मराठी प्रेम पत्र | Top 3 marathi love letter | Marathi prem patra

प्रेम म्हणजे काय असते हे तर फक्त आपले आई वडील आणि आपल्या प्रिये कडून अनुभवायला मिळते. आपल्या प्रेमाला प्रेम पत्र लिहायचे असेल तर आपण marathi love letter असे सर्च करत असाल परंतु तुम्हाला आपल्या मनासारखे prem patra सापडत नसेल त्यामुळे मी आज आपल्यासाठी सुंदर मराठी प्रेम पत्र घेऊन आलोय.

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला मराठी प्रेम पत्र (Marathi Prem Patra) सांगणार आहे. ह्या पत्रांच्या मदतीने आपण नक्कीच आपल्या प्रीयकेला किंवा प्रियकाला प्रभावित करू शकता.

👉 नक्की वाचा: 100+ Love मराठी शायरी

खाली आपल्याला Top 3 Love Letters In Marathi मिळतील.

मराठी प्रेम पत्र 1 | Marathi Love Letter

माझ्या प्रिय प्रेमास,

तू माझे पहिल आणि शेवटचं प्रेम आहे,
तू माझे सुंदर जग आणि माझे संपूर्ण जीवन आहे,
तू नसलीस की माझे जगचं हरवल्यासारखे वाटते,
24 तास माझ्या मनात तुझाच विचार असतो,
एवढी स्तुती करून देखील अजून खूप काही सांगायचे आहे असे वाटते.

आजही तुझी आठवण आली की चेहऱ्यावर एक सुंदर हास्य येते कारण त्या वेळेस आपले एक एक क्षण मला आठवतात.

जेव्हा तू जवळ असते ना तेव्हा असे वाटते की तुझ्याशी किती बोलावे पण जेव्हा मी तुझ्या जवळ येतो तेव्हा काय बोलावे तेच समजत नाही, फक्त तुझ्याकडे पाहत राहावे असे वाटते. आणि जेव्हा तू दूर जाते मग तेव्हा मनात खूप गोष्टी येतात की तुझ्याशी हे बोलावे, तुला त्या गोष्टी सांगाव्या, तू भेटली की तुझ्याशी खूप काही बोलावे जणू तुझ्याशिवाय मी अर्धवटच आहे.

प्रेम म्हणजे काय असते हे मला फक्त तुझ्याशिवाय कोणी दुसरे समजावू शकत नाही, लहानपणी मला प्रेम काय असते हे तर माहिती नव्हते पण तेव्हा मला जगातील सुंदर प्रेम माहीत होते ते म्हणजे आईचे प्रेम.

मला माफ कर पण तुझ्या आधी मी माझ्या आईवर प्रेम करतो कारण सर्वात आधी प्रेमाची व्याख्या आईने न सांगताच मला समजली होती. परंतु मी तुला वचन देतो की आई वडील नंतर जर मी कुणावर प्रेम आणि विश्वास केला असेल तर ती व्यक्ती फक्त तूच आहे.

तुला आठवतंय तो क्षण जेव्हा आपण दोघे फिरायला गेलो होतो आणि तेथे एक रम्य वातावरण निर्माण झाले होते जसे की ते फक्त आपल्या दोघांसाठीच झाले असावे. तेथे फक्त आपण दोघेच होतो, तो तुझा माझ्या हातात हात, माझ्या खांद्यावर तुझी मान आणि ते तुझे गोड शब्द तुझ्या ओठांना स्पर्श करून माझ्या कानावर पडत होते जणू ते फक्त माझीच वाट पाहत आहेत. तो क्षण माझ्या जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण आहे.

तुझच प्रेम

मराठी प्रेम पत्र 2 | Love Letter In Marathi

प्रिय,

कशी आहेस,
तुझी तब्येत तर बरी आहे ना,
आपली काळजी तर घेते ना.

काय करू तुझी खूप आठवण येते आहे, ये ना परत एकदा भेटायला त्याच ठिकाणी.

खूप काही बोलायचे आहे तुझ्यासोबत परंतु काय करू तेच समजत नाही. खूप काळ गेलाय तुझ्याशी बोलून काय करू तुझी खूप खूप आठवण येत आहे. आता तर फक्त तुझा फोटो च आहे जो माझा सहारा बनलेला आहे कारण खूप काळ गेलाय तुला बघुन.

किती आश्चर्यकारक आहे ना हे प्रेम, वाटलं नव्हतं की आपल्यात एवढे प्रेम वाढेल आणि जीवनाचा एक एक क्षण तुला बघण्यासाठी तरसेल.

जेव्हा कोणी विचारात कधी आहेस तू तेव्हा ओठांतून आपोआप शब्द बाहेर पडतात जणू त्याच वेळेची मी वात पाहत होतो. जेवढी स्तुती तुझी करता येईल तेवढी करतो पण काय करू तरी सुद्धा खूप वेळ घेतो.

कधी काळी मलाच समजत नाही की मी माझ्या भावना तुझ्यासमोर कश्या स्पष्ट करू परंतु तुझे ते कातील डोळे बघून ते ही सहज जमत, परंतु आता ते देखील बघायला मिळत नाही काय करू तेच समजत नाही. तुझ्या बद्दलच्या भावना कुणासमोर सांगू हेच कळत नाही आणि आता तर कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू तेही सुचत नाही.

तू जवळ होती तेव्हा प्रेम काय असते हे समजले आणि तू दूर गेल्यावर आठवण काय असते हे समजले. दिवसभर तुझीच आठवण काढत असतो, ह्या वेळ्या मनाला देखील समजावते की आता तरी बसं कर परंतु समुद्रातील पाणी आटने संभव आहे का.

आजही मला आठवण आहे जेव्हा मी तुला पहिल्या वेळेस बघितले होते आणि माझे मन आणि डोळे दोही जसे तुझे प्रेमी झाले होते. एक एक क्षण तुझ्याशी बोलण्याची संधी बघत होतो जेव्हा ती संधी जवळ आली तेव्हा मात्र माझे अंग कापत होते आणि काय बोलू तेही सुचत नव्हते. परंतु त्यानंतरचा आपला संपूर्ण प्रवास खूप छान ठरला.

हे प्रिये ये ना एकदा भेटायला खूप आठवण येतेय ग तुझी.

तुझ प्रेम

मराठी प्रेम पत्र 3 | Marathi Prem Patra

तुझ्या हातात माझा हात जणू भारताची सुंदरता काश्मीर,
माझे हृदय म्हणजे तुझे घर जणू काय ताजमहाल,
मी तुझे पाहिले प्रेम आणि तू माझा शेवटचा श्वास,
असे काही आहे आपले प्रेमाचे बंधन.

तू आहेस म्हणून मी प्रेम पत्र लिहीत आहे, कारण तुच आहेस जीला मी हक्काने आणि बिना घाबरता माझ्या मनातील सर्व काही सांगू शकतो.

जेव्हा तू समोर असतेस तेव्हा बरेच काही मनातील भावना व्यक्त होत नाहीत म्हणुन मी माझ्या भावना ह्या पत्राद्वारे तुझ्यापर्यंत पाठवत आहे.

प्रेमामध्ये प्रियकर प्रियकेला खूप सारे शब्द वापरतात जसे जानू, पिल्लू, बबड्या, शोना, बाबू, बेबी, बच्चा, डार्लिंग आणि नावाचे छोटे अक्षर. परंतु मी तुला हे शब्द फक्त कधी कधी च वापरतो आणि जास्त तर नावाने च हाक मारतो म्हणजे असं नाही की माझे तुझ्यावर प्रेम नाहीये किंवा कमी झाले आहे. उलट तुझे नाव घेताच माझा संपूर्ण दिवस खूप आनंदी जातो.

तुझ्याबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमी आहे परंतु जरीही कोणी मला तुझ्याबद्दल विचारले तर माझी तुझ्याबद्दल ची स्तुती संपता संपत नाही आणि मी वेड्यासारखा फक्त तुझ्याच गोष्टी करत असतो.

प्रेमाचा खरा अर्थ काय असतो हे मला तुझ्याकडून शिकायला मिळालं आहे, प्रेम म्हणजे तू आणि त्या प्रेमात पडलेला मी अशी आपली प्रेमाची व्याख्या आहे.

माझ्यासाठी ह्या जगातील सर्वात मोठी भेटवस्तू जर कोणती असेल तर ती फक्त तू आहेस, काय माहित की मी एवढा नशीबवान कसकाय आहे ज्याने मला तू मिळालीस. खरंच मला माहिती नाही मी तुझ्यासाठी काय आहे परंतु हां तू माझ्यासाठी ती भेटवस्तू आहे जिच्यामुळे मी रोज जगतो, श्वास घेतो, जगण्याची प्रेरणा मिळते.

सकाळी उठलो की लगेच फोन तपासतो आणि तुझा मेसेज बघतो की आलेला आहे की नाही आणि बसं त्याचीच वाट बघत असतो.

मला माफ कर माझ्या रागामुळे जो मला लगेच येतो परंतु मी त्यावर देखील हळु हळू नियंत्रण करतो आहे.

रोज खूप मेहनत करतो आणि पुढच्या करिअर बद्दल विचार करतो ज्याने भविष्यात मी तुला एक आनंददायी जीवन देऊ शकेल, तुझे घरचे स्वतःहून तुझा हात माझ्या हातात देतील. जीवनात जास्त श्रीमंत तर नाही व्हायचय परंतु तुला सन्मानाने जगण्याचा अधिकार देईल.

तुझा प्रियकर

निष्कर्ष

प्रेम पत्र म्हणजे फक्त काहीही लिहून मोकळे होणे नाही तर आपल्या प्रेमाबद्दल आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त करणे होय.

प्रेम पत्रामध्ये आपल्या प्रेमाची जास्तीत जास्त स्तुती करा, तुमच्यातील काही प्रेमळ क्षण समाविष्ट करा. प्रेम पत्र हे तुमच्या हृदयातून थेट कागदावर उतरले पाहिजे. म्हणून आपल्यासाठी मी घेऊन आलोय Marathi Love Letter.

मला खात्री आहे की आपल्याला वरील मराठी प्रेम पत्र ( Marathi Prem Patra) नक्कीच आवडले असतील.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

1 thought on “मराठी प्रेम पत्र | Top 3 marathi love letter | Marathi prem patra”

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap