मासिक पाळी येण्यासाठी उपाय: मासिक पाळी लवकर आणि नियमित येण्यासाठी 12 अचूक उपाय

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला मासिक पाळी येण्यासाठी उपाय सांगणार आहे. हे उपाय 100% घरगुती आणि गुणकारी आहेत ज्याने आपल्याला पाळी नियमित आणि लवकर येण्यास मदत होईल.

आपल्या पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत आजही स्त्री आणि मासिक पाळी हा विषय खूप गैरसमज असलेला आहे. आपण 21 व्या शतकात वावरतो आहे तरी देखील आपण स्त्रियांना या काळात विटाळ आहे असं समजतो. देवाचे काम मग त्यात पूजा, एखादा समारंभ या ठिकाणी त्या स्त्रीने जाणे अशुभ मानले जाते परंतु आपण सध्या ज्या काळात वावरतो आहे त्यानुसार ही एक वैज्ञानिक क्रिया आहे आणि ही स्वाभाविक आहे. जर मासिक पाळी ही संकल्पना नसती ना तर तुम्ही आणि आम्ही देखील या जगात नसता ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी.

परंतु तरी देखील स्त्रिया अशा कार्यक्रमांमध्ये बाधा येऊ नये म्हणून त्यांची मासिक पाळी मागे पुढे करण्यासाठी काही गोळ्या घेत असतात. या गोळ्या घेऊन अनेक वेळा आपल्याला इतर आजारांचा सामना करावा लागतो त्यामुळे आज आम्ही आपल्याला मासिक पाळी आधी आणण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांचा अवलंब करून आपल्याला काही इतर त्रास होणार नाही आणि मासिक पाळी येईल.

मुलगी जेव्हा वयात येत असते त्यानंतर तिच्या योनीमार्गातून 3 ते 5 दिवस रक्तश्राव हा होतो. हा रक्तश्राव काय असतो तर जेव्हा पुरुषांचे शुक्राणू बीज हे स्त्रीच्या शुक्राणू बिजाशी एकरूप होत नाही तेव्हा ते 28 ते 35 दिवसाचे स्त्रीचे शुक्राणू बीज शरीराच्या बाहेर टाकले जाते. हे बीज त्यावेळी निरुपयोगी झालेले असते आणि त्यामुळे त्याला शरीराच्या बाहेर टाकणे गरजेचे असते.

मासिक पाळी येण्याआधीची लक्षणे- Symptoms Before Menstrual Cycle

1) बेचैन वाटणे, यामध्ये आपण घरगुती काम करत असताना देखील मन लागत नाही.

2) आपल्याला आपले शरीर हे अशक्त झाले आहे असे जाणवते. यामध्ये हातपाय दुखायला लागतात व ओटीपोटात देखील त्रास होऊ लागतो.

3) स्त्री नुसार हे लक्षण बदलतात परंतु एखाद्या स्त्रीला खूप जास्त झोप यायला लागते किंवा एखाद्या स्त्रीला झोपच येत नाही म्हणजे निद्रानाश होतो.

4) झोपेप्रमाणे एखाद्याला खूप जास्त भुक लागते तर एखाद्याला भूकच लागत नाही.

5) कधीकधी मासिक पाळी येण्याआधी अंगात कणकण भरते आणि डोके देखील दुखायला लागते.

6) स्तनांमध्ये त्रास व्हायला लागने आणि सूज येणे.

7) त्वचेचा रंग बदलणे आणि चेहऱ्यावर पिंपल्स येणे.

8) काही स्त्रियांना मासिक पाळी काळात उलट्या आणि जुलाब देखील होतात. अशक्तपणा असल्यास चक्कर देखील येते.

मासिक पाळी येण्यासाठी घरगुती उपाय – Home Remedies for Menstrual Cycles in Marathi

काही घरगुती फळे आणि पदार्थ आहेत ज्यांच्या मदतीने आपण आपल्याला हव्या त्या दिवशी मासिक पाळी आणू शकतो. त्यांचे सेवन तुम्हाला कसे करायचे आहे जेणेकरून तुम्हाला मासिक पाळी लवकर येईल ही देखील माहिती खाली आम्ही दिलेली आहे.

1) गूळ

आपण स्वयंपाक घरात वापरत असलेल्या गुळाला आयुर्वेदात खूप जास्त महत्व आहे. आयुर्वेदात गुळाला औषधी शर्करा म्हणून ओळखले जाते. गूळ तुम्ही दोन पद्धतीने घेऊ शकता जेणेकरून तुमची मासिक पाळी ही लवकर येण्यास मदत होईल. याशिवाय तुम्हाला जर मासिक पाळी येण्याआधी त्रास होत असेल किंवा चिडचिड होत असेल तर मग तुम्हाला गुळ खाऊन नक्कीच मदत होईल.

पद्धत 1- गुळाचे सेवन तुम्ही तिळाच्या बियांसोबत करू शकता. मिक्सर मधून या बिया आणि गूळ बारीक करून तुम्ही ही पेस्ट खाऊ शकता.

पद्धत 2- सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जर रात्रभर आले भिजवलेला ग्लासभर पाणी आणि त्यात थोडासा गूळ घेतला तरी देखील तुमची मासिक पाळी लवकर येण्यास मदत होईल.

2) पपई

पपई हे फळ उष्ण प्रकारातील आहे आणि त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील उष्णता वाढते. पपई या फळात कॅरोटीन नावाचे द्रव्य असते त्यामुळे स्त्रीच्या शरीरात असलेले इस्ट्रोजन हार्मोन उत्तेजित होण्यास मदत होते. हे इस्ट्रोजन हार्मोन तुम्हाला मासिक पाळी लवकरात लवकर आणायला मदत करते. तुम्हाला लवकर मासिक पाळी हवी असेल तर तुम्ही पपई या फळाचे सेवन केले पाहिजे, याने नक्की फायदा होतो.

3) डाळिंब आणि उसाचा रस

जेव्हा तुम्हाला एखाद्या महिन्यात मासिक पाळी लवकर हवी असेल तेव्हा त्या महिन्याच्या सुरुवातीपासून डाळिंब खायला तुम्ही सुरुवात करावी. यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा डाळिंबाचा रस घ्यावा. यात तुम्ही उसाचा रस देखील मिसळून घेऊ शकता. या दोन रसांचा फायदा असा होतो की ते इस्ट्रोजन हार्मोन जास्त लवकर बनवायला सुरुवात करतात आणि त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी लवकर येते.

4) गाजर, भोपळा

तुम्हाला आधीच सांगितले की कॅरोटीन कशा प्रकारे तुम्हाला मासिक पाळी लवकर आणण्यासाठी मदत करते. गाजर आणि भोपळा यासारख्या भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये कॅरोटीनचे प्रमाण चांगले असते. जर आपण त्यांचे सेवन केले तर मासिक पाळी नक्की लवकर येईल. गाजर खायला कंटाळा येत असेल तर त्याचा ज्यूस करून देखील तुम्ही सेवन करू शकता.

5) तीळ

तीळ गुळासोबत कसे घ्यावे हे आपण वर बघितले परंतु तुम्ही दररोज एक चमचा पाण्यासोबत देखील तीळ घेऊ शकता. साधारण तुम्हाला ज्या तारखेला मासिक पाळी यावी असे वाटते त्या तारखेच्या 15 दिवस आधी पासून याचे दररोज सेवन करावे.

6) मेथी व ओवा

मेथी आणि ओवा हे मासिक पाळी लवकर आणण्यासाठी मदत करतात. तुम्ही मेथी आणि ओवा हे मिक्सर मधून बारीक करून घेऊ शकता किंवा तसेच मेथी आणि ओवा हे ग्लासभर पाण्यात टाकून त्याचे सेवन केल्यास आपल्याला फायदा होईल. मासिक पाळी वेळेच्या आधी येईल.

7) जिरे

जिरे खाल्ल्याने देखील मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते. रात्रभर एका ग्लासात पाणी आणि एक चमचा जिरे हे भिजत ठेवावेत. नंतर या जिऱ्याचा अर्क त्या पाण्यात मिसळलेला असतो. मग दुसऱ्या दिवशी ते पाणी गाळून प्यावे. याशिवाय एक चमचा जिरे आणि थोडं मध यांचे सेवन केल्यास देखील मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते.

8) अननस

अननस हे फळ उष्णता वाढवत असते. तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात जर अननस या फळाचे सेवन केले तर तुम्हाला मासिक पाळी ही लवकर येईल.

9) पिंपळ

आता पिंपळ या झाडाची पाने तुम्हाला मासिक पाळी आधी आणण्यासाठी मदत करणार नाहीत परंतु नियमीत मासिक पाळी जर येत नसेल तर तुम्ही पिंपळाची पाने सेवन करू शकता. पिंपळाची पाने वाळवून त्यांची पावडर करावी आणि ही पावडर दुधासोबत ग्रहण करावी.

10) हळद

तुम्हाला नियोजित वेळेच्या 5 दिवस आधी मासिक पाळी आणायची असेल तर त्या पाच दिवस आधीच्या तारखेच्या 15 दिवस आधी पासून दररोज सकाळी एक चिमूटभर हळद ग्लासभर गरम पाण्यात टाकून ग्रहण करावी. याने मासिक पाळी 5 दिवस आधी येण्यास मदत होते.

11) भेंडीची पाने

एखाद्याला अनियमित मासिक पाळीच्या समस्याच असतील तर त्यांनी दररोज सकाळी उठून भेंडीच्या पानांचा रस आणि गावरान गाईच्या दुधापासून बनलेले दही यांचे सेवन करावे. याने आपल्याला काहीच दिवसात परिणाम दिसायला लागतात आणि तुम्हाला नियमित पाळी यायला सुरुवात होईल.

12) बडीशेप

ज्याप्रमाणे आपण जिऱ्याचे सेवन केले तसेच रात्रभर दोन चमचे बडीशेप पाण्यात टाकून सकाळी त्या पाण्याचे सेवन केल्यास मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते.

मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी – Care to take while Menstrual Cycles

1) मासिक पाळी दरम्यान आपल्याला आता मेंस्ट्रुअल कप वापरायला आहेत. त्यांचा वापर तुम्ही करू शकता.

2) मेंस्ट्रुअल कप नसतील तर स्वच्छ असे सॅनिटरी नॅपकिन वापरावे.

3) सॅनिटरी नॅपकिन वर त्याचा कालावधी दिलेला असतो तो साधारण 6 ते 8 तासांनी बदलत रहावा. जेणेकरून स्वच्छता राहते.

4) आपल्या शरीरावरील अवयव हे कोरडे व स्वच्छ नसतील तर तिथे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे तो भाग मासिक पाळीच्या काळात कोरडा ठेवावा.

5) मासिक पाळी दरम्यान रक्त हे जास्त पडत नाही जर एखाद्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त रक्तश्राव होत असेल तर वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

6) मासिक पाळीमध्ये जे अंगावरून पाणी जाते त्याचा रंग अधिक घट्ट पिवळट होत असेल आणि त्याचा दुर्गंध येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण वेळेनुसार पुढे जाऊन आपल्या आरोग्याला ही गोष्ट हानिकारक ठरू शकते.

7) मासिक पाळी दरम्यान अनेक स्त्रियांना त्रास होत असतो त्यासाठी त्यांनी घरात असलेल्या कुळीथ म्हणजेच हुलग्यांचे सेवन केल्यास त्याने त्यांना त्रास होत नाही.

8) मासिक पाळी दरम्यान संक्रमनची शक्यता ही खूप अधिक असते आणि स्त्रीला खूप जास्त त्रास होत असतो त्यामुळे शक्यतो शारीरिक संबंध टाळावेत.

9) दररोज व्यायाम केल्यास आणि पौष्टिक आहार घेतल्यास मासिक पाळी मध्ये होणारा त्रास हा कमी होत असतो.

10) आपण वापरलेले सॅनिटरी नॅपकिन हे एखाद्या कागदात गुंढाळून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.

निष्कर्ष

मासिक पाळी लवकर येण्यासाठी आपण या लेखात काही घरगुती उपाय बघितले. याशिवाय मासिक पाळीशी निगडित इतर माहिती देखील बघितली. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. लेख आवडला असेल आणि महत्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील स्त्रियांशी नक्की शेअर करा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap