गावातील बापाने विदेशातील मुलाला लिहिलेले पत्र | Poor Father’s Letter In Marathi

बाप हा असा शब्द आहे जो माणसाला जगायला शिकवतो जणू त्याने त्याचा ठेकाच घेतला असावा. परंतु खूप वाईट वाटते जेव्हा तोच मनुष्य आपल्या बापाला ओळखण्यात चूक करतो. अश्याच एका गरीब बापाची कथा त्याने त्याच्या पत्राद्वारे मांडली आहे.

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला गावातील बापाने विदेशातील मुलाला लिहिलेले पत्र सांगणार आहे. हे पत्र वाचतांना आपले डोळे देखील भरून येतील परंतु मित्रांनो ह्या पत्रातून बोध घेण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा करतो. तर मग चला सुरू करू या एका बापाची कहाणी स्वतःच्या शब्दात.

गावातील बापाने विदेशातील मुलाला लिहिलेले पत्र | Poor Father’s Letter In Marathi

प्रिय मित्रा,

हे पत्र तुझ्यापर्यंत पोहोचते की नाही हे तर माहीत नाही कारण हे माझे तुझ्याशी शेवटचे बोल आहेत असे समजून घे आणि हा तुझा पत्ता जेवढ्या प्रयत्नांनी भेटलेला आहे तेवढ्या वरून वाटते की योग्य असेल.

मुला ओळखलस का तसे तर मी तुला मित्रा म्हणून हाक मारायचो कारण तू मला माझ्या मित्रापेक्षा कमी नव्हता. काय दिवस होते ते जेव्हा आपल्यात एका क्षणा एवढा अंतर पडत नव्हता परंतु आता तू दूर गेलीस की मी तुझ्यापेक्षा दूर आहे तेच समजत नाही. दूर तर तूच असावा कारण मला तुझ्यापर्यंत पोहचण्याची देखील भीती वाटते.

तुला नावाने हाक मारावी की मित्र म्हणावे की मुला म्हणून हाक मारावी ह्यातच माझा अर्धा तास गेला. आता वय एवढे झालंय की हातातील लेखणी ही थरथर करते आणि जर अक्षर वेडे वाकडे आले असेल तर माफ कर, करशील ना माफ.

सात वर्ष झाली त्या घटनेला ज्या दिवशी तू मला अमेरिकेला घेऊन जाण्याचे वचन दिले परंतु तू एकटाच विदेशात पोहचला पण मी तर इथेच राहिलो. आपल्यातील एवढे अंतर देवाने लिहिले होते का तूच लिहिले होते याचे उत्तर आजपर्यंत मी शोधत आहे, वेळ भेटला तर याचही उत्तर दे.

अजुनही आठवतोय तो दिवस तू मला सांगितले की बाबा तुम्ही आता खूप थकलेत आणि तुमच्याकडून आता कामे देखील होत नाही त्यामुळे मी तुम्हाला विदेशात माझ्याबरोबर घेऊन जातोय. मी खूप खूष होतो आणि तू म्हटल्याप्रमाणे तयारीत लागलो होतो परंतु माझी कात तयारी राहणार आहे तेच एक शर्ट आणि खाली धोतर दुसरं काय. दोन दिवसांनी आपण अमेरिकेला जाण्यासाठी गावातून शहरात गेलो आणि तिथे विमानतळावर गेलो. तेव्हा पुन्हा पुन्हा सांगत होता की बाबा हे काय वस्त्र घातलेत सर्वजण तुमच्याकडेच बघत आहेत पण तू विसरलास होता लहानपणी तुझी बहिण साडी घालण्याचा हट्ट करायची तर तू धोतर घालण्याचा हट्ट करायचा.

त्या विमानतळावर तू मला त्या चाहवाल्याच्या बाजूला सोडून गेला आणि म्हणाला बाबा मी पाच मिनटात आलो तुम्ही इथेच थांबा. मी एका वासारा सारखी तुझी वाट पाहत होतो पाच मिनिटांचा एक तास कसा होऊन गेला समजलंच नाही. त्या चाहावाल्याने विचारले आजोबा काही हवंय का मी मान हलवत नाही सांगितले. त्याने थोड्या वेळाने पुन्हा विचारले आजोबा कोणाची वाट बघताय का, मी हो मुलाची वाट पाहतोय असे म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांत तुला शोधत होतो पण तू घावेच ना. दुपार ची संध्याकाळ झाली त्या चहा वाल्याने मला विचारले की आजोबा तुम्ही आता घरी जा तुमचा मुलगा नाही येणार. हे एकूण मी सावराबावरा झालो आणि त्याला सांगितले नाही माझा मुलगा मला वचन देऊन गेलाय की तो मला अमेरिकेला त्याच्याजवळ घेऊन जाणार आहे. त्या माणसाने मला दिलासा दिला की आजोबा मी बघतो अमेरिकेला जाणारी फ्लाईट कितीला आहे पण जेव्हा तो परत आला तेव्हा तो म्हटला की आजोबा अमेरिकेला जाणारी फ्लाईट तर दुपारीच गेली. त्यात मी तुमच्या मुलाचे नाव देखील तपासले आणि तोही त्या फ्लाईट मध्ये बसून अमेरिकेला गेला आहे.

मला विश्वास होत नव्हता आणि एका बाजूस आक्रोश ही फुटत होता कारण काय करावे तुझा बाप तर गरीब होता, अडाणी होता परंतु मतलबी नव्हता. मी तर सर्वांना ज्ञानाचे धडे सांगायचो पण त्या दिवशी तीच अज्ञानी झालास. त्या चहा वाल्याने माझ्यासाठी पुन्हा दुकान उघडून नवीन चहा ठेवली आणि मला पाजली. त्यावेळेस माझ्या खिश्यात एकही पैसा नव्हता तेव्हा त्या माणसाने मला पुन्हा गावाला जाण्यासाठी पैसे दिले. परंतु आता पुन्हा गावाला कोणत्या तोंडाने जावे ते कळत नव्हते तरीही पुन्हा परत गेलो. मी खूप ठिकाणी तुझ्यासाठी एवढा वेळ थांबलोय जसे शिक्षणासाठी, शाळेत प्रवेश घेण्यासाठी आणि इतर ठिकाणी परंतु एवढे वाईट मला कधी वाटले जेवढे तेव्हा वाटले होते.

आजही रोज तुझ्या परत येण्याच्या आठवणीने मी व्याकुळ होत आहे आणि पण एका बाजूस तुला विसरण्याचा देखील प्रयत्न करतोय पण ते संभव होईल हे काही वाटत नाही. आज घरी एकटाच राहतो जेवढे होईल तेवढे काम करून जगतो आहे, वाटलं होत तुझी आधाराची काठी आहे पण आता लाकडी काठी पकडण्याची सुद्धा शक्ती नाहीये.

हे पत्र तुझ्या पर्यंत पोहचेल की नाही हे तर माहीत नाही कारण जेवढ्या प्रयत्नांनी तुझा पत्ता भेटलेला आहे तेवढ्याच शमतेने हे पत्र पाठवत आहे.

आणि हा माफ कर हे पत्र वाचून तुझा वेळ गेला असेल कारण तू खूप व्यस्त असशील.

तुझाच बाप, मित्र, लहानपणीचा जोडीदार,

लेखक: खुशवंत बोरसे

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap