हृदयस्पर्शी मातृ दीन भाषण मराठी | Mother’s Day Speech In Marathi

मातृदिन म्हणजेच साऱ्या जगातील आईंचा दिवस, खरतर त्या दिवशी ही त्यांना शांतता नसते हो ना. मातृदिन निम्मित भाषण देण्याचे ठरवले तर आपण आधी Mother’s Day Speech In Marathi असे सर्च करतात परंतु कदाचितच आपल्याला आपल्या आवडीनुसार भाषण सापडत असेल. हे लक्षात घेऊनच आम्ही आपल्यासाठी खालील सुंदर आईवर भाषण मराठी मध्ये दिले आहे.

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला मातृदिन भाषण मराठी सांगणार आहे. हे भाषण नक्कीच आपल्याला पहिला क्रमांक पटकावून देईल याची आम्ही खात्री घेतो.

हृदयस्पर्शी मातृ दीन भाषण मराठी | Mother’s Day Speech In Marathi

व्यासपीठावर जमलेले माझे आदरणीय गुरुजनांनो आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो आज मी आपल्याला मातृदिन निमित्त काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने एकावे अशी माझी नम्र विनंती.

मातृ शब्द आला की आपल्या डोळ्यासमोर आई आठवते परंतु तिची आठवण फक्त मातृदिन वेळेसच येते असं का. कारण तेव्हा सर्वजण आपापल्या आईचे कौतुक करत असता, तिच्याबद्दल बोलत असता तर त्यामुळे, नाही अगदी चुकीचे.

माणसाच्या जीवनातील पहिला गुरु, पहिली मैत्रीण, पहिली ओळख असलेली व्यक्ती म्हणजे आईचं असते.

माणसाचा जन्म होण्याआधीच त्याला 9 महिने ओळखणारी व्यक्ती म्हणजे आई असते कारण ती नऊ महिने बाळाला पोटात ठेवते. ते नऊ महिने पोटात एक जीव घेऊन जगायला देवाचे काळीज लागते म्हणून पृथ्वीवर देव रुपी आई असते.

तुम्हाला माहितीये जगातील सर्वात अधिक त्रास केव्हा होतो तो म्हणजे एका बाळाला जन्म देताना.

जेव्हा एक आई बाळाला जन्म देते तेव्हा ज्या वेदना होतात ना त्या वेदना म्हणजे 20 हाड फ्रॅक्चर झाल्या बरोबरचे असते. तर विचार करा त्या वेदना आणि आईचे प्रेम किती मजबूत आहे, हो हे तेच प्रेम आहे जे ह्या वेदनांना देखील सहन करण्याची क्षमता ठेवत.

लहानपणी जेव्हा मुलाचे डोळे उघडतात तेव्हा त्याच्यासमोर चेहऱ्यावर आणि मनात आनंद घेऊन वाट बघत बसलेली व्यक्ती म्हणजे आई असते. सर्वांना आपल्यात काही ना काही कमी दिसत असते कोणाला रंगात तर कोणाला चेहऱ्यात तर कोणाला दुसऱ्या कोणत्या अंगात परंतु आईचं अशी असते जिला आपण जगातील सर्वात सुंदर आणि गोंडस दिसत असतो. तिला तिच्या आधाराची काठी दिसत असते, तिला मनापासून जीव लावणारा व्यक्ती दिसत असतो.

सर्वात आधी आपल्या तोंडून शब्द बाहेर पडतो तो म्हणजे आई असतो आणि दुसरा शब्द म्हणजे बाबा असतो. जेव्हा हे दोघी शब्द सोबत मिळतात तेव्हा मुलाला असे वाटते की माझ्या सोबत सुपरहिरो आणि सुपरहुमन आहेत.

जीवनाच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला काही ना काही शिकायला मिळते परंतु त्यात चांगले वाईट गोष्टींचा अनुभव करून देणारे आपले आई वडिलच असतात. जीवनाची बाराखडी म्हणजेच जन्मल्यापासून तर मरेपर्यंत ची बाराखडी आपल्याला शिकवते एक वेळेस नाही तर दहा वेळेस समजावून सांगते कारण ती आपली पहिली गुरु असते.

मित्र आणि मैत्रिणी तर खूप भेटतात परंतु आई सारखी मैत्रीण आख्या जगात भेटत नाही कारण न सांगता आपल्या मनातील ओळखणारी व्यक्ती म्हणजे आई असते. जर आपल्याला काही अडथळा असेल किंवा काही समस्या असेल तर ती आपण नक्कीच निडर आईला सांगू शकतो आणि मला खात्री आहे की आई त्या गोष्टीचा मार्ग नक्कीच सांगेल. आई वडील मुलाचा चेहरा बघूनच सांगून देतात की काय झालंय त्याची तब्येत तर बरी आहे ना, आज दिवसभरात त्याचे कोणाशी भांडण झाले आहे का, त्याला कोणत्या गोष्टीची चिंता पडलीय का.

आई काय असते ह्याचा अर्थ तुम्हाला माहितीये? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्र्वर असा ह्या दोघी शब्दांचा संगम म्हणजे शाक्षात देव रुपी आई असते.

आई म्हणजे दुधावरची साय असते, गोठ्यातील वासराची गाय असते, मानव रुपी देव असते.

आजकालच्या युगात खूप सारे किस्से एकायला भेटतात जसे कोणी आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकले तर कोणी त्यांना ओळखण्यास नकार दिला. काय भेटते हो असे करून म्हणजे तुम्हाला ज्या व्यक्ती ने जन्म दिला, ज्या व्यक्तीमुळे तुम्ही आज ह्या जगात आहात आणि त्याच व्यक्तीमुळे तुम्ही आज इथं पावत आहात. त्याच मातेला तुम्ही असे वाळीत टाकलेल्या माणसासारखे वागणूक करतात. लाज वाटली पाहिजे अश्या माणसांना अरे लहानपणापासून तर मरणेपर्यंत तुझी साथ सोडणार नाही असे वचन करणारी आईला आज तुम्ही एका आता आलेल्या व्यक्तीमुळे, किंवा कोणाचं तरी एकूण वागण्यास मनाई करतात.

काय अपेक्षा असते हो त्या बिचाऱ्या आईची फक्त दोन वेळेस चे जेवण आणि दोन प्रेमाचे शब्द, जर शिळी भाकर देखील दिली तरी ती आनंदाने खाते आणि ते सुद्धा जर तुम्हाला जमत नसेल तर फक्त आपल्या बालपणाचे काही दिवस आठवा त्यावेळेस तुम्हालाच तुमची लाज वाटेल.

असं नाही की दरवेळेस आईचं बरोबर असते किंवा आईचं दरवेळेस चुकते, जर चुकत असेल तर समजावून सांगा ती तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही आणि जर बरोबर असेल तर समोरच्या व्यक्तीला आणि तुम्हा स्वतःला समजावून सांगा हे मात्र कठीण असेल.

“किती करावे कौतुक माझ्या आईचे तेही कमीच आहे कारण तिच्या मायेपुढे सर्व काही व्यर्थ आहे”.

निष्कर्ष

आई, माय, मदर, ममता, मम्मी अश्या अनेक शब्दांनी ओळखली जाणारी व्यक्ती म्हणजे आई असते आणि तो शब्द कानावर पडताच आपल्यासाठी धावून येणारी व्यक्ती देखील आईचं असते.

वरील मातृदिन भाषण मराठी मध्ये सांगितले आहे आणि हे भाषण शेअर करण्याच्या मागील हेतू फक्त एवढाच आहे की आईवर भाषण आपल्या मायबोलीत म्हणजेच आपल्या मराठी भाषेत मिळायला हवं म्हणून. आजकाल खूप सारे लेख, कविता, निबंध, भाषण आईवर लिहिले जातात परंतु जस्तातर सारखेच असतात त्यामुळे हे भाषण आम्ही फक्त आपल्यासाठी लिहिले आहे.

मराठी माणसं मातृदिन निमित्त mothers day speech in marathi असे नक्की सर्च करत असाल कारण ह्या दिवशी काही कमी वेळेत भाषण तयार करणे कठीणच. परंतु आईवर तर जेवढे लिहावे तेवढे कमी आहे पण कमी शब्दात महत्वाचे मुद्दे कसे लिहावे हेच बहुतेक जणांना समजत नाही त्यामुळे आम्ही हे भाषण लिहिले आहे.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap