हृदयस्पर्शी शिक्षक दीन भाषण मराठी | Teachers Day Speech In Marathi

5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनानिमित्त काही दोन शब्द बोलावे असे म्हटले तर Teachers Day Speech In Marathi. ह्या दिवशी भाषण देण्याची संधी मिळणे म्हणजे भाग्यच समजा कारण जे शिक्षक आपल्यासाठी एवढे काही करता त्यांच्यासाठी दोन शब्द बोलणे भाग्यच.

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला शिक्षण दीन भाषण मराठीत सांगणार आहे. ह्या भाषणाने नक्कीच आपला पहिला क्रमांक येईल.

👉 नक्की वाचा : जर मी शिक्षक झालो तर मराठी निबंध

शिक्षक दीन मराठी भाषण | Teachers Day Speech In Marathi

व्यासपीठावर जमलेले माझ्या गुरुजनांनो आणि माझ्या बंधू बघिंनिनो आपल्याला माझा कोटी कोटी प्रणाम. आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनानिमित्त मी आपल्याला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने एकावे अशी माझी नम्र विनंती.

सर्वात आधी आपण सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मुख्यतः आदरणीय गुरुजनांना. आणि खरतर मी आभारी आहे की मला इथे दोन शब्द सांगण्याची संधी प्राप्त झाली.

आपल्याला माहितीच असेल की 5 सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असून शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या मते शिक्षकांचा मेंदू जगातील सर्वात चांगला मेंदू असतो, आणि त्यांचा शिक्षणामध्ये मोठा मौल्याचा वाटा आहे.

जीवनाच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला एक एक गोष्ट शिकायला आणि पाहायला मिळते आणि ती गोष्ट समजे पर्यंत शिकवणारे व्यक्ती म्हणजे गुरु असतात. त्यांना गुरू, शिक्षक, मास्तर, सर, मॅडम, गुरुजी, मार्गदर्शक आणि अजून अश्या भरपूर सुवर्ण शब्दांनी संबोधले जाते.

पक्षी हा उंच भरारी घेत असतो आणि आपल्यासारखे खालून बघणारे विचार करत असतात की जर मलाही पंख असते तर मी खूप उंच झेप घेतली असती परंतु त्या पक्षीच्या पंखांमधील धडपड कोणालाही दिसत नाही आणि आपल्या जीवनात त्या पंखांची जागा म्हणजे आपले गुरू, शिक्षक होय.

जन्म झालेल्या मुलाला सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर दिसणारी व्यक्ती म्हणजे आई आणि बाबा असतात बरं का. त्याच्या एवलेश्या डोळ्यांनी तो सारे जग पाहत असतो आणि तोंडातून पहिले शब्द बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो त्यात पुस्तकातील आणि जीवनातील बाराखडी शिकवणारी आई त्याच्या जन्मापासून तर मरेपर्यंत साथ देण्याचे वचन देऊन बसलेली असते.

मुलं गुडघ्यावर आंभा करत चालतांना त्याचा हात घट्ट पकडून दोघी पायांवर विश्वासाने चाल सांगणार बाप आपल्या पहिल्या आई गुरु बरोबरचाच दर्जा मिळालेला गुरु असतो.

असे आपल्या जीवनातील पहिले दोन मोठे गुरु म्हणजे आपले आई वडील जे मुलाच्या चेहरा पाहून ओळखून घेतात की मुलाला काय झालंय.

मुलगा शाळेत गेल्यावर त्याची अजून एका गुरुंबरोबर ओळख होते ते म्हणजे शिक्षक. शिक्षक म्हणजे मुलाच्या जीवनाला आकार देणारा शिल्पकार, शिक्षक म्हणजे मुलाच्या जीवनाचे संदर्भासह स्पष्टीकरण, शिक्षक म्हणजे आपला घसा कोरडा ठेऊन मुलांना ज्ञानाचे पाणी पाजणारा बुद्धिकार, शिक्षक म्हणजे माणसाला जीवनात उडण्यासाठी पंख प्रदान करणारा देवता, शिक्षक म्हणजे माणसाला एक वेळेस नाही तर दहा वेळेस एकच गोष्ट समजवणारा ज्ञानदाता.

आपले संपूर्ण ज्ञान सहज वाटून त्याला शहाणे करावे ही उदार भावना ठेवणे कुणी छोट्या मनाची माणसांची नाही कारण याच्यासाठी लागणारे मोठे मन मात्र शिक्षकाकडेच असते.

प्रत्येक वर्गात अनेक शिक्षक बदलतात कोणी दयाळू असतं तर कोणी कठोर तर कोणी प्रेमळ असे अनेक शिक्षक आपल्याला वर्गाच्या वाटेवर भेटत असतात परंतु त्यातील काही शिक्षक आपल्या मनात घर करून जातात. परंतु एक गोष्ट नक्की असते प्रत्येक शिक्षक आपल्याला काही ना काही शिकवून जातात कोणी पुस्तकातील ज्ञान तर कोणी जीवनातील पढाव.

अश्याच काही शिक्षकांमधिल माझी काही किस्से आपल्या समोर मांडतो ज्यात आपल्याला नक्कीच मज्जा येईल आणि काही शिकायला देखील मिळेल.

मी पाचवीत होतो आणि तेव्हा आम्हाला एक सर होते पाटील सर ते आम्हाला रोज एक गृहपाठ देत, गृहपाठ असा होता की एक शब्दकोश होता त्यातून रोज दहा शब्द पाठ करून यायचे आणि पुढच्या दिवशी ते एका वहीवर लिहायचे बिना शब्दलेखन चुकता. त्यात इंग्रजीत शब्द होते आणि त्यांचा मराठीत अर्थ दिलेला होता त्यामुळे आमचा एवढा सराव झाला की जणू भविष्यात शब्दलेखन बिना चुकता येतील. त्यामुळे इंग्रजीची देखील वाट मोकळी झाली.

पुस्तकांच्या बरोबर जीवनातील धडे शिकवणारे शिक्षक आपण सर्वांनाच खूप प्रिय असतात. शिक्षक म्हणजे फक्त पुस्तकीय ज्ञान देणारे नाही तर जीवनातील गोष्टींचा अनुभव करून देणारे गुरु असतात. त्यांचा फक्त शाळेतच नाही तर शाळेच्या बाहेर देखील आपल्याशी चांगला संबंध असतो, जर एखाद्या विद्यार्थाला काही गरज भासली किंवा काही अडचण आली तर ते त्याला मनाने आणि आर्थिक मदत करण्यास देखील तयार असतात असे हे फक्त आपले गुरूच नाही तर आपले साथीदार सुद्धा असतात.

निष्कर्ष

5 सप्टेंबर शिक्षक दीन आल्यावर प्रत्येकाच्या मनात येते की शिक्षक दिनानिमित्त भाषण कोणते द्यावे ज्याने करून ते सर्वांपेक्षा वेगळे आणि आकर्षित असायला हवे तर आपण बिलकुल चींत्ता करू नये कारण वरील teachers day speech in marathi फक्त आपल्यासाठीच आहे.

शिक्षक दीन सोडला तर काहीजण इतर दिवस शिक्षकांचा मान ठेवत नाहीत, त्यांना वाईट बोलतात आणि त्यांच्या पाठी त्यांचा अपमान करतात तर हे पूर्णपणे चुकीचे आहे.

मला माहितीये मी वरील शिक्षक दीन भाषण मराठी आपल्याला नक्की आवडले असेल आणि आपण ह्या भाषणात आपले काही विचार सुद्धा मांडू शकता ज्याने हे भाषण अजून सुंदर बनेल.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap