टेलिग्राम काय आहे आणि कसे यूज करावे? | What Is Telegram And How To Use

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला टेलिग्राम काय आहे आणि कसे यूज करावे? ते सांगणार आहे. जर आपल्याला टेलिग्रामबद्दल काहीच ज्ञान नसेल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात कारण इथे मी आपल्याला टेलिग्राम कसे वापरावे तेही सांगणार आहे.

इंटरनेटच्या युगात लोकं जास्तकरून सोशल मीडिया वर सक्रिय असतात परंतु काय तुम्ही जे सोशल मीडिया ऍप वापरतात ते तुमच्यासाठी योग्य आहे का, त्यात तुमचा डेटा सुरक्षित आहे का असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होत असतील. परंतु यांचे उत्तर आपल्याल न भेटल्यामुळे आपण इतर सोशल संकेतस्थळांकडे वळतात आणि असेच काहीजण telegram app वरून देखील दुसऱ्याकडे वळतात परंतु त्यांचे हे प्लॅटफॉर्म सोडायचे मन नसते कारण ते आहेच एवढे उत्तम.

तर मंडळी आता मी आपल्याला टेलिग्राम ऍप बद्दल पूर्णपणे डिटेल मध्ये सांगणार आहे ज्याने आपल्या सर्व शंका दूर होतील.

टेलिग्राम काय आहे? What Is Telegram In Marathi

टेलिग्राम एक असे प्लॅटफॉर्म आहे ज्यात तुम्ही इतरांशी बोलू शकता, चॅटिंग करू शकता, मोठमोठ्या गोष्टींची देवाण घेवाण करू शकता.

टेलिग्राम ऍप हे 2013 मध्ये दोन भाऊंनी मिळून तयार केले होते, निकोलाय दुरोव (Nikolai Durov) आणि पावेल दूरोव (Pavel Durov) अश्या दोन भाऊंनी चालू केले होते. आता Pavel Durov हे Telegram Company चे CEO देखील आहेत. आणि जास्तकरून टेलिग्राम नाव आले म्हणजे पावेल दूरोव यांचे नाव येते.

सध्या तुम्ही व्हॉटसअप आणि फेसबुक तर वापरले असेल आणि जसे व्हॉटसअप ऍप आहे तसेच टेलिग्राम ऍप आहे. परंतु टेलिग्राममध्ये व्हॉटसअप पेक्षा जास्त फीचर्स आहेत आणि प्रत्येक फील्ड मधल्या लोकांसाठी सोयीस्कर आहे. टेलिग्राममध्ये भरपूर चॅनल्स आणि ग्रुप्स असतात त्यात तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि आपण आपल्या आवडीनुसार चॅनल्स सर्च करुन त्याला जॉईन करून शकतात जसे चित्रपटांचे चॅनल्स, शैक्षणिक चॅनल्स, शॉपिंग चॅनल्स, गेमिंग चॅनल्स, इत्यादी. ह्या चॅनल्स मध्ये आपल्याला अपडेट्स मिळत राहतील आणि चित्रपट आणि इतर गोष्टी सुद्धा डाऊनलोड करू शकता.

टेलिग्राम ऍपचे खास वैशिष्ट्ये | Telegram App Features

टेलिग्राम ऍप मध्ये खूप सारे नवनवीन वैशिष्ट्ये आहेत जे अजुनही खूप साऱ्या लोकांना माहिती नाही आहेत तर तेच मी आपल्याला खाली सांगितले आहेत.

टेलिग्राम मोठ्या फाईल्स शेअरिंग आणि डाऊनलोड | Telegram Big Files Sharing And Download

जर आपण व्हॉटसअप वापरले असेल तर आपल्याला माहितीच असेल की त्यात आपण जास्त मोठ्या फाईल्स सेंड काही करू शकत जसे चित्रपट, जास्त MB च्या फाईल्स किंवा GB मध्ये असलेल्या फाईल्स. आणि आपण ह्या गोष्टीपासून नक्कीच चिंताग्रस्त असाल तर टेलिग्राम आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

कितीही मोठी फाईल्स, व्हिडिओज, चित्रपट असूद्या त्या तुम्ही जलद गतीने कोणालाही सेंड करू शकता फक्त टेलिग्राम च्या माध्यमातून. जर तुम्हाला कोणाला चित्रपट पाठवायचा आहे किंवा डाऊनलोड करायचा आहे तर तो तुम्ही जलद गतीने करू शकता.

यातील एक महत्वाचे फीचर म्हणजे आपण एखाद्या चॅनल किंवा ग्रुप मधून फाईल बिना डाऊनलोड करता दुसऱ्याला सेंड करू शकता, जसे व्हॉटसअप मध्ये आपल्याला जर एका ग्रुप मधली फाईल दुसऱ्या ग्रुप मध्ये किंवा कोणाला वैयक्तिक सेंड करायची असेल तर आधी आपल्याला ती फाईल व्हॉटसअप मध्ये डाऊनलोड करावी लागते मग एखाद्याला सेंड होते परंतु टेलिग्राममध्ये आपण बिना डाऊनलोड करता एखाद्याला सेंड करू शकता.

टेलिग्राम चॅनल्स | Telegram Channels

टेलिग्राम चॅनल्स हे टेलिग्राममधील प्रसिद्ध वैशिष्ट्य पैकी एक आहे कारण यात आपल्याला सर्वकाही मिळते ज्याची आपल्याला गरज असते किंवा शोधत असता. Telegram Channels मध्ये भरपूर प्रकारचे चॅनल्स आपल्याला बघायला मिळतात ज्यांना आपण डाऊनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनल मध्ये unlimited सदस्य जोडू शकतात हे इतर ऍपच्या गोष्टीत चांगले आहे.

आता आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की टेलिग्रामवर कोणकोणते चॅनल्स Follow करावे.

जर आपण चित्रपट बघण्याचे शौकीन असाल आणि आपल्याला आपल्या मनासारखे चित्रपट सापडत नसतील तर टेलिग्राम चॅनल्स आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारण यात आपल्याल सर्व प्रकारचे चित्रपट भेटून जातात जे आपल्याला इंटरनेट वर सुध्दा सापडत नाहीत तेही.

इतर अनेक चॅनल्स आपल्याला टेलिग्रामवर बघायला मिळतात ज्यात आपल्याला सर्व प्रकारचे चॅनल्स मिळतात जसे चित्रपटांचे चॅनल्स, शैक्षणिक चॅनल्स, शॉपिंग चॅनल्स, गेमिंग चॅनल्स, पुस्तकांचे चॅनल्स, अभ्यासातील नोट्स चॅनल्स, एमपीएससी यूपीएससी चॅनल्स, स्पर्धापरीक्षा चॅनल्स, ट्रॅव्हल चॅनल्स, न्यूज चॅनल्स, फॅशन चॅनल्स, व्यवसाय चॅनल्स, ई.

टेलिग्राम ग्रुप्स | Telegram Groups

टेलिग्राम ग्रुप्स हा आपल्यासाठी एक उत्तम फीचर्स ठरू शकते कारण यात तुम्ही एकूण 200000 सदस्य जोडू शकतात. ग्रुप मध्ये सर्वजण चॅटिंग करू शकतात आणि जे ग्रुप चे अडमिन असतील ते ग्रुपचे रुल्स बदलवून शकता.

आपल्याला टेलिग्रामवर अनेक वेगवेगळे ग्रुप्स बघायला मिळतील ज्यात आपण जॉईन होऊ शकता. जर आपण एक विद्यार्थी आहेत तर Telegram Groups आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण जर आपल्याला अभ्यासात काही अडचण असेल तर आपण ते लगेच इंटरनेट वर शोधतात परंतु तिथे आपल्याला आपल्या मनासारखे उत्तर भेटत नाही आणि नाही कोणी आपल्याला मार्गदर्शन करणारे असते त्यामुळे आपण टेलिग्राम शैक्षणिक ग्रुपांचा वापर करू शकता. त्या ग्रुप मधे जास्त सदस्य असल्यामुळे क्षणाला सदस्य ऑनलाईन असतातच आणि जेव्हा आपण आपली समस्या तिथे टाकतात तर खूप जण आपल्याला त्याचे उत्तर समजावून सांगतात. असे नाही की त्या ग्रुप मध्ये एकाच भागातील लोक जॉईन असतात तर त्या ग्रुप मध्ये वेगवेगळ्या ठीकाण्यातील लोकं जॉईन असतात जसे वेगवेगळ्या शहरातून, राज्यातून, देशातून.

जर आपलं डायरेक्ट ग्रुप मध्ये जॉईन झाले असाल तर त्यात आपला मोबाईल नंबर दिसणार नाही.

सिक्रेट चॅट | Secret Chat

टेलिग्राममध्ये आपल्याला एक secret chat नावाचे फीचर बघायला मिळते ज्यात तुम्ही समोरच्याशी आपल्याल नंबर न दिसता चॅटिंग करू शकता म्हणजेच तुम्ही ज्याच्याशी चॅट करत आहात त्याला तुमचा नंबर दिसणार नाही आणि नाही त्याचा नंबर तुम्हाला दिसेल. असे हे एक टेलिग्रामचे उत्तम फीचर्स मधील एक आहे.

जर आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीशी बोलत आहत तर आपल्यासाठी हे वैशिष्ट्य उपयोगी ठरू शकते कारण जेव्हा सामोरच्याशी चॅटिंग करतात तेव्हा ते संभाषण फक्त तुमच्या दोघात राहते.

सिक्रेट चॅट चे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे त्यात आपण किंवा समोरचा व्यक्ती स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही कारण ते पूर्णपणे secret chat असते. ही चॅट end-to-end encryption मध्ये होते. अजून एक मुख्य फीचर म्हणजे जर आपण ती सिक्रेट चॅट कॅन्सल केली तर समोरचा व्यक्ती आपल्याशी चॅटिंग करू शकत नाही कारण आपण ती चॅट संपवली असते त्यामुळे समोरच्याला टाईप करण्याच्या जागेवर chat cancel असे येते, आणि चॅट कॅन्सल समोरचा व्यक्तीही करू शकतो.

टेलिग्राम स्टिकर्स | Telegram Stickers

टेलिग्रामवर stickers देखील खूप प्रसिद्ध आहेत कारण चॅटिंग करताना स्टिकर्स एक नवीनच माहोल तयार करते. यातील stickers खूप छान असतात आणि हलणारे असतात त्यामुळे ते खूप खरे वाटतात.

जर आपण चॅट करत असाल आणि फक्त टायपिंग करतच बोलत असाल तर आपल्याला मध्ये मनोरंजनासाठी काहीतरी हवे असते आणि त्यामुळे आपल्याला टेलिग्राम स्टिकरांचा योग्य पद्धतीने वापर करता येईल.

टेलिग्राम स्टिकर्स मध्ये आपल्याला भरपूर प्रकार बघायला मिळतात जसे प्राण्यांचे, माणसांचे, सेलिब्रिटींचे, कार्टून्स, नवीन मेम्स वर आणि इतर अनेक stickers बघायला मिळतील. आणि मला खात्री आहे की आपल्याला आपल्या अपेक्षा पेक्षा जास्तच telegram stickers पाहायला मिळतील.

सिक्युरिटी | Security

आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला सुरक्षेची खूप गरज असते आणि मुख्य तर इंटरनेटवर, सोशल मीडियावर. त्यामुळे प्रत्येकजण आधी हाच विचार करत की आपली माहिती गुप्त राहील का, आपली चॅटिंग गुप्त राहील का, जे मी माझी वैयक्तिक माहिती शेअर केली आहे ती सुरक्षित राहील का असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. परंतु यात आपल्याल योग्य ठिकाण निवडणे कठीण होते तर टेलिग्राम हे आपल्यासाठी उत्तम आहे.

जर आपण telegram secret chat चा वापर कराल तर सेक्युरिटीची बिलकुल काळजी करू नका कारण सिक्रेट चॅट मध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात सुरक्षा मिळते. आणि आपण टेलिग्रामवरून फोन करतात तोही सुरक्षेने होतो.

टेलिग्राम कसे यूज करावा? How To Use Telegram In Marathi

टेलिग्राम यूज करण्यासाठी आधी ते ऍप आपल्याल डाऊनलोड करायला लागेल जर आपण अँड्रॉइड वापरत असाल तर प्ले स्टोअरवर आपल्याला टेलिग्राम ऍप उपलब्ध होईल, जर आपण आयओएस वापरत असेल तर आप्पल स्टोअरमध्ये, जर आपण कॉम्प्युटर वापरत असाल तर telegram software आपण डाऊनलोड करून यूज करू शकता.

टेलिग्राम हे व्हॉटसअप ऍप सारखेच आहे आणि आपण हे चॅटिंग करण्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि हे व्हॉटसअप पेक्षा सुद्धा खूप उत्तम ऍप आहे.

टेलिग्राम ऍप हे आतून व्हॉटसअप ऍप सारखेच दिसण्यात असते त्यामुळे आपल्याल हाताळण्यास सोपे जाईल.

जर आपल्याला चॅनल्स ला जॉईन व्हायचे असेल तर आपण आपले आवडते चॅनल निवडून जॉईन बटन वर क्लिक करून जॉईन होऊ शकता. आणि तसेच आपण टेलिग्राम ग्रुप्स ला सुद्धा जॉईन होऊ शकतात.

जर आपल्याला समोरच्याला फोन लावायचा असेल तर कॉल च्या चिन्हावर क्लिक करून फोन करू शकतात.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap