नमस्कार मंडळी नवरात्रीचे नऊ दिवसांचे रंग 2021 मध्ये काय आहे हा प्रश्न आपल्याला पडलाच असेल परंतु 2021 ह्या वर्षी कोणते रंग असतील बर तर चला जाणून घेऊया.
ह्या नऊ दिवसांत रोज देवीला रंगानुसार साडी परिधान करण्यात येते त्यामुळे रंग मात्र जाणून घेणे अती महत्त्वाकांक्षी आहे.
आश्र्विनी महिन्यात मज्जा काय असते आणि देवभक्ती काय असते जाणून घ्यायचे असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसांत सहभागी व्हा. आणि खरी मज्जा तर तेव्हा येते जेव्हा तुम्ही नवरात्रीच्या नऊ रंगानुसार कपडे प्रधान करतात म्हणून Navratri Colours 2021 Marathi हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कपड्यांचे रंग कोणते आणि त्यांचे महत्त्व | Navratri Colours 2021 Marathi
हे फक्त रंग नसून तर नऊ दिवस देवीला कोणत्या रंगांच्या साड्या नेसवाव्या आणि त्याचबरोबर स्त्रियांनी देखील त्याच रंगांच्या साड्या नेसावे ज्याने घरात सुखशांती नांदते, निरोगी राहतात.
पहिला दिवस रंग पिवळा
पहिला दिवस 7 ऑक्टोबर वार गुरुवार रोजी देवीची शैलपुत्री म्हणून पूजा केली जाते आणि ह्या दिवशी देवीला पिवळा रंगाची साडी परिधान केली जाईल. 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापण आहे जो नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून आहे. ह्या दिवशी सर्व महिला देखील पिवळ्या रंगाची साडी परिधान करतील कारण स्त्री हे देविचेच रूप असते म्हणून घरातील देवीची देखील आदर करा आणि असा हा पहिला दिवस पूर्ण होतो आता पुढे.
दुसरा दिवस रंग हिरवा
दुसरा दिवस म्हणजेच 8 ऑक्टोबर वार शुक्रवार रोजी देवीची ब्रह्मचारिणी म्हणून पूजा केली जाते आणि ह्या दिवशी देवीला हिरव्या रंगाची साडी परिधान केली जाईल. त्याचबरोबर स्त्रियांनी देखील ह्या दिवशी हिरवा रंग परिधान करावा आणि देवीची पूजा करावी ज्याने त्यांना अजून लाभ होईल कारण मुळातच घरातील महिला देखील देवीचेच रूप आहेत.
तिसरा दिवस रंग राखाडी
तिसरा दिवस 9 ऑक्टोबर वार शनिवार रोजी देवीची चंद्रघंटा म्हणून पूजा केली जाते आणि देवीला राखाडी किंवा करडा रंगाची साडी नेसवली जाते आणि स्त्रियांनी सुद्धा राखाडी रंगाची साडी घालावी बर! कारण घरातील देवी सुंदर आणि योग्य राहील तरच देवीला पूजा पावते. नवरात्रीत गरबा घेतात आहात ना तर नक्की खेळा कारण यातच खरा आनंद आहे.
चौथा दिवस रंग नारंगी
चौथा दिवस 10 ऑक्टोबर वार रविवार रोजी देवीचे चौथे शक्ती रूप म्हणून कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आणि देवीला नारंगी रंगाची साडी परिधान केली जाते. ह्या दिवशी नारंगी रंग हा देवीवर आणि स्त्रियांवर खुलून दिसतो त्यामुळे सर्व घरातील महिलांनी नारंगी रंग अंगावर परिधान करायला हवा.
पाचवा दिवस रंग पांढरा
पाचवा दिवस 11 ऑक्टोबर वार सोमवार रोजी देवी युद्धाचे देव स्कंद आणि कार्तिक यांची माता म्हणून आली ज्याने पाचव्या दिवशी देवीला स्कंदमाता म्हणून पुजले जाते. ह्या दिवशी देवीला पांढरा रंगाची साधी परिधान करण्यात येते आणि स्त्रिया देखील पांढरा रंगाची साधी घालतात, पांढरा रंग शुभ चे प्रतीक मानले जाते. ह्या दिवशी पंचमी पूजा केली जाते जी महत्त्वपूर्ण मानण्यात येते कारण घरात सुखशांती, धनलाभ सुरळीत राहावे यासाठी ही पूजा करून देवीची आराधना केली जाते.
सहावा दिवस रंग लाल
सहावा दिवस 12 ऑक्टोबर वार मंगळवार रोजी देवीची मां कात्यायनी म्हणून पूजा केली जाते आणि देवीला लाल रंगाची सुंदर अशी साडी परिधान करण्यात येते. स्त्रियांनी देखील सहाव्या दिवशी लाला रंगाची साडी घालावी कारण हा रंग जवळजवळ सर्वच स्त्रियांनकडे असतो.
सातवा दिवस रंग निळा
सातवा दिवस 13 ऑक्टोबर वार बुधवार रोजी आपल्या पापापासून मुक्ती मिळावी म्हणून सातव्या दिवशी देवीची कालरात्री देवी म्हणून पूजा केली जाते. ह्या दिवशी देवीला गर्द निळ्या रंगाची साडी परिधान करण्यात येते आणि स्त्रिया देखील ह्या दिवशी निळ्या रंगाची साडी परिधान करतात.
आठवा दिवस रंग गुलाबी
आठवा दिवस 14 ऑक्टोबर वार गुरुवार नवरात्रीचा मुख्य दिवस दुर्गाष्टमी म्हणून ओळखला जातो. आपल्या नवऱ्याला लांब आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून स्त्रिया देवीचे आठवे शक्ती रूप महागौरी देवीची पूजा करतात. ह्या दिवशी लहान मुलींची देखील पूजा केली जाते कारण त्यांना देवीचे रूप मानले जाते. नवरात्रीच्या आठव्या दिवशी गुलाबी रणाचे वस्त्र देवीला परिधान केले जातात आणि स्त्रिया देखील गुलाबी रंगाची साडी नेसतात.
नववा दिवस रंग जांभळा
नववा दिवस 15 ऑक्टोबर वार शुक्रवार रोजी देवीची सिद्धिदात्री देवी म्हणून पूजा केली जाते कारण देवीचे हे रूप ज्ञानाचे दात्री आहे. जांभळा रंग ह्या दिवशी शुभ मानला जातो आणि विशेषतः ह्या दिवशी देवीला जांभळा रंगाची साडी परिधान करण्यात येते आणि स्त्रिया देखील जांभळा रंगाची साडी परिधान करतात.
असे हे नवरात्रीचे नऊ दिवस, नऊ दिवसांचे रंग आणि त्यांचे महत्त्व कारण फक्त रंग जाणून फायदा नाही तर त्या दिवशी कसली पूजा करतात, का करतात आणि आपण काय करायला हवे हेही जाणून घेणे अती आवश्यक आहे. नवरात्रीचे नऊ ही दिवस खूप प्रसन्न वातावरण आणि धमाल असते, सर्वत्र फक्त भक्तीचा आणि आनंदाचा क्षण असतो जो डोळ्यातही मावत नाही.
Navratri Colours 2021 Marathi हा लेख आपल्याला नक्की आवडला असले कारण आम्ही यात नवरात्रीचे नऊ दिवसांचे रंग 2021 मधले सांगितले आहे जे तुम्हाला ह्या 2021 मध्ये नक्कीच कामात येतील. तर वार दिलेले रंग जाणून घ्या आणि प्रत्येक दिवशी रंग बघून वस्त्र परिधान करा आणि देवीला देखील ह्याच रंगाची साडी परिधान करा.