विराट कोहली माहिती मराठी | Virat Koli Information in Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला विराट कोहलीची माहिती मराठी मध्ये सांगणार आहे, म्हणजेच Virat Kohli Information In Marathi त्यांची जीवनी आत्मसात करून देणार आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार आणि एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळख असलेला विराट हा भारतीय क्रिकेटची जणू शानच आहे. एकापाठोपाठ एक असंख्य रेकॉर्डस् तोडत आणि ते रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करत विराट ची कारकीर्द पुढे सुरूच आहे. अगोदर फलंदाज म्हणून भारतीय संघात आलेला हा विराट कोहली आता संपूर्ण भारतीय संघाचे कर्णधारपद यशस्वीपणे सांभाळत आहे.

आज आपण विराट कोहली यांच्या विषयी संपूर्ण माहिती (निबंध) जाणून घेणार आहोत. विराट यांचे बालपण, त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती, त्यांच्या क्रिकेट करियरची सुरुवात, रेकॉर्डस् आणि वैयक्तिक जीवनाविषयी (Virat Kohli Childhood Information, Virat Kohli Family Members, Virat Kohli Cricket Career, Virat Kohli Records, Virat Kohli's Personal Life) आज आपण जाणून घेणार आहोत.


विराट कोहली विषयी थोडक्यात माहिती | Virat Kohli Quick Information in Marathi

पूर्ण नाव (Full Name)-

विराट प्रेम कोहली

टोपण नाव (Nickname)-

चिकू

आईचे नाव (Mothers Name)-

सरोज कोहली

वडिलांचे नाव (Father's Name)-

प्रेम कोहली

पत्नीचे नाव (Wifes Name)-

अनुष्का शर्मा

जन्म तारीख (BirthDate)-

5 नोव्हेंबर 1988

जन्मस्थळ (Birthplace)-

दिल्ली, भारत

धर्म (Religion)-

हिंदू

जात (Caste)-

खत्री

राशी (Zodiac Sign)-

वृच्चिक

मातृभाषा (Mother Tongue)-

पंजाबी

राष्ट्रीयत्व (Nationality)-

भारतीय

होमटाऊन (Hometown)-

नवी दिल्ली

वय (Age)-

32 वर्ष (2021)

उंची (Height)-

5 फूट 9 इंच

शिक्षण (Education)-

12 वि

प्रशिक्षक (Coach)-

राज कुमार शर्मा

बॅटिंग शैली (Batting Style)-

राईट हॅन्ड बॅट्समन


विराट कोहली यांचे बालपण व परिवार | Virat Kohli's Childhood And Family

Virat Kohli Information In Marathi

Credit: Instagram

विराट यांचे कुटुंब हे पंजाबी कुटुंब होते. गुन्हेगारी वकील असलेल्या प्रेम कोहली आणि सरोज कोहली यांच्या एका सामान्य कुटुंबात विराट यांचा जन्म हा 5 नोव्हेंबर 1988 रोजी झाला. विराट यांच्या जन्माआधी प्रेम आणि सरोज कोहली यांना दोन आपत्य होती. एक मुलगा आणि एक मुलगी! विराट यांच्या भावाचे नाव विकास तर बहिणीचे नाव भावना कोहली- धिंग्रा आहे. विराट कोहली यांचे काही काळापूर्वीच लग्न झाले असून त्यांच्या पत्नीचे नाव हे अनुष्का कोहली आहे. त्यांचे कुटुंब आजही एकत्रच आहे.

विराट यांना लहानपणापासूनच क्रिकेट खेळाची आवड होती. अगदी 3 वर्षाचे असताना त्यांना त्यांच्या खेळण्यामधील बॅट जास्त आवडली होती असे त्यांचे वडील सांगतात. त्यांचे वडील हे लहानपणापासून त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत असे. त्यांना लहानपणी आवडलेली बॅट आता वेळेनुसार त्यांच्या छंदात रूपांतरित होत होती. बालपणीच वडिलांनी त्यांची आवड ओळखून त्यांना क्रिकेट साठी सराव लावला होता.

विराट कोहली यांचे शालेय शिक्षण हे विशाल भारती पब्लिक स्कूल मधून झाले. शालेय शिक्षण घेत असताना त्यांची आवड ही शिक्षणात कमी आणि क्रिकेटमध्ये जास्त दिसत होती. त्यांचे क्रिकेट क्लब मध्ये ऍडमिशन घेतले गेले तेव्हाच ते मात्र 8 वर्षांचे होते. विराट यांच्या विशाल भारती पब्लिक स्कूल मध्ये शिक्षणाशिवाय सर्वांगीण विकासावर जास्त लक्ष दिले जाते नव्हते आणि मूळ म्हणजे खेळाला या शाळेत काहीच महत्व नसल्याने विराट यांना 9 वि इयत्तेनंतर त्यांच्या वडिलांनी दुसऱ्या शाळेत घातले. इयत्ता नववी नंतरचे शिक्षण सेविअर कॉन्व्हेंट सिनियर सेकंडरी शाळा, पश्चिम विहार दिल्ली येथे झाले. अभ्यासात जास्त आवड नसल्याने मात्र खेळात उत्तम प्रदर्शन करत असल्याने त्यांनी फक्त इयत्ता 12 वि पर्यंत शिक्षण घेतले. क्रिकेट कडे त्यांचे पूर्ण लक्ष केंद्रित होते.


विराट कोहलीचे वैवाहिक जीवन, पत्नी | Virat Kohli Marriage Life & Love Life

Virat Kohli Marriage Life, Wife Information In Marathi

Credit: Instagram

आपण सर्वांना माहितीच असेल की क्रिकेटर विराट कोहली यांचे लग्न महशुर अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याशी झाले परंतु काय आपल्याला माहिती आहे या आधीही विराटचे काही अफेअरस होते!

बातम्यांनुसार सराह जाने दिस ही त्यांची पहिली गर्लफ्रेंड होती. ती मिस इंडिया असल्या सोबत बॉलिवूड अभिनेत्री देखील होती. ती काही वेळेस विराटचे सामने देखील पाहायला गेली आहे. परंतु हे नाते त्यांचे जास्त वेळ टिकले नाही. मॉडेल संजना शी त्याचे नाव जोडले गेले परंतु त्यांनी ह्या नात्याला फक्त अफवा असून चांगले मित्र आहोत असे सांगितले. तमन्ना भाटिया साऊथ ची अभिनेत्री आणि विराटची भेट एका जाहिराती दरम्यान झाली आणि नंतर त्यांच्या अफेअर च्या बातम्या बाहेर आल्या, हेही संबंध फारसे टिकले नाही. ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेल लिइट भारतात कामानिमित्त एका वर्षाहून अधिक वेळ राहिल्या तेव्हा त्यांची आणि विराटची डेटींग ची बातमी बाहेर आली, परंतु जास्त काळ टिकले नाही.

2013 मध्ये विराट कोहलीची ओळख अभिनेत्री अनुष्का शर्मा शी एका ॲड दरम्यान झाली. नंतर त्यांची चांगली मैत्री झाली आणि ती मैत्री हळू हळू प्रेमामध्ये वळु लागली. त्यांच्या अफेअर आणि डेटिंग च्या बातम्या बाहेर येऊ लागल्या. अनुष्का विराटच्या क्रिकेट सामना पहायला देखील जायची. अखेर 2017 मध्ये विराटचे नाव अनुष्काशी जोडले गेले म्हणजेच त्यांचे इटली येथे लग्न झाले.


विराट कोहली यांचे क्रिकेट करिअर | Cricket Career of Virat Kohli

सध्याच्या काळात आपण विराट कोहली यांना जरी एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखत असलो तरी देखील त्यांचा संघर्ष प्रवास हा खडतर आहे. विराट कोहली यांना प्रशिक्षण देण्यात राज कुमार शर्मा यांचा मोलाचा वाटा आहे. विराट यांना शर्मा सरांनी दिल्लीच्या क्रिकेट अकॅडमी मध्ये त्यांचे टॅलेंट बघून प्रशिक्षण दिले. विराट कोहली यांच्याविषयी त्यांचे कोच हे देखील सांगतात की विराट जेव्हा बाकी सर्व विद्यार्थी एखाद्या कारणामुळे गैरहजर रहात असतील तेव्हा मात्र विराट क्लबला येऊन आणखी जास्त सराव करत असत.

2002 साली विराट यांची निवड ही अंडर 15 साठी झाली आणि त्यात त्यांनी अनेक सामने देखील खेळले. 2002 साली झालेल्या पॉली उमरीगर ट्रॉफी मध्ये त्यांनी सर्वाधिक रन्स देखील बनवले. 2004 मध्ये त्यांनी अंडर 17 देखील खेळले. विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये विराट यांनी 4 सामन्यांमध्ये 2 शतक झळकवत 470 रन बनवले. त्यांच्या या प्रदर्शनामुळे त्यावर्षी विजय मर्चंट ट्रॉफी दिल्ली संघाने जिंकली. दिवसेंदिवस त्यांच्या खेळामध्ये सुधारणा होतच राहिली. त्यामुळे 2006 मध्ये त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये निवड देखील झाली. 2006 मध्ये त्यांनी पहिला सामना हा तामिळनाडू विरोधात खेळला. पहिल्या डावात त्यांना मात्र 10 रन बनवता आले परंतु त्यांनी पुढील सामन्यात कर्नाटक संघाच्या विरोधात 90 रन बनवले. 2006 साली त्यांनी आधार गमावला होता. त्यांनी क्रिकेट खेळात करियर करावे म्हणून धडपडणारे त्यांचे वडील प्रेम कोहली यांचे निधन झाले होते.

त्यांच्या करियरला खरी कलाटणी ही 2008 साली आली. अंडर 19 क्रिकेटमध्ये त्यांची निवड झाली. इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत विराट यांनी 105 रणांच्या सरासरीने भारताला विजय मिळवून दिला. पहिला अंडर 19 वर्ल्ड कपचा सामना विराट यांनी भारतीय संघाकडून मलेशिया विरुद्ध खेळला. विशेष म्हणजे या सामन्यात त्यांनी मलेशिया संघावर विजय मिळविला. त्यांचे प्रदर्शन बघून सर्व निवडकर्ते हे चकित झाले होते.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय करियर

केवळ 19 वय असताना विराट यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये निवड देखील झाली. सचिन आणि सेहवाग हे दोन्ही भारतीय सलामीवीर जखमी असल्याने विराट यांना संघात स्थान मिळाले. त्यांनी पहिला सामना हा वयाच्या 19 व्या वर्षी श्रीलंका संघाच्या विरोधात खेळला. पहिल्या सामन्यात विराट हे केवळ 12 धावा बनवू शकले. परंतु त्यांनी चौथ्या सामन्यात 54 धावांची खेळी करत पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाची मदत म्हणून भारतीय संघाने तो सामना जिंकत मालिका नावावर केली.

एकदा आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाल्यानंतर विराट त्या संधीचा फायदाच घेत राहिले. 2009 साली युवराज सिंग जखमी झाल्यानंतर विराट यांना पुन्हा एकदा संधी मिळाली. यावेळी ते आयसीसी च्या चॅम्पियन्स ट्रॉफी साठी भारताकडून खेळत होते. एका सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिज संघाच्या विरुद्ध नॉट आउट 79 रन बनविल्याने त्यांना सामनावीर (मॅन ऑफ द मॅच) घोषित करण्यात आले. श्रीलंके विरुद्ध 2009 साली खेळल्या गेलेल्या मालिकेत विराटने चौथ्या सामन्यात 107 रन बनवून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेतील पहिले शतक झळकावले.

2010 मध्ये विराट यांना एशिया कप मध्ये सर्व सामने खेळायला मिळाले परंतु त्यांचे प्रदर्शन काही खास राहिले नाही. फॉर्म काही ठीक नव्हता परंतु एक चांगला खेळाडू कधीही कमाल करू शकतो याची जाणीव निवड समितीला होती. त्यामुळे पुढेही विराटला खेळण्याची संधी मिळत राहिली. पुढील प्रत्येक मालिकेत त्यांची निवड ही होतच राहिली.

पुढे 2010 मध्येच ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात त्यांनी चांगले प्रदर्शन केले. न्यूझीलंड दौऱ्यावर तर त्यांनी शतक बनवत मॅच विनिंग पारी खेळली. न्यूझीलंड दौऱ्यावर भारताची कामगिरी ही सर्वात उत्तम होती. न्यूझीलंड संघाला 5-0 ने धूळ चारत पुढे येणाऱ्या वर्ल्ड कप साठी भारतीय संघ हा विजेतेपदाचा दावेदार बनला होता. वर्ल्ड कप आधी झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात देखील विराट यांनी दोन अर्धशतक झळकावले आणि मालिकेत सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज बनले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतक्या कमी वयात त्यांनी आयसीसी वनडे रँकिंग मध्ये दुसरा क्रमांक मिळविला होता.

अखेर पुढे आलेल्या 2011 वर्ल्ड कप मध्ये देखील विराट यांची इतक्या कमी वयात आणि अनुभवात निवड देखील झाली. वर्ल्ड कप मध्ये देखील त्यांनी त्यांची कामगिरी तशीच सुरू ठेवली. पहिल्याच बांगलादेश विरुद्ध सामन्यांमध्ये विराटने 100 रणांची खेळी करत भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवून दिला. या शतकाने त्यांना भारताकडून विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सामन्यात शतक ठोकणार्ऱ्या पहिल्या खेळाडूचा मान मिळवून दिला. पुढे जाऊन त्यांचे प्रदर्शन तसे जास्त खास नव्हते परंतु अखेरच्या सामन्यात त्यांनी गौतम गंभीरला साथ देत बनवलेले 35 रन हे खूप महत्वाचे होते. अखेर भारताने हा 2011 सालचा वर्ल्ड कप जिंकला!


कसोटी क्रिकेट करियर

विराट यांनी 2011 साली कसोरी क्रिकेट खेळायला देखील सुरुवात केली. कसोटी क्रिकेट मध्ये देखील त्यांनी त्यांचा फॉर्म हा कायम ठेवत सुरुवातच दमदार केली. वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी मालिकेत त्यांना यश मिळाले नाही. त्याच वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील त्यांना संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या या मालिकेत त्यांनी सर्वाधिक रन तर बनवलेच परंतु अखेरच्या सामन्यात 116 रन बनवत कसोटी क्रिकेट मधील पहिले शतक देखील झळकावले.

पुढे त्यांनी हा फॉर्म काही सोडला नाही. बांगलादेश आणि इंग्लंड संघाच्या विरोधी खेळल्या गेलेल्या सलग दोन मालिकांमध्ये द्विशतक बनवणारे ते पहिले खेळाडू बनले.


टी-20 करिअर

2010 साली विराट कोहली यांनी ट्वेंटी ट्वेन्टी मध्ये पदार्पण केले. 2012 मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांनी पहिले टी-20 अर्धशतक झळकावले. 2014 च्या टी 20 विश्वचषकात विराट कोहली यांचे प्रदर्शन अगदी खास राहिले. भारतात सेमिफायनल मध्ये विजयासाठी 173 धावा गाठायच्या होत्या तेव्हा 44 चेंडूत 72 धावा बनवून विराट कोहली यांनी त्यांच्या करियरची सर्वात उत्कृष्ट खेळी केली होती.

आत्ता 2019 मध्ये वेस्ट इंडिज विरोधात 94 धावांची खेळी करत सर्वाधिक रन बनवले. विराट हे भारताकडून टी 20 आंतरराष्ट्रीय करियर मध्ये 3000 रन बनवणारे पहिले खेळाडू आहेत.


आयपीएल करियर

विराट यांनी 2008 मध्ये आयपीएल मध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्यांची सुरुवात ही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून झाली परंतू त्यांचे प्रदर्शन हे काही खास नव्हते. पुढील वर्षी मात्र त्यांनी चांगले प्रदर्शन केले आणि त्यांची टीम ही उपांत्य सामन्यात देखील पोहोचली. 2011 मध्ये उप कप्तान आणि पुढे डॅनियल विटोरी यांच्या जखमी असल्याने कप्तान म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. 2013 साली डॅनियल व्हीटोरी निवृत्त झाल्यानंतर विराट यांच्याकडे रॉयल चॅलेंजर्स चे कर्णधारपद देण्यात आले.

2016 हे वर्ष त्यांच्यासाठी जास्त खास राहिले कारण तेव्हाच त्यांनी जवळपास 81 च्या सरासरीने 16 मॅच मध्ये सर्वाधिक रन बनवले. आजही त्यांच्या संघाचे आयपीएल मधील प्रदर्शन हे म्हणावे तितके खास नाहीये परंतु तरी देखील त्यांचा संघ आयपीएल मध्ये लोकप्रिय आहे.


विराट कोहली रेकॉर्डस् | Records Of Virat Kohli

Virat Kohli Information In Marathi

Credit: Instagram

विराटच्या नावावर आयसीसी रँकिंगमध्ये सर्वाधिक म्हणजे 922 पॉईंट्स असण्याचा रेकॉर्ड आहे.

कर्णधार म्हणून टेस्ट क्रिकेट मध्ये 6 द्विशतक झळकावण्याचा विक्रम हा विराट कोहली यांच्या नावावर आहे. याआधी 5 द्विशतकांसह हा विक्रम ब्रायन करा यांच्या नावावर होता.

कसोटी क्रिकेट मध्ये 150 हुन अधिक रन सर्वाधिक म्हणजे 9 वेळा बनवण्याचा विक्रम देखील विराटच्या नावावर आहे.

एक वर्षात सर्वाधिक रन बनवण्याचा रेकॉर्ड देखील विराटच्या नावावर आहे आणि तो एकदा नव्हे तर 2010 पासून 2016 पर्यंत सलग 7 वर्ष हा रेकॉर्ड त्याच्या नावावर होत राहिला.

2018 साली कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक रन बनवणारा खेळाडू म्हणून विराटच्या नावावर विक्रम आहे.

भारताकडून सर्वाधिक शतक बनविणारा सचिन नंतर विराट दुसरा खेळाडू आहे.

आयपीएल मध्ये 6000 रन बनवणारा विराट हा पहिला खेळाडू आहे.

विराट हा सर्वात लवकर 1000, 5000, 6000, 7000, 8000, 9000, 10000 धावा गाठणारा भारतीय खेळाडू आहे.

विराट हा पहिला भारतीय खेळाडू आहे त्याची सरासरी ही तिन्ही फॉरमॅट मध्ये 50 च्या वर आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग 3 वेळा शतक ठोकणारा विराट हा पहिला भारतीय खेळाडू आहे.


विराट कोहली यांना मिळालेले पुरस्कार | Awards Winned By Virat Kohli

Virat Kohli Awards Information In Marathi

Credit: Instagram

विराट यांना त्यांच्या क्रिकेट मधील प्रदर्शनासाठी आणि भारताचे नाव उंचावण्यासाठी अनेक खेळाशी निगडित पुरस्कार आणि नागरी सन्मान मिळाले आहेत. 2013 मध्ये त्यांना सर्वात आधी अर्जुन पुरस्कार या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. नागरी पुरस्कारांमध्ये चौथ्या क्रमांकाचा असणारा पद्मश्री पुरस्कार देखील विराटला 2017 साली देण्यात आला. क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा आणखी एक मोठा सन्मान म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (सध्याचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार) हा 2018 साली विराट कोहलीला देऊन सन्मानित करण्यात आले.

क्रिकेट क्षेत्रात त्यांना अनेक पुरस्कार हे मिळालेले आहेत, त्यांची यादी खालीलप्रमाणे-

सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी (ICC क्रिकेटर ऑफ द इअर) : 2017, 2018

सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी (ICC क्रिकेटर ऑफ द डिकेड 2011-20)

आयसीसी ओडीआय प्लेयर ऑफ द इअर : 2012, 2017, 2018

आयसीसी टेस्ट प्लेयर ऑफ द इअर : 2018

आयसीसी स्पिरिट ऑफ द क्रिकेट : 2019

आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द डिकेड : 2011-20

पॉली उमरीगर अवॉर्ड फॉर इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इअर : 2014, 2015, 2016, 2017

विसडन लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड : 2016, 2017, 2018

CEAT इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इअर : 2011-12, 2013-14,2018-19

पीपल्स चॉईस अवॉर्ड इंडिया फॉर फेव्हरेट स्पोर्टसमनशिप : 2012


विराट कोहलीचे सोशल मीडिया | Virat Kohli's Social Media Accounts

फेसबुक (Facebook)- https://www.facebook.com/virat.kohli

ट्विटर (Twitter)- https://twitter.com/imVkohli?s=09

इंस्टाग्राम (Instagram)- https://www.instagram.com/virat.kohli


निष्कर्ष

Virat Kohli Information In Marathi Language हा लेख फक्त आपल्या क्रिकेट चाहत्यांसाठीच नाही तर सर्व भारतीय जनतेसाठी आहे कारण भारताला गर्व मिळवून देणाऱ्या खेळाडूंची माहिती माहीत असणे गरजेचे आहे.

विराट कोहली यांच्याविषयी संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. विराट कोहली बायोग्राफी मराठी किंवा विराट कोहली यांचे जीवन चरित्र किंवा विराट कोहली यांच्याविषयी मराठी माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा. विराट कोहली यांच्याविषयी तुमच्याकडे आणखी काही माहिती असेल तर ती देखील सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap