दम व्हेज बिर्याणी रेसिपी: हॉटेलची स्वादिष्ट गुपित रेसिपी सविस्तर

आज मी आपल्याला दम व्हेज बिर्याणी रेसिपी घरी कशी बनवायची तेही एकदम हॉटेल स्टाईल मध्ये सांगणार आहे म्हणजेच Veg Biryani Recipe In Marathi सोप्या भाषेत सांगणार आहे.

जर आपण ही कृती आमच्या सांगण्यावरून हुभेहुभ बनवली तर नक्कीच ही स्वादिष्ट आणि चवदार बनेल तर खाली दिलेली कृती स्टेप बाय स्टेप अनुसरण करा.

व्हेजिटेबल बिर्याणी ही एक शाकाहारी डिश आहे आणि मुख्यतः जे लोक मांसाहारी नसून शाकाहारी आहे त्यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. शाकाहारी बिर्याणी मुख्यतः भात आणि भाज्यांपासून बनवली असते परंतु हिला बनवण्याची विधी पूर्णपणे वेगळी असते. रंगीबेरंगी भाज्या, भात आणि त्यात चविष्ट मसाले टाकून जी चव येते ना ती एकदम कडकच!


दम व्हेज बिर्याणी रेसिपी मराठी मध्ये | Veg Biryani Recipe In Marathi

मी जी रेसिपी सांगणार आहे ती अगदी सोपी रेसिपी आहे आणि मी खात्री देतो जर तुम्ही काळजीपूर्वक वाचली तर नक्कीच तुमच्या हातून एक स्वादिष्ट व्हेज बिर्याणी बनेल.

व्हेज बिर्याणी मध्ये मुख्य दोन गोष्टी आहेत, भाज्या आणि भात ज्यांच्याशिवाय ती अपूर्णच आहे.

भाज्यांमध्ये तुम्ही त्या भाज्या निवडू शकता ज्या तुमच्या घरात उपलब्ध असतील, जे माझ्या घरात उपलब्ध होते त्या मी घेतल्या आहे जर शक्य झाल्या तर त्या घ्या कारण त्या सहज मिळणाऱ्या भाज्या आहेत.

माझ्या मते व्हेज बिर्याणी तेव्हाच सुंदर चव देते जेव्हा भात आणि भाज्यांचे गुणोत्तर प्रमाण सारखे असेल, तर मी इथे जेवढा तांदूळ तेवढेच भाज्या घेणार आहे (सर्व भाज्या एकत्र करून तेवढे प्रमाण).


साहित्य

जेवढे तांदूळ घ्याल तेवढेच भाज्या(सर्व एकत्र) घ्या. मी 3 वाटी तांदूळ घेत आहे.

तांदूळ (बासमती)

गाजर

कोबी

बटाटे

बीन्स

पनीर (पर्यायी)

कांदा

वाटाणे (मटार)

कोथिंबीर

मीठ

मिरची पावडर

हळद

दालचिनी

जावित्री (जायफळ)

इलायची

शाही जिरे

लसूण पेस्ट

अद्रक पेस्ट

इलायची पावडर

हिरवी मिरची

पुदिनाचे पाने

दही

तेल किंवा देसी तूप

गुलाब पाणी

केवडा पाणी

केसर


कृती

1) सर्व भाज्या आणि पनीर योग्य त्या आकारात कापून घ्या, त्यात बीन्स चे 1, 2 इंच एवढे तुकडे करा. 3 वाटी तांदूळ ला अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा.

भाज्या शिजवा

2) एका मोठ्या वाटीत सर्व भाज्या टाका, त्यात अर्धा चमचा हळद, मिरची पावडर, मीठ, दालचिनी, अखंड इलायची, चिमूटभर इलायची, शाही जिर, पुदिना, एक-दोन इंच एवढी कापलेली हिरवी मिरची आणि थोडी दही (3-4 चमचे). आता याचे व्यवस्थित मिश्रण करून घ्या आणि याला बाजूला ठेउन भाताची स्टेप(4) करा.

2) नॉन स्टीक कढई मध्ये 1 वाटी तेल गरम करा त्यात 2 वाटी कांदा टाका आणि त्याला हलके ब्राऊन होई पर्यंत तळून घ्या, लक्षात घ्या जास्त जळू देऊ नका. नंतर कांद्यांना गाळून घ्या आणि जे तेल बाजूला निघेल तर ते पुढे आपल्याला कामात येणार आहे. हे तेल तुम्ही स्वयंपाकात इतर भाज्यांमध्ये देखील वापरू शकता कारण यांची चव अतिशय सुंदर येईल.

3) नंतर पुन्हा 2 चमचे तेच तेल टाकून आणि अर्धा चमचा लसूण पेस्ट आणि अद्रक पेस्ट टाकून कांदे ब्राऊन करून घ्या. एक छोटा चमचा कांदे बाजूला काढून घ्या. कांद्याचा कढईत ज्या आपण भाज्या केल्या होत्या त्या टाका. त्याला चांगले परतवून घ्या आणि पाच मिनिट उच्च ज्योत(हाय फ्लेम) वर शिजवून घ्या. लक्षात घ्या की भाज्या पूर्णपणे शिजलेल्या नको कारण भाताबरोबर त्या अजून शिजणार आहेत तेव्हा त्या गळून जाऊ नको. नंतर त्यात वाटाणे टाकून मिक्स करून घ्या.

भात शिजवा

4) कढईत 3 लिटर पाणी (तांदूळ पूर्णपणे भिजेल आणि पाणी उरून राहील) गरम करायला ठेवा, त्यात 3-4 अखंड इलायची, 2-3 हिरवी मिरची, 2 दालचिनी, 2 चमचे मीठ(जास्त), ते बाजूला काढलेले तेल 1 चमचा टाका. याला 5-6 मिनिट उकळून घ्या.

5) नंतर पाण्यातील सर्व मसाले वरच्यावर गाळणीने काढून घ्या. पाण्यात 1 चमचा गुलाब जल आणि केवडा पाणी टाका. आधी भिजवून ठेवलेल्या तांदूळ ला गाळून, आता तयार केलेल्या पाण्यात टाका. भात जवळ जवळ 80% शिजवा आणि त्याला एका वाटीत गाळून घ्या. गाळलेले पाणी पुढे कामात येईल.

दम व्हेज बिर्याणी शेवट

6) आता भाज्या शिजवलेल्या कढईत भाज्यांच्या वर भाताचा थर लावा, त्यात 1 छोटी वाटी तांदुळाचे पाणी, 2 चमचे केसर, 3 चमचे ब्राऊन कांद्याचे तेल (आधी बाजूला काढलेले), ब्राऊन कांदे (आधी बाजूला काढलेले), थोडा पुदिना(8-10 पाने), थोडी कोथिंबीर टाका.

7) पिठाच्या गोळ्याला लोळून लांब करून घ्या आणि कढईच्या कडांना लावून घ्या आणि त्यावर हाताने थोडे पाणी लावा. त्यावर झाकण दाबून लावा आणि पिठाला चांगले दाबून द्या. आता आधी हाय फ्लेम् वर 1 मिनिट शिजवा आणि नंतर 10-12 मिनिट याला हलक्या आचेवर शिजवून घ्या.

8) नंतर ह्या कढईला हळुवार आणि काळजीपूर्वक उघडून घ्या, लक्षात घ्या काही मधल काही हलू नये.

9) नंतर हळूहळू कोपऱ्याने चमच्याने मिक्स करा. आणि आता याला सर्व्ह करा.

टीप: व्हेज बिर्याणी आपण लोणचं आणि कोशिंबिरी सोबत खाल तर याची चव अजून खुलून येईल.


वर्षानुवर्ष बिर्याणी ही चालत आली आहे आणि त्यातच व्हेज बिर्याणी लोकांकडून जास्त पसंद केली जात आहे. मुख्यतः व्हेज बिर्याणी शाकाहारी लोकांसाठी खास आहे कारण मटण बिर्याणी ही शाकाहारी लोक खात नाही त्यामुळे. बिर्याणी भारतातील काण्या कोपऱ्यात प्रसिद्ध आहे, विशेषतः हैदराबाद मध्ये तर खूप. भारत हा खाण्याच्या गोष्टीत ही खूप शौकीन आहे आणि त्यातच भारतीय लोक प्रत्येक पदार्थाला त्यांच्या पद्धतीने बनवून त्याला एक वेगळीच चव देतात तशीच ही रेसिप एक आपल्या आताच एक वेगळी आहे.

जर आपण ही व्हेज बिर्याणी चे शौकीन असाल तर ह्यात आपण शाकाहारी आहेत की मांसाहारी याचा प्रश्न नाहीये कारण व्हेज बिर्याणी ही दोघांसाठी आहे. आशा करतो की दम व्हेज बिर्याणी रेसिपी आपल्याला नक्की आवडली असेल कारण ही एकदम हॉटेल स्टाईल मध्ये आणि एका वेगळ्याच ढंगात आहे.

Veg Biryani Recipe In Marathi हा लेख लिहिण्याचा उद्देश फक्त आपल्या मराठी मंडळींना बिर्याणीची कृती मराठी मध्ये मिळावी एवढाच आहे, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते आम्हाला खाली कमेंट मध्ये कळवा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap