सूर्य उगवला नाही तर… मराठी निबंध | Surya Ugavala Nahi Tar

शाळेत असताना आपल्याला एक निबंध नेहमी विचारला जातो तो म्हणजे सूर्य उगवला नाही तर काय होईल आणि आपल्या मनात खूप काल्पनिक कथा रचली जातात. तसेच मी माझा एक काल्पनिक निबंध तुमच्या समोर घेईल आलो आहे.

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध सांगणार आहे जो आपल्याला शाळेत पैकी चे पैकी गुण मिळवून देईल आणि मिळतील. तुम्ही यात काही स्वतःचे मुद्दे देखील टाकू शकता.

सूर्य आपल्या आयुष्यात एक मुख्य भूमिका निभावतो कारण सूर्य आहे म्हणून आपण एवढे निरोगी आहोत, झाडे जिवंत आहेत, जमीन शेती करण्याच्या कामाची आहे.

खालील निबंध कोणकोणत्या विषयांवर वापरू शकता

सूर्य उगवला नाही तर
सूर्य नसता तर
सूर्य संपावर गेला तर
मी सूर्य बोलतोय
सूर्याचे महत्व
सूर्याची गरज
सूर्याचे आत्मकथन
सूर्य माहिती

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध | Sury Ugavala Nahi Tar

ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि मी शाळेत गेलो होतो, माझा वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता आणि माझा बाकडा खिडकीच्या बाजूलाच होता. त्या खिडकीतून आत खूप तिश्र्न उन येत होते आणि माझ्या एका बाजूचा गाल, हात त्या उन्हाने तापून लाल झाला होता. तेव्हा मला त्या उन्हाची चीड आली आणि मला सूर्य नकोसा वाटायला लागला.

माझ्या मनात विचार चालू लागला जर सूर्य नसला तर काय होईल? आणि मी त्या विचारांत वावरायला लागलो.

दिवसभर फक्त अंधार त्यामुळे सकाळ होणारच नाही पुन्हा पुन्हा अंघोळ करण्याचे काम नाही. जेव्हा पटेल तेव्हा मस्त झोप काढायची आणि घरीच आराम करायचा.

शाळेला सुट्टी फक्त खरीच मज्जा मारायची आणि वडील, आई, दीदी, दादा सर्वजण घरी फक्त त्यांच्यासोबत खेळायचे, मस्ती करायचे, खायचे, प्यायचे.

सूर्य नसला तर उन पडणार नाही आणि उन पडले नाही आणि आपल्याला उनच लागणार नाही परंतु एकीकडे विचार केला तर आपल्याला सूर्याच्या किरणांचा फायदा मिळणार नाही जसे की आपली त्वचा निरोगी आणि चमकदार दिसणार नाही, हाडे मजबूत राहणार नाही, शरीर आतून साफ होणार नाही आणि अजून बरेच काही सूर्यापासून मिळणारे फायदे प्राप्त होणार नाहीत.

लोकांमध्ये उत्साह दिसणार नाही आणि कोणीही कामाला जाणार नाही. आपले वडील जर घरीच राहिले तर आपल्या घरात पैसे कसकाय येणार, घरातील गरजा कसकाय पूर्ण होतील, आपल्याला खायला मिळणार नाही.

दुकाने, बाझार उघडणार नाही कारण प्रकाशच राहणार नाही तर लोक दुकाने कसकाय उघडतील. त्यात सुद्धा आपलाच तोटा आहे कारण आपण महिनेतून एक दोनदा तरी बाजारात जातो आणि आपल्यासाठी किंवा आपल्या घरासाठी लागणारी वस्तू आणतो. जर आपल्याला रोज लागणाऱ्या वस्तूच भेटणार नाही आणि खाण्यास देखील वस्तू भेटणार नाही तर आपण जीवित कसकाय राहणार.

शाळा जर एक महिना बंद राहिली, तीन महिने बंद राहिली तर काही वाटत नाही परंतु जास्त दिवस झाले तर घरी बसणे देखील नकोसे वाटायला लागते. मुख्य तर आपला अभ्यास होणार नाही, शाळेत जाऊन शिकण्याची मज्जा घेता येणार आणि आणि शाळेतील ती मत्रांबरोबची मज्जा मस्ती देखील करता येणार नाही. शिक्षकांनी आठवण येईल ते त्यांचे शिकवणे, समजले नाही तर पुन्हा समजावणे, गृहपाठ नाही केला तर शिक्षा करणे.

सर्वजण आपापल्या घरी असतील त्यामुळे मित्रांची भेट होणार नाही, आपल्याला एकही मित्र नाहीये असे वाटेल, ते संध्याकाळी मित्रांबरोबर फिरायला जाणे आणि खेळायला जाणे कुठ तरी हरवून जाईल. मित्रांबरोबर जीवन जगण्याचे स्वप्नच अधुरे राहील. मित्र हा आपल्याला हसवतो आपली निराशा दूर करतो पण मित्रच नसेल तर ते कसे घडेल.

सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली नाही तर पृथ्वीवरील पाणी कसकाय राहील, नदी, तलाव, खोरे, समुद्र, ई कसकाय दीर्घकाळ टिकतील. करणं सूर्यामुळे पाण्याचे बाषपीभवन होते आणि मग पाऊस पडतो आणि जर पाऊसच पडला नाही तर आपल्याला पिण्यास पाणी कसे राहील. जेवढे नदी, समुद्र, तलाव यांच्यातील पाणी आहे तेवढेच राहील ते संपल्यावर पिण्यास पाणी कुठून येईल आणि पाणी नाही तर आपण जिवंत कसे राहणार.

सूर्यामुळे झाडे झुडपे जिवंत आहेत कारण सूर्याच्या उष्णतेमुळे त्यांना पोषण मिळते आणि त्यांची वाढ होते आणि जर झाडेच राहणार नाही तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही आपण जिवंत राहणार नाही.

शेतीत काय हाल होतील बिचाऱ्या शेतकऱ्याचे तर नुकसानच आहे ना! जर शेतात काही पिकनार नाही तर तो कमवणार कसे तो आणि आपण खाणार काय कारण शेतातील रोपांना आणि जमिनीला जेवढी पणीची गरज असते तेवढीच सूर्याची देखील गरज असते. तुम्ही बघितले असेल हंगाम नुसार पीक शेतात पेरले जाते जसे उन्हाळी बाजरी वेगळी, पावसाळी बाजरी वेगळी.

पृथ्वीवर अन्न आणि पाणीच शिल्लक राहणार नाही तर सर्व जीव, मनुष्य, प्राणी, पक्षी, झाडे कसे जिवंत राहतील.

काय तुम्हाला माहितीये सूर्यापासून आपल्याला कायकाय पोषण मिळते नाही तर मी थोडक्यात आपल्याला सांगतो. सूर्यापासून व्हिटॅमिन डी मिळते, आपली त्वचा निरोगी राहते, गोरी राहते, हाडे ठिसूळ होत नाहीत, डोळे तेज राहतात, शरीरातील घान निघते आणि अजून भरपूर काही फायदे होतात.

म्हणून सूर्य उगायलाच हवा आणि सूर्या बद्दल असे विचार करणे अयोग्य आहे. उलट आपल्याला आपल्या सृष्टीतील एक एक गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की निसर्गात आपल्याला किती छान छान गोष्टी मिळाल्या आहेत.

निष्कर्ष

जर सूर्य उगवला नाही तर मुळात असा विचार कारणच चुकीचा आहे. खरतर आपण त्याच्यावरच जिवंत आहोत आणि सर्व सृष्टी हिरवीगार आणि निरोगी आहे. सर्वीकडे काळोख पसरला तर कोणामध्ये उत्साह दिसणार नाही कोणाचीही काम करण्याचे मन होणार नाही.

मान्य आहे की सूर्याच्या किरणामुळे आपल्याला काही हानी देखील होते परंतु त्या गोष्टीचे जबाबदार देखील आपणच आहोत. आपणच एवढे प्रदूषण करून ठेवले जसे सर्वी कडे फक्त वाहनांचा धूर, कारखान्याचे धूर, सांडपाणी ज्यामुळे प्रदूषण होऊन सूर्याच्या वरच्या थरला बारीक बारीक छिद्र पडतात.

जर आपण प्रदूषण कमी केले तर सूर्य आणि आपण दोघीजणी सुरक्षित राहणार.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap