स्लॅम बुक काय आहे, कसे बनवायचे, त्यात काय लिहावे? What Is Slam Book? How To Make Slam Book? What To Write In Slam Book

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला स्लॅम बुक काय आहे, स्लॅम बुक कसे बनवायचे आणि स्लॅम बुकमध्ये काय लिहावे हे सर्व सांगणार आहे. आम्ही स्वतःचा खूप ठिकाणाहून अनुभव घेऊन स्लॅम बुक बद्दल लिहीत आहोत त्यामुळे ह्यात आपल्या सर्व शंका दूर होतील.

शाळेतील विद्यार्थी म्हटल की त्यांना खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या सवयी असतात आणि त्यातूनच सवय किंवा आवड म्हणजे स्लॅम बुक लिहिणे. आम्हाला देखील लहानपणी स्लॅम बुक लिहिण्याची आवड होती आणि तेव्हा मी नवनवीन स्लॅम बुक किंवा त्यात नवनवीन गोष्टी टाकत राहायचो, त्याच गोष्टी आज मी आपल्यासोबत मांडणार आहे.

जर तुम्ही slam book हे नाव ऐकले असाल परंतु त्याविषयी तुम्हाला अजिबात काही माहिती नसेल तर हा लेख तुम्ही काळजीपूर्वक वाचा. आणि महत्वाची बाब म्हणजे ज्या चुका मी केल्या आहेत त्या तुम्ही स्लॅम बुक लिहिण्यात अजिबात करू नये याचीही आम्ही काळजी घेतली आहे.

Slam Book चा अर्थ काय आहे? What Is Meaning Of Slam Book?

आपल्याला हा प्रश्न नक्की पडला असेल की slam book म्हणजे नेमके काय असते, what is meaning of slam book कारण आजकाल खूप मुलं स्लॅम बुक तर आपल्या जवळ ठेवतात परंतु त्या वहीचा खरा अर्थ काय होतो हेच भरपूर लोकांनां माहिती नसते.

स्लॅम बुकचा अर्थ म्हणजे अशी वही जी लहानपणापासून तर मोठ्या होईपर्यंत जपली जाते आणि महत्वाचे म्हणजे त्यात आपल्या मित्रांची आणि आपल्या जवळील लोकांची संपूर्ण माहिती असते जसे त्यांचे नाव काय, त्यांना काय आवडते, त्यांची ताकत काय आहे, त्यांची कमजोरी काय आहे, ई. मुख्यतः त्यात काही प्रश्न विचारले असतात त्यांची उत्तरं देण्यासाठी स्लॅम पुस्तक समोरच्याला द्यावे लागते आणि ते त्यातील सर्व माहिती भरून आपल्याला पुन्हा परत करतात.

Slam Book काय आहे? What Is Slam Book?

आपण तर आतापर्यंत खूप पुस्तक, वह्या बघितल्या असतील परंतु त्यात स्लॅम बुक एक वेगळीच वही म्हणून ओळखली जाते. त्यामुळे कधी ना कधी आपल्या मनात what is slam book असे आलेच असेल आणि आपण ते जाणण्याचा प्रयत्न ही केला असेल परंतु आपल्याल आपल्या मनासारखे उत्तर मिळाले नसेल.

तर स्लॅम बुक म्हणजे एक वही असते ज्यात तुमच्या आवडत्या लोकांबद्दल मनोरंजक आणि वैयक्तिक माहिती लिहिलेली असते ती सुद्धा त्यांच्या स्वतःच्या शब्दात व अक्षरात. ही वही भरपूर लोकांकडे असते आणि ज्या लोकांकडे नसते त्यांना ह्या वही बद्दल जाणून घेणे आवडीचे वाटते. तुम्ही slam book movie नक्कीच बघितली असेल आणि त्यात स्लॅम बूकचा क्षण घेतला आहे, त्यामध्ये अभिनेता अभिनितीला स्लॅम बुक डेपो ज्यात ती तिची सर्व माहिती लिहिते, परंतु ती त्या वहितील ते एक पान फाडून आपल्याकडे ठेऊन घेते.

स्लॅम बुक मध्ये असे काही प्रश्न लिहिलेले असतात ज्यांची उत्तर देणे अनिवार्य असते कारण त्यात काही सोपे प्रश्न असतात असे नाव, छंद, कमतरता, ताकद, आणि इतर अनेक काही असतात. हे स्लॅम बुक लहानपणापासून ते मोठ्या होईपर्यंत जपायचे असते, आपल्या आवडत्या वस्तूंमध्ये ठेवायची असते.

Slam Book कसे बनवायचे? How To Make Slam Book?

जर आपण विद्यार्थी असाल आणि तुम्हाला स्लॅम बुक काय आहे माहिती असेल तर how to make slam book असा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर आपण एकदम योग्य ठिकाणी आले आहात कारण इथे मी स्लॅम बुक कसे बनवायचे ते विस्तार मध्ये समजावले आहे. तसे तर स्लॅम बुक हे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असते परंतु त्यातील गोष्टी ह्या सारख्याच असतात त्यामुळे वहीच्या आतील बाजूस जास्त लक्ष केंद्रित करा.

खाली मी एकूण 2 प्रकारचे स्लॅम बुक दिले आहेत ज्यात पहिले हे पूर्णपणे स्वतंत्र वस्तूंपासून बनवले आहे आणि दुसरे म्हणजे वहीपासून बनवले आहे.

कागदापासून बनवा स्लॅम बुक

सर्वात आधी A4 साइज चे कागद (A4 size papers) घ्या, जेवढ्या पानांची स्लॅम बुक हवी असेल त्याच्यापेक्षा अर्धे पाने घ्या, त्याचबरोबर एक A4 साईज पेक्षा थोडा मोठा रंगीत कार्डशीट पेपर (cardsheet paper) घ्या.

घेतलेल्या कागदांना आडवे पकडून मध्यभागुन घडी घाला, म्हणजेच मधून त्याचे दोन भाग होतील वही सारखे. त्यानंतर त्यांना एकसोबत वरून क्लिप लावा ज्याने ते तसेच राहतील, नंतर त्यांच्या मधून घडी घातलेल्या जागेवर स्टॅपल करा किंवा सुई धाग्याने दोन टाके टाका.

नंतर कार्ड शीट पेपर घ्या लक्षात ठेवा की पेपर रंगीत किंवा डिझाईन वाला हवा, त्याला त्या कागदांच्या वरून कव्हर घाला जसे आपण पुस्तकांना लावतो तसे. कव्हर लावल्यावर त्याला वरून जिथून आधी शिवले होते तिथूनच डिझाईन मध्ये सुई धाग्याचे टाके टाका.

कार्ड शीट पेपरवर केच पेनाने मोठ्या आणि सुंदर अक्षरात Slam Book नाव टाका, आणि पुढच्या व मागच्या बाजूला वेगवेगळ्या रंगांनी नक्षी काढा.

आता आपली slam book बाहेरून पूर्ण तयार झालेली आहे परंतु आता मधून तिच्यात प्रश्न लिहा. लक्षात ठेवा की मधील प्रश्न सुंदर अक्षरात टाका ज्याने सर्वांना सहजतेने वाचता येईल.

वहीपासून बनवा स्लॅम बुक

एक सामान्य आकाराची छोटी वही घ्या A4 size ची, आणि एक कार्ड शीट पेपर घ्या.

कार्ड शीट पेपरला वहीच्या वर कव्हर लाऊन स्टॅपल करा, नंतर त्या कार्ड शीट वर मोठ्या आणि सुंदर अक्षरात Slam Book असे नाव टाका. कार्ड शीट वर सुंदर तुम्हाला आवडणारी नक्षी काढा ज्याने तिची शोभा अजून वाढून दिसेल.

एवढे झाल्यावर आता उरते मधले काम म्हणजे प्रश्न लिहिणे, तर तुम्हाला हवे असणारे प्रश्न तुम्ही त्यात लिहायचे आहे आणि तेही सुंदर अक्षरात ज्याने समोरच्याला ते सहजतेने वाचता येतील.

Slam Book मध्ये काय लिहायचे? What To Write In Slam Book?

स्लॅम बुक मध्ये काय लिहायचे याच्या आधी प्रश्न येतो की स्लॅम बुक तुमची आहे की तुम्हाला कोणीतरी त्यात लिहण्यासाठी दिलेली आहे.

जर slam book तुमची आहे तर त्यात तुम्ही काही प्रश्न लिहायचे आहे ज्यांची अपेक्षा तुम्हाला समोरच्याकडून आहे. यात तुम्ही काही सामान्य प्रश्न विचारू शकता जसे तुमचे नाव काय, तुम्ही किती वर्षाचे आहात, तुमचा छंद काय आहे, तुमचा ताकद काय आहे, तुमची कमजोरी काय आहे असे काही सामान्य प्रश्न त्यात लिहा. प्रश्न हे एकदम सुंदर आणि योग्य अक्षरात लिहायचे आहे कारण ते समोरच्याला सहजतेने वाचता येईल असे.

आता चर्चा करू की जर तुम्हाला स्लॅम बुक समोरच्याने दिले असेल म्हणजे त्याने त्याचे slam book तुम्हाला भरण्यासाठी दिले असेल, तर त्यात तुम्ही तुमची माहिती लिहायची आहे. थोडक्यात त्यात जे प्रश्न दिले असतील ते तुम्हाला योग्य द्यायची आहेत.

निष्कर्ष

स्लॅम बुक एक अशी वही आहे जिच्या मदतीने आपण समोरच्याबद्दल जाणून घेऊ शकतो जसे त्याचे पूर्ण नाव, छंद, ताकद, कमजोरी आणि इतर अनेक काही ज्याची तुम्हाला गरज असेल. जर तुम्ही कोणाला slam book दिली आहे तर त्याला ती पूर्ण भरून देणे भाग आहे कारण म्हणूनच तर तिला स्लॅम बुक असे म्हणतात.

वरील लेखात मी what is meaning of slam book, what is slam book, how to make slam book आणि what to write in slam book दिलेले आहे आणि मला माहितीये की आपल्याला हे सर्व नक्की आवडले असेल. कारण यात मी सर्व विस्ताराने समजावले आहे त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap