शेअर बाजार संपूर्ण माहिती मराठी | Share Market Information In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला Share Market Information In Marathi सांगणार आहे म्हणजेच शेअर बाजार माहिती मराठी मध्ये.

ह्या लेखात आपण शेअर बाजारात गुंतवणूक कसे करावे, पैसे कसे कमवावे, शेअर कसे विकत घ्यावे, कोणते शेअर विकत घ्यावे, शेअर मार्केट टिप्स, शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf आणि अजून बरेच काही जाणून घेणार आहोत.

बहुतेकदा असे होते की काही लोकांना शेअर मार्केट मध्ये पैसे लावायचे असतात परंतु त्यांना संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे ते पैसे लावणे टाळतात म्हणूनच शेअर मार्केट म्हणजे काय मराठी मध्ये सांगितले आहे.

पैसा कोणाला नकोय, आजकाल सर्वजण पैसे कमावण्यासाठी काम करतात. कोणी नोकरी करून कमवत, कोणी व्यवसाय करून तर कोणी पैसे गुंतवून पैसे कमावतात. सध्या पैश्याशिवय मानवाचे जीवन अपूर्णच आहे समजा कारण स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पैसा मुख्य भूमिका निभावतो.

शेअर बाजार म्हणजे लोकांना सट्टा वाटतो परंतु तो सट्टा नसून त्यात बुध्दीचे बळ लावून पैसे गुंतवून नफा मिळवायचा असतो. यात नफा तोटा चा देखील सामना करावा लागतो.

स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट हे शब्द आपल्याला सध्या जाहिरातींच्या माध्यमातून किंवा आपल्या मित्रपरिवाराकडून ऐकायला मिळतात. परंतु त्याविषयी सविस्तर अशी माहिती आपल्याला कुठेही वाचायला मिळत नसते. याच कारणामुळे एकतर आपण शेअर बाजारात पैसे गुंतवायला घाबरतो किंवा गुंतवून ते पैसे गमावतो. भारतात सध्या दोन स्टॉक एक्सचेंज हे मोठे आहेत. त्यातील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) 1875 साली भारतात पहिले स्टॉक एक्सचेंज म्हणून स्थापन झाले. भारतात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया हे दुसरे मोठे स्टॉक एक्सचेंज आहे. आज आपल्यासाठी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार (Share Market Information in Marathi) याविषयी सविस्तर माहिती घेऊन आलो आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण शेअर मार्केट विषयी मूलभूत माहिती तर जाणून घेणारच आहोत परंतु शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची, त्याचे अकाउंट कसे उघडायचे, स्टॉक मार्केट मध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळवायचा या सर्व गोष्टी बघणार आहोत.


शेअर बाजार काय आहे - What is Share Market

Share Market Information In Marathi

आता आपण शेअर मार्केट विषयी शब्दशः आणि मुख्य अर्थ देखील जाणून घेऊयात. शेअर म्हणजे भाग! आपला त्या कंपनीत असलेला भाग म्हणजे शेअर होय. आपण शेअर मार्केटला स्टॉक मार्केट या नावाने देखील ओळखतो. शेअर मार्केट म्हणजे जिथे कंपनी या त्यांचे शेअर्स हे विक्रीसाठी ठेवतात. आपण ते शेअर खरेदी करून त्या कंपनीची मालकी हक्क मिळवू शकतो.

आता जर उदाहरण घ्यायचे झाल्यास एखाद्या कंपनीचे एकूण मिळून सगळे 1हजार शेअर आहेत. त्यापैकी जर समजा तुम्ही 600 शेअर हे विकत घेतले तर त्या कंपनीची 60% मालकी भागीदारी ही तुमची असेल. म्हणजे तुमचा त्या कंपनीत काही तरी वाटा असेल आणि कंपनीला फायदा होत राहिला तर तुम्हाला देखील फायदा होईल अन्यथा तुम्हाला देखील कंपनीसोबत तोटा सहन करावा लागेल.

Stocks ही संकल्पना शेअर सारखीच आहे. Stocks हा त्या व्यक्तीचा त्या कंपनीत असलेला भाग दर्शवत असतो. शेअर मार्केट मध्ये व्यक्ती त्याला हवे असेल तेव्हा शेअर्स हे खरेदी करत असतो आणि त्याला वाटेल तेव्हाच तो शेअर्स हे विक्री देखील करू शकतो. यामध्ये त्या कंपनीचा काही हस्तक्षेप हा नसतो.

आता या सर्व प्रक्रियेवर भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजेच सेबी(SEBI) नियंत्रण ठेवत असते. जेव्हा कंपनी त्या शेअर मार्केट मध्ये रजिस्टर होते तेव्हा तिच्या शेअर्स ची किंवा स्टॉकस ची किंमत ही BSE किंवा NSE मध्ये नोंदवली जाते. SEBI ही यातील सर्वोच्च संस्था असल्याने यांच्या परवानगी शिवाय कंपनी या स्टॉक मार्केट मध्ये त्यांचा IPO (Initial Public Offering) देऊ शकत नाही.


शेअर चे प्रकार - Types of Shares

शेअर चे वेगवेगळे लोक हे विविध प्रकार पाडतात परंतु सुरुवात करत असताना आपल्याला शेअर चे तीन प्रकार लक्षात घेणे गरजेचे असते. हे तीन प्रकार शेअर कोणाला भेटतात किंवा ते कोणाला दिले जातात यावरून पडतात.


Common Share

अनुपम शेअर बाजारात पदार्पण केल्यानंतर शक्यतो हेच शेअर खरेदी करत असतो. याची खरेदी विक्री ही सामान्य असते आणि यावरच जास्तीत जास्त शेअर मार्केट हे सुरू असते.


Bonus Share

एखाद्या कंपनीला बक्कळ नफा झाला असेल आणि आता कंपनी तिच्या भागीदारांना काही देऊ इच्छित असेल तर ती कंपनी त्यांना पैसे न देता काही शेअर देत असते. यालाच आपण बोनस शेअर म्हणून ओळखतो. बोनस शेअर हे आपल्याला खरेदी करता येत नाही परंतु आपण त्यांची विक्री करू शकतो.


Preferred Share

सर्वात सुरक्षित शेअर कोणते असतील ते प्रेफरड शेअर्स असतात. हे share कंपनी काही विशिष्ट समूहासाठी आणत असते. या शेअर्स मध्ये ज्यांच्यासाठी ते आणले आहेत त्यांना ते खरेदी करण्याचा अधिकार हा दिलेला असतो. हे शेअर कंपनी स्वतःची पैशांची गरज भागविण्यासाठी बाजारात आणत असते आणि सुरक्षित लोकांच्या हातात ते शेअर गेल्याने कंपनीला पुढे शेअर ची किंमत खुप घसरेल किंवा इतर काही घडेल याविषयी काही काळजी नसते.


शेअर मार्केटमध्ये खाते कसे उघडावे - How to Open Account in Share Market

आपल्याला शेअर मार्केट मध्ये येण्यासाठी 2 प्रकारचे खाते हे लागतात. ते म्हणजे डिमॅट खाते आणि ट्रेंडिंग खाते होय. आपल्याला या दोन्ही खात्याच्या मदतीनेच शेअर मार्केटमध्ये सर्व व्यवहार हे करायचे असतात. या दोन्ही खात्यांविषयी आपण आधी जाणून घेऊयात आणि मग ते खाते कसे उघडायचे याविषयी माहिती घेऊयात.


डिमॅट खाते (Demat Account)

आपले बँक खाते तुम्ही डिमॅट खात्यासोबत तुलना करू शकता. ज्याप्रमाणे आपल्या बँक खात्यात आपण ठेवू तोपर्यंत पैसे सुरक्षित असतात त्याच प्रमाणे डिमॅट खात्यात आपले सर्व शेअर हे डीमटेरिअलाईझड फॉर्म मध्ये सुरक्षित असतात. जेव्हा आपण शेअर खरेदी करतो त्यानंतर ते आपल्या डिमॅट अकाऊंट मध्ये असतात. हे सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होतात आणि शेअर हे देखील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात.

जेव्हा तुम्ही डिमॅट खाते खोलण्यासाठी जाता तेव्हाच तुम्हाला डिमॅट खाते उघडण्यासाठी काही चार्जेस हे द्यावे लागतात. याशिवाय आपले डिमॅट अकाउंट हाताळण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्षाला काही पैसे देखील दयावे लागतात. म्हणजे आपल्याला एकदा खाते खोलण्यासाठी पैसे आणि प्रत्येक वर्षी सेवा शुल्क हे द्यावे लागतात.


ट्रेडिंग खाते (Trading Account)

ट्रेंडिंग खाते एखाद्या दुकानासारखे आहे. जिथे आपण आपले व्यवहार करू शकतो. बँकेत आलन एकाच खात्यातून सर्व काही व्यवहार हे करत असतो परंतु इकडे बघायला गेलं तर आपल्याला पैसे म्हणजे इथे शेअर ठेवायला डिमॅट खाते तर त्याचे व्यवहार करण्यासाठी ट्रेंडिंग खाते लागते. म्हणजे सांगायचे झाले तर आपल्या डिमॅट खाते या घरातून तो खरेदी करण्यासाठी दुकानात म्हणजे ट्रेडिंग खात्यावर जातो आणि तिथून वस्तू म्हणजे इथे शेअर हे विकत घेतो.

थोडक्यात सांगायचे झाल्यास एक ट्रेडिंग खाते हे तुमची बँक जिथून पैसे येणार आहेत आणि तुमचे डिमॅट खाते जिथे शेअर सुरक्षित ठेवले जाणार आहेत त्यामधील दुवा म्हणून काम करते. उदाहरण म्हणजे जर समजा तुम्हाला टाटा चे काही शेअर खरेदी करायचे असतील तर मग तुम्ही टाटा चे 10 शेअर खरेदी करण्यासाठी तुमच्या बँकेतून पैसे देता आणि ते शेअर तुमच्या डिमॅट खात्यात येतात. मग हा संपूर्ण व्यवहार ट्रेडिंग खात्याच्या माध्यमातून होत असतो.

याच प्रकारे जेव्हा आपण शेअर विक्री करत असतो तेव्हा ट्रेडिंग खाते आपले शेअर हे डिमॅट खात्यातून उचलते आणि त्याचा मोबदला आपल्या बँक खात्यात पाठवत असते. ट्रेडिंग खाते खोलण्यासाठी देखील आपल्याला काही पैसे द्यावे लागतात. यालाही वार्षिक शुल्क आपल्याला द्यावे लागते.


सुरवातीला तुम्हाला दोन्ही खात्यांची गरज लागणार आहे कारण तुम्हाला शेअर खरेदी करावे लागतील त्यासाठी ट्रेडिंग आणि कायम तुम्हाला शेअर ठेवण्यासाठी डिमॅट खात्याची गरज लागणार आहे. काही लोक हे शेअर लांब कालावधीसाठी घेत असतात त्यामुळे मग ते शेअर मार्केट मध्ये शेअर खरेदी केले की ट्रेडिंग खाते बंद करून टाकतात जेणेकरून त्यांना वार्षिक शुल्क द्यावे लागत नाही. परंतु तुम्हाला कायम डिमॅट खाते हे ठेवावेच लागते.

डिजिटल युगात तुम्ही BSE ला न जाता किंवा शेअर ब्रोकर न बनता सहज शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही करू शकता. SEBI अंतर्गत सध्या 15000 हुन अधिक असे ब्रोकर NSE आणि BSE मध्ये आहेत. या ब्रोकर्स ने स्वतःचे apps आणि websites बाजारात आणलेल्या आहेत. सध्या अनके असे APP किंवा WEBSITE आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही कुठल्याही प्रकारे खाते खोलण्यासाठी चार्जेस न देता तुमचे डिमॅट आणि ट्रेडिंग दोन्ही खाते खोलू शकतात.

भारतीय बाजारात Upstocks, Groww, 5 Paisa, Angel Broking यासारखे अनेक apps उपलब्ध आहेत परंतु यातील Upstocks च्या माध्यमातून सहज थोड्या डिटेल्स देऊन तुम्ही तूमचे दोन्ही खाते सहज सुरू करू शकता. कधी ऑफर सुरू असेल तर तुम्हाला डिमॅट अकाउंट अगदी फ्री मध्ये देखील मिळून जाईल आणि तसे upstocks वर सर्वात कमी म्हणजे 250 रुपये खाते खोलण्यासाठी घेतले जातात.


शेअर विकत घेणे म्हणजे काय आणि कसे विकत घ्यावे - What is Share Purchase and How to Buy Shares

शेअर म्हणजे कंपनीचा एक भाग विकत घेणे हे आपण आधीच बघितले आहे. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या ब्रोकर च्या मदतीने आपले दोन्ही डिमॅट आणि ट्रेडिंग खाते ओपन करून घेत असतो तेव्हा आपल्याला शेअर ची खरेदी विक्री करता येते. आपण ब्रोकरच्या मदतीने आणि आपल्या ट्रेडिंग अकाउंट मधून एखाद्या कंपनीचे विक्रीला असलेले शेअर हे विकत घेत असतो. त्यावेळी आपण आपल्या बँकेतून पैसे देतो आणि ते शेअर आपल्या डिमॅट खात्यात सुरक्षित ठेवत असतो.

ब्रोकर मध्ये घेऊन जेव्हा आपण स्टॉक खरेदी करत असतो तेव्हा आपल्याला त्याच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होत असतो. तो आपल्याला काही टार्गेट आणि काही टिप्स देखील देत असतो आणि त्याबदल्यात त्याचे काही चार्जेस किंवा नफ्यातील हिस्सा तो घेत असतो. आपल्याकडे ब्रोकर्स अनेक असले तरी देखील दोनच स्टॉक एक्सचेंज आहेत. BSE आणि NSE शी शेअर ब्रोकर म्हणून हे लोक काम करत असतात.

आपण एकदा डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडले की आपल्या ट्रेडिंग खात्यातून कंपन्यांचे BSE किंवा NSE वर असलेले shares बघू शकता. त्यातून तुम्हाला ज्या कंपनीच्या शेअर्स मधते तुमचा फायदा दिसत असेल त्या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही बँकेतून पैसे देऊन विकत घेऊ शकता. यात काही लोक शेअर्स हे लॉंग टर्म साठी घेतात तर काही लोक हे इन्ट्राडे करतात. परंतु तुम्ही जोपर्यंत तो शेअर विक्रीला काढत नाही तोपर्यंत तो शेअर तुमच्या डिमॅट खात्यात सुरक्षित पडून असतो.


कंपनीला शेअर मार्केमध्ये कसे लिस्ट करावे - How to list your Company in Share Market

शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट मध्ये आपल्याला आपली कंपनी जर लिस्ट करायची असेल तर कंपनीला स्टॉक एक्सचेंज सोबत अनेक करार हे करावे लागतात. यात सर्व काही आपल्याला लेखी कराराच्या स्वरूपात द्यावे लागते. कंपनीला या करारात दिल्याप्रमाणे प्रत्येक वेळी जेव्हा गरज असेल तेव्हा स्टॉक एक्सचेंज ला माहिती पुरवावी लागते. ही सर्व माहिती त्या कंपनीच्या शेअर्स आणू स्टॉक वर परिणाम करत असल्याने ती देणे बंधनकारक असते.

कंपनीला तिचे मागील 3 वर्षांचे संपूर्ण रेकॉर्ड एक्सचेंज बोर्डला द्यावे लागतात. यामध्ये कंपनीचा 2 कोटींपेक्षा जास्त बाजारात वाटा असायला हवा. IPO साठी अर्ज करत असाल तर कंपनी भांडवल हे कमीत कमी 10 करोड आणि FPO साठी अर्जदार असाल तर कंपनी भांडवल हे किमान 3 करोड असायला हवे असते. कंपनीने अर्ज दिल्यानंतर तिची फेरतपासणी होऊन मगच कंपनीला स्टॉक एक्सचेंज मार्केट मध्ये स्थान दिले जाते. यालाच आपण कंपनी स्टॉक मार्केट लिस्टेड आहे असे म्हणतो.

Share market मध्ये कंपनी दृश्य झाल्यानंतर त्या कंपनीचे मूल्यांकन केले जाते. जेव्हा त्या कंपनीच्या उत्पादनात किंवा कार्यात घट किंवा वाढ होते तेव्हा त्या कंपनीच्या शेअर चे दर हे बाजारात कमी किंवा जास्त होत असतात.

आपण कंपनी एकदा रजिस्टर केली म्हणजे झाले असे नाही. सेबी अंतर्गत काही नियमावली देखील दिलेली आहे, जर त्या नियमांचे पालन कंपनी करत नसेल तर सेबी त्या कंपनीला एक्सचेंज मधून काढून टाकू शकते.


शेअरचे भाव उतर चढ का होतात - Shares Rates Up and Down

मागणी आणि पुरवठा या दोन शेअर मार्केट मधील शेअर चे भाव वधारने किंवा घटने याचे कारण आहे. यालाच आपण डिमांड आणि सप्लाय असे म्हणू शकतो. शेअर मार्केट मध्ये आपल्याला दोन प्रकारचे लोक आढळतात. काही लोक हे मार्केट वाढण्यासाठी म्हणजे मार्केट चढले यासाठी बोलतात तर काही लोक मार्केट पडेल म्हणजेच कोसळेल असे बोलतात. आपल्याला मार्केट कधी वाढेल आणि कधी पडेल यासाठी महत्वाचे दोन मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.

शेअर बाजारात जर पुरवठा वाढत असेल आणि मागणी कमी होत असेल तर मग शेअरचे दर हे घसरतात.

जेव्हा मागणी वाढते आणि ती एका लिमिटला ओलांडून पुढे जाते तेव्हा पुरवठा हा कमी पडलेला असतो आणि त्यामुळे शेअरचे दर हे खूप वाढतात.

आता फक्त मागणी आणि पुरवठा हा शेअर चा असतो. त्यात वाढ होते किंवा कमी येते यासाठी कंपनीची धोरणे किंवा कंपनीचे निर्णय हे जास्त कारणीभूत असतात.

आपण आता एक उदाहरण घेऊयात. समजा सिरम इन्स्टिट्यूट ने कोरोना लस निर्मितीला सुरुवात केली होती आणि आता त्यांची लस ही सरकारने मान्यता देखील दिलेली आहे म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट ही प्रॉफिट मध्ये असणार आहे. जर समजा तुम्ही सिरम जेव्हा लस बनवत होती तेव्हा स्टॉक बघितले असतील तर तेव्हा ते हळूहळू वाढतच होते कारण लोकांना माहीत होते की पुढे हे लस आणणार आहेत आणि त्यामुळे त्यांचे शेअर हे नक्की वाढणार आहेत. अशा काळात जर तुम्ही शेअर खरेदी करायला गेलात तर मागणी ही खूप जास्त होती, प्रत्येकाला सिरम चे शेअर हवे होते परंतु प्रत्येक जण शेअरची किंमत वाढणार आहे या आशेने शेअर विक्री करत नव्हता आणि त्यामुळेच मार्केट मध्ये पुरवठा हा खूप कमी होता. यामुळे शेअर ची किंमत ही खूप वाढली होती.

आता आपण उदाहरण घेऊ की जर समजा सिरमला लस बनविण्यात अपयश आले असते तर लोकांनी शेअर ला किंमत वाढणार नाही हे लक्षात घेऊन शेअर विक्रीला काढले असते. त्यामुळे बाजारात शेअर खूप प्रमाणात विक्रीला आले असते आणि खरेदी करणारे मात्र कोणीही नसते. त्यामुळे त्या शेअर च्या किमती या घसरल्या असत्या. अशा प्रकारे शेअर बाजारात तुम्हाला शेअरच्या किंमतीत चढ उतार हे बघायला मिळतात.


शेअर बाजारामध्ये पैसे कसे लावावे - How To Invest Money in Share Market

ट्रेडिंग अकाउंट खोलून तुम्ही शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक ही करू शकता. सध्या अनेक असे apps आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक ही करू शकता. शेअर बाजारात पैसे गुंतवत असताना काही गोष्टींचे भान आपण पाळले पाहिजे. आपल्याला एक गोष्ट आधी लक्षात घ्यायला हवी की आपण पैसे लावतोय परंतु यात खूप धोका आहे. आपले पैसे कधी गमावू याची काही एक खात्री नसते. त्यामुळे शेअर बाजारात पैसे लावताना आधी ब्रोकर्सचा सल्ला घेतलेला कधीही चांगले. जर तुम्हाला ब्रोकर नको असेल तर मग तुम्ही त्याविषयी थोडाफार आधी रिसर्च करणे गरजेचे आहे. ज्या कंपनीचे शेअर घेतोय तिची मागील काळातील कामगिरी आपण बघितली पाहिजे. त्यानुसार मग आपण ते शेअर किती घ्यायचे, घ्यायचे की नाही घ्यायचे आणि घेतले तरी किती वेळात पुन्हा विकायला काढायचे हे निर्णय घेऊ शकतो.

शेअर मार्केट मध्ये पैसे कसे लावावे यासाठी खालील काही मुद्दे आहेत त्यांची काळजी नक्की घ्या.

शेअर मार्केट मध्ये उतरत असताना शोध घेण्याची तयारी आपली असायलाच हवी. आता काहीतरी शोध घ्यायचा संशोधन करायचे म्हणून लोक शेअर मार्केटकडे पाठ फिरवतात परंतु आपण बघितले तर संशोधन केले नाही तर शेअर मार्केट मध्ये अपयश हे नक्कीच आहे. त्यामुळे अगोदर तुम्हाला जो शेअर विकत घ्यायची असेल त्यावर संशोधन करा आणि जाणून घ्या की मागील काळात या शेअर ने काय कामगिरी केली आहे आणि त्यावरूनच त्यांची पुढील वाटचाल काय असेल याचा अंदाज तुम्हाला बांधता यायला हवा. हे सर्व करत असताना दुसऱ्याने केलेले संशोधन हे कधीच न वापरता स्वतः संशोधन करायला शिका जेणेकरून तुम्ही स्वतः निर्णय हे घेऊ शकता.

ययाशिवाय चांगल्या कंपन्यांनमध्ये गुंतवणूक ही करायला शिका जेणेकरून तुम्हाला जास्त काही संशोधन करायची गरज पडणार नाही. एकाच स्टॉक मध्ये सर्व पैसे गुंतवण्याऐवजी आपला पैसा हा विभागून लावत जा. जेणेकरून एखाद्या शेअर मध्ये तुम्हाला नुकसान होत असेल तर ते दुसरे शेअर्स भरून नक्कीच काढतील.

शेअर मार्केट हा रिस्क चा खेळ आहे आणि स्कॅम 1992 मधील डायलॉग प्रमाणे यात रिस्क है तो इष्क है हे तत्व लागू पडते. थोडीफार रिस्क घेऊन तुम्ही वावरू शकत असाल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत जास्तीत जास्त फायदा मिळण्याच्या संधी असतात.


शेअर बाजारामध्ये शेअर कसे विकत घ्यावे - How to Buy shares in Share Market

शेअर विकत घेताना वर सांगितलेल्या काही गोष्टी पाळल्या तर तुम्ही या शेअर मार्केट व्यवसायात थोडे पुढे जाऊ शकता. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असताना तुम्हाला सुरुवातीला शेअर हे विकत घ्यावे लागतात. हे शेअर विकत घेताना आपल्याला त्या कंपणीविषयी माहिती असणे गरजेचे असते. कारण शेअर मार्केट मध्ये अनेक अशा कंपनी देखील आलेल्या आहेत ज्या लिस्ट देखील होतात आणि लोक त्यांचे शेअर देखील विकत घेत असतात परंतु काही काळाने या कंपन्या सर्वांचे पैसे घेऊन पळून जात असतात. त्यामुळे अशा कंपन्या पासून सावध राहिलेलं कधीही चांगले.

तुम्हाला अनेक पुस्तके किंवा वर्तमानपत्रे यांच्या माध्यमातून शेअर मार्केटविषयी अधिक माहिती मिळेल. दररोज शेअर मार्केट मध्ये होणाऱ्या हालचाली जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर काही युट्युबर देखील आहेत त्याशिवाय इकॉनॉमिक्स टाइम्स सारखे वर्तमानपत्र देखील आहे. टेलिव्हिजन वर सीएनबीसी नेटवर्क हे एक न्यूज चॅनल आहे ज्यावर तुम्हाला शेअर मार्केट विषयी अधिक आणि अपडेटेड माहिती ही सतत मिळत राहील.


Nifty आणि Sensex काय आहे - What is Nifty and Sensex

Nifty ही NSE ची एक इंडेक्स आहे. आता इंडेक्स म्हणजे ही एक यादी आहे. या यादीमध्ये देशातील सर्वात जास्त किंमत असलेल्या स्टॉक च्या 50 कंपनी असतात. Nifty मध्ये ज्या कंपनीच्या स्टॉक ची किंमत ही जास्तीत जास्त वाढते तिला टॉप गेनर्स तर ज्यांची किंमत ही खूप कमी होते त्यांना टॉप लुजर्स असे म्हणतात. Nifty ची आकडेवारी तुनहाला दररोज वृत्तपत्रात आणि टीव्हीवर बघायला मिळेल.

याचप्रमाणे Sensex देखील BSE ची इंडेक्स आहे. यात भारतातील BSE शी जोडलेल्या टॉप 30 कंपन्यांचा समावेश Sensex Index मध्ये होतो. सर्वाधिक वाढलेली स्टॉक किंमत ही टॉप गेनर्स आणि सर्वाधिक कमी झालेली स्टॉक किंमत ही टॉप लूजर्स म्हणून ओळखली जाते. सेन्सेक्सची आकडेवारी ही देखील दररोज आपल्याला वृत्तपत्रात आणि टेलिव्हिजनवर बघायला मिळेल.


Support Level काय असते

सपोर्ट लेव्हल ही Price चार्ट मधील अशा पॉईंट्स ची लेव्हल असते जिथे sellers पेक्षा buyers ची संख्या ही आपल्याला जास्त बघायला मिळत असते. शेअर्स च्या किमती या सपोर्ट लेव्हल पासून वाढायला सुरुवात होण्याची शक्यता जास्त असते.


Resistance Level काय असते

रेसिस्टन्स लेव्हल ही price चार्ट मधील अशा पॉईंट्स ची लेव्हल असते जिथून पुढे आपल्याला Buyers पेक्षा sellers हे जास्त दिसतात. शेअर्स ची किंमत एका resistance level नंतर पडायला सुरुवात होते असा अंदाज असतो.

Support and Resistance (S & R) हे आपल्याला स्टॉक मार्केट मध्ये एन्ट्री कधी घ्यायची, एक्झिट कधी व्हायचे आणि टार्गेट निश्चित करण्यासाठी मदत करत असतात.


निष्कर्ष

हा लेख लिहिण्याचा उद्देश फक्त एवढाच की आजकाल जगातील अनेक लोक व्यवसायाच्या मदतीने आणि शेअर मार्केट च्या मदतीने पैसे कमवत आहेत. तरीही आपल्या मराठी मंडळींना देखील याचे ज्ञान मिळावे आणि त्याचा फायदा व्हावा हाच मूळ उद्देश आहे.

आज आपण शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेअर मार्केट हे क्षेत्र खूप मोठे आहे तरी देखील जी गरजेची अशी माहिती आहे ती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला Share Market Information In Marathi हा लेख आवडला असेल आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर मार्केट विषयी माहिती मिळावी असे वाटत असेल तर नक्की शेअर करा!

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

2 thoughts on “शेअर बाजार संपूर्ण माहिती मराठी | Share Market Information In Marathi”

  1. नवीन लोकांसाठी ही माहिती खुप आवश्यक आहे. समजायला चांगली व फायदेशीर आहे.

    Reply
    • 🙏 धन्यवाद सर, त्यामुळेच आम्ही ही माहिती सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. याला अजून आपल्या मित्रांसोबत आणि इतरांसोबत शेअर करा.

      Reply

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap