शाळेत एक निबंध नेहमी विचारला जायचा तो म्हणजे पाऊस पडला नाही तर काय होईल. आणि आपल्या मनात त्याबद्दल काल्पनिक गोष्टी सुरू होतात आणि काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत तर ते जाणून घेऊया.
नमस्कार मंडळी आज मी आपल्याला एक मजेदार निबंध सांगणार आहे ज्याने आपल्याला नक्कीच शाळेत पैकी चे पैकी गुण मिळतील.
पाऊस आपल्या जीवनात एक मुख्य भूमिका निभावतो कारण पाणी शिवाय मनुष्य, प्राणी, पशू यांचे जीवन अशक्य आहे कारण आपण एक वेळेस अन्नाशिवाय राहू शकतो पण पाणी शिवाय तर अजिबातच नाही.
खालील निबंध कोणकोणत्या विषयांवर वापरू शकता
पाऊस पडला नाही तर
पावसाळा नसता तर
पावसाळा का नकोसा वाटतो
पावसाळा गोष्ट
👉नक्की वाचा: सूर्य उगवला नाही तर
👉नक्की वाचा: पर्यावरण निबंध मराठी
तर चला मित्रांनो आपल्या आवडत्या निबंधाला सुरुवात करुया.
पाऊस पडला नाही तर निबंध
रोजच्या सारखे मी संध्याकाळी शाळेतून येत होतो आणि तेव्हा अचानक मंद गतीने पाऊस सुरू झाला. त्या पावसाचे लहान लहान अलगद थेंब अंगावर पडत होते आणि मी पावसाचा आनंद घेत नाचत, खेळत जात होतो.
अर्ध्या रस्त्यात पाऊस जोराने सुरू झाला जसा की मुसळधार पाऊसच.
मी रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाखाली थांबलो. मला जोराची भूक ही लागली होती आणि तेव्हा मला पाऊस नकोसा वाटायला लागला.
मग माझ्या मनात विचार आला की जर पाऊस पडला नाही तर काय होईल? आणि त्या विचारात मी वावरायला लागलो.
जर जोरदार पाऊस पडला तर शाळेला सुट्टी फक्त घरी मजा करायची. आई, बाबा, दीदी आणि भाऊ सगळे घरी राहतील मग फक्त त्यांच्यासोबत घेळायच.
परंतु मागच्या वर्षी मुसळधार पावसाने शहरात धुमाकूळ घातला होता आणि खूप लोकांचे फार नुकसान झाले होते. कोणाचे घर कोसळले होते तर कोणाचे दुकान आणि महत्वाचे म्हणजे तर झाडे सुद्धा तुटून खाली पडले होते. आपणास माहीत असेल झाडे लहानाची मोठी होण्यासाठी काही वर्ष लागून जातात परंतु पावसाने त्यांना काही क्षणातच उभ्याचे आडवे केले. काही झाडे तर लोकांच्या अंगावर पडले त्यामुळे लोक जखमी झाले.
अश्या परिस्थितीत गरीब आणि श्रीमंत दोघींना नुकसान होते पण गरीबाला जास्त भोगावं लागतं.
एका बाजूस असा विचार आला की जर पाऊस नाही तर आपल्याला प्यायला पाणी कसे मिळणार. मनुष्य जिवंत कसा राहील.
पावसाळ्यात रंगीबेरंगी इंद्रधनुष्य दिसतो तो कसा दिसेल आपली पृथ्वी सुंदर कशी बनेल. पाणी नसल्याने झाडांना पोषण कसकाय मिळेल आणि मुख्य तर झाडे पाणीवरच जिवंत राहतात. आणि झाडे नाही तर मनुष्य नाही कारण झाडांपासूनच ऑक्सिजन मिळते.
झाडे नसली तर पृथ्वीवरील स्वर्गच हर्वल्यासारखे वाटेल, पृथ्वी हिरवीगार वाटणार नाही. जंगल बघायला मिळणार नाही आणि डोंगर, पर्वते तर जणू बिना कपड्यांचे आहेत असे वाटतील.
नदी नाले, तलाव, खोरे आणि समुद्र तर बघायलाच मिळाले नसते, सर्व कालांतराने आटून गेले असते. पृथ्वी आकर्षकच वाटणार नाही.
जर पाऊस नाही तर जीवन नाही कारण पाणी विना झाडे नाही ज्यामुळे फळ, फुल आपल्याला मिळणार नाही. पाण्याविना शेती शक्य नाही आणि जर शेती नाही तर आपल्याला खाण्यास अन्न नाही आणि अन्न नाही तर जगणं सोप नाही.
ज्यावेळेस पाऊस पडत नाही त्यावेळेस शेतात काय हाल होतात हे त्या शेतकरी ला विचारा कारण तो वर्षभर राब राब राबतो आणि शेवट पाऊसच पडत नाही तर त्याचे दुःख एका आईविना मुलासारखे होते.
आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि यात शेतीला जास्त मान आहे. जर पाणी राहणार नाही तर शेती होणारच नाही आणि शेती नाही तर भारत कृषीप्रधान देश कसा राहील.
पहिल्या पावसाचा जो आनंद असतो तो घेता येणार नाही. जुने लोक तर पहिल्या पावसाचे पाणी पितात कारण त्याने सर्व आजार दूर होतात. लहान मुलं तर पहिल्या पावसात एवढे खेळतात जणू त्यांना अमृतच दिसतंय. पाऊस हा एक अमृत पेक्षा कमी नाही त्यामुळे आपणास पाऊस नकोसा वाटायला नको.
पाऊस आल्यावर येणारा मातीचा सुगंध तो तर वेगळाच आनंद देतो, असे वाटते की दिवसभर फक्त मतीचाच सुगंध घेत बसावं.
पाऊस न पडल्याने जमिनीमध्ये पाणी जिरणार नाही आणि जमिनीची भूजल पातळीचे संतुलन बिघडेल आणि कालांतराने संपून जाईल. त्यामुळे जमिनीला भेगा पडायला सुरुवात होईल, जमीन शेती करण्याच्या लायकीची राहणार नाही आणि जी जमीन आपले एवढे भार उचलते तीच जर जिवंत राहणार नाही तर आपण कसे राहणार.
खरं तर पावसाची ही अवस्थाची काळजी न घेणे ही आपलीच चुकी आहे कारण जिथे गाव आणि नैसर्गिक घर, रस्ते होते तेथे आता सिमेंट आणि डांबरी रस्ते आली आहेत. ज्यामुळे पावसाच्या पाण्याला जमिनीत जिरण्यासाठी जागाच सापडत नाही आणि मग तेच नुकसानाचे कारण बनते.
त्यामुळे जर पाऊस पडलाच नाही तर हा विचार मनात येणे हीच गोष्ट चुकीची आहे. ज्या पावसाच्या पाण्यावर आपण जगतो, आपली पृथ्वी निसर्गरम्य राहते ती गोष्ट कशी नष्ट होऊ शकते, खरं तर आपलाच विचार नष्ट करायला हवा.
नंतर मी देवाला पार्थना केली की देव पावसाळा हा सण असाज आनंददायी राहू दे आणि मी त्या विचारांतून बाहेर आलो. आणि बघतो तर काय पाऊस थांबला होता मग लवकर घरी गेलो आणि आईला पावसात घेतलेला आनंद सांगितला.
निष्कर्ष
पाऊस पडला नाही तर काय होईल तर थोडक्यातच आपल्याला प्यायला पाणी मिळणार नाही, इतर कामांसाठी पाणी गरज भासते ती पूर्ण होणार नाही. पाण्याशिवाय अन्न पिकणार नाही कारण पाणी नाही तर पीक कसे उगेल आणि मुख्य तर बिचाऱ्या शेतकऱ्याचे तर हालच होतील असे समजा कारण तो शेतात पीक टाकणार नाही तर तो आणि आपण खाणार कसे.
हळूहळू नदी, नाले, खोरे, समुद्र, विहिरी, तलाव यांच्यातील पाणी आटून जाईल आणि काय होईल हे तर सर्वांनाच माहित आहे की पृथ्वीवर कोणीच जगणार आहे. सर्विकडे फक्त एक भयाण शांतता पसरेल आणि मानवी व प्राणी, पशू जीवन संपलेच समजा.