीत कमी अर्धा तास आधी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बंद ठेवले पाहिजे जेणेकरून झोप ही शांत लागते व डोळे दुखत नाहीत. झोपण्यापूर्वी तुम्ही हळद टाकून दूध घेतल्यास शांत झोप येण्यास मदत होते.

निष्कर्ष

आज आपण या लेखाच्या माध्यमातून मांड्या कशा कमी कराव्यात आणि मांड्या कमी करण्याचे उपाय बघितले आहेत. आपल्याला हा लेख कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा. लेख आवडला असेल आणि उपयोगी वाटला असेल तर आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना हा लेख नक्की शेअर करा!

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

1 thought on “मांड्या कमी करण्याचे घरगुती उपाय: मांड्यांवरील चरबी कमी करण्याचे 12 अचूक उपाय”

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap