नमस्कार मंडळी आज मी आपल्याला sachin tendulkar information in marathi सांगणार आहे. ही माहिती पूर्णपणे सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित आहे.
क्रिकेटच्या युगात आपले वर्चस्व निर्माण करणारा स्वतःतच एक महान व्यक्तिमत्व असणार आणि भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात त्याचे चाहते असणारा खेळाडू म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे.
क्रिकेट विश्वातील देव, शतकांचे शतक झळकवणारे, अनेक विश्वविक्रम स्वतःच्या नावावर करणारे, क्रिकेट विश्वात सर्वात जास्त धावा करणारे सचिन तेंडुलकर! निवृत्त झाले असले तरी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या कामगिरीने क्रिकेट विश्वात त्यांना देवाचे स्थान प्राप्त झालेले आहे. भारत सरकार कडून अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात एखाद्या खेळाडूला लोकप्रियता मिळाली असेल तर ते म्हणजे सचिन तेंडुलकर होय.
आज आपण या क्रिकेटमधील देवाविषयी म्हणजेच सचिन तेंडुलकर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. सचिन तेंडुलकर मराठी चरित्र, बायोग्राफी, बालपण, परिवार, पुरस्कार, रेकॉर्ड्स (Sachin Tendulkar Biography in Marathi, Information, Childhood, Family, Awards, Records) या विषयी आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
- नक्की वाचा: विराट कोहली माहिती मराठी
खालील टेबल मध्ये दिलेल्या टॉपिक वर क्लिक करून तुम्ही थेट त्या टॉपिक वर पोहचाल, म्हणजेच तुम्हाला शोधण्यास सोपे पडेल.
सचिन तेंडुलकर थोडक्यात माहिती - Sachin Tendulkar Quick Information In Marathi
संपूर्ण नाव (Full Name)- | सचिन रमेश तेंडुलकरलिटिल मास्टर, मास्टर ब्लास्टर, तेंडल्या |
टोपण नाव (Nicknames)- | लिटिल मास्टर, मास्टर ब्लास्टर, तेंडल्या |
जन्म दिनांक (BirthDate)- | 24 एप्रिल 1973 |
वय (Age)- | 48 वर्ष (2021) |
धर्म (Religion)- | हिंदू |
जात(Caste)- | ब्राम्हण |
राशी (Zodiac Sign)- | कुंभ |
मातृभाषा (Mother Tongue)- | मराठी |
राष्ट्रीयत्व (Nationality)- | भारतीय |
होमटाऊन (Hometown)- | मुंबई महाराष्ट्र |
क्रिकेट मधील रोल (Role)- | बॅट्समन |
बॅटिंग शैली (Batting Style)- | राईट हॅंडेड |
बॉलिंग शैली (Bowling Style)- | राईट आर्म लेग स्पिन, ऑफ स्पिन, मिडीयम पेसर |
शाळा (School)- | 1) इंडियन एज्युकेशन सोसायटी न्यू दिल्ली बांद्रा, मुंबई 2) शारदाश्रम विद्यामंदिर दादर, मुंबई |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)- | हायस्कूल |
निव्वळ रक्कम (Net Worth)- | ₹834 करोड (2021) |
सचिन तेंडुलकरचा जन्म आणि जन्म स्थान | Sachin Tendulkar Birth And Birth Place
जन्म तारीख (BirthDate)- | 24 एप्रिल 1973 |
जन्म ठिकाण (Birth Place)- | मुंबई, महाराष्ट्र |
सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्म हा 24 एप्रिल 1973 रोजी महाराष्ट्रात झाला. सचिन यांचा जन्म हा एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. तयांचे कुटुंब राजापूर मध्ये त्यावेळी स्थायिक होते. मुंबई मधील दादर येथे असलेल्या निर्मल नर्सिंग होम मध्ये त्यांचा जन्म झाला.
सचिन तेंडुलकरचे लहानपणीचे जीवन | Sachin Tendulkar Childhood Life
Credit: Instagram
सचिन कुटुंबातील सर्वात लहान सदस्य होता. त्याचे इतर दोन भाऊ आणि बहीण ही सावत्र भावंडे होती. रमेश तेंडुलकर यांनी पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर रजनी यांच्याशी विवाह केला होता. सचिन सर्वांचे लाडके असल्याने ते खोडकर देखील होते. साहित्य सहवास सहकारी गृहनिर्माण संस्था बांद्रा पूर्व इथे त्यांचे बालपण गेले. सचिन यांचा खोडकरपणा तिथल्या शेजाऱ्यांनी देखील अनुभवलेला आहे.
सचिन लहान असताना टेनिस जास्त खेळत होता. त्याने जॉन मॅकेनरो या टेनिस खेळाडूला आदर्श देखील मानले होते. जस जसे दिवस जात राहिले आणि सचिन मोठा होत गेला तशी त्याची क्रिकेट खेळाकडे रुची वाढायला लागली. ही गोष्ट त्यांचे मोठे बंधू अजित तेंडुलकर यांच्या लक्षात आली. अजित यांना सचिनची क्षमता कळली आणि त्यामुळे त्यांनी सचिनला क्रिकेट मध्ये पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले. अजितचे वय त्यावेळी समजत असलेले होते. अजित हा आधी क्रिकेट खेळत होता. याचाच फायदा घेऊन अजितने सचिनची ओळख एकलव्याशी करून दिली. शिवाजी पार्क मधील क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर हे सचिनचे गुरू बनले.
सचिन तेंडुलकरची शारीरिक माहिती | Sachin Tendulkar Physical Information
उंची (Height)- | 5 फूट 5 इंच |
वजन (Weight)- | 62 किलो |
रंग (Colour)- | गोरा |
डोळ्यांचा रंग (Eye Colour)- | गडद तपकिरी (डार्क ब्राउन) |
केसांचा रंग (Hair Colour)- | काळा |
खेळ क्रिकेट असो किंवा आयुष्याची इनिंग, आपण कायम म्हणत असतो की मूर्ती लहान पण कीर्ती महान! हो याच प्रमाणे सचिन यांचे जीवन आहे. त्यांची उंची बघतली तर अगदी कमी फक्त 5 फूट 5 इंच म्हणजेच 165 सेमी, परंतु त्यांची उंची त्यांच्या करियरला कधीच अडथळा बनली नाही. त्यांचे कारकीर्द ही सतत गगनाला भिडत राहिली. सचिन यांच्या डोळ्यांचा रंग हा गडद तपकिरी आहे. त्यांचे केस हे काळ्या रंगाचे आहेत.
सचिन तेंडुलकरचे कुटुंब | Sachin Tendulkar Family
Credit: Instagram
वडिलांचे नाव (Father's Name)- | रमेश तेंडुलकर |
आईचे नाव (Mothers Name)- | रजनी तेंडुलकर |
भाऊ (Brothers)- | अजित तेंडुलकर आणि नितीन तेंडुलकर |
बहीण (Sister)- | सविता तेंडुलकर |
पत्नी (Wife/ Sprouse)- | डॉ अंजली तेंडुलकर |
मुलगा (Son)- | अर्जुन तेंडुलकर |
मुलगी (Daughter)- | सारा तेंडुलकर |
सचिन यांच्या कुटुंबाविषयी सांगायचे झालेच तर त्यांचे वडील म्हणजे रमेश तेंडुलकर हे एक लेखक होते. त्यांची आई म्हणजेच रजनी तेंडुलकर या इन्शुरन्स कंपनी मध्ये काम करत होत्या. सचिन यांचा जन्म होण्याच्या आधीच रमेश व रजनी तेंडुलकर यांना 2 भाऊ आणि 1 बहीण होती. अजित तेंडुलकर आणि नितीन तेंडुलकर हे सचिनचे भाऊ तर सविता तेंडुलकर या सचिनच्या बहीण आहेत. सचिन या चार भावंडात सर्वात लहान होते.
पुढे जाऊन सचिन यांचा विवाह हा डॉ अंजली सोबत झाला. आता सचिन आणि अंजली यांना अर्जुन आणि सारा हे अपत्य आहेत.
Credit: Twitter
सचिन तेंडुलकरचे वैवाहिक जीवन | Sachin Tendulkar Marriage Life & Love Life
Credit: Instagram
सचिन आणि अंजली यांची पहिली भेट ही मुंबई विमानतळावर झाली. यावेळी सचिनला अंजली कडे बघून थोडे आश्चर्य वाटले कारण तेव्हा सचिन एका दौऱ्यावरून विजयी होऊन येत होता आणि इतर सर्व लोक भारतीय संघाला सन्मानाने बघत होते परंतु अंजली या त्यांच्याच नादात होत्या. त्यांनी सचिनकडे बघितले देखील नाही तेव्हा सचिनला त्यांच्याविषयी आणखी आकर्षण निर्माण झाले.
अंजली या मेडिकल च्या विद्यार्थिनी होत्या. त्या आता बालरोगतज्ज्ञ आहेत. अंजली या अशोक मेहता या प्रसिद्ध उद्योगपतींच्या कन्या आहेत. पुढे जाऊन एका मित्राच्या मदतीने त्या दोघांची पुन्हा भेट झाली. अंजली यांना क्रिकेट मध्ये काही रस नव्हता. त्यांना ही भेट होईपर्यंत हे देखील माहीत नव्हते की सचिन क्रिकेटर आहे.
दोघांच्या पुढे भेटी होत राहिल्या. सचिन देखील क्रिकेट मध्ये प्रसिद्धी मिळवत गेला आणि अंजली यांची देखील मेडिकल प्रॅक्टिस सुरू होती. पुढे जाऊन त्यांना भेटणे देखील कठीण होऊ लागले कारण ते सहज भेटायला गेले तरी देखील सचिनचे चाहते त्यांच्या भोवती गर्दी करत असत.
सचिन एक त्यांच्या आयुष्यातील किस्सा सांगतात की, त्यांना एकदा रोजा नावाचा चित्रपट बघायला जायचे होते. चाहत्यांना कळू नये म्हणून सचिन हे दाढी मिश्या लावून वेगळ्या अवतारात सिनेमागृहात गेले तरी देखील एका चाहत्याने त्याना ओळखले व त्यांच्याभोवती गर्दी करून ऑटोग्राफ साठी झुंबड उडाली.
जवळपास 5 वर्षे सचिन व अंजली यांचे हे भेटणे सुरूच होते. अंजली सांगतात की जेव्हा सचिन आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असत तेव्हा मोबाईल फोन चे बिल वाचविण्यासाठी अंजली या देखील सचिनला प्रेम पत्र लिहीत असत. 24 मे 1995 रोजी सचिन आणि अंजली यांचा विवाह झाला. पुढे 2 वर्षांच्या अंतराणे आधी साराचा आणि नंतर अर्जुनचा जन्म झाला. मुलांच्या जन्मानंतर डॉ अंजली यांनी त्यांची प्रॅक्टिस थोडी दुर्लक्षित करून मुलांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. सचिन यांनी त्यांच्या निवृत्ती सामन्यात त्याबद्दल अंजलीचे आभार देखील मानले आहेत.
क्रिकेट खेळत असताना सचिनला कुटुंबासाठी वेळ देणे शक्य नव्हते त्यामुळे आता एकदा निवृत्त झाल्यानंतर सचिन जास्तीत जास्त वेळ हा त्याच्या कुटुंबासोबतच घालवत असतो.
सचिन तेंडुलकरचे शिक्षण | Sachin Tendulkar's Education
सचिन हे सुरुवातीपासून अभ्यासात काही जास्त हुशार नव्हते. एक सामान्य विद्यार्थी म्हणून ते अभ्यास करत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे बांद्रा येथे असलेल्या इंडियन एड्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये झाले. त्यांना अभ्यासात तशी आवड नव्हती मात्र क्रिकेट मध्ये ते त्यांचे सर्वस्व देत होते. हे रमाकांत आचरेकर सरांनी बघितले आणि त्यांनी सचिन ला शाळा बदलण्यास सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सचिनने दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर येथे प्रवेश घेतला. या शाळेची निवड करण्यामागे एकच कारण होते आणि ते म्हणजे या शाळेचा क्रिकेट संघ हा अतिशय उत्तम होता. या आधी सुद्धा या शाळेतून अनेक रणजी खेळणारे खेळाडू बाहेर पडले होते.
उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यानु खालसा कॉलेजला प्रवेश घेतला. परंतु तोपर्यंत क्रिकेट हीच त्यांची ओळख बनली होती. अखेर सचिनचे शिक्षण थांबले. फक्त शिक्षणाने मोठे होता येते हा गैरसमज आहे. आज एक व्यक्ती शिक्षण जरी मधीच सोडले असले तरी देखील क्रिकेट विश्वात देव बनून उभा आहे!
Credit: Instagram
सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमध्ये पदार्पण | Sachin Tendulkar's Debut In Cricket
सचिन आणि क्रिकेट ही सुरुवात शिवाजी पार्क मधून वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी झाली. त्यांच्याविषयी आणि रमाकांत सरांविषयी एक कथा सांगितली जाते. जेव्हा सचिन बॅटिंग करायचे तेव्हा रमाकांत सर स्टंप वर एक रुपयाचा सिक्का ठेवत असत. जेव्हा एखादा खेळाडू सचिनला आउट करेल तेव्हाच त्याला तो सिक्का मिळत असे आणि जर असे कोणी करू शकले नाही तर सिक्का सचिनला मिळत असे. सचिन ने त्यांचा तोंडून स्वतः सांगितले आहे की त्याने असे 13 सिक्के त्यावेळी जिंकले होते. आजही सचिनच्या संग्रहात ते सर्व सिक्के आहेत.
शारदाश्रम विद्यामंदिर चाच असलेला एक खेळाडू म्हणजे विनोद कांबळी! विनोद सोबत सचिनने स्वतः 329 धावा बनवत 664 धावांची विक्रमी भागीदारी स्वतःच्या शाळेच्या संघासाठी केलेली आहे. फलंदाजी मध्ये सचिनला सुरुवातीला जास्त आवड नव्हती परंतु ते एकदा सर डॅनिस लिली यांना भेटले असताना त्यांना त्यांच्यातील फलंदाज बघता आला. सचिनने पुढे मग बॉलिंग सोबत बॅटिंग देखील करायला सुरुवात केली.
सचिन यांनी मुंबई संघाकडून खेळत असताना 1988 मध्ये राज्यस्तरीय सामन्यात पहिले शतक झळकावले. हाच सामना पुढे त्यांना राष्ट्रीय स्तरावर निवडण्यासाठी कारणीभूत ठरला. मध्ये जवळपास एक वर्षांचा कालखंड गेल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध सामन्यात भारताकडून सचिनला खेळण्याची संधी मिळाली. पहिलाच सामना हा पाकिस्तान संघासोबत होता. या सामन्यात सचिनच्या नाकावर जोरदार बॉल लागला, नाकातून रक्त यायला लागले आणि जखमही झाली. परंतु सचिनने हार न मानता खेळ सुरू ठेवला आणि सर्वांची मने जिंकली. त्याकाळी पाकिस्तानी संघाचे वेगवान गोलंदाज हे सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखले जात होते. अवघे 16 वर्षाचे सचिन त्या वेगवान गोलंदाजाचा सामना करत खेळत राहिले.
सचिन तेंडुलकरचे करिअर | Sachin Tendulkar's Career
सचिनने पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय करियरला सुरुवात केली. सुरुवातीला म्हणावे तसे यश हे मिळाले नाही परंतु त्यांना याच मालिकेनंतर 1990 साली कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी यात इंग्लंड संघाच्या विरोधात 119 धावा करून विक्रम बनवला. ते सर्वात कमी वयात शतक बनवणारे भारतीय बनले.
सचिनने आपल्या कारकिर्दीत दोन वेळा कर्णधारपद सांभाळले आहे. 1996 साली तो चांगल्या फॉर्म मध्ये असताना त्याला कर्णधारपद देण्यात आले परंतु अपयश मिळत गेल्याने सचिनने 1998 मध्ये म्हणजे दोनच वर्षात कर्णधारपद सोडून दिले. कर्णधारपदाचा त्यांच्या स्वतःच्या खेळावर तर परिणाम होतच होता परंतु ते संघाला देखील चांगल्या प्रकारे लीड करू शकत नव्हते. पुढे जाऊन पुन्हा त्यांना काही काळ कर्णधारपद हे देण्यात आले होते परंतु त्यांचे प्रदर्शन हे काही खास राहिले नाही. सचिनने भारताचे 25 टेस्ट मॅच मध्ये नेतृत्व केले परंतु त्यातील केवळ 4 सामने सचिनला जिंकता आले.
वर्ष 2000 सुरू झाले आणि जणू सचिनने आता स्वतःच्या करियरला अगदी उच्च शिखरावर नेण्याचे ठरविले होते. सचिन असे काही रेकॉर्डस् बनवत गेला की ज्यांचा त्यावेळी कोणी विचार देखील करू शकत नव्हते. 2000-01 दरम्यान सचिन हा पहिला खेळाडू बनला ज्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 10,000 रन पूर्ण केले होते. 2003 मध्ये झालेल्या वर्ल्ड कप मध्ये तर सचिनने जगाचे लक्ष स्वतःकडे खेचून घेतले. सचिन एकटा धावांचा डोंगर उभा करत भारतीय संघाला विजयाकडे घेऊन जात होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला परंतु सचिन ने त्या सामन्यात केलेल्या कामगिरी मुळे पहिल्यांदा पराभूत संघातील खेळाडूला वर्ल्ड कप मध्ये सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
2011 वर्ल्ड कप मध्ये देखील सचिनचे भारतीय संघाला विश्वकप जिंकून देण्यात खूप मोठे योगदान होते. हा 2011 वर्ल्ड कप पूर्णपणे सचिनच्या नावाने भारतीय संघाने खेळला आणि जिंकला असे म्हणायला काही हरकत नाही. सचिन हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये 200 धावांचा टप्पा एका सामन्यात ओलांडणार पहिला खेळाडू बनला. क्रिकेट मधील आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 शतके झळकवणारे सचिन तेंडुलकर हे एकमेव खेळाडू आहेत. आजही कोणताही खेळाडू त्यांच्या या विक्रमाची बरोबरी देखील करू शकलेला नाही.
सचिन तेंडुलकरचा क्रिकेटमधून संन्यास | Sachin Tendulkar Retires From Cricket
सचिनने 2011 चा वर्ल्ड कप हा शेवटचा वर्ल्ड कप खेळला. त्यानंतर 5यांनी बांगलादेश विरोधी मालिकेत आपले 100 वे शतक लगावले. 12 डिसेंबर 2012 रोजी सचिनने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. त्यावेळी त्यांनी ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देखील संन्यास घेतला. 2013 साली आयपीएल मध्ये त्यांनी मुंबई संघाकडून शेवटचा टी 20 सामना खेळला.
16 नोव्हेंबर 2013 रोजी या महान खेळाडूने वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेनंतर संपूर्ण क्रिकेट मधून संन्यास घोषित केला.
सचिन तेंडुलकरचे वर्ल्ड रेकॉर्ड | Sachin Tendulkar World Records
Credit: Instagram
1) कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड- कसोटी क्रिकेट मध्ये 200 सामन्यांमध्ये 19,921 धावा तर 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धावा सचिनने बनविल्या आहेत.
2) सर्वाधिक शतके- सचिनने एकूण 100 शतके केली आहेत. यातील 51 शतके ही टेस्ट मध्ये तर 49 शतके ही एकदिवसीय सामन्यांत केलेली आहेत. दोन्ही फॉरमॅट मध्ये ही सर्वाधिक शतके आहेत.
3) एखाद्या खेळाडूला सर्वाधिक वेळेचं एकदिवसीय करिअर लाभले असेल तर ते सचिनला मिळाले आहे. सचिनला 22 वर्षे आणि 91 दिवसांचे एकदिवसीय क्रिकेट करियर लाभले आहे.
4) विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक रन- 1992 साली विश्वचषकात सुरू झालेला प्रवास हा 2011 साली थांबला. या दरम्यान 2,278 धावा सचिनने केल्या आहेत. यात 15 शतक, 241 चौकार हा देखील एक वेगळाच रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.
5) सर्वाधिक टेस्ट सामने खेळण्याचा रेकॉर्ड देखील सचिनच्या नावावर आहे. त्यांनी 200 टेस्ट खेळल्या आहेत. यात अखेरच्या टेस्ट मॅच मध्ये त्यांनी 74 रणांची खेळी तर केलीच पण एक विकेट देखील मिळविली होती.
सचिन तेंडुलकरला मिळालेले पुरस्कार | Sachin Tendulkar Awards
1994- | अर्जुन पुरस्कार |
1997- | राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (हा पुरस्कार मिळविणारे सचिन हे पहिले क्रिकेटपटू आहेत) |
1999- | पद्मश्री पुरस्कार |
2001- | महाराष्ट्र भुषण पुरस्कार |
2008- | पद्मविभूषण |
2010- | एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड |
2011- | क्रिकेटर ऑफ द इअर |
2013- | सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न ने सन्मानित |
भारतीय पोस्ट ने त्यांची जिवंत असताना पोस्टाची तिकिटे बनवली. मदर तेरेसा यांच्यानंतर हे एकमेव असे व्यक्ती ठरले ज्यांना जिवंत असताना हा सन्मान मिळाला. भारतरत्न हा नागरी सन्मान क्रीडा क्षेत्रात देण्यास सुरुवात देखील सचिन यांच्यापासूनच झाली.
सचिन तेंडुलकरचे मनोरंजक तथ्य | Sachin Tendulkar Interesting Facts
सचिन विषयी काही मनोरंजन तथ्य आपण जाणून घेऊयात-
1) 1987 साली झालेल्या भारत इंग्लंड उपांत्य सामन्यात सचिन आपल्याला बॉल बॉय म्हणून बघायला मिळतो.
सचिनकडे आजही त्याची पहिली गाडी लाल रंगाची मारुती 800 आहे.
2) टीव्ही अंपायर ही संकल्पना पहिल्यांदा आली तेव्हा जोंटी रोडस यांनी 1992 साली पहिल्यांदा सचिनला रन आऊट दिले.
3) सचिन हा राईट हॅडेड बॅट्समन जरी असला तरी देखील तो लिहिताना डाव्या हाताचा वापर करतो.
4) सचिनचे पहिले एकदिवसीय शतक हे त्याच्या 79 व्या सामन्यात बनले. त्यामुळे हार ही कधीच मानायची नसते ही गोष्ट यातून कळते.
सचिन तेंडुलकरची पसंद, आवड | Sachin Tendulkar Like, Dislike
सचिन यांच्या आवडीनिवडी विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
1) सचिन यांना क्रिकेट सोबत लॉन टेनिस हा खेळ देखील आवडतो.
2) त्यांना क्रिकेट खेळताना सर्वाधिक कोणते मैदान आवडले असेल तर ते म्हणजे सिडनी क्रिकेट ग्राउंड ऑस्ट्रेलिया!
3) त्यांच्या वडिलांनी ज्या सचिन देव बर्मन यांच्या नावावरून सचिनचे नाव ठेवले होते तेच सचिनचे आवडते संगीतकार आहेत.
4) चित्रपट क्षेत्रात नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, आमिर खान आणि सर्वांची क्रश अशी माधुरी दीक्षित हे आवडीचे कलाकार आहेत.
5) सचिनला निळा हा रंग सर्वाधिक आवडतो.
6) गाण- कोकिळा लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांची गाणी सचिनला खूप आवडतात.
सचिन तेंडुलकरचे सोशल मीडिया | Sachin Tendulkar's Social Media Accounts
फेसबुक (Facebook)- https://www.facebook.com/SachinTendulkar
ट्विटर (Twitter)- https://twitter.com/sachin_rt?s=09
इंस्टाग्राम (Instagram)- https://www.instagram.com/sachintendulkar/
निष्कर्ष
भारतात अनेक खेळाडू होऊन गेलेत आणि होत आहेत जे भारताचे नाव रोशन करत आहेत आणि त्यांच्यातील सचिन तेंडुलकर हा एक क्रिकेटर आहे. भारतातील क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची संपूर्ण माहिती वर दिलेली आहे.
हा लेख आपल्याला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडून काही माहिती सुटली आहे तर ती खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.