पाणी वाचवा निबंध मराठी | Save Water Essay In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला पाणी वाचवा निबंध मराठी मध्ये सांगणार. Save Water Essay In Marathi आपल्याला नक्कीच पैकी चे पैकी गुण मिळवून देईल.

पाणी वाचवा पाणी जिरवा हा उपक्रम आपण नक्कीच ऐकला किंवा बघितला असेल आणि ह्यावर आपल्याला शाळेत निबंध देखील विचारला असेल तर खालील निबंध फक्त आपल्यासाठी आहे.

👉 नक्की वाचा: पर्यावरण वर मराठी निबंध

खालील निबंध कोणकोणत्या विषयांवर वापरू शकता

पाणी वाचवा निबंध मराठी

  • Save Water Essay In Marathi
  • पाणी अडवा पाणी जिरवा निबंध
  • पाण्याचे महत्त्व
  • पाण्याची टंचाई
  • Essay On Save Water In Marathi

पाणी वाचवा निबंध मराठी | Save Water Essay In Marathi

Save Water Essay In Marathi

पाणी हे निसर्गाकडून मिळालेलं अमूल्य आणि मोफत स्त्रोत आहे जे पृथ्वी संरंक्षक असे म्हटले तरी चुकीचे नसेल.

मानव असो या प्राणी असो सर्वांना पाण्याची गरज ही भासतच असते कारण पृथ्वीवरील जीव एकेवेळेस जेवणाशिवाय राहतील परंतु पाण्याशिवाय अजिबात राहू शकत नाहीत.

सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्या दिनचर्यात पाण्याची गरज भासत असतेच कारण ते म्हणतात ना पाण्याशिवाय जीवन नाही पण मी तर म्हणतो पाणी हेच जीवन आहे.

आपण पाणी वाचवा पाणी जिरवा ही मोहीम नक्कीच ऐकली असेल तर तुम्हाला माहितीये की ही मोहीम का राबवली जाते. कारण पृथ्वीवर एकूण 71% पाणी आहे आणि त्यातील 1% पेक्षाही कमी पाणी पिण्यायोग्य आहे त्यामुळे आपण आताच सावध राहायला हवे.

पृथ्वीवर पाण्याचे दोन प्रकार आहे एक खारे पाणी आणि एक गोड पाणी. यातील गोड पाणी हे वापरण्यायोग्य आहे.

मुळात पाण्याची टंचाई होणे हे मानवामुळेच झाले आहे. जर आपण पहिलेच पाणी सांभाळून वापरले असते तर आता आपल्याला पाण्याची कमी झाली नसती. आताही लोकांना येवढे सर्व माहीत असूनही पाण्याची किंमत कळत नाही.

आधीचे लोकं पाणी सांभाळून वापरत असे कारण त्यांना आयते घरी बसून पाणी भेटत नव्हते आणि त्यांना पाणी घेण्यासाठी लांब नदीवर, विहरीवर, खोऱ्यावर, तलावावर जावे लागत असे त्यामुळे त्यांना पाण्याची किंमत काय असते हे माहीत होते. कारण त्यांना माहीत होते जर पाण्याचा एकही घडा वाया गेला तर पुन्हा आपल्याला पाणी घेण्यासाठी लांब नदीवर जावे लागेल.

जर पाऊस पडला नाही तर ह्या विचाराने सुद्धा अंगावर शहारे येतात त्यामुळे पाण्याची बचत आणि पाण्याची साठवण कशी जास्तीत जास्त करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे.

जसे मानवांना आणि प्राणी पक्षिंना पाण्याची गरज भासते तसेच झाडांनाही पाण्याची आवश्यकता असते. जेव्हा आपण झाडांना पाणी टाकतात तेव्हा ते खाली हळु हळू बादली ने टाका ज्याने पाण्याची बचत होईल. झाडांना पाणी टाकल्यावर ते खाली मुळांमध्ये जाते आणि त्याच्या साह्याने संपूर्ण झाडाला त्याच्या फांद्यांना, खोडाला पाणी पोहोचते.

पाण्याच्या टंचाई होण्याचे कारण काय तर आजकालच्या युगात थेट घरापर्यंत नळातून पाणी येते आणि हेच कारण आहे की लोकं पाण्याची उधळमस्ती करतात. सरकारला वाटले की ह्याने लोकांचे परिश्रम कमी होईल, त्यांचा वेळ वाचेल परंतु खरतर ह्याच्या उलटच झाले. खरंच ह्या कारणामुळे लोकं आळशी झाली आणि पाण्याची किंमत विसरून गेले. आजच्या युगात देखील काही चांगले लोकं आहेत ज्यांना पाण्याची किंमत आहे, पाणी कसे वाचवायचे त्याची कल्पना आहे. सरकार झाले, काही महान लोकं झाले जे काही उपक्रम सुरू करतात ज्याने पाणी वाचवा असा संदेश प्राप्त होतो आणि तो आपण आत्मसात करायला हवा.

अजून काही कारणं म्हणजे अर्धे पाणी प्यायचे अर्धे पाणी फेकायचे, भांडे आणि कपडेलत्ते धुतांना अधिक पाणी वाया घालवणे, अंघोळीला जास्त पाणी वापरणे. अजून तर लोकं काही थोडेसे काम करण्यासाठी जसे दात घासण्यासाठी सुद्धा जास्त पाणी वाया घालवतात. त्यामुळे आपण आणि आपल्या घरात इतरांनीही पाणी योग्य प्रमाणात वापरायला हवे.

पाण्याची बचत कशी करावी असा प्रश्न प्रत्येकाला नक्कीच पडत असेल तर आपण भांडी धुताना आणि कपडे धुताना पाणी कमी वापरायला हवे, अंघोळ करताना शॉवर मध्ये न करता बादली मध्ये लागेल तेवढेच पाणी घेऊन अंघोळ करावी, हात धुतल्यानंतर लगेच नळ बंद करावा.

जर आपल्याला कुठेही पाण्याचा नळ चालू दिसला तर लगेच नळ बंद करायला हवा. जर कोणी पाण्याचा गैरवापर करत असेल, वाया घालत असेल तर त्याला तसे करण्यास थांबवा.

भरपूर ठिकाणी बघायला मिळते की पाण्याचे मोठमोठे पाइप फुटलेले असतात त्यातून धार लागलेली असते आणि पाणी हळु हळू वाया जात असते ते आपण थांबवायला हवे. अश्या वेळेस नगरपालिकेत तक्रार नोंदवून त्याची दुरुस्ती करायला हवी.

होळी सण च्या दिवशी लोकं पाण्याने रंगपंचमी खेळतात आणि त्यात प्रमाणाबाहेर पाणी वाया घालतात तर ते आपण थांबवायला हवे. आणि जर आपल्याला पाण्यानेच होळी साजरा करायची असेल तर जे पाणी वापरण्यायोग्य नसेल किंवा पिण्यायोग्य नसेल तेच पाणी वापरा तेही कमी प्रमाणात.

पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे पाण्याची बचत करायला हवी आणि जमिनीत पाणी जिरवायल हवे. कारण जेव्हा पाणी जमिनीत जिरते तेव्हा जमिनीची पातळी नियंत्रित होते.

आताच जर आपल्याला पाण्याचे महत्त्व समजले तरच पुढे आपले जीवन सोपे आहे नाहीतर पाणी देखील विकत घेण्याची वेळ येईल. त्यावेळी पाणी सुद्धा पेट्रोल डिझेल च्या जागेवर वाटेल. म्हणून पाणी हे जपून आणि काळजीपूर्वक वापरा.

निष्कर्ष

पाणी वाचवा मराठी निबंध हा लेख लिहिण्याचा मुख्य उद्येश एवढाच आहे की आपल्याला पाण्याची किंमत कळायला हवी. आणि जर आपल्याला शाळेत पाण्यावर निबंध विचारला असेल तर हा निबंध आपण नक्कीच वाचायला हवा.

हवं तर आपण ह्यात आपले सुंदर विचारही समाविष्ट करू शकतात ज्याने हा निबंध अजून सुंदर आणि आकर्षक दिसेल ज्याने आपले शिक्षक अजून आनंदी होतील.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap